विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 9 May 2019

खून: मराठ्यांच्या विश्वासाचा. खून: स्वजातीच्या अभिमानाचा आणी पराक्रमाचा.भाग 10

खून: मराठ्यांच्या विश्वासाचा.
खून: स्वजातीच्या अभिमानाचा आणी पराक्रमाचा.

पोस्टसांभार : सतीश शिवाजीराव कदम

भाग 10

आता अत्यंत महत्वाचे:
पिलाजीच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी ना उमेद न होता पिलाजीचा मुलगा दमाजी ( दुसरा ) आणि पिलाजीचा भाऊ महादेव यांच्या नेतृत्वाखाली अभयसिंहाच्या मुघली सैन्यावर जोरदार हल्ले सुरु केले.
मराठ्यांचे हे हल्ले इतके प्रखर होते कि अभयसिंहाला मराठ्यांच्या धाकाने रात्री धड झोपताही येत नसे.
महाराष्ट्र धर्मचे लेखक सतीश शिवाजीराव कदम यांच्या अभ्यासानुसार; पिलाजीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी चिडून जाऊन आता खुद्द अत्यंत वेगाने उमाबाई दाभाडे आणि कंठाजी कदम बांडे हे ३० हजार शूर मराठ्यांची फौज घेऊन पिलाजीचा मुलगा दमाजी आणि पिलाजीचा भाऊ महादेव गायकवाड यांच्या मदतीला धावून आले.
आता मराठ्यांच्या जबरदस्त वादळाच्या तडाख्यात अभयसिंह सापडला होता. 'कुठूनही आपण जिवंत परत जात नाही आणि मराठे आपले मुंडके कापून भाल्याला लावून सगळीकडे मिरवतील..' ह्या भीतीने घाबरून जाऊन अभयसिंहाने उमाबाई दाभाडे यांच्याशी तहाचे बोलणे लावले.
पण मराठ्यांनी तहाच्या ह्या बोलण्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आणि सरळ हत्येचा बदला आता हत्या करूनच घ्यायचे असे ठरविले.
मराठ्यांनी सरळ अभयसिंहाचे मुख्य ठाणे असलेल्या अहमदाबादेवरच चाल केली.
मराठ्यांचा अहमदाबादेवरचा हल्ला इतका भयंकर होता कि अभयसिंहाच्या फौजेने लढाई न करताच रणांगणातून पळ काढला. मराठ्यांनी अहमदाबादच्या आजूबाजूचा सगळा परिसरही जिंकून घेतला.

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...