खून: मराठ्यांच्या विश्वासाचा.
खून: स्वजातीच्या अभिमानाचा आणी पराक्रमाचा.

पोस्टसांभार : सतीश शिवाजीराव कदम
भाग 11
शेवटी हार जाऊन अभयसिंहाने मराठ्यांना चौथाई देण्याचे मान्य केले आणि अहमदाबादेच्या वेढा उठविण्यासाठी उमाबाई दाभाडे यांस ८० हजार रुपये देऊ केले.
घाईघाईने आपला जीव वाचवून आता अभयसिंह रातोरात जोधपूरला पळून गेला.
राजवाडे लिखित पेशवे शकावलीत ह्या संबंधी फार मार्मिक वर्णन आहे ते असे, "पिलाजीच्या मरणामुळे अभयसिंह लाभ चिंतीत होता; तो त्यास प्राप्त झाला नाही. पिलाजीचा मित्र पाद्रा या गावचा ठिकमा नावाचा देसाई होता. त्याने पिलाजीचा भाऊ महादेव यास बोलावून आणुन बडोदे किल्ला त्याने घेतला. तो अद्यापपर्यंत गायकवाड यांच्या वंशजांकडे आहे.
पिलाजीचा वडील पुत्र सोनगडास होता. त्याने मोठी मराठ्यांची फौज जमा करून अभयसिंहाच्या जोधपूरपर्यंत स्वाऱ्या करून अभयसिंहास बराच उपद्रव दिला. मराठ्यांच्या भीतीने अभयसिंह काही जोधपूरच्या वेशीबाहेर निघाला नाही.”
बडोद्याचा आणि अभयसिंहाने जिंकलेला गुजराथचा सगळा प्रदेश मराठ्यांनी थोड्याच दिवसांत परत मिळविला. ज्या गायकवाडांचा नाश करण्यासाठी हे कृत्य अभयसिंहाने केले तेच गायकवाड पुढे लवकरच गुजराथेचे स्वामी झाले आणि भारताला स्वातंत्र्य मिळूपर्यंत (१९४७ ) गायकवाडांचा अंमल गुजराथवर चालला.
अभयसिंहाच्या पूर्वचरित्राचा अभ्यास करता आपल्याला असे दिसते कि ह्या अभयसिंहाने आपल्या जन्मदात्या वडिलांचाच सत्तेसाठी खून केलेला आहे.

No comments:
Post a Comment