विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 9 May 2019

खून: मराठ्यांच्या विश्वासाचा. खून: स्वजातीच्या अभिमानाचा आणी पराक्रमाचा भाग 12.

खून: मराठ्यांच्या विश्वासाचा.
खून: स्वजातीच्या अभिमानाचा आणी पराक्रमाचा.

पोस्टसांभार : सतीश शिवाजीराव कदम

भाग 12

महाराष्ट्र धर्मचे लेखक सतीश शिवाजीराव कदम यांच्या अभ्यासानुसार;
'वीर विनोद' या रजपुतांविषयीच्या इतिहास ग्रंथात पुढील माहिती मिळते ती अशी, " एकदा काही मुघल सरदार आणि जयपूरचा सवाई जयसिंह याने जोधपूरच्या ह्या अभयसिंहाला असे सांगितले कि फर्रूखसियर बादशहाच्या खुनाच्या कटात तुझा बाप अजितसिंहाचा हात आहे.
त्यामुळे अजितसिंहाच्या विषयी आता नवीन बादशहा मुहम्मद याच्या मनात खटकते आहे. जर मारवाडचे म्हणजे जोधपूरचे राज्य तुला तुझ्या घराण्यात चालू ठेवायचे असेल तर तू अजितसिंहाला म्हणजे तुझ्या बापाला ठार मारून टाक.
तेंव्हा अभयसिंहाने आपला धाकटा भाऊ बख्तसिंह याला पत्र लिहून त्याचे करवी आपल्या पित्याचा खून करविला आणि मारवाडची गादी मिळविली.
गादी मिळविल्यावर मनाजोगी गोष्ट केल्याबद्दल आपला भाऊ बख्तसिंह याला राजेश्वर हि पदवी देऊन त्याला नागोरची जहागिरी दिली."
ह्याच अभयसिंहाला मराठ्यांच्या कागदपत्रांत ‘ढोकळसिंह’ या नावानेही ओळखतात.
ह्या अभयसिंहाने स्वतःच्याच राजपुतान्यांत जो विध्वंस आणी जाळपोळ केली त्यामुळे ह्याला हे नामाभिधान प्राप्त झाले असे इतिहासकार ‘टॉड’ म्हणतो.
आपल्याच राजपुतान्यांत जाळपोळ, विध्वंस करून आणि जन्मदात्या वडिलांचा खून करून अभयसिंहाने सर्व राजपुतान्यांत आपले तोंड काळे करून घेतले.
शिवाय पिलाजी गायकवाडांस दग्यानें ठार मारण्याची कृती करून आपल्या राठोड घराण्याला तोंड दाखवायला जागा शिल्लक ठेवली नाही.
मराठ्यांनी अभयसिंहाचा बदला घेण्यासाठी केलेल्या जोधपूरपर्यंतच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे आणी जोधपूरच्या आसमंतात मराठा वाघ आपली शिकार टिपण्यासाठी दबा धरून बसू लागल्याने अभयसिंहाला हे कृत्य करणं फारच महागात पडले.
मराठ्यांच्या धाकाने आणी जिवाच्या भीतीने जोधपूरच्या वेशीबाहेर परत कधीही अभयसिंहाला निघता आले नाही.
लेख समाप्त.
लेख कसा वाटला ते जरूर कळवा आणि मित्र-मंडळीस लेख शेअर करायला विसरू नका.
श्री भवानी शंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम
निरंतर

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...