खून: मराठ्यांच्या विश्वासाचा.
खून: स्वजातीच्या अभिमानाचा आणी पराक्रमाचा.

पोस्टसांभार : सतीश शिवाजीराव कदम
भाग 8
पण ‘मिराते-ई-अहमदी’ या फारसी ग्रंथात महंमदखान या इतिहासकाराने पिलाजीच्या छावणीतील मराठ्यांनी बाकीच्या साथीदारांनाही पकडून ठार मारले असे म्हंटले आहे.
दिवस मावळल्यावर २ तासांनी हा दगा केला गेला.
ह्या गोंधळात तोपर्यंत अभयसिंहाच्या दबा धरून बसलेल्या २ हजार निवडक सैन्याला हि खबर कळाली. आणि अंधारात बेसावध असलेल्या मराठ्यांच्या फौजेवर त्यांनी अचानक हल्ला केला.
मराठे अश्या बेसावध अवस्थेत असताना अभयसिंहाच्या २ हजार निवडक स्वारांनी मराठ्यांवर धाड घातली. वाटाघाटीच्या घोळामुळे मराठ्यांचे सैन्य बेसावध होते. अंधारातच जोरदार लढाई सुरु झाली.
इकडे भेटीच्या तंबूतून पिलाजी गायकवाड यांचा देह सुरक्षित ठिकाणी नेऊन मराठे आता जोरदार लढाई करू लागले. वेळ रात्रीची असल्याने मराठ्यांचे मोठे नुकसान झाले.
पिलाजीच्या खुनाची हि घटना २३ मार्च १७३२ या दिवशी डाकोर येथे पिलाजीच्या लष्करी छावणीत घडली.
ह्या हल्यात मराठ्यांचे आणि मुघलांचे किती नुकसान झाले ह्याचे वेगवेगळे आकडे उपलब्ध आहेत.
अभयसिंहाने दिल्लीला बादशहाजवळ असलेल्या अमरसिंह भंडारी या आपल्या वकिलाला २६ मार्च १७३२ रोजी पाठविलेल्या पत्रात म्हंटले आहे कि, "पिलूचा भाऊ मेमा व आणखी ५-७ मातब्बर माणसे मारली गेली. मराठ्यांचे ५०० लोक जागेवरच मारले गेले. आपल्या मुघलांच्या सैन्याने मराठ्यांना मदत करणाऱ्या कोळ्यांच्या वेगवेगळ्या ठाण्यांवर हल्ले करून त्यांच्याही बऱ्याच कत्तली केल्या. ७००-८०० घोडे व बराचसा दारुगोळा आमच्या हाती लागला. शिवाय मिळालेली लूट मोठी आहे. या प्रसंगी आमचे फक्त ५० लोक
मारले गेले. शिवाय आपले २०० लोक जखमी झाले."
अभयसिंहाने मुघली रिवाजाप्रमाणे मारले गेलेल्या मराठ्यांच्या आकडा फुगवून सांगितला आहे. ह्याला पुरावा म्हणजे पिलूचा भाऊ मेमा मारला गेला असे जे अभयसिंह म्हणतो ते खोटे आहे.
पिलाजीचा भाऊ महादेव हा पिलाजीच्या मृत्यूनंतर पुढे बऱ्याच मोहिमांमध्ये सहभागी होता हे पुढील पत्रांवरून सिद्ध होते.

No comments:
Post a Comment