विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 9 May 2019

खून: मराठ्यांच्या विश्वासाचा. खून: स्वजातीच्या अभिमानाचा आणी पराक्रमाचा.भाग 9

खून: मराठ्यांच्या विश्वासाचा.
खून: स्वजातीच्या अभिमानाचा आणी पराक्रमाचा.

पोस्टसांभार : सतीश शिवाजीराव कदम

भाग 9

महत्वाचे म्हणजे ह्या कठीण प्रसंगी मराठ्यांनी मुघलांना चांगला चोप देऊन मुघलांची ५० च्या वर माणसे ठार मारली यावरून मराठे बेसावध असतानाही मुघलांना भारी पडले असे दिसून येते.
पिलाजीचे शव पालखीत घालून मराठे डाकोर वरून निघून मही नदी ओलांडून 'सावळी' या गावी येऊन थांबले. 'सावळी' गाव बडोद्याच्या उत्तरेला १४ मैल अंतरावर आहे. 'सावळी' या गावी मराठ्यांनी पिलाजीच्या प्रेताचे दहन करून उत्तरक्रिया केली.
( गायकवाड यांची हकीगत या बखरीत पिलाजीला पालखीत घालून 'सावळी' या गावी आणताच तेथे प्राण गेला व त्यांनतर प्रेताचे दहन केले असे म्हंटले आहे. )
पुढच्या काळात 'सावळी' या गावी पिलाजीची छत्री उभारून तिथे पाण्याचे एक तळेही मराठ्यांनी खोदले.
मराठ्यांनी आता पिलाजीचा निर्घृणपणे आणि दगाबाजीने खून करणाऱ्या अभयसिंहाचा बदला घ्यायचा निर्णय घेतला.
इकडे अभयसिंहाने वेळ दवडू न देता आपल्या तोफखान्यासह मराठ्यांवर चाल केली.
डाकोरच्या तळाचा विध्वंस केल्यावर मराठे मागे सरकले होते. ह्या संधीचा फायदा घेऊन अभयसिंहाने २१ एप्रिल १७३२ रोजी बडोदाही जिंकून घेतले.
मराठे तात्पुरती माघार घेऊन नर्मदेकडे सरकले आणि मराठ्यांनी डभईच्या किल्याचा आश्रय घेतला.
पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतरही अभयसिंहाला डभईचा किल्ला काही जिंकून घेता आला नाही. मराठ्यांनी डभईचा किल्ला झुंजता ठेऊन अभयसिंहास तिथंच खेळवून ठेवले.

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...