विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 13 November 2020

भद्रकाली महाराणी ताराराणी

 मराठा सैन्यातले शूर सरदार संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव ह्यांच्या साथीने महाराणी ताराबाईसाहेबांनी बलाढ्य मुघल सैन्याला सतत हुलकावणी दिली सन १७०५ मध्ये मराठी फौजा नर्मदा ओलांडून थेट माळवा प्रांतात शिरल्या आणि मोगल फौजांना खडे चारले त्या जिंकलेल्या प्रांतांमधून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करून स्वराज्याची तिजोरी आर्थिकदृष्ट्या बळकट केली १७०० ते १७०७ या कालखंडात शेकडो लढाया मराठी भुमीवर झाल्या पण त्याला समर्थपणे तोंड देऊन महाराणी ताराबाईंनी राज्य जिंवत ठेवले ईतकेच नव्हेतर वाढविले सुध्दा महाराणी ताराबाईंसाहेबांनी महाराष्ट्रातील सर्वांना भगव्या झेंड्याखाली एकत्र आणले..

१३ नोव्हेंबर १६८१ ला दक्षिणेत आला होता तेव्हाची घटना
धनाजी जाधव आपल्या १५००० खड्या फौजेस घेऊन गुजरातेत गेले व त्यांनी बादशहाच्या हंगामी सुभेदार अब्दुल हमीदला कैद केले मोगली सैन्याची दाणादाण उडवुन प्रंचड लुट घेऊन ते स्वराज्यात परत आले १,५०,००० फौज, तोफा, हत्ती, घोडे काय वाट्टेल ते सोबत असुनही औरंगजेबास हार पत्कारावी लागत होती बादशहा १३ नोव्हेंबर १६८१ ला दक्षिणेत आला होता तेव्हा पासुन ते १७०७ ह्या २८ वर्षात मोगली नेतृत्वात एकदाही बदल झाला नाही तो स्वतः दक्षिणेत राहून स्वाऱ्या करत होता तर स्वराज्याचा नेतृत्वात तीन वेळेस बदल झाला आधी संभाजी महाराज नंतर राजाराम महाराज व पुढे महाराणी ताराबाईसाहेब एवढे बदल होऊनही औरंगजेबास स्वराज्य काही घेता आले नव्हते ह्या सर्व गोष्टींमुळे आता मात्र तो अंत्यत निराश झाला होता देवाकडे मदत मागत होता पण त्याचाही देव सध्या ‘भद्रकाली’ च्या बाजुने होता मोगली लष्करातील एक आख्खी पिढी (२५ वर्षे) त्याने दक्षिणेत राबविली पण हाती ठोस काहीच लागले नव्हते ९० वर्षांचे आयुष्य जगलेला हा मुघल सम्राट औरंगजेब अत्यंत निराश अवस्थेत २० फेब्रुवारी १७०७ रोजी मरण पावला रणांगणात मृत्यू आलेला हा एकमेव मुघल सम्राट.. पुढील अवघ्या तीन महिन्यातच महाराणी ताराराणींसाहेबांनी अनेक चढाया मारत सिंहगड, पुरंदर, पन्हाळा, सातारा, परळी हे व असे अनेक किल्ले जिंकुन घेत स्वराज्यात आणले...
------------------

भद्रकाली महाराणी ताराराणी बाईसाहेबांनी मनाचा मुजरा...
🙏🙏

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...