१८ ऑगस्ट १७०० श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा जन्म....
बाळाजी विश्वनाथ भट यांचा बाजीराव हा मोठा मुलगा तर चिमाजी आप्पा धाकटा आईचे नाव राधाबाई बाजीरावांचे मूळ नाव विसाजी मात्र बाजीराव बल्लाळ व थोरला बाजीराव या नावानेही प्रसिद्ध होते वयाच्या १३ व्या वर्षी काशीबाई नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला (१७१३) बाजीरावांना चार मुलगे झाले त्यांपैकी नानासाहेब व रघुनाथराव हे पुढे प्रसिद्धीस आले दुसरी पत्नी मस्तानीस समशेर बहाद्दूर नावाचा मुलगा झाला समशेर बहाद्दूर पुढे पानिपतच्या लढाईत (१७६१) ठार झाला आपल्या अवघ्या २० वर्षांच्या कारकीर्दीत बाजीरावांनी ४० महत्त्वाच्या लढाया केल्या त्यात माळवा (डिसेंबर १७२३), धर (१७२४), औरंगाबाद (१७२४), पालखेड (फेब्रुवारी १७२८), अहमदाबाद (१७३१) उदयपुर (१७३६), फिरोजाबाद (१७३७), दिल्ली (१७३७), भोपाळ (१७३८), वसईची लढाई (मे १७३९) या मोठ्या लढायांचा समावेश आहे आणि विशेष म्हणजे सर्व लढायांमध्ये ते अजिंक्य ठरले...
थोरल्या बाजीरावांना पराभूत करणे त्यांच्या शत्रूला कधीही शक्य झाले नाही हिंदवी स्वराज्य सैन्य भिमथडीच्या तट्टांना नर्मदा, यमुनेचे पाणी पाजणारा बाजीराव हा पहिलाच योद्धा होय...
बाजीरांवानी उत्तरेत घुसून गुजरात, माळवा, बुंदेलखंड जिंकून नर्मदा आणि विंध्य पर्वत यातील सर्व महत्त्वाचे व्यापारी मार्ग आपल्या ताब्यात घेतले भविष्यात महाराष्ट्रावर परकीय संकट कोसळू नये म्हणून महाराष्ट्रा च्या बाहेर आपली सत्ता असायला हवी हे जाणून बाजीरावाने उत्तरेत शिंदे, होळकर, बांडे, पवार हे मराठा सरदार उभे केले त्यामुळे ग्वाल्हेर, इंदौर, देवास आदी संस्थानं पुढे आली...
बाजीरावांचा हिंदुस्थानभर मोठा दरारा होता १७३९ मध्ये इराणचा बादशाह नादिरशाह याने दिल्लीवर आक्रमण केल तेव्हा बाजीराव दिल्लीकडे निघाला ‘बाजीराव निघालाय’ या एवढ्या बातमीनेच नादिरशाह याने दिल्ली सोडली आणि तो परतला...
असा धुरंधर की ज्याचा कधी पराजय झाला नाही ज्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावांनेही ओळखले जाते अशा रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावाने आपल्या कुशल युद्ध नेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या अशा थोरले बाजीराव पेशवे तथा बाजीराव बाळाजी भट यांची आज जयंती...
थोरल्या बाजीरावांची मुद्रा :
“।। श्री राजा शाहु नरपती हर्ष निधान, बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान......।।”
उण्यापुर्या ४० वर्षांच्या आयुष्यात त्यानी अतुल पराक्रम गाजवला......

विनम्र अभिवादन
@the_maratha_history
No comments:
Post a Comment