''साळुंखे/सोळंके राजवंश''
""---""---""---""
@सतीशकुमार शिवाजीराव सोळंके-देशमुख,
मुख्य आयुर्विमा सल्लागार LIC,
9422241339,
9922241339.
इतिहासातील दिर्घ काळ सतेत राहिलेल्या देशातल्या प्रमुख राज घराण्यांचा अभ्यास करत असताना साळुंखे/सोळंके घराण्याचे नाव खूप वरच्या क्रमांकावर घ्यावे लागते. महाराष्ट्रातील साळुंखे राज घराणा हा दक्षिणेतील चालुक्य या मराठा राजवंशाचा वंशज आहे. दक्षिणेतील चालुक्य आणि नंतरच्या काळातील उत्तरेतल्या सोळंकी राजवंशाचा वंशज असलेल्या साळुंखे राजवंशातील पूर्वज राजांनी सहाव्या आणि दहाव्या शतकात आपल्या राज राजघराण्याची "राजमुद्रा" बनवल्याचा इतिहास आहे. स्वतःच्या घराण्याची राजमुद्रा असलेले देशातील जेवढे क्वचित बोटावर मोजण्या इतके राजवंश असतील त्यातील एक राजवंश म्हणून साळुंखे राजवंशाची ओळख आहे.
सोळंकी राजे विक्रम संवताच्या तेराव्या शतकात (1294 मध्ये) देवगिरी लढाईच्या निमित्ताने महाराष्ट्रात आले. त्यानंतर त्यांनी सातारा जिल्ह्यातील पाटन हे गाव बसविले. त्यानंतर सोळंकी या आडनावाचा अपभ्रंश होऊन ते साळुंखे असे झाले. साळुंखे राज वंशातील लोकांनी त्या काळी मोहिमांच्या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रभर रणांगणे गाजवत आपल्या शौर्याची यशोगाथाच निर्माण केली. अनेक मोहिमांमुळे महाराष्ट्रभर विखुरलेल्या या घराण्यातील लोकांनी मनगटाच्या जोरावर ठिकठिकाणी जहागिरदारी, इनामदारी, सरंजामदारी, देशमुखी, पाटीलकी अशा जहागिऱ्या देखील मिळवल्या.
साळुंखे घराण्यातील पराक्रमी सरदारांनी या जहागिऱ्या व्यतिरिक्त रणांगणात लढताना स्वपराक्रमाने 62 वेगळ्या भूषणावह पदव्या सुद्धा मिळविलेल्या आहेत. जहागीरदारी, सरंजामदारी, इनामदारी, देशमुखी आणि गावोगावच्या पाटीलकी या अशा मिळवलेल्या जहागिऱ्याबरोबरच साळुंखे घराण्यातील पराक्रमी सरदारांनी रणांगणात मिळवलेल्या प्रतिष्ठेच्या ह्या वेगळ्या 62 पदव्या आहेत. या शिवाय साळुंखेंची महाराष्ट्रातील रहिवासाची जवळपास 90 ते 95 टक्के गावे ही तालुका, जिल्हा आणि राज्याच्या सीमेवर बसलेली आहेत.
बदामीच्या मराठा राजवंशातील चालुक्य राजांनी राजस्थान राज्यातील चावडा राजांचे सिद्धपूर पाटन हे राजधानीचे शहर जिंकून ते आपल्या राजधानीचे शहर बनवले. येथे चालुक्यांचे देवक साळुंखी पंख असल्याने आडनावाचा अपभ्रंश होऊन ते सोळंकी असे झाले. तर विक्रम संवत 1294 मध्ये देवगिरी लढाई साठी महाराष्ट्रात आल्यानंतर आणि महाराष्ट्रात स्थिरवल्या नंतर या आडनावाचा पुन्हा अपभ्रंश होऊन ते साळुंखे असे झाले.
या घराण्यातील वेळोवेळी झालेल्या राजांनी स्वतःचे राज्याभिषेक करून स्वतःला त्या काळी अनेक बिरुदावली लावून मिरवल्याचा इतिहास आहे. या राजांनी आपल्या घराण्याची राजमुद्रा सुद्धा बनविलेली आहे. मात्र नंतरच्या काळात या घराण्यातील लोकांनी देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या काळापर्यंत महाराष्ट्रात सरदार घराणा म्हणूनच काम केले.
साळुंखे घराण्यातील अनेक सरदारांनी रणांगणातील आपल्या मनगटी शौर्याच्या जीवावर अनेक पराक्रम गाजवले. या घराण्यातील सरदारांनी पराक्रमाने ठिकठिकाणी जहागिऱ्या मिळवल्या. या सगळ्या जहागिऱ्या, पदव्या आणि इतकी सगळी रहिवासाची गावे तालुका, जिल्हा आणि राज्याच्या बाॅन्ड्रीवर असलेला साळुंखे/सोळंके हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एकमेव घराणा असावा!
@
Gret proud to be myself
ReplyDelete