"राजमुद्रा"....
साळुंखे-सोळंके
राजघराण्याची
.....
- - - - - - - -
-
मित्रांनो,
साळुंखे/सोळंके या घराण्यातील पूर्वज राजांनी सहाव्या आणि दहाव्या शतकात अशी एकूण दोन वेळा साळुंखे राजघराण्याची 'राजमुद्रा' बनवली होती. पैकी साळुंखे यांचे चालुक्य आडनाव असताना चालुक्य राजांनी सहाव्या शतकात आपल्या राजघराण्याची राजमुद्रा बनविली होती. तर साळुंखे यांचे सोलंकी (साळुंखे-सोळंके) आडनाव असताना या घराण्यातील महान पराक्रमी राजा सिद्धराज जयसिंह सोलंकी यांनी सुद्धा सोलंकी राजघराण्याची राजमुद्रा (राज्य कार्यकाल इ.स.1094 to 1143) तयार केली होती.
-
शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज घराण्याची "प्रतिपश्चंद्रलेखे....." ही जी राजमुद्रा बनविली होती. ती बनवताना त्यांनी ज्या काही मोजक्या क्षत्रिय राजवंशाच्या राजमुद्रांचा अभ्यास केला, त्यात साळुंखे/सोळंके राज वंशातील पूर्वज राजांनी बनविलेल्या राजमुद्रेचा क्रमांक वरचा होता.
सोलंकी (साळुंखे-सोळंके) घराण्यातील राजा सिद्धराज जयसिंह सोलंकी यांनी तयार केलेली राजमुद्रा ही वेगवेगळ्या सात भागांच्या विभाजनातून बनवली गेली होती. या सात भागांचा वेगवेगळा स्वतंत्र असा अर्थ आहे. आपण तो तपशीलवार पाहुया. ..
-
1) राजमुद्रेतील छत्र : -
राजस्थान, गुजरात तसेच महाराष्ट्रातील काही भागात सोलंकी (साळुंखे-सोळंके) राज घराण्याचा अंमल होता. हिंदुस्थानात सोलंकी राजांनी धर्मराज्य केल्याचा इतिहास आहे. राज्यातील प्रजेच्या रक्षणासाठी सोलंकी राजे सतत दक्ष असायचे. ते प्रजेची विषेश काळजी घेत असत, हे या राजमुद्रेतील छत्र (छत्रीद्वारे) द्वारा दाखवले आहे. सोलंकी राजांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या प्रजेच्या शिरावर (डोके) राजांचे कायम छत्र आहे, हे यामधून दाखविण्यात आले आहे.
-
2) राजहंस पक्षी : -
राजमुद्रेतील दुसरा भाग म्हणजे राजहंस पक्षी.! राजमुद्रेतील सात भागांपैकी हा एक प्रमुख भाग आहे. सोळंकी (साळुंखे-सोळंके) घराण्यातील सिद्धराज जयसिंह सोलंकी यांनी बनविलेल्या स्वतःच्या सोलंकी घराण्याच्या राजमुद्रेतील 'राजहंस पक्षी' हा एक प्रमुख घटक आहे. या राजमुद्रेत दोन राजहंस पक्षी दाखविण्यात आले आहेत. हे दोन्ही राजहंस पक्षी एकमेंकांकडे पहाताना राजमुद्रेत दाखविण्यात आले आहेत.
असे सांगितले जाते की, राजहंस पक्षी दुधात मिसळलेले पाणी न पिता फक्त दुध पितो, अगदी तसेच सोलंकी राजे हे त्यांच्या राज्यातील न्यायदान वा निवाडा करते वेळी खूप काळजी घेत होते. आणि खऱ्या गुन्हेगारांना कडक शासन करीत होते. सोलंकी राजांचे पूर्वज असलेल्या बदामीच्या चालुक्य राजवटीतील राजा, राजा विक्रमादित्या चालुक्य (इस.655 to 680) हा असा राजा होऊन गेला. तो अतिशय न्यायप्रिय राजा होता. त्याच्या न्यायदानाच्या आजही चर्चा ऐकायला मिळतात. तसेच विधीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा राजा विक्रदिमादित्य चालुक्याच्या न्यायदानाविषयी शिकविले जाते.
-
3) त्रिशूल : -
राजमुद्रेत त्रिशूळ हा एक प्रमुख भाग दाखविण्यात आला आहे. त्रिशूल हे शिवाचे शस्त्र अथवा आयुध समजले जाते. साळुंखे / सोळंके घराण्यातील पूर्वज असलेले चालुक्य आणि सोलंकी राजे हे शिवाचे पूजक आणि उपासक असल्याने शिवा वरील नितांत श्रद्धेमुळे त्यांनी स्वतःच्या घराण्याच्या राजमुद्रेत त्रिशूळ ठेवले होते.
-
4) ढाल-तलवार : -
तलवार हे वीरांचे, क्षत्रियांचे शस्त्र आहे.! सोलंकी हा क्षत्रिय वंशातील एक प्रमुख असा राजघराणा आहे. तसेच सोलंकी कुळाचे कूलदेव पुष्करराज (राजस्थान) येथील घोड्यावरील खड्गधारी श्री. ब्रह्मनाथ आणि कुलदेवी खड्गे हाथी असलेली महाकाली देवी आहे. (साळुंखे-सोळंके कुळाचे महाराष्ट्रात आल्यानंतरचे कूलदेव जेजुरी खंडेराय, सोनारी काळ भैरवनाथ तसेच कुलदेवी तुळजा भवानी आहे. साळुंखेतील काही लोक ज्योतिबा कोल्हापूर याला सुद्धा कुलदेव मानतात.) ढाल ही शत्रूच्या होणार्या वाराला, घावाला रोखण्याचे एक प्रमुख साधन आहे. म्हणून सोलंकी राजांनी आपल्या राजमुद्रेत ढाल आणि तलवारीला विशेष असे स्थान दिले आहे.
-
5) लाकडी फांदी : -
सोळंकी राजांच्या राजमुद्रेतील लाकडी फांदी हा एक प्रमुख भाग आहे. राजमुद्रेतील लाकडी फांदीवर दोन राजहंस पक्षी बसलेले दाखविण्यात आले असून फांदी खाली राजमुद्रेतील सोलंकी राजांचे 'पाटनं रा पातशाही' हे ब्रीद लटकवलेले दाखविण्यात आले आहे. राजमुद्रेतील लाकडी फांदी ही राजमुद्रा, राजहंस पक्षी आणि राजमुद्रेतील ब्रीद या सर्वाना जोडण्याचे काम करत असल्याचे दाखविले आहे.
-
6) ब्रीद / वचन : -
सोळंकी राजांनी स्वतःच्या राजघराण्याची जी राजमुद्रा बनविली होती, त्या राजमुद्रेतील
"पाटनं रा पातशाही" हे ब्रीद / वचन दिले गेले आहे. या ब्रीदचा अर्थ असा, की सोलंकी राजांची राजधानी त्या काळातील राजस्थान आणि आत्ताच्या गुजरात राज्यातील पाटन या शहरात होती. या शहरात कशाचीच कमी नसल्याने या शहराला सिद्धपूर पाटन असे सुद्धा म्हटले जायचे. या शहराला भक्कम अशी तटबंदी होती, जी की त्या काळातील जगात तिसर्या क्रमांकाची सर्वात लांब भिंत होती.
आणि सोलंकी राजांची राजधानी असलेल्या या पाटन शहरात त्या काळी सोलंकी राजे धर्मराज्य करीत होते. म्हणून सोलंकी राजांनी जी स्वतःच्या घराण्याची राजमुद्रा बनविली होती, त्या राजमुद्रेतील ब्रीद हे "पाटनं रा पातशाही" असे ठेवले होते. सोलंकी राजांचे पाटन राज्य हे त्या काळी एक पवित्र सरकार म्हणून ओळखले जात होते, हे राजमुद्रेतील या ब्रीद मधून लक्षात येते.
-
7) बोध वाक्य : -
बोध वाक्य हे राजमुद्रेतील शेवटचा आणि सातवा टप्पा आहे. ''सरणायां साधार चालक राव''.. असे हे राजमुद्रेतील बोधवाक्य आहे. प्रजेच्या नजरेमध्ये राजा कितीही मोठा असला, तरी त्याने आपल्या राज्यातील प्रजेप्रती तसेच देवतांविषयी सदैव लीन, कर्तव्यदक्ष आणि ऋणी असले पाहिजे. हे यातून दाखवले गेले आहे. राजाने प्रजेचे हीत पाहुन राज्य कारभार केला पाहिजे, त्यांचे सेवेसाठी सदैव तत्पर असले पाहिजे. म्हणून सोलंकी राजांनी राजमुद्रेतील शेवटच्या टप्प्यातील "सरणायां साधार चालक राव" हे बोधवाक्य त्यात टाकले आहे.
@ ..,सतीशकुमार शिवाजीराव सोळंके-देशमुख
(एम.ए.बी.एड्.& बी.पी.एड्.)
-चीफ लाईफ इन्शुरन्स अॅडवायजर LIC*
-आॅल इंडिया चेअरमन क्लब मेंबर
& M.D.R.T. Agent*
@..
''अग्निवंश'',
सिद्धिविनायक काॅलनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बी.
मोबाईल.-
9422241339
9922241339
No comments:
Post a Comment