विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 1 March 2019

म्हालोजीबाबा सेनापती



म्हालोजीबाबा सेनापती
हंबीरराव मोहिते यांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज यांनी म्हालोजी घोरपडेंना सरनैबतकी दिली पण काळाने यांना ही लवकरच हिरावून घेतले.
इतिहास प्रसिध्द सेनापती संताजी घोरपडेंचे पिताश्री म्हालोजी घोरपडे हे संभाजी महाराज यांचे द्वितीय सरसेनापती होय .
संभाजी महाराज 1688 साली रायगडावर होते . औरंगजेबाच्या तुफान सेनासागरास सलग नऊ वर्षे त्यांनी पळो की सळो करून ठेवले होते औरंग्याने मराठे शरण येईना म्हणून धुर्त डाव आखला आणी आदिलशाही कुतुबशाही ह्या दोन शाह्या प्रथम बळकावल्या आणि स्वराज्यावर चाल करून आला संपुर्ण स्वराज्यात औरंग्याची सेना पसरली होती पण मराठे काय करतील याची पत्ताच लागू देत नव्हते. पण एक घटना अशी घडली की शिर्के कलशावर पारखे झाले 1688 नोव्हेंबर ( जे .श.) संभाजी महाराज स्वतःहा हे प्रकरण मार्गी लावण्यासाठी पन्हाळा खेळण्यास आले आणि शिर्केंचा बंड मोडून पन्हाळ्यावर आले .
सोबत सेनापती म्हालोजीबाबा संताजीबाबा खंडोबल्लाळ कलश आणि पाचशे ते सातशे सैन्य होते पन्हाळा सोडून संगमेश्वरी मुक्काम केला तो 1689/ 1 फेब्रुवारी .
शंभूराजे पन्हाळा आल्याची वार्ता आधीच शेख निजामास लागली होती शेख निजाम हा आदिलशाही मातब्बर सरदार आणि तो याच प्रांतातील होता. आदिलशाही बुडाल्यावर तो कुतुबशाहीत गेला तिथे ही आलमगिराने कुतुबशाही संपवल्यावर मोगलाईस रूजू झाला आणि पन्हाळा संगमेश्वरी पुन्हा त्याच प्रदेशावर रवानगी झाली .
संभाजी महाराज यांचा मुक्काम 1 फेब्रुवारी 1689 ला संगमेश्वरी पडल्याची वार्ता या शेख निजामास लागली आणि ताबडतोब तो 4/5 हजारी सैन्यासह निघाला आणि शंभूराजेंवर चाल केली .
सेनापती म्हालोजीबाबा जणू रौद्ररूप घेऊनच लढले असावे . पाचसहाशे सैन्यासोबत सेनापती या गनीमांना तोंड देत होते. घमासान युद्ध सुरू होते पण सहा सात पट सैन्यापुढे मराठ्यांचा निभाव थोडीच लागणार होता त्यात म्हालोजीबाबांनी आपली समशेर गाजवून उभ्या रणांगणावरच धरतीला रक्ताचा अभिषेक करून प्राण सोडला आणि दोनतिनशे लोक कामी आलेले पाहून बाकीचे ही पळाले संभाजी महाराज यांना ही कैद झाली ती याचं दिवशी यातून संताजी घोरपडे खंडोबल्लाळ आपला जीव कसाबसा मुठीत धरून निसटून आले.
शेख निजामाने सह्याद्रिपुञ छञपती संभाजी महाराज यांना कैद करून थेट बहादुरगडावर रवानगी केली.
अशा या रक्तरंजीत ऐतिहासिक स्थळी घोरपडेबहाद्दर म्हालोजीबाबांची प्राज्योत वीजली आणि स्वराज्यच जणू मोगलांच्या हातात सापडलं .
पोस्ट साभार : गडप्रेमी बाळासाहेब पवार

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...