विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 1 March 2019

उंबरखिंड युद्ध

शिवाजी महाराज १६६० साली पन्हाळा किल्ल्यावर सिद्दी जोहरच्या वेढ्यात अडकले असताना मोगल बादशाह औरंगझेबाने दक्खन मोहिमेवर अमीर उल उमरा शाइस्तेखानची नेमणूक केली. त्याच्या सोबत प्रचंड संख्येने पायदळ, घोडदळ,तोफखाना तसेच अनेक नामवंत सरदार होते. खानाने पुणे,चाकण, शिरवळ अश्या स्वराज्यातील मोक्याच्या ठिकाणांचा ताबा घेतला होता. राजे पन्हाळा वेढ्यातून निसटले पण शाइस्तेखानावर निर्णायक स्वारी करता येत नव्हती. या काळात त्याने पुण्याचा लालमहाल तसेच पुणे-नाशिक मार्गावर नियंत्रण आणण्यासाठी चाकणचा संग्रामदुर्ग देखील जिंकून घेतला. खानाचे पुढचे लक्ष होते-शिवरायांनी १६५७ नंतर जिंकून घेतलेला उत्तर कोकण प्रदेश. ह्यात कल्याण-भिवंडी,दुर्गाडीचा किल्ला, रायगड जिल्ह्यातील कर्णाळा,प्रबळगड इतक्या मोक्याच्या प्रदेशाचा ताबा घेण्यासाठी त्याने मोठी मसलत साकारली. ह्या मोहीमेवर नेमणूक झाली ती उझबेग सरदार-कारतलब खानाची! त्यासोबत मोठा फौजफाटा होताच पण एक स्त्री सरदार सुद्धा होती- रायबाघन!
कारतलब खानाने पुणे-वडगाव असा मार्ग आखून तो सह्याद्रीच्या ऐन कण्यात आला.पण खान आपले घाटमार्ग कुठपर्यंत गुप्त ठेवणार होता महाराजांचे हेर तिखट कानाचे होते. खानाने खंडाळ्याहून खोपोलीला उतरणारा बोरघाटाचा राजमार्ग न निवडता उंबरखिंडीचा बिकट मार्ग निवडला शिवरायांना ही खबर राजगडवर समजताच ते लागलीच निघाले. स्वत: शिवाजी महाराज,नेतोजी पालकर असे अनेक खासे लोक ह्या मोहिमेवर होते. मोगल सैन्य ह्या ऐन घाटवाटेवर येईपर्यंत कोठेही विरोध वा हल्ला केला नाही. मात्र मोगल जेव्हा घाट उतरायला लागले तेव्हा मराठ्यांनी उंबरखिंडीच्या बिकट रानात, दुर्गम अशा प्रदेशात खानाची अशी नाकेबंदी केली की घराच्या एका कोपर्यात कोंडलेला उंदीर. खानाचे वर तसेच खाली जायचे सर्व मार्ग बंद झाले. मराठयांच्या तिखट अशा गनिमी काव्यापुढे खानाने साफ व बिनशर्त शरणागती स्वीकारली. कमीत कमी सैन्याने अनेक पट सामर्थ्यवान शत्रूचा केवळ भौगोलिक परिस्थितीचा वापर करून केलेल्या पराभवच हे उत्र्कृष्ट उदाहरण आहे. ह्या मोठ्या पराभवामुळे सह्याद्री आणि कोकणावर नजर टाकायचं शाईस्तेखानाच धाडस झाल नाही

उंबरखिंड युद्ध झाले ती तारीख होती
- 2 फेब्रुवारी 1661

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...