विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 1 March 2019

परळी किल्ल्यावर म्हणजेच सज्जनगडावर मोगलांची मराठ्यांनी केलेली हैराणगत


परळी किल्ल्यावर म्हणजेच सज्जनगडावर मोगलांची मराठ्यांनी केलेली हैराणगत -
मराठा सरदारांनी ताराबाई राणीसरकरांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन वेढा घालून बसलेल्या मोगली लष्करावर हल्ल्यामागून हल्ले चढविले आणि भोवतालचा प्रदेश उध्वस्त करून त्यांनी बादशाही छावणीस मिळणारी रसदही बंद करून टाकली. आता ह्या मोगलांच्या स्थितीचं वर्णन खाफिखानाने केले ते वाचण्यासारखे आहे - मराठे मुंग्यांच्या व टोळ याप्रमाणे बादशाही सैन्याभोवती घिरट्या घालत आणि त्यांच्या भोवतालचा प्रदेश उध्वस्त करून टाकला. त्यामुळे रसद बंद झाली .औरंगजेब बादशहाच्या फौजेची स्थिती अत्यंत कठीण झाली , खाण्या-पिण्याचे हाल झाले .मोगल सैन्यात माणसे आणि जनावरे भरपूर हैराण झालेली आहे. ती इतकी की त्याच्या सौन्यात कुणालाच हालचाली करण्याची शक्ती राहिली नाही. एकीकडे महार्घता तर दुसरीकडे पैश्याची टंचाई , आणि कोणी एका दमडीला अमृत विकतो म्हटले तर कोणी विकत घेण्यास तयार झाले नसत.पावसाच्या थेंबाचे मोती झाले असले तरी लोकांजवळ एक दमडीही नव्हती किंवा धान्याचा कण नव्हता म्हणून त्या पावसाच्या थेंबांकडे कोणी डोकावून ही पाहत नसत.
अश्याही परिस्थितीत मोगलांनी परळी किल्ल्यावर हल्ला चढवला पण मराठ्यांनी हा मोगलांचा हल्ला मोडून काढला व त्यांच्या सैन्याला परतवून लावले. ह्यावेली प्राप्त परिस्थितीत किल्ला हल्ला करून मिळणार नाही हे जाणून बादशहाने आपला पुत्र शहजादा आजम ह्याच्या मध्यस्थीने मराठ्यांकडे वाटाघाटी सुरू केली आणि त्यासाठी बादशहाला मोठी रक्कम मराठ्यांना द्यावी लागली तेव्हा किल्ल्या त्याच्या हाती दिला पण त्याच्या कडची संपत्ती ही मराठ्यांनी मिळवून घेतली आणि स्वराज्यात वापरली ही गोष्ट गरजेची आहे कारण मराठे तो किल्ला परत हातात घेणारच होते हे ठरवलेच होते.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...