"आरमारात माणसे नाहीत.विश्वासू अधिकारी नाहीत.आमचे किल्ले निरुपयोगी.तंत्रांची,दारुगोळ्याची कमतरता,द्रव्याची टंचाई
तर पाचवीलाच पूजलेली.साऱ्या राज्याची अवस्था शोचनीय झाली आहे.मोगलांचे
थोडेफार सहाय्य असले,तरी संभाच्या आक्रमणाची शक्यता आहेच.आमचे हे
राज्य,हातातून जाण्याची भीती वाटत आहे."
------- गोव्याच्या व्हाइसरॉय ने आपल्या राजाला 25 जानेवारी 1684 रोजी लिहीलेले पत्र..
आणि यामधुन जाणवनारी संभाजी महाराजांच्या पराक्रमाची ताकद..!!
तसे पाहायला गेले,तर मराठ्यांशी पोर्तुगीजांनी आधीच्या काळात म्हणजेच
शहाजी महाराजसाहेबांच्या काळात,चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा आटापिटा
केल्याचा दिसून येतो.
तेव्हाचा व्हाइसरॉय Conde de Alvora च्या हस्ते
पोर्तुगीज राजाने शहाजी महाराजांसोबत मैत्री व्हावी,अशा इच्छेचे पत्र
पाठवले होते.पोर्तुगीजांना आधीच्या काळात जर कुणाची जरब वाटत असेल,तर ती
महाबली शहाजी महाराजांची..
म्हणूनच की काय,शिवरायांच्या
कारकिर्दीच्या सुरुवातीलाही पोर्तुगीजांनी महाराजांविरोधात कुठलीही कारवाई
करण्याचे धाडस केले नाही.इतकेच काय,तर इसवी सन 1667 च्या अखेरीस पोर्तुगीज
व्हाइसरॉय Conde de San Vincente आपल्या राजाला लिहीतो,
"आम्ही
शिवाजीच्या सागरी अरमाराला घाबरतो.आम्ही कसल्याही प्रकारचा विरोध करण्यास
असमर्थ असून,शिवाजीने कोकण किनारपट्टीवर अनेक किल्ले बांधले आहेत.आणि
त्याच्या ताब्यात असणारी जहाजे ही फार मोठी आहेत."
मराठ्यांची जहाजे
लहान होती,असा सर्वत्र उल्लेख मिळत असताना,पोर्तुगीजांनीच लिहुन ठेवले आहे
की शिवाजीची 3 भली मोठी धान्याने भरलेली जहाजे बाहेर देशातून येताना
समुद्रात बुडाली.
Roe Leitao Viegas आणि त्याचा भाऊ Fefnao Leitao
Viegas ह्या दोन पोर्तुगीज भावांनी कल्याण,भिवंडी आणि पनवेल येथे
मराठ्यांसाठी जहाज बांधनी काम चालू केले.पण त्याच वेळेस,मिर्झा राजा जयसिंह
याने औरंगजेबाकडे पोर्तुगीजांची तक्रार केली आणि त्यामुळे 19 मे 1667 ला
पोर्तुगीजांनी या दोन भावांना वापस बोलावून घेतले.
शिवरायांच्या आरमाराची दहशत एवढी होती,की 30 नोवेंबर रोजी लिहिलेल्या पत्रात व्हाइसरॉय म्हणतो,
"जर शिवाजी मिरज,अंकोला,शिवेश्वर,कारवार या ठिकाणी चालून आला,तर लोक एवढे घाबरले आहेत,ते तोंड देण्याऐवजी पळून जातील."
शिवरायांना खरेतर पोर्तुगीजांच्या ताब्यातील प्रदेश मुक्त करायचा
होता.त्यासाठी शिवरायांनी 7000 लोकांची फ़ौज या मोहीमेसाठी जमा केली होती,पण
त्याच आधी शिवछत्रपतींचा दुर्दैवी मृत्यु झाला.
शिवरायांच्या मृत्युनंतर पोर्तुगीजांनी आपल्या राजाला लिहीले,
"हा शिवाजी युद्ध काळापेक्षा शांततेच्या काळात च अधिक घातक होता."
शहाजी महाराजांच्या पराक्रमाची जेवढी होती,त्याहीपेक्ष जास्त दहशत शिवरायांनी निर्माण केली होती.आणि समुद्रावर मराठ्यांचे जरिपटके मोठ्या डौलाने फडकत होते.
पुढे,शंभू छत्रपतींच्या कार्यकाळात पोर्तुगीजांनी
शांततेचे धोरण स्वीकारले होते.पण स्वराज्या विरोधी कारवाया करण्यास
त्यांना वेळ लागला नाही.
अंजदिव बेट प्रकरण असो,या चौल रेवदंड्या वरीलस्वारी असो.संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धूळ चारली.
पण एक विशेष गोष्ट म्हणजे,गोव्यातल्या एका संताला,पॅट्रन म्हणजे रक्षणकर्ता ही पदवी मिळाली ती संभाजी महाराजांच्या पराक्रमामुळे..!!
जुवे बेटावरील युद्धानंतर पोर्तुगीज इतके खचले की त्यांना पुन्हा तितक्या सक्षमतेने मराठ्यांशी लढा देण्याचे बळ उरलेच नाही.संभाजी महाराजांच्या काळात सिद्धी आणि मुघलांच्या आरमाराच्या सहाय्याने पोर्तुगीजांनी मराठा अरमाराला तोंड देण्याचा प्रयत्न केला,पण त्यात त्यांना पुर्ण अपयश आले.
पुढे,शाहू छत्रपतींच्या काळात,म्हणजेच 18 व्या शतकाच्या सुरुवातीस
भारतातील सर्वात प्रबळ आरमार म्हणून मराठा आरमाराकडे पाहील्या जात
होते.मलाबारचा राजा जेम्स प्लांटेन स्वताः शाहू छत्रपतींच्या आश्रयाला होता
आणि जगतले सर्वात घातक समजल्या जाणारे pirates म्हणजे समुद्री चाचे
मराठ्यांच्या आरमाराकडे आश्रयाला येत.आणि यामागे कारणीभूत होते शाहू
छत्रपतींचे राज्यविस्तार धोरण आणि कान्होजी आंगरेंचा पराक्रम..!!
इंग्रजांच्या रॉयल नेवीचे आणि पोर्तुगीजांच्या आरमाराचे धिंडवडे मराठा आरमाराने वेळोवेळी काढले.
शिवछत्रपतींनी मोठ्या दूरदृष्टीने स्थापलेल्या मराठा आरमाराला शाहू छत्रपतींच्या काळात खुप मोठी ऊंची प्राप्त झाली होती.
इंग्रजांशी लढण्यात आपल्या आरमाराने केलेला पराक्रम सर्रास वाचायला
मिळतो,पण पोर्तुगीजांची सत्ता उखडून टाकण्यात आपल्या आरमाराने केलेले
पराक्रम कुठेतरी दुर्लक्षिल्या जातात.आणि त्याच दुर्लक्षित भागावर किंचितसा
प्रकाश टाकन्याचा हा प्रयत्न..!
आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची
No comments:
Post a Comment