विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 8 July 2020

वीर मुरारबाजी देशपांडे

मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखानाने पुरंदर किल्ल्याला वेढा घातला तेव्हा त्या किल्ल्याचे किल्लेदार "

वीर मुरारबाजी देशपांडे" हे होते.

शाहिस्तेखानाच्या पराभवाने, सुरतेच्या लुटीने, जसवन्तसिंहाच्या पराभवाने औरंगजेबाचा संताप खुपच वाढला होता, सत्तर हजारांची सेना घेऊन शाहिस्तेखान गेला व बोटे गमावून माघारी आला. दिल्लीसम्राटांची व्यापारपेठ सुरत बघता बघता महाराजांनी लुटली. महाराजांचा तांडव असाच चालू राहिला तर मोगलाई संपुष्टात आल्याखेरीज राहणार नाही हे औरंगजेबाने ओळखले होते. म्हणून बिमोड करण्यासाठी त्याने आपल्या दरबारचा सर्वश्रेष्ठ सरदार निवडला. मिर्झाराजा जयसिंह ऐंशी हजार स्वार, बरोबरी दिलेरखान, पाच हजार पठान घेऊन स्वराज्य व महाराजांना संपवण्यासाठी निघाला. स्वराज्यावर मिर्झाराजे जयसिंह ह्यांच्या रूपात नवीन संकट घोंगावत होतं, मिर्झाराजांनी ज्याप्रकारे महाराष्ट्रावर आक्रमण केले, त्यापुढे मराठी सैन्याचा टिकाव लागणे फारच अवघड होते, इ.स. १६६५ मध्ये मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी पुरंदर किल्ल्यावर "वीर मुरारबाजी देशपांडे" हे किल्लेदार होते. दिलेरखानाने वज्रगड घेऊन सफेद बुरुजांवरून पुरंदरावर चाल केली. खानाने पाच सहस्र कडवे पठाण घेऊन बालेकिल्यावर स्वारी केली मुरारबाजीने सातशे मावळे घेवून खानास प्रत्युत्तर दिले. मुरारबाजी देशपांडे यांचे शौर्य पाहून खानाने त्यांना त्यांच्या बाजूने येण्यास सांगितले. मुरारबाजी बोलिले, मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो कि काय ? असे म्हणून खानावर वार करावा तोच खानाने तीन तीर मारून मुरारबाजी देशपांडे यांना घायाळ केले. लढता लढता अखेर मुरारबाजी खाली कोसळले. वीर मुरारबाजी देशपांडे यांनी पुरंदर फार शर्थीने लढवला. अवघ्या सातशे मावळ्यांनिशी दिलेरखानाच्या पाच हजार फौजेच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या मुरारबाजीचा या लढाईत अंत झाला. जेव्हा महाराजांना हे वृत्त कळाले, तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाविषयी बोलणी चालू केली. ११ जून १६६५ रोजी इतिहासातील प्रसिद्ध पुरंदरचा तह झाला.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...