Richard Keigwin to Mumbai. 20th Nov, 1679
The gunns that have been fired were the Siddees and his Yice-Admirall against the Island, who ridewithin shott; but wee think they spend their powder to littlepurpose, except the noyse does hurt them......
सिद्दीच्या आगमनाने खांदेरी परिसरात प्रचंड धामधूम उडाली. सगळ्या गदारोळाचा आवाज मुंबईपर्यंत स्पष्ट येत होता. मुंबईतील इंग्रज पत्रातून तोफांचे आवाज नक्की नेमके कश्याला हे विचारत होते. सिद्दी मराठ्यांच्या दिशेने बेफाम तोफा डागत होता. पण ते गोळे बेटावर पोहचतच नव्हते. त्याचा तोफगोळ्याच्या कसलाही परिणाम मराठी सैन्यावर ना त्यांच्या चालू असणाऱ्या कामावर होत होता. मराठ्यांकडूनही सिद्दीवर तोफा डागल्या जात होत्या. पण सिद्दीदेखील मराठ्यांच्या तोफांच्या माऱ्याच्या बाहेर जाऊन उभा होता. पण इंग्रज सिद्दीच्या तुलनेत बेटाच्या जवळ असूनही त्यांच्यावर मराठे हरकत घेत नव्हते की हल्ला करत नव्हते. मराठे आता शरण येतीलच अशी आशा इंग्रजांना वाटू लागली होती. दिवसेंदिवस ती प्रबळ होत जातं होती. मराठ्यांना शरण येऊन बेट ताब्यात देण्याचा प्रसंग आलाच तर ते सिद्दीला बाजूला ठेवून आपल्यालाच देतील हा विश्वास त्यांना होता. म्हणून मराठ्यांनी शरणागती पत्करली तर त्याचा फायदा घेण्यासाठी शक्य तितक्या जवळ त्यांनी नांगर टाकले होते. आणि जसा ताबा आपल्या हातात येईल तसं त्या बेटावर सर्वोच्च ठिकाणी आपला झेंडा फडकवून टाकू अशी एक मानसिकता इंग्रज बनवून बसले होते.
बेटातील शिबंदी कधीही समर्पण करेल म्हणून इंग्रज आणि बरोबरच सिद्दी देखील डोळे लावून बसलेला होता. इंग्रजांना यश आलंच तर आपणही ह्यात वाटेकरी होऊ म्हणून तोही उतावीळ झाला होता. सिद्दीने त्याची ५०० च्या आसपास माणसे बेटावर उतरण्यासाठी तयार केली होती आणि त्यांना सोयीस्कर अश्या बोटी तयार ठेवल्या होत्या. सिद्दीचा नौकेदार रेव्हेंजवर केंग्विनला भेटायला आला. आणि केंग्विनला पुढील युद्धाची रचना कशी असेल ते सांगू लागला. तो त्याच्या माणसांसोबत १२ फूट पाण्यात हळुवारपने येऊन उभा राहील. तोच बाकी इतर जहाजांवरून बेटांवर तोफांचा जोराचा मारा करण्यात येईल. तोच प्रकार इंग्रजांनी सुद्धा करावा. निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा फायदा घेउन सिद्दीचा बाकी माणसे बेटावर उतरतील. पण केंग्विनने ती परिस्थिती टाळत आपण दोन धन्याचा (कदाचित मुंबई व सुरत) नोकर आहे त्यामुळे तुम्ही मला काय करावं हे सांगू शकत नाही हे उत्तर दिले. त्या नौकेदाराने व स्वतः सिद्दीने केंग्विनला आपल्या बोटेवर येण्याचे आमंत्रण दिले असल्याचे सांगितले. ह्या सर्व घडामोडी केंग्विनने मुंबईला कळवल्या. आणि ह्यावर सिद्दी ह्या प्रकरणात न आलेलाच बरं होता इथवर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
अश्या सगळ्या गदारोळात अजून भर घातली गेली ती २१ नोव्हेंबरच्या पहाटेने. सूर्यनारायण क्षितिजापलीकडे हळूच डोकं वर काढत होते. सिद्दी व इंग्रज बेटावर बारीक नजर ठेवून होते. पहाटेचे ६ वाजता हलकी गडबड बेटावर दिसली. हालचालीत जे दिसलं त्याने दोघांची झोप उडाली. दोघांनी आपली लहान जहाज बेटाच्या दिशने पाठवण्यासाठी तयार करावी म्हणून आदेश दिले. ज्याची ते वाट बघत होते ते शेवटी घडलं होत. मराठ्यांनी बेटावरील एका झाडावर पांढरं निशाण फडकावले होते. इंग्रजांनी पुढील कारवाईसाठी बेटाच्या जवळ त्वरित एक मचवा पाठवला. पण नंतर मात्र मराठ्यांनी कसलाही प्रतिसाद दिला नाही. किव्हा त्या बाजूने कोणी आलं नाही. मराठ्यांचा डोक्यात काय चाललंय ह्याचा अंदाज इंग्रजांना येत नव्हता तरी त्यांनी धीर दाखवत पुन्हा किनाऱ्यावर मचवा पाठवला. पण आताही मराठ्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. जास्त जवळ न जाता त्यांनी वाट बघायचे धोरण स्वीकारले. इंग्रजांना आपल्या बोटी संकटात टाकायच्या नव्हत्या. त्याच वेळी बेटाजवळ एक लहान जहाज बघितलं. जे कालपर्यंत इथे नव्हतं. आज अचानकच त्यांना ते दिसण्यात आलं होतं.
RTCHARD KeigWIN TO Mumbai, 21 NOV, 1669.
This day, about 6 of the clock in the morning, Savagees people put a white flagg in the brab tree upon the hill. Wee immediately sent the manchua as neere the shoare that they were
in call of them.
केंग्विन ने मुंबईला ही कळवावी म्हणून पत्र लिहण्यास घेतले तेच त्याला अजून एक बातमी आली की सिद्दीने मराठ्यांशी बोलणी करण्यास एक जहाज पाठवलंय. त्यानेही एक गलबत तयार करण्यास सांगितले. सार्जंट cully सोबत एक डच पोर्तुगीज व्यक्ती देऊन त्यांना किनाऱ्यावर पाठवले गेले. इथे मराठ्यांनी दोन्ही कडून निरोप घेऊन येणाऱ्या बोटी बघितल्या. इंग्रजांना थारा देत जर ते किनाऱ्यावर आले तरी त्यांना काही इजा केली जाणार नाही सांगत संवाद साधला. जर मराठे शरण आले तर त्यांना इंग्रज प्रतिष्ठेने वागवतील व इंग्रजांचे रक्षण भेटेल म्हणून सांगण्यात आले. ह्यावर मराठ्यांनी तुम्ही इथे १२ महिने जरी बसून राहिले तरी हे बेट आम्ही सोडणार नाही म्हणून सांगितले. आणि हे पांढरे निशाण आम्ही थळच्या किनारी असलेल्या मराठी सैन्यासाठी सांकेतिक खून होती म्हणून स्पष्ट करण्यात आले. सार्जंट cully ने आपल्याकडे मायनाकासाठी डेप्युटी गव्हर्नरने लिहलेले पत्र आहे म्ह्णून सांगितलं. मायनाकही डेप्युटी गव्हर्नरसाठी पत्र लिहणार आहे म्हणून खांदेरीवरून सांगण्यात आलं. पण मराठ्यांच एकंदर उत्तर बघून इंग्लिश पथक पत्र देण्याच्या व बेटावर वैगरे न जाता तसेच माघारी आले. असाच प्रयत्न सिद्दीकरून झाला मात्र त्याच्याशी काहीही चर्चा मराठ्यांनी केली नाही. उलट त्यांना धमकावून हकलावून लावण्यात आले.
पण झाल्या प्रकाराने मराठ्यांची इच्छाशक्ती किती प्रबळ होती व ह्या सगळ्या धामधुमीत सुद्धा रसद पुरवठा चालूच असणार ह्यावर ठाम विश्वास होता हेच दिसते.
क्रमशः
स्वराज्याचे वैभव
संदर्भ ग्रंथ : शिव छत्रपतींचे आरमार
English record
No comments:
Post a Comment