ब्रिटिशांच्या मनात शिवरायांच्या बद्दल असलेली भिती व तिचे कारण :
शिवाजी महाराज यांची मुघल, आदिलशाह, निजाम यांना तर भिती होतिच परंतू व्यापार करण्यासाठी आलेले पोर्तुगीज, इंग्रज यांनाही शिवरायांची भिती वाटायची
शिवाजी महाराजांनी भक्कम स्वराज्य बांधणीसाठी आपले किल्ले अधिक मजबूत बनविले. दाण्यापाण्याची व्यवस्था ठेवली,किल्लेदार नेमले. पहारा ठेवण्यासाठी बुरुज बांधले.अन्नधान्याची कमतरता पडू नये म्हणून भूमिगत कोठारे तयार केली,शत्रूचा वेढा पडलाच तर निसटून जाता यावे म्हणून चोरवाटा तयार केल्या.
आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराज प्रत्येक क्षणी स्वराज्याचा विचार करायचे.स्वराज्य आणखी मजबूत कसे करता येईल असा विचार रात्रंदिवस त्यांच्या मनात असायचा.
शिवाजी महाराजांना ब्रिटिशांकडे असलेल्या ज्ञानाची त्यांना कल्पना होती आणि खुद्द ब्रिटिश लोकही शिवाजी महाराजांना सुरतेच्या दोनदा झालेल्या लुटीपासून चांगलेच ओळखत होते.ब्रिटिशांनी मद्रासमध्ये थोडाफार व्यापार करण्यास सुरुवात केली असतांनाच त्यांना शिवाजी महाराज वेल्लोर आणि जिंजीवर कब्जा मिळविण्याच्या रस्त्यावर असल्याची खबर मिळाली तेव्हा मद्रासमधील जनतेमध्ये खळबळ उडाली आता मद्रास शहर लुटले जाते की काय अशी धास्ती ब्रिटिशांना वाटू लागली.
९ मे १६७७ ला ब्रिटिशांनी एक शहर सुरक्षा परिषद भरविली आणि शहराची सुरक्षा मजबूत करण्यासाठी एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
लवकरच शिवाजी महाराज शहराजवळ आले.१४ मे रोजी त्यांनी एक ब्राह्मण आणि दोन अन्य माणसं ब्रिटिशांकडे संदेश घेऊन पाठविले.ब्रिटिशांनी जरा धास्तीनेच तो संदेश वाचला.त्यात महाराजांनी ब्रिटिशांकडे काही औषधी खडे आणि विषावरील उताऱ्यांची मागणी केली होती आणि त्याबद्दल पैसेही देऊ केले होते.
ब्रिटिशांना हायसे वाटले,त्यांनी अत्यंत नम्रपणे महाराजांचे पैसे नाकारले आणि भेट म्हणून त्यांची मागणी पूर्ण केली,वर त्या ब्राह्मणाचा सत्कार केला त्याला चांगले कापड भेट म्हणून दिले आणि काही चंदनापासून बनविलेल्या वस्तू ही दिल्या.
ब्रिटिशांकडे वैद्यकीय ज्ञानासोबत उत्तम प्रकारचे अभियंतेही आहेत आणि याचा उपयोग आपण स्वराज्य बळकट करण्यासाठी करून घेऊ शकतो असा विचार शिवाजी महाराजांच्या मनात होता.
महाराजांनीं त्यांच्या अभियंत्यांची मागणी करण्याकरिता २२ सप्टेंबर १६७७ या दिवशी त्यांनी आपले दोन हेर अभियंत्यांच्या मागणीचे पत्र घेऊन सेंट जॉर्ज येथील ईस्ट इंडिया कंपनीकडे पाठविले.
ईस्ट इंडिया कंपनीची त्याकाळी नुकतीच स्थापना झाली होती.ब्रिटिश आता मात्र शिवाजी महाराजांच्या ह्या मागणीने दचकले.ब्रिटिश मात्र आपले तंत्रज्ञान शिवाजी सारख्या बलाढ्य शत्रूला पुरवून स्वतःपुढेच संकट उभे करू इच्छित नव्हते.त्यांनी शिवाजीराजेंची मागणी विनम्रपणे नाकारली.त्यांनीही तसे पत्र शिवाजी महाराजांना पाठविले.
ब्रिटिश त्यांच्या अहवालात म्हणतात की,
'सेवेजी राजा याने २२ सप्टेंबरला त्याचे दोन हेर पाठविले आणि इंजिनिअर्स पुरविण्याची मागणी केली,आम्ही तात्काळ कार्यालयीन कारण दिले आणि त्यांच्या प्रामाणिकतेविषयी शंका उत्पन्न केली आणि विनम्रपणे त्यांची विनंती नाकारली. तुमच्या प्रशासकीय गोष्टींमध्ये आमचा हस्तक्षेप ही चुकीची गोष्ट होईल असेही सांगितले.'
निश्चितच ब्रिटिशांच्या मनात शिवारायांच्या बद्दल असलेल्या भितीपोटी नाकारले.

No comments:
Post a Comment