विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 19 February 2021

शिवजन्माच्या नोंदी

 


शिवजन्माच्या नोंदी
१९ फेब्रुवारी १६३० शुक्रवार , शके १५५१ फाल्गुन वद्य तृतीया शिवनेरी गडावर स्वराज्याच्या सूर्य उगवला . छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म दिवसाच्या नोंदी अनेक समकालीन व उत्तरकालीन साधनांमध्ये आढळून येतात . सदर लेखात निरनिराळ्या साधनांचे लेखनवर्ष व त्या साधनांत आढळून येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म नोंदी व त्यातील त्रुटी यांचा उल्लेख करण्यात आला आहे . कालगणनेनुसार शके १५४९ रोजी प्रभव संवत्सर , वैशाख शुक्ल १ रोजी शुक्रवार , वैशाख शुक्ल २ रोजी शनीवार , वैशाख शुक्ल ५ रोजी मंगळवार , वैशाख शुक्ल २ रोजी भरणी नक्षत्र होते . खालील निरनिराळ्या साधनांत ह्याबाबत चुकीच्या नोंदी आढळून येतात . सदर लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म दिवसाच्या नोंदी व त्यातील त्रुटी या विषयापुरताच मर्यादित आहे.
  • (१) रायरी बखर ( लेखनकाळ १७७० ) :-
जन्म दिनांक :- शके १५४८ , क्षय , वैशाख शुक्ल ५ , सोमवार
त्रुटी : - वर्षाचे नाव व वार चुकीचा . तिथी वार जुळत नाहीत
  • (२) ९१ कलमी बखर ( लेखनकाळ १७७० ) :-
जन्म दिनांक :- शके १५५९ क्षय, वैशाख शुक्ल ५ , सोमवार
त्रुटी :- वर्षाचे नाव (शक संवत्सर) चुकीचे व वार चुकीचा .
  • (३) तारिख - इ – शिवाजी ( लेखनकाळ १७८० ) :-
जन्म दिनांक :- शके १५४९ . क्षय , वैशाख शुक्ल ५
त्रुटी :- वर्षाचे नाव (शक संवत्सर) चुकीचे , वार दिला नाही .
  • (४) प्रभानवली शकावली ( लेखनकाळ १७९८ ) :-
जन्म दिनांक :- शके १५४९ , विभव
त्रुटी :- वर्षाचे नाव (शक संवत्सर) चुकीचे, अर्धवट नोंद .
  • (५) धडफळे यादी ( लेखनकाळ १८०७ ) :-
जन्म दिनांक :- शके शके १५४९, प्रभव
त्रुटी :- वर्षाचे नाव (शक संवत्सर) चुकीचे, अर्धवट नोंद .
  • (६) चिटणीस बखर ( लेखनकाळ १८१० ) :-
जन्म दिनांक :- शके १५४९ प्रभव, वैशाख शुक्ल २ , गुरुवार
त्रुटी :- वार आणि तिथी जुळत नाहीत
  • (७) मराठा साम्राज्याची छोटी बखर ( लेखनकाळ १८१७ ) :-
जन्म दिनांक :- शके १५४९ , क्षय, वैशाख शुक्ल ५ , सोमवार
त्रुटी : - वर्षाचे नाव (शक संवत्सर) चुकीचे आणि वार चुकीचा .
  • (८) शिव दिग्विजय बखर ( लेखनकाळ १८१८ ) :-
जन्म दिनांक :- शके १५४९, प्रभव , वैशाख शुक्ल २ , गुरुवार , रोहिणी नक्षत्र
त्रुटी :- वार आणि तिथी , नक्षत्र जुळत नाही
  • (९) नागपूर भोसले बखर ( लेखनकाळ १८२२ ) :-
जन्म दिनांक :- शके १५४९ , प्रभव वैशाख शुक्ल २ गुरुवार
त्रुटी :- वार आणि तिथी जुळत नाही
  • (१०) छत्रपती वंशाची यादी ( लेखनकाळ १८२२ ) :-
जन्म दिनांक :- शके १५४९ वैशाख शुक्ल ५
त्रुटी :- वर्षाचे नाव (शक संवत्सर) चुकीचे , अर्धवट नोंद
  • (११) शिवाजी प्रताप ( लेखनकाळ १८२९ ) :-
जन्म दिनांक :- शके १५४९ , रक्ताशी
त्रुटी:- वर्षाचे नाव (शक संवत्सर) चुकीचे , अर्धवट नोंद
  • (१२) रामदासी शकावली ( लेखनकाळ १८३१ ) :-
जन्म दिनांक :- शके १५४९ , रक्ताशी
त्रुटी:- वर्षाचे नाव (शक संवत्सर) चुकीचे, अर्धवट नोंद
  • (१३) विजयदुर्गची हकीकत ( लेखनकाळ १८३५ ) :-
जन्म दिनांक :- शके १५४९ , समान अश्रिफ अलफ कृष्ण -२
त्रुटी:- मुस्लिम वर्ष चुकीचे ,अर्धवट नोंद
  • (१४) पंतप्रतिनिधी बखर ( लेखनकाळ १८४४ ) :-
जन्म दिनांक :- शके १५४९ प्रभव, वैशाख पौर्णिमा सोमवार
त्रुटी :- वार आणि तिथी जुळत नाही
  • (१५) पंडितराव बखर ( लेखनकाळ १८४८ ) :-
जन्म दिनांक :- शके १५४९ , प्रभव
त्रुटी :- अर्धवट नोंद
  • (१६) शेडगावकर बखर ( लेखनकाळ १८५४ ) :-
जन्म दिनांक :- शके १५४९ प्रभव वैशाख शुक्ल ३, शनिवार ,रोहिणी नक्षत्र, कर्क लग्न
त्रुटी:- माहितीचा परस्परांशी संबंध जुळत नाही
  • (१७) इतिहास भिडे ( लेखनकाळ १८६६ ) :-
जन्म दिनांक :- शके १५४९, प्रभव, वैशाख शुक्ल ३, शनिवार
त्रुटी :- वार व दिवस जुळत नाहीत
  • (१८) दासपंचायतन शकावली ( लेखनकाळ १७३५ ) :-
जन्म दिनांक :- शके १५५१
त्रुटी : - अर्धवट नोंद
  • (१९) स्प्रिंगेलचा इतिहास ( लेखनकाळ १७९१ ) :-
जन्म दिनांक :- सन १६२९
त्रुटी :- अर्धवट नोंद
  • (२०) तंजावरचा शिलालेख ( लेखनकाळ १८०३ ) :-
जन्म दिनांक :- शके १५५१
त्रुटी :- अर्धवट नोंद
  • (२१) मराठयांची बखर ( लेखनकाळ १८२९ ) :-
जन्म दिनांक :- सन १६२७
त्रुटी :- अर्धवट नोंद
समकालीन आणि विश्वासनीय अश्या शिवभूषण ( लेखनकाळ १६७० ) , सभासद बखर ( लेखनकाळ १६९५ ) , चित्रगुप्त बखर ( लेखनकाळ १७६० ) आणि शिवकाव्य संकर्षण संकळकळेकृत ( लेखनकाळ १८२० ) यामध्ये शिवजन्माची नोंद दिली गेली नाही.
  • (२२) शिवभारत ( लेखनकाळ १६६५ - १६७० ) :-
जन्म दिनांक :- शके १५५१ फाल्गुन वद्य ३ ,शुक्रवार
नोंद बरोबर
  • (२३) राज्याभिषेख शकावली ( लेखनकाळ १६७४ ) :-
जन्म दिनांक :- शके १५५१ , फाल्गुन वद्य ३ , शुक्रवार , शुक्ल संवत्सर
नोंद बरोबर
  • (२४) जेधे शकावली ( लेखनकाळ १६९५ ) :-
जन्म दिनांक :- शके १५५१ शुक्ल , फाल्गुन वद्य ३ ,शुक्रवार
नोंद बरोबर
  • (२५) जोधपूर कुंडली ( लेखनकाळ १७०० ) :-
जन्म दिनांक :- संवत १६८६ फाल्गुन वद्य ३ शुक्रवार
नोंद बरोबर
  • (२६) बिकानेर कुंडली :-
जन्म दिनांक :- संवत १६८६ फाल्गुन वद्य ३ भृगो रात्री
नोंद बरोबर
  • (२७) बनेडा कुंडली :-
जन्म दिनांक :- संवत १६८६ चैत्र वद्य ३ शुक्रवार
नोंद बरोबर
  • (२८) फोर्बचा संग्रह ( लेखनकाळ १६७४ ) :-
जन्म दिनांक :- शके १५५१ फाल्गुन वद्य ३
नोंद बरोबर
श्री. नागेश मनोहर सावंत.
संदर्भ :- शिवाजी महाराजांचा जन्म दिनांक :- मोहन आपटे
शककर्ते शिवराय :- विजयराव देशमुख

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...