यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा.
- अलेक्झांडर द ग्रेट Alexander the great,
- नेपोलियन बोनापार्ट Napoleon Bonaparte,
- ज्युलियस सीझर गेयस Julius Caesar Gaius ,
- शार्लमेन Charlemagne,
- ऑलिव्हर क्रॉमवेल Oliver Cromwell
अश्या अनेक योध्यांशी करतात.
पण खरच हे सगळे परकीय योद्धे छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करावी अश्या लायकीचे होते का?
ह्या विषयी शोध घेतला असता बऱ्याच अचंबित करण्याऱ्या गोष्टी सापडतात.
चला तर शोध घेऊयात ह्या परकीय योध्यांच्या कर्तृत्वाचा आणि त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांशी केलेल्या मूल्यमापनाचा.
महाराष्ट्र धर्म समूहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
1. अलेक्झांडर द ग्रेट
( Alexander the great)
1. अलेक्झांडर द ग्रेट
( Alexander the great)
ह्याला आपण सिकंदर असेही म्हणतो.
हा
मॅसेडोनियाचा ग्रीक राज्यकर्ता. आपल्या कारकिर्दीत त्याने इराण, सीरिया,
इजिप्त, मेसोपोटेमिया, फिनीशिया, जुदेआ, गाझा, बॅक्ट्रिया तसेच भारतातील
पंजाबपर्यंतचा प्रदेश जिंकला. फारसी पत्रांमध्ये त्याला एस्कंदर-इ-मक्दुनी
(मॅसेडोनियाचा अलेक्झांडर) म्हटले जाते. तर उर्दू आणि हिंदी दस्तऐवजांत
त्याला सिकंदर-ए-आझम असे म्हटले जाते.
अलेक्झांडर सत्तेसाठी कायम हपापलेला असायचा. ह्याचे आणि ह्याचा बाप फिलिप यांच्यात वैर होते.
राज्याचा
उत्तराधिकारी निवडताना तर्रर्र दारूच्या नशेत असलेल्या अलेक्झांडरने
आपल्याला डावललं जातंय हे पाहून " मी काय अनौरस पुत्र आहे काय.." असे म्हणत
आपला काका अटॅलसच्या अंगावर दारूचा ग्लासच फेकून मारला होता. ह्यावरून
चिडून जाऊन राजा फिलिप म्हणजे अलेक्झांडरच्या बापाने अलेक्झांडरला
मारण्यासाठी तलवार उपसली होती.
हाच
राग मनात ठेऊन पुढे 'एजियाच्या' सभागृहात मोठा उत्सव सुरू असतानाच
'पॉसेनियस' नावाच्या एका तरुणाने काही खाजगी कारणास्तव अलेक्झांडरचा बाप
राजा फिलिपच्या छातीत खंजीर भोसकून त्याची हत्या केली होती. ह्या खुनी
पॉसेनियसला पकडून न्यायसंस्थेपुढे उभे करणे सहज शक्य असतानाही अलेक्झांडरने
त्याला ठार केले. या आणि इतर काही कारणांवरून राजा फिलिपच्या खुनात
अलेक्झांडरचा हात असल्याचा तर्क मांडला जातो.
बापाच्या हत्येनंतर वयाच्या विसाव्या वर्षी मॅसेडोनियन सैन्याने अलेक्झांडरला आपला राजा घोषित केले.
अथेन्स
आणि थेबेस या दोन मांडलिक राजांनी अलेक्झांडरच्या विरुद्ध बंड केले होते.
अलेक्झांडरने हे बंड मोडून काढून तिथल्या लोकांवर दहशत बसावी म्हणून
तब्ब्ल ६००० लोकांची मुंडकी कापून धडावेगळे केली आणि थेबेस शहर जाळून भस्मसात केले.
पिनारस
नदीच्या तीरावरील आयसस शहरावर हल्ला करून 'दरायस' राजाचा पराभव
अलेक्झांडरने केला आणि ३२९ वेश्या, ३३६ आचारी, ७० मद्य ओतणाऱ्या दासी,
दरायस राजाची आई 'ज्यात' आणि दरायस राजाची पत्नी 'स्टटेरा' आणि मुलगी (हिचे
ही नाव स्टटेराच होते.) ह्यांना कैद करून आपल्याबरोबर नेले. ह्या आयससच्या
युद्धात अलेक्झांडरने सुमारे २०,००० लोकांची कत्तल केली.
यानंतर
अलेक्झांडरने हर्केनियावर स्वारी केली. 'माझ्या खुनाचा प्रयत्न करताय
का..' असे म्हणत अलेक्झांडरने राजा पार्मेनियन आणि त्याचा पुत्र फिलोटस
यांची निर्घृण हत्या केली.
इ.स.पूर्व
३२६ ला अलेक्झांडच्या सैन्याने भारतावर आक्रमण केले. इथं त्याच उत्तरेतील
हिंदुस्थानातील टोळ्यांशी युद्ध सुरु झाले. पेशावर येथे आपल्यावर हल्ला
केलेल्या शत्रूच्या टोळीच्या सर्व बायका आणि लहान मुलांना पकडून
अलेक्झांडरने त्यांची अत्यंत क्रूरपणे कत्तल केली.
दारूच्या नशेत अलेक्झांडरने आपला सहकारी सॅल्यूटसची निर्घृण हत्या केली होती.
आता महत्वाचे:
छत्रपती शिवाजी महाराजांना अलेक्झांडरसारखे कुठलेही व्यसन नव्हते. अलेक्झांडरने जसा आपल्या सहकाऱ्यांचा खून केला तसा खून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांचा केला नाही. पर-स्रियांना छत्रपती शिवाजी महाराजांनी सन्मानाची वागणूक दिली. मग ती स्त्री शत्रूची का असेना. कधीही त्यांचा अपमान होऊ दिला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही हजारोंच्या संख्येने निरपराध लोकांची, बायका -मुलांची कत्तल केली नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांना अलेक्झांडरसारखे कुठलेही व्यसन नव्हते. अलेक्झांडरने जसा आपल्या सहकाऱ्यांचा खून केला तसा खून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांचा केला नाही. पर-स्रियांना छत्रपती शिवाजी महाराजांनी सन्मानाची वागणूक दिली. मग ती स्त्री शत्रूची का असेना. कधीही त्यांचा अपमान होऊ दिला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही हजारोंच्या संख्येने निरपराध लोकांची, बायका -मुलांची कत्तल केली नाही.
मग तुम्हीच सांगा. असे सगळे असताना का बर आपण आपल्या राजाची त्या दारुड्या खुनशी अलेक्झांडरशी तुलना करावी?
**
**
2.नेपोलियन बोनापार्ट.
(Napoleon Bonaparte)
(Napoleon Bonaparte)
ह्याचा जन्म कोर्सिकाचा.
हे कोर्सिका बेट मेडिटोरियन समुद्रात आहे. जन्माने फ्रेंच नसला तरी नेपोलियन हा आपल्या महान कर्तुत्वाच्या जोरावर फ्रेंच सम्राट झाला.
हे कोर्सिका बेट मेडिटोरियन समुद्रात आहे. जन्माने फ्रेंच नसला तरी नेपोलियन हा आपल्या महान कर्तुत्वाच्या जोरावर फ्रेंच सम्राट झाला.
नेपोलियन फार महत्वकांक्षी स्वभावाचा होता.
जशी
जशी नेपोलियन युद्ध जिंकत गेला तशी तशी त्याची महत्वकांक्षा हि वाढतच
गेली. त्याच्या चरित्रातील सगळ्यात मोठी दुर्बलता हि होती कि इतर देशांशी
झालेल्या कुठलाही तहाचा तो सन्मान ठेवत नसे.
केवळ राजकीय संधी ह्याच नजरेतून तो त्याकडे पाही. त्यामुळे सगळे शेजारचे देश त्याच्याकडे संशयाच्याच नजरेतून पाहत.
'मी
कधीच कुठलीही चूक करूच शकत नाही, मी कधीही हरूच शकत नाही' अश्या
समजुतीमुळे तो प्रचंड जिद्दी बनला. त्यामुळे दुसऱ्यांनी दिलेले हिताचे
चांगले सल्ले तो सरळ धुडकावून लावत असे. त्याच्या ह्या स्वभावामुळे लोक
त्याला चांगले सल्ले देणे टाळू करू लागले. जवळच्यांचा तो पदोपदी अपमान करू
लागला. त्यामुळे त्याचे जवळचे सगळे सहकारी त्यापासून दूर जाऊ लागले.
नेपोलियनची सगळ्यात मोठी दुसरी गोष्ट म्हणजे तो सदैव सैन्यावर अवलंबून राहू लागला.
सगळी
राजनीती तो सैन्याच्याच बळावर करू लागला. ह्यामुळे तो सदैव युद्धांमध्येच
अडकून पडू लागला. तो हे विसरून गेला कि सैन्याचा उपयोग हा फक्त राज्य
विस्तार, शत्रूवर विजय आणि संकटाच्या वेळी करायचा असतो.
आपल्या
राज्याच्या पुनर्बांधणीत आणी त्याच्या कल्याणाच्या गोष्टींत नेपोलियनने
मुळीच लक्ष दिले नाही. त्यामुळे जशी फ्रान्सची युद्धे संपली तशी लोकांनी
नेपोलियनची साथ सोडली.
आपल्याच
लोकांची सहानभूती आणि प्रेम मिळविण्यात नेपोलियन अपयशी ठरला. उठसुठ युद्ध
केल्यामुळे त्याची प्रजा आणि सैन्यही कंटाळले. विनाकारण सर्व शेजारी
राष्ट्रांशी शत्रुत्व तयार करून त्याने स्वतःच्या बरोबर आपल्या देशावर
युद्धाचे ढग कायमच गडद केले. पराजित राष्ट्रे संधी मिळताच त्याच्या विरुद्ध
परत युद्ध करू लागली. आपल्या शत्रूंमध्ये मैत्रीची थोडीही जागा नेपोलियनने
शिल्लक ठेवली नाही.
सुरवातीला
फ्रान्सची सेना ही देशभावनेने ओतप्रोत भरलेली होती. पण नेपोलियन जसा
जिंकायला लागला तसा तो आपल्या सैन्यात जर्मन, इटालियन, पोर्तुगीज, डच,
अश्या सैनिकांची भरती करू लागला. बाहेरच्या सैनिकांमुळे त्याच्या सैन्यात
विविधता येऊन त्याच्या सैन्यात देशभावनेचे थोडेही प्रेम शिल्लक राहिले
नाही. जिंकलेल्या प्रदेशातील लोकांच्या मनात नेपोलियन कधीही सद्भावना आणी
प्रेम निर्माण करू शकला नाही. ह्याचाच परिणाम म्हणजे तो वॉटर्लूची लढाई
हरला.
नेपोलियनच्या काही निर्णयांमुळे पोर्तुगाल, स्पेनमध्ये लाखो लोकांना आपल्या प्राणांना मुकावे लागले.
आता महत्वाचे:
छत्रपती शिवाजी महाराजांनीही नेपोलियन सारखा आपला राज्यविस्तार केला. पण हे करत असताना त्यांनी अत्यंत बारकाईने स्वराज्याची व्यवस्था लावून दिली. प्रजेला काय हवे नको ते पहिले. रयत सुखी आणी समृद्ध केली.
छत्रपती शिवाजी महाराजांनीही नेपोलियन सारखा आपला राज्यविस्तार केला. पण हे करत असताना त्यांनी अत्यंत बारकाईने स्वराज्याची व्यवस्था लावून दिली. प्रजेला काय हवे नको ते पहिले. रयत सुखी आणी समृद्ध केली.
छत्रपती
शिवाजी महाराज आपल्या मुत्सद्यांशी सल्लामसलत करत असत. त्यांच्या शब्दांना
मान देत असत. छत्रपती शिवाजी महाराज कधीही जवळच्या लोकांचा अपमान करत नसत.
महाराजांच्या ह्या स्वभावामुळे लोक होऊन स्वराज्याची सेवा करण्यासाठी
आपणहून धडपडत असत.
छत्रपती
शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याचा वापर हा फक्त राज्य विस्तार, शत्रूवर
विजय आणि संकटाच्या वेळीच केलेला आहे. इतर वेळी फौज स्वराज्यात लोकोपयोगी
कामे करण्यात गुंतलेली असायची. शिवाजी महाराजांनी परमुलखात स्वाऱ्या करताना
तिथल्या प्रजेला आधार दिला. तिला छळले नाही, तिच्यावर अत्याचार केले नाही,
विनाकारण हत्या केली नाही. त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या स्वाऱ्या
परराज्यांत गेल्यावर लोकांस आनंद होत असे आणि 'स्वराज्य आले..स्वराज्य
आले..' असे लोक म्हणत असत.
छत्रपती
शिवाजी महाराजांनी स्वकीयांच्या बरोबरच परकीयांच्याही मनात सहानभूती आणि
प्रेम निर्माण करण्यात यश मिळविले. स्वकीयांना महाराज जसे आधार वाटायचे
तसेच शत्रूच्या लोकांनाही महाराज आधार वाटायचे. शत्रूचे लोकही अंतस्थ
शिवाजी महाराजांशी सलोख्याचे संबंध ठेऊन असायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी
युद्धांत कधीही शरण आलेल्या शत्रूच्या सैनिकांची विनाकारण कत्तल केलेली
नाही.
**
**
महाराष्ट्र धर्म समूहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
3.ज्युलियस सीझर गायस.
(Gaius Julius Caesar)
3.ज्युलियस सीझर गायस.
(Gaius Julius Caesar)
सीझर हे नाव नाही. हि उपाधी आहे.
ग्रीको-रोमन जगाच्या इतिहासाचा ओघ निर्णायकपणे बदलून टाकणारा थोर रोमन सेनापती, हुकूमशहा आणि मुत्सद्दी.
ग्रीको-रोमन जगाच्या इतिहासाचा ओघ निर्णायकपणे बदलून टाकणारा थोर रोमन सेनापती, हुकूमशहा आणि मुत्सद्दी.
त्याचा
जन्म रोम शहरी झाला. सीझरचे कुटुंब ‘पट्रिशन’ वर्गातले होते. पट्रिनशन
म्हणजे श्रेष्ठी. पट्रिशन हा विशेषाधिकार असलेला वर्ग होता. सीझरचे घराणे
श्रेष्ठींपैकी असले, तरी श्रीमंत, नामांकित वा प्रभावशाली नव्हते. रोमन
सरदाराला रोमच्या राजकीय जीवनात पुढे येण्यासाठी निरनिराळ्या सरकारी
अधिकारपदांवर निवडून येणे आवश्यक असे आणि कॉन्सलपद प्राप्त करणे हे फार
मोठे यश मानले जात असे (कॉन्सलची मुदत एक वर्षासाठी असली, तरी त्याचे
अधिकार मोठे असत. न्यायदान आणि लष्कर त्याच्या अधिकारक्षेत्रात येत असे).
हे सर्व करण्यासाठी पैसा आणि प्रभाव ह्यांचे पुरेसे पाठबळ जरी सीझरजवळ
नसले, तरी त्याने राजकीय जीवनाचा स्वीकार हेतुतःच केला होता, असे दिसते.
सीझरने
फार्दर स्पेनमध्ये (आजचा अँडालूसीया आणि पोर्तुगाल) क्वेस्टर म्हणून काम
केले. त्याला इ. स. पू. ६५ मध्ये ‘कुरुले ईडिल’ (Curule Aedile) ह्या पदावर
निवडण्यात आले. हे पद दंडाधिकाऱ्याचे असून हा अधिकारी सर्व लोकांचे
प्रतिनिधित्व करी. रोम शहरातील देवळे, इमारती, बाजारपेठा, खेळ आणि
धान्यपुरवठा हे विषय त्याच्या अधिकारकक्षेत येत.
ह्या
पदावर असताना त्याने पैशाची भरपूर उधळपट्टी केली. त्यासाठी त्याने कर्जे
काढली. ह्या उधळपट्टीत लोकरंजनासाठी होणारा खर्च बराच असे. सार्वजनिक
जीवनात यशस्वी होण्यासाठी तो हे करीत होता. पुढे इ. स. पू. ६३ मध्ये
‘पाँटिफेक्स माक्सिमस’ ह्या पदावर निवडून गेल्यावरही त्याने हेच धोरण ठेवले
होते. रोममधील हे प्रमुख धार्मिक पद होते. ह्या पदाच्या माध्यमातून
रोमच्या राजकारणात महत्त्व प्राप्त होण्यास बरीच मोठी संधी होती.
रोमच्या
सामाजिक राजकीय जीवनात सीझर पुढे येत चालला होता. देखणे, सुसंस्कृत आणि
लोभस व्यक्तिमत्त्व असलेल्या सीझरने रोमन समाजावर आपली छाप पाडली होती;
परंतु तो वादग्रस्तही होत चालला होता. इ. स. पू. ६२ ह्या वर्षासाठी सीझर
प्रेटरपदी निवडला गेला. नंतर इ. स. पू. ६३-६४ साठी फार्दर स्पेनचे
गव्हर्नरपद त्याला मिळाले; पण त्याच्यावर कर्ज बरेच झालेले असल्यामुळे
त्याचे सावकार त्याला रोम सोडून जाऊ देईनात.
गव्हर्नर
झाल्यानंतर त्याच्या सत्तेखालील प्रांताच्या वायव्य हद्दीपलीकडील प्रदेशात
लष्करी मोहीम चालवून त्याने स्वतःसाठी आणि आपल्या सैनिकांसाठी बरीच लूट
जमा केली. हि मिळविलेली लूट पुढे जाऊन त्याने वयक्तिक राजकीय फायद्यासाठी
वापरली. आपल्या राजकीय फायद्यासाठी ज्युलियस सीझर बेधडक बायकांशी लग्न करीत
असे आणि परत बायकांना सोडूनही देत असे.
इजिप्तची
राणी क्लियोपेट्रा ही ज्युलियस सीझरची प्रेमिका होती. क्लीओपात्राने एका
पुत्राला जन्म दिला. तो सीझरपासून झाल्यामुळे त्याचे नाव सीझेरियन असे
ठेवले होते.
रोमचा
सर्वंकष सत्ताधारी झाल्यानंतर सीझरने आफ्रिका, फार्दर स्पेन अशा ठिकाणी
त्याला होणारा विरोध मोडून काढला. ह्या मोहिमांमध्ये निरपराध लोकांचीही
हत्या करण्यास सीझरने आजिबात मागे पुढे पहिले नाही. सीझरचा राजसत्तेचा
वाढता हव्यास आणि लुटीच्या पैशांचा गैर वापर त्यामुळे सीझरला ठार मारण्याचे
कारस्थान रचले जात होते. ह्या कारस्थानात काही पूर्वीचे सीझरनिष्ठही होते.
सीझरच्या राजवटीचे सतत वाढत जाणारे राजेशाही स्वरुप त्यांना मान्य नव्हते.
शेवटी
संधी साधून श्रेष्ठ सभेच्या गृहामध्ये मारेकऱ्यांनी सीझरला भोसकून ठार
मारले. त्याचे काही जुने मित्र आणि त्याने उपकृत केलेले काही लोक मारेकरी
म्हणून समोर आलेले पाहून – विशेषतः ब्रूटसला त्यांच्यात पाहून – सीझर
मरताना आश्चर्यचकित झाला होता.
आता महत्वाचे:
छत्रपती
शिवाजी महाराजांनी हे राज्य रयतेचे आहे हा भाव सदैव जागता ठेवला. आपल्या
राज्याला हुकूमशाहीचे रूप त्यांनी येऊ दिले नाही. स्वराज्यातील प्रत्येकाला
हे माझे राज्य आहे असे वाटायचे.
ज्युलियस सीझर कठोर हुकूमशहासारखा वागला. युद्धातून मिळविलेली लूट ज्युलियस सीझर स्वतःच्या वयक्तिक स्वार्थासाठी वापरत असे.
मात्र शिवाजी महाराज परमुलुखातून गोळा केलेली खंडणी स्वराज्याच्या हितासाठी वापरत असत.
आपली
राजकीय महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी ज्युलियस सीझर ने दमणकारी नीती
वापरत सगळे विरोधक संपविण्याचे षडयंत्र केले. परस्त्रीयांशी संबंध ठेवले.
ह्या त्याच्या वागण्यावरून रोमवासी ज्युलियस सीझरवर प्रचंड नाराजही झाले
होते.
ज्युलियस सीझरने वारेमाप कर्जे काढली आणि पैशाची भरपूर उधळपट्टी केली.
छत्रपती
शिवाजी महाराजांनी पै पै जमा करून, त्या धनाचा कुठलाही गैरवापर होऊ न देता
मेहनतीने शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा खजिना वाढविला. स्वतःच्याच
मित्रांनी ज्युलियस सीझरचा खून केला. शिवाजी महाराजांनी त्यांचे सवंगडी
पोटाशी धरले. त्यांना प्रेम दिले, विश्वास दिला.
तानाजी मालुसरेंसारख्या आपल्या जिवाभावाच्या सवंगड्याच्या मृत्यू मुळे शिवाजी महाराज भावुक झालेले दिसतात.
**
तानाजी मालुसरेंसारख्या आपल्या जिवाभावाच्या सवंगड्याच्या मृत्यू मुळे शिवाजी महाराज भावुक झालेले दिसतात.
**
4.शार्लमेन
(Charlemagne)
(Charlemagne)
शार्लमेनचा
जन्म जर्मनीतील आखन येथे झाला. त्याचे वडील 'पेपिन द शॉर्ट' तर त्याचे
आजोबा 'चार्लस मार्टेल' हेदेखील महान योद्धे होते. पेपिनच्या मृत्यूनंतर
त्याचे राज्य शार्लमेन व कार्लोमन या दोन मुलांत विभागले गेले. भाऊ
कार्लोमनच्या मृत्यूनंतर याची पत्नी मुलांना घेऊन लाँबार्डच्या डेसिडेरिअस
राजाच्या आश्रयास गेली. तेव्हा शार्लमेनन भावाची सर्व जहागीर बळकावली व
स्वतःस फ्रांकोनियाचा राजा म्हणून घोषित केले.
या
सुमारास पोप आणि लॉंबार्डचा राजा डेसिडेरिअस यांत संघर्ष उद्भवला. पोपने
शार्लमेनची मदत मागितली. त्याने डेसिडेरिअस सह आपला भाऊ कार्लोमनची विधवा
पत्नी व मुले या सर्वांना पकडून ठार मारले आणि लाँबार्डचा (इटली) राजा हे
पद धारण केले.
यानंतर
शार्लमेनने आव्हार्झ (हंगेरी), सॅक्सन (जर्मनी-ब्रिटन), मूर (स्पेन),
स्लाव्ह (चेकोस्लोव्हाकिया) इत्यादी टोळ्यांचा पराभव करून राज्यविस्तार
केला.
सॅक्सन
या लोकांबरोबर तीस वर्षे त्याचा लढा चालला आणि अखेरीस शार्लमेनने
सॅक्सनांना ख्रिस्ती धर्म स्वीकारायाला लावलाच. ह्या साठी शार्लमेनने ४५००
सॅक्सन लोकांची क्रूर हत्या केली.
ख्रिस्ती
धर्माचा शार्लमेन कट्टर अनुयायी होता त्यामुळे जिथे म्हणून तो जायचा तिथे
तो लोकांचे धर्मपरिवर्तन करायचा. अश्याच प्रकारे त्याने तलवारीच्या जोरावर
मूर या मुस्लिम जमातीचे ख्रिस्ती धर्मात धर्मपरिवर्तन केले.
पहिली बायको डेसिडेराटा हिला त्याने सोडून देऊन पुढे त्याने अनेक बायकांशी संबंध प्रस्थापित केले.
आता महत्वाचे:
छत्रपती
शिवाजी महाराजांनी शार्लमेन प्रमाणे आपल्या भावाचे राज्य बळकावले नाही.
शार्लमेनने भावाच्या बायको आणि मुलांना अत्यंत क्रूरपणे ठार मारले.
छत्रपती
शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात कधीही निरपराध बायका मुलांची हत्या
केली नाही. शार्लमेनने जसे लोकांना बळजबरीने ख्रिस्ती बनविले तसे शिवाजी
महाराजांनी कोणाचेही बळजबरीने धर्मपरिवर्तन केले नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांच्या क्रूर हत्या केल्या नाही. आणि तलवारीच्या धाकाने बळजबरीने लोकांचे धर्मपरिवर्तनही केले नाही.
तलवारीच्या धाकाने ज्या लोकांनी धर्मपरिवर्तन केले त्यांना मायेने परत धर्मात घेतले. प्रसंगी बरोबर बसून जेवूही घातले.
ज्यांनी धर्मपरिवर्तनासाठी बळजबरी केली त्यांची मुंडकी महाराजांनी उडविलेली आहेत.
छत्रपती
शिवाजी महाराजांनी पत्नीव्रत कटाक्षाने पाळले. कधीही त्यांनी शत्रूच्या
बायका मुलांना हात लावू दिला नाही. म्हणूनच शत्रूच्या मनातही छत्रपती
शिवाजी महाराजांच्याविषयी अत्यंत आदरभाव असायचा.
**
**
5.ऑलिव्हर क्रॉमवेल.
( Oliver Cromwell)
ऑलिवर क्रॉमवेल हा ब्रिटन चा ( यूनाइटेड किंगडम ) शासक होता.
( Oliver Cromwell)
ऑलिवर क्रॉमवेल हा ब्रिटन चा ( यूनाइटेड किंगडम ) शासक होता.
हा
उत्तम राजनेता, सैनिक, आणि क्रांतिकारक होता. देशातील राजेशाहीचा हा कट्टर
विरोधक होता. राजा चार्लसच्या विरोधात असलेला जनआक्रोशाचा फायदा घेत
ह्यानेच ब्रिटनचा राजा चार्लस १ ह्याला मृत्युदंड दिला होता. राजेशाही नष्ट
करून देशात लोकशाही स्थापन करण्याचा प्रयत्न ह्याने केला होता. विरोधात
असलेल्या सगळ्यांची खांडोळी उडवून ह्याने लोकांमध्ये मोठी दहशत तयार केली
होती.
देशातील राजेशाही नष्ट करून ह्या क्रॉमवेल ने इंग्लंड, स्कॉटलंड, आणि आयर्लंड ह्या ठिकाणी राष्ट्रपतीच्या रूपात राज्य केले होते.
हा
अत्यंत क्रूर लष्करी शासक होता. आयर्लंड मधील लोकांचा विरोध मोडून
काढण्यासाठी क्रॉमवेलने अत्यंत क्रूरता दाखविली होती. देशातील गृहयुद्ध,
अनागोंदी मोडून काढण्यासाठी ह्याने अगणित लोकांना, बायकांना लहान मुलांना
सुळावर चढविले होते. सप्टेंबर १६४९ मध्ये आयर्लंड मधील द्रोघेडा (Drogheda)
ह्या गावातील प्रत्येक लहानापासून थेट म्हाताऱ्या माणसापर्यंत ३५००लोकांची
ह्याने कत्तल केली होती. ह्या हत्या करून " मला देवानेच ह्यांची हत्या
करायचा आदेश दिला होता" असेही ह्याने बिनदिक्कत सांगितले होते.
पुढच्या
महिन्यातच परत ह्याने आयर्लंड मधील वेक्सफोर्ड (Wexford) गावातील विरोध
करणाऱ्या लोकांना चर्चेसाठी बोलविले आणि चर्चेसाठी आलेले लोक त्याला शरण
आले तरीही रागाच्या भरात त्याने १५०० लोकांची हत्या केली होती. हत्या करून
लोकांच्या मुंडक्यांचे ढिगारेच त्याने रचले होते.
१६५८
मध्ये ह्याचा मृत्यू झाला. ह्याच्या मृत शरीरावर लेप लावून त्याच्या
देहाला संरक्षित करून लोकशाहीचा पुरस्कर्ता म्हणून लोकांनी मोठ्या
सन्मानाने वेस्ट मींस्टर कॅथेड्रल मध्ये त्याला दफन केले होते.
ह्याच्या
मृत्यनंतर इंग्लंडमध्ये परत राजेशाही स्थापन झाली. नवीन राजा चार्ल्स
द्वितीय ह्याने देशाची सत्ता हातात घेताच आपल्या बापाचा खुनी असलेल्या ह्या
क्रॉमवेलचा मृतदेह बाहेर काढून त्या मृतदेहाचं शीर कलम करून ते शीर (खोपडी
) वेस्ट मींस्टर कॅथेड्रलच्या दाराला लटकविले होते.
आता महत्वाचे:
छत्रपती
शिवाजी महाराजांनी आपल्या प्रजेला कायम सुखी ठेवल्याने प्रजेने कधीही
राजाविरोधात असंतोष व्यक्त केला नाही. ज्या प्रमाणे ऑलिव्हर क्रॉमवेलने
आयर्लंडमधील लोकांची कत्तल केली त्या प्रमाणे आपल्याच स्वराज्यातील लोकांची
छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही कत्तल केली नाही.
लोक छत्रपती शिवाजी महाराजांवर जीव ओवाळून टाकत असत. महाराजांनी लोकांस रोजगार दिला. हातात तलवार देऊन पराक्रमाचे तमाशे दाखविण्यास उद्युक्त केले.
**
लोक छत्रपती शिवाजी महाराजांवर जीव ओवाळून टाकत असत. महाराजांनी लोकांस रोजगार दिला. हातात तलवार देऊन पराक्रमाचे तमाशे दाखविण्यास उद्युक्त केले.
**
महाराष्ट्र धर्म समूहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
इथून पुढे सावध वाचावे:
इथून पुढे सावध वाचावे:
पाश्चात्य योध्यांशी तुलना केली म्हणजे शिवाजी महाराजांची योग्यता वाढेल असे काही नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांची योग्यता स्वयंसिद्ध आहे.
अलेक्झांडर प्रमाणे शिवाजी महाराजांनी आपल्या स्नेह्या-सोबत्यांस ठार मारले नाही.
अलेक्झांडर प्रमाणे शिवाजी महाराजांनी आपल्या स्नेह्या-सोबत्यांस ठार मारले नाही.
सीझर प्रमाणे आपल्या बायकोस सोडून दिले नाही.
बोनापार्ट प्रमाणे अन्यायाने लोकांचा वध केला नाही.
क्रॉमवेलने आयरिश लोकांस सरसहा ठार मारले त्या प्रमाणे शिवाजी महाराजांनी कोण्या प्रान्तातील लोकांची कत्तल उडविली नाही.
फेड्रिक द ग्रेट प्रमाणे शिवाजी महाराजांच्या अंगी दुर्गुण नव्हते.
**
**
छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्तन न्यायाचे, नीतीचे, पराक्रमाचे, स्वधर्मपरायणतेचे आणि परधर्मसहिष्णुतेचे होते.
- अगणित लढाया मारून त्यात विजयी होणे,
- साडेतीनशेच्या वर किल्ले मैदानात, डोंगरांवर, समुद्र किनाऱ्यांवर बांधणे,
- नवीन सैन्य तयार करणे,
- नवीन आरमार निर्माण करणे,
- नवीन कायदे बनविणे,
- स्वभाषेला उत्तेजन देणे,
- कवींना, लेखकांना कलाकारांना, शिल्पकारांना आश्रय देणे,
- नवीन शहरे वसविणे,
- स्वधर्माचे रक्षण करणे,
- गोधनाचा प्रतिपाळ करणे,
- कर्तुत्वाला संधी देणे,
- आया-बहिणींचे रक्षण करणे
- 'प्रयत्न केल्यास यश मिळते' हे सिद्ध करून दाखविणे,
- संघटनात्मक शक्ती निर्माण करून स्वराज्य उभे करणे,
- रयतेला पोटच्या लेकरासारखे उराशी धरणे,
- आणि जुलमी सुलतानांपासून स्व-देशाची सुटका करून स्व-देशाला स्वतंत्र व सुखी करणे
ह्या
लोकोत्तर कृत्यांनी जर कोणा पुरुषाने ह्या भू मंडळाला अक्षय ऋणी करून
ठेवले असेल तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी.
छत्रपती
शिवाजी महाराजांची खासगी आणि सार्वजनिक वर्तणूक-पराक्रम इतके लोकोत्तर
होते कि त्यांच्याशी तुलना करावयास जी जी म्हणून व्यक्ती घ्यावी ती ती ह्या
ना त्या कारणाने छत्रपती शिवाजी महाराजांहून कमतरच दिसेल.
आणि म्हणूनच आमचे छत्रपती शिवाजी महाराज हे यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा आहेत.
लेख समाप्त.
लेख आवडल्यास जरूर प्रतिक्रिया द्या आणी आपल्या महाराष्ट्र धर्मवर मित्रमंडळींना आमंत्रित करा.
समाप्त.
श्री भवानी शंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम
निरंतर
WhatsApp: 00968 98813812
श्री भवानी शंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम
निरंतर
WhatsApp: 00968 98813812
No comments:
Post a Comment