तीन स्वराज्य स्थापना करणारे जगातील सर्वश्रेष्ठ पिता म्हणून ज्यांचा गौरवपूर्ण उल्लेख होतो. ते स्वराज्य संकल्पक शहाजीराजें
पराक्रमी वेरुळच्या भोसले घराण्यातील मालोजीराजे आणि उमाऊ यांच्या पोटी १८ मार्च १५९५ रोजी जन्म झाला.
आई उमाऊ या फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील, आपसूकच दोन्ही घराण्याचा पराक्रमी वारसा जन्मतः मिळाला. मामा वणगोजीराजे निंबाळकर, वडील मालोजीराजे आणि सिंदखेडराजाचे लखुजीराजे यांचा अहमदनगरच्या निजामशाहीत मोठा दबदबा होता. किंबहूना यांच्या पराक्रमावरच निजामशाहीच अस्तित्व होत.
शहाजीराजेंच बालपण हे वेरुळच्या गढीत गेल, तेथे त्यांना जाणकार प्रशिक्षकांनी उत्तमोत्तम शिक्षण दिले. त्यांनी १० भाषांचं ज्ञान अवगत केले होते. संस्कृतचे तर पंडित होते. शस्त्र विद्येत पण पारंगत झाले होते.
भोसले, निंबाळकर आणि जाधव घराण्याच एकमेकांकडे नेहमी जाण येण होत. वणगोजीराजेंच्या पुढाकाराने शहाजीराजे आणि लखुजीराजेंची कन्या जिजाऊंचा लग्न जमलं. सुसंस्कृत, सुलक्षण जिजाऊ भोसले घराण्यात सून म्हणून आल्या. रयत सर्वांगी पिचली होती. सत्ताधीश आपापल्या राज्यविस्तारासाठी लढत होते. बिचारी रयत मात्र सततच्या आक्रमणानी त्रस्त झाली होती. उभी पिकं नष्ट होत होती, आया बहिणींची अब्रु लुटली जात होती, वतनदार वतनाच्या लोभापायी आपापसात लढत होती. अश्या निस्तेज मुर्दाड वातावरणात शहाजीराजे आणि जिजाऊंनी स्वराज्याची स्वप्न पाहिलं. आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न चालू केले. मुगल व आदिलशाहीच्या सततच्या मोहिमानी निजामशाही मोडकळीस आली. आणि अस्तित्वहीन झाली असताना. पेमगीरीच्या किल्ल्यावर निजामशाहीच्या वारसातील बाल मुर्तुजास मांडीवर घेऊन शहाजीराजे नवीन निजामशाही अस्तीत्वात आणली, नामधारी मुर्तुजा होता, सर्व हक्क राजे कडे होते. बलाढ्य मुगल व आदिलशाहीस लढत लढत जवळपास तीन वर्षे टिकून ठेवले होते. मुर्तुजाची आई मुगलास परस्पर शरण गेल्यानी नाईलाजास्तव निजामशाही मुगलास बहाल करावी लागली.
स्वराज्याची संकल्पना पुर्णत्वास आणण्यासाठी आदिलशाही मध्ये आले. त्यांच्या पराक्रमाच्या किर्तीनी विजापूर दरबारी. *सरलष्कर* हा किताब देण्यात आला. बलाढ्य मुगलाना शह देण्यासाठी आदिलशाहीस शहाजीराजे सारखा मुसद्दी योध्दा हवा होता.
कर्नाटकातील बेंगळुरूची जहागिरी राजेंना देण्यात आली. या ठिकाणी आपले जेष्ठ पुत्र संभाजी राजे यांना स्वतंत्र स्वराज्य स्थापन करून दिले. तेथील पाळेगार, नायक आणि इतरांना मोठ्या प्रमाणात आपल्या कडे दाखल करुन घेतले. येथील न्यायनिवाडा, सुधारणा, शेतीची सुधारणा आदी गोष्टी ते करू लागले. बाल शिवबा , धाकले पुत्र व्यंकोजीराजे यांच्या शिक्षणासाठी प्रज्ञावंत शिक्षकांची नेमणूक केली. स्वत: महाराज , जिजाऊ आणि जयंती बाईसाहेब ही मुलांच्या संगोपनासाठी प्रयत्नशील होते.
पुढे शिवबांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पुण्याच्या जहागिरीत स्वराज्य स्थापनेसाठी जिजाऊंसह बारा मावळातील विश्वासू सरदार , खजिना, सैन्य, घोडे, स्वराज्याची राजमुद्रा, ध्वज आणि स्वराज्यासाठी लागणाऱ्या सर्व बाबी सोबत दिले. शहाजीराजेंच्या संकल्पनेतील दुसऱ्या स्वराज्याची स्थापना मुरार जगदेव यांनी बेचिराख केलेल्या पुण्यात होणार होती. झांबरे पाटलांकडून जागा विकत घेऊन तेथे मोठा वाडा बांधण्यात आला हाच तो *लाल महाल* याच वाड्यात बारा मावळातील लोकांची वर्दळ वाढली.
कर्नाटकातील *बेंगळुरू*, महाराष्ट्रातील *पुणे* नंतर तामिळनाडू मधील *तंजावर* येथे धाकले पुत्र व्यंकोजीराजे आणि त्यांच्या मातोश्री जयंतीबाई यांच्या सोबत स्वत: शहाजीराजे कांही काळ राहून रयतेचं स्वराज्य निर्माण केले. या साठी ही भरपूर खजीना, सैन्य, विश्वासू सरदार दिले. *तंजावरवरच राज्य १६५ वर्षे अस्तीत्वात होत.* येथील सरफोजीराजे महापराक्रमी आणि कला प्रेमी होते. त्यांनी उभा केलेला "सरस्वती महाल" हा संग्रहालय आज ही आहे. पराक्रमी मराठ्यांच्या इतिहासातील अनेक दस्तावेज येथे उपलब्ध आहेत. या घराण्यानी दक्षिण भारतात आपलं विस्तार केले होते.
या तिन्ही ठिकाणी वेळोवेळी स्वत: हजर राहून रयतेच्या कल्याणासाठी शहाजीराजेनी लक्ष घातले. आज सर्व साधनसंस्था अस्तीत्वात असताना प्रादेशिक पक्षांना आपला पक्ष राज्या बाहेर वाढवणं शक्य नाही झाल. त्या काळात शहाजीराजे आणि पराक्रमी पुत्रानी दक्षिण भारतात आपलं वर्चस्व प्रस्थापित केल होते. या मागे कष्ट होते ते स्वराज्य संकल्पक, महाबली, संस्कृत पंडित शहाजीराजेंचे आणि समर्थसाथ देणाऱ्या जिजाऊ आणि जयंती या राजमातांची.
२३ जानेवारी १६६४ रोजी आपल्या सैन्याची व्यवस्था पाहण्यासाठी गेलेले असताना घोडयाचा पाय वेलीत अडकून झालेल्या अपघातात होदेगीरी येथे त्यांचा मृत्यू झाला.
*जगातील सर्वश्रेष्ठ पिता म्हणून ज्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला पाहिजे अश्या स्वराज्य संकल्पक शहाजीराजेंचा आज जन्मोत्सव निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन*
साभार
रवि गायकवाड
सोलापूर —
Pratap Sinh Serfoji RajeBhosle
सोबत.
No comments:
Post a Comment