संभु राजाच्या मृत्यु नंतर,, रंग्या दक्खन मध्ये जो पाय रोवून उभा राहिला तो मागे फिरायलच मागेना,
मराठ्यांची परस्तीथी बरीच बिकट झाली होती. मराठ्यांच्या एका राजाची हत्या झाली होती तर दुसऱ्या वर जिंजिला परागंद होण्याची पाळी आली. हिकडे रोज एक एक किल्ला मोघलांच्या घसात जात होता.... आता पर्यन्त निष्ठावान राहिलेले मराठा सरदार रंग्याच्या अमीषा पुढे जाऊन त्याला सामिल होत होते. ह्याही प्रस्तिथित काही मराठा सरदार स्वराज्यासी एकनिष्ठ राहिली...त्यापैकी एक नाव *नेमाजी शिंदे* मराठ्यांच्या घोड़ी पहिल्यांदा नर्मदेच्या पाण्यात फुरफुरली ती नेमाजी शिंदे ह्यांच्याच् नेतृत्वाखाली,,,,
रंग्या दक्खन मध्ये शेवटचा मराठा शरण येत नाही तो पर्यन्त दक्खन सोडणार नाही ह्या इर्षेनी रणात उतरला होता........
दक्खनची मोहीम चालवायला सैन्याची रसद,खजिना जो येयचा तो उत्तरेतून,,, हीच रसद ,खजिना लुटायच काम नेमाजी शिंदे ने केल.
मराठ्यांची आक्रमने थेट बादशाहच्या छावनी पर्यन्त येत होती. मोगलाना उत्तरेकडून येणारा खजिना आणि मनुष्यबळ ही तोडण्यासाठी मराठे नर्मदापार झाले.जानेवारी १७०३ पासूनच ते नर्मदेपर्यन्त पोहचले होते.रंग्याचा नातू "बेदरबख्त" हां त्यावेळी औरंगाबादेस सुभेदार होता.खानदेश संभाळण्याच् काम ही त्याच्याकडे होते.बेदरबख़्तला काढण्यासाठी मराठ्यांनी बुर्हांनपुरला वेढा घातला होता.तो उठवून ते वर्हाड़ाकडे गेले. वर्हाडावर वर नायब सुभेदार रुस्तुमखान विजापुरी याची नेमणूक झाली होती.बुर्हांनपुरवर नायब सुभेदार अलीमर्दानखान हैदराबादी हां होता.'
मराठ्यांच्या धांमधुमी मूळे बादशाही छावणीत धान्य आणि रसदही येईनासी झाली....जून महिन्यात
नेमाजी शिंदे यांनी वर्हाडात आक्रमण केले.त्याच्याबरोबर पंधरा हजार स्वार होते.संबध वर्हाड़ आणि खानदेश या दोन प्रांतात मराठ्यांनी धुमाकूळ घातला. जुल्फिकारखांन हां धनाजी जाधव पाठलागावर लागला होता......
नोव्हेंबर महिन्यात नेमाजी शिंदे याचे वर्हडचा सुभेदार रुस्तुमखांन याच्यासी एलिचपुरजवळ मोठे युद्ध झाले.'
रुस्तुमखांन विजापुरी हां सात हजारी मनसबदार होता.मराठे वर्हाडात घुसले हे पाहुन तो आपल्याबरोबर निवडक सैन्य घेवून एलिचपुरहुन निघाला आणि मराठ्यावर चालून गेला. *त्याची लढाईची योजना धुळीला मिळून मराठ्यांच्या कैदेत सापडला. हां मोगलांचा मोठा जबरदस्त पराभव होता.*
रुस्तुमखानाने जबर खंडणी भरून आपली सुटका करुण घेतली.नेमाजी शिंद्याच् सैन्य तेथून पुढे खांणदेसात चालून गेले आणि त्यांनी नर्मदा पार झाले.......! वर्हाड़ मधल्या मोगलांची बातमी आली त्यावेळी रंग्या,, हां पुणे सोडून राजगडच्या वाटेला लागला होता..........
मराठ्यानी त्यानंतर नर्मदा ओलांडून माळव्यात प्रवेश केला.औरँगजेबाने आपला नातू आणि औरंगाबादचा सुभेदार शहजादा बेदरबख्त याला त्यांच्याविरुद्ध चालून जाण्याची आज्ञा केली.जुल्फिकारखानाला ही तातडीने खानदेशात पाठविण्यात आले.तो पर्यन्त नेमाजी माळव्यात घुसला होता..नांदेड आणि वर्हाड़ येथील सुभेदार गाजीउद्दीन फिरोजजंग हां मराठ्यांच्या पाठलागावर निघाला. तो बुर्हांनपुरापर्यन्त पोहचला. इकडे "नेमाजीचे " सैन्य नर्मदापार झाल्याबरोबर मोगलांच्या माळवा सुभ्यात एकच हाहाकार उडाला."मराठ्यांचे सैन्य तीस चाळीस हजार असावे असा अंदाज मोगल बातमी पत्रात भेटतो" मराठ्यांनी माळव्यातील शहरे लुटली बुन्देलखंडात क्षत्रसालासी युती साधली ( मैत्री ) आणि सिरोंज शहराला वेढा घातला.उत्तर हिंदुस्थानातून मोगलांकडे येणारा खजिना याच मार्गाने दक्षिणेकडे ज़ात असे...पाच-सात लाखांचा खजीना यावेळी दक्षिणेच्या वाटेवर होता. आणि नेमका तोच टिपण्यासाठी मराठे टपले होते...गाजीउद्दीन फिरोजजंग याने "रंग्याला" लिहून कळवले की, आपला जय झाला शेकडो मराठे मारले गेले आणि नेमाजी शिंदे ,,, हां सिरोंज चा वेढा उठवून गडमंडल्याकड़े निघुन गेला ( जबलपुरजवळ ) ही बातमी वाचून रंग्याला मोठा आनंद झाला.त्याने फिरोजजंगला सिपाहसालार अशी पदवी दिली आणि फिरोजजंगच्या सैन्यातील आधिकार्यावर बढत्या आणि बक्षीसे ह्यांची खैरात केली..
नंतर बातमी समजली की ती अशी : फ़िरोजजंग हां नर्मदापार गेलाच नाही.सिरोंज जवळ लढाई झालीच नाही..मोगल-मराठा बातमी सपसेल खोटी होती. आपणाला सपसेल बनविन्यात आले हे पाहुन रंग्याने फिरोजजंगची पदवी काढून घेतली आणि सैन्याच्या आणि आधिकार्यांच्या बढत्या रद्द केल्या.
फजीत होवून फ़िरोजजंग हां वर्हाडात आला...रंग्याचे मोठ मोठाले आधिकारी त्याला कसे बनवत हे त्याचे उत्तम उदाहरण,,,,,,,,
वर्हाड़ मधील रुस्तुमखाणाचा पराभव हां बादशाहला बसलेला मोठा धक्काच् होता. त्या लढाईत एकंदर एक हजार सैन्य मारले गेले.रुस्तुमखानाचा जावई मारला गेला स्वता : रुस्तुमखांन भाल्याच्या जखमा लागून मराठ्यांच्या कैदेत सापडला होता..
खुद्द बादशाहच्या छावनी भोवती मराठ्यांचे हल्ले चालु असत्,,,,,,,,,,
नेमाजी शिंदे ह्यांनी उत्तरेत् जी मोगलांची तँगड़ेतोड़ केली तो पराक्रम असामन्यच..........!
|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी....||
No comments:
Post a Comment