महाबली शहाजी महाराज यांचा भातवडीचा पराक्रम, एक वेळा नाहीतर तब्बल तीन वेळा स्वतंत्र होण्याचे प्रयत्न असोत त्याच बरोबर प्रतिनिजामशाही स्थापन करत स्वतःकडे राज्यकारभार ठेवण्याचा प्रयत्न, आदिलशाही आणि मोगलांशी दिलेला लढा यावरून सरलष्कर शहाजी महाराज यांचा पराक्रम, संघटन कौशल्य, राजकीय मुस्तद्दीपणा आणि कर्तृत्व हे अतिउच्च पातळीचे होते हे दिसून येते. १६३६ साली दक्षिणेत गेल्यानंतर स्वतंत्र दरबारातून केलेला कारभार, बाल शिवाजी राजेंच्या शिक्षणाची केलेली व्यवस्था आणि शिवाजी महाराज बेंगलूर येथून परतताना त्यांच्या सोबत दिलेली आपली विश्वासू माणसे, ध्वज आणि मुद्रा हे पाहता शहाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेची कल्पना आपल्याला स्पष्टपणे येऊ शकते. दक्षिणेत शहाजी महाराजांनी गाजवलेला पराक्रम आणि मोहिमा यावरून आपण महाबली शहाजी महाराज यांचा दबदबा लक्षात येतो..
पराक्रम, युध्दप्रसंगाची बुध्दिमत्ता, उत्तम प्रशासन, स्वतंत्र राज्यकारभार या गुणांचे शिवरायांमध्ये बीजारोपण करणारे, अनंत संकटावर मात करत छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणारे स्वराज्य संकल्पक महाबली महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरू शहाजीराजे भोसले यांना त्रिवार मानाचा मुजरा..
- राज जाधव
No comments:
Post a Comment