आदिलशाही, निजामशाही, बरिदशाही, इमामशाही व कुतुबशाही
भाग ४
पोस्तसांभार : आशिष माळी
बरिदशही शेवट आणि निझाम शाहीच घरघर
मुर्ताझा निझाम शाह ने त्याच्या राज्यात बहामनी साम्राज्यातून निर्माण झालेले बरारचे राज्य विलीन केले. अकबर च मुलगा मुराद ने अहमदनगरवर स्वारी केली व शहराला वेढा दिला. चांदबीबी विजापूरचा आदिल शहा याच्या मृत्यूनंतर १५९४ साली तिच्या माहेरी अहमदनगरला परत आली होती. तिने मोठी पराक्रम दाखवत मोठ्या शहराचे रक्षण केले. तिने मोगलांच्या सैन्याची कत्तल केली व त्यांनी पाडलेला तट रातोरात पुन्हा बांधून काढला. तेवढ्यात, विजापूरची फौज आल्यामुळे मुरादने तहाची बोलणी सुरू केली. चांदबीबीने त्याच्या मागणीप्रमाणे त्याला वऱ्हाड दिल्यावर तो वेढा उठवून निघून गेला. तिने मग १५९५ मध्ये बहादूर शहा नामक मुलाला गादीवर बसवले ( इब्राहिम निजाम शहाचा पुत्र) व स्वत: सर्व कारभार हाती घेतला.
पण मुगलांनी पुन्हा निजामशाहीवर स्वारी केली आणि बरारचा ताबा घेतला. दरम्यानच्या काळात, सत्ता-संघर्षात चांदबीबीची हत्या झाली. मुगलांनी निजामशाहीतील आपापसातील फायदा घेऊन १६०० मध्ये अहमदनगरवर ताबा मिळवला व बहादूर निजाम शहास बंदी बनवले.
मलिक अंबरने त्याच्या नेतृत्वाच्या जोरावर मुर्तजा निजाम शहा- दुसरा यास गादीवर बसवून निजामशाहीस पूर्वप्रतिष्ठा प्राप्त करून दिली. तो निजाम शहाचा पेशवा बनला. त्याने १६१०मध्ये मुर्तजा निजामशहा - तिसरा यास गादीवर बसवले. त्याने त्याच्या ताब्यात मुगलांनी निजामशाहीतून जिंकून घेतलेले सर्व प्रदेश विजापूरच्या आदिल शहाच्या मदतीच्या जोरावर १६१० पर्यंत घेतले.
नंतर मुगलांनी निजामशाहीतील सरदारांना स्वत:कडे वळवले, विजापूरवर दबाव आणला व मलिक अंबरला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला. १६२३ मध्ये त्याचा मृत्यू झाला. पुढे शहाजी महाराजांनी निजामशाही वाचवण्याचा असफल प्रयत्न केला.
No comments:
Post a Comment