आदिलशाही, निजामशाही, बरिदशाही, इमामशाही व कुतुबशाही
भाग ५
पोस्तसांभार : आशिष माळी
विजापूर
विजापूरच्या आदिलशाहीची स्थापना युसूफ आदिलशहाने केली.
त्याने विजापूरच्या आसपासच्या रायचूर, गोवा, दाभोळ, गुलबर्गा क्षेत्राचा ताबा घेऊन राज्याचा विस्तार केला. पण पोर्तुगीजांनी१५१० मध्ये गोव्याचा ताबा घेतला. युसूफ आदिल शहानंतर त्याचा मुलगा इस्माईल गादीवर बसला. इस्माईल आदिल शहाने बिदरवर स्वारी करून बिदरच्या शासकास कैद केले व बिदरचा ताबा घेतला. त्याचा मृत्यू १५३४ मध्ये झाला. अली आदिल शहा पहिला च्या काळात विजयनगर साम्राज्याचा बराच भाग विजापूरच्या ताब्यात आला. आदिल शहाची धार्मिक बाबींतील जिज्ञासा व त्याचे ज्ञान यांमुळे लोक त्याला सुफी संत समजत.
इब्राहिम आदिल शहा- दुसरा हा वयाने लहान असताना सत्तेवर आला. त्याने१६१९ मध्ये बिदर राज्याचा ताबा घेतला.
मराठ्यांची आक्रमणे, दरबारातील राजकारण व मुगलांचे औरंगजेबाच्या नेतृत्वाखालील आक्रमक धोरण यामुळे विजापूरचे राज्य विभागले गेले. औरंगजेबाने विजापूर राज्याचा ताबा १६८६मध्ये घेतला.
बरीदशाही (१४९२-१६५६) - बरीद घराण्याची सत्ता बहमनी वंशाचा अंत झाल्यानंतर राजधानी बीदर येथे चालू राहिली. कासीम बरीद हाच १४९२ पासून खरा सुलतान होता. त्याचा मुलगा अमीर बरीद याने १५०४पासून १५४९पर्यंत सत्ता गाजवली. मात्र बहामनी सुलतान १५३८पर्यंत नामधारी राजे राहिले होते. अमीर बरीदनंतर मात्र अली बरीद याने शहा हा किताब धारण केला. पण अहमदनगरच्या निजाम शहाने त्याच्या राज्याचा बराच भाग जिंकून घेतला. ते राज्य हळूहळू लयाला गेले व १६५६साली मोगलांचा दक्षिणेकडील सुभेदार औरंगजेब याने बीदरचा किल्ला व शहर हस्तगत करून बरीदशाही नष्ट केली.
इमादशाही (१४८४-१५७२)- फत्तेउल्ला इमाद शहा हा मूळचा विजयनगरचा रहिवासी ब्राम्हण होता. तो मुसलमान झाल्यावर त्याला वऱ्हाडची सुभेदारी व इमाद-उल्मुल्क ही पदवी मिळाली. तो १४८४मध्ये स्वतंत्रपणे कारभार पाहू लागला. पण तो त्याच वर्षी, मरण पावला. बुऱ्हाण शहा वयाने लहान असतानाच गादीवर आला होता. त्या वेळी तोफलखान नामक सरदाराने सर्व अधिकार बळकावला. पण १५७२साली मुर्तझा निजाम शहाने वऱ्हाडवर स्वारी करून इमाद शहा व तोफलखान यांना ठार मारले आणि वऱ्हाडचे राज्य निजामशाहीला जोडले.
कुतुबशाही - गोवळकोंड्याचा सुभा म्हणजे बहमनी राज्याचा पूर्वेकडील भाग, महमूद गवाँ याने कुली कुत्ब-उल्मुल्क याला तेथे सुभेदार नेमले होते. तो इराण वरून आला होता व त्याच्या कर्तबगारीने सुलतान महंमद शहाच्या दरबारात वर चढला होता. त्याने कासीम बरीदचा अंमल सहन न झाल्यामुळे १५१२ मध्ये गोवळकोंडा येथे स्वतंत्रपणे राज्यकारभार सुरू केला. तो पराक्रमी होता, त्याने त्याच्या राज्याचा पूर्व समुद्रापर्यंत विस्तार केला. त्याने विजयनगर, बरीदशाही व आदिलशाही यांच्याशी अनेक युद्धे केली व त्यांचा पराभव केला. त्याने १५४३ पर्यंत चांगला कारभार केला. पण शेवटी, त्याचा खून झाला.
अब्दुल्ला हुसेनच्या मागून त्याचा जावई अबू हसन गोवळकोंड्याच्या तख्तावर बसला. त्याचा वजीर मदनपंत नामक एक ब्राह्मण होता. त्याने राज्यव्यवस्था चांगली ठेवली, पण सेनापती इब्राहिम खान याला त्याचे वर्चस्व सहन झाले नाही. औरंगजेब १६८३ साली दक्षिणेत आला, तेव्हा इब्राहिम खान त्याला फितूर झाला. मदनपंत त्या वेळच्या गडबडीत मारला गेला. अबू हसन याने मोठी खंडणी देऊन मोगलांशी तह केला.
याचं काळात अनेक मराठा सरदारांनी मैदाने गाजवतं नावलौकिक मिळविला.
व अवघ्या विश्वात प्रेरणा म्हणून मराठ्यांचा इतिहास अजरामर झाले.
Bahamani empire :-Sen
No comments:
Post a Comment