पोस्तसांभार :: Prasad Shinde
----------------------------------------------------
सातारा
जिल्ह्यात अनेक कर्तबगार मराठा घराणी होऊन गेली, त्यांनी आपल्या
पराक्रमाने इतिहासात ठसा उमटविला,असेच एक घराण म्हणजे फाळके घराणे,या
घराण्याचा खूप दैदिप्यमान इतिहास आहे पण काळाच्या अघोत तो काळा आड पडत
चालला आहे,या ऐतिहासिक वारश्याला उभारी देण्याचे काम काही इतिहासकारांणी
केले आहे,तवारीख ए शिंदे शाही शोध ग्रंथाचे लेखक पंडित निलेश करकरे यांनी
आपल्या या शोध ग्रंथात या घराण्याचा व शिंदे शाहीतील सरदार घराण्यांचा
चांगल्या प्रकारे इतिहास मांडला आहे,त्या मधील सारांश
फाळके
घराणे खऱ्या अर्थाने राणोजीराव शिंद्यांच्या काळात नावारुपास आले,तद नंतर
उत्तरेत फाळके घराण्याचा संचार सुरु झाला,आज ही महाराष्ट्राच्या
कानाकोपर्यात हे घराणं विस्तारल असलं जरी त्यांच मूळ ठिकाण पाडळी गाव आहे,
या गावाची पाटीलकी या घराण्याकडे होती, पुढे राणोजीराव शिंदे आणि
निंबाजीराव फाळके यांनी उत्तरे आपली समशेर तळपवली,आज ही ग्वाल्हेर मध्ये हे
घराणं आपला रुतबा कायम राखून आहे,या घराण्याचा इतिहासात मोगावा घेऊ या,
फाळके
घराण्याची कैफियत या मध्ये "आपला जुना मित्र निंबाजीराव फाळके यांस पाडळी
हुन आणून आपल्या हाताखाली पागेवर अधिकारी नेमले" अस उल्लेख आढळतो,याचा अर्थ
निंबाजीराव हे राणोजीराव शिंदे यांचे जुने मित्र होत,राणोजीराव शिंदे
यांच्या सोबत अनेक ठिकाणी निंबाजीराव यांचा उल्लेख येतो,पालखेडच्या
मोहिमेध्ये तसेच माळव्यात राहतगडाच्या मोहीम मध्ये निंबाजीरावांनी अतुल्य
कामगिरी बजावली म्हणून ६०० घोडदळाची स्वतंत्र तुकडी दिली, सोबत
चवरी,छत्री,नौबती,तोफ,शिंदेशाही निशाण, आदी व राव हा किताब दिला.
वसईच्या
मोहिमेध्ये मराठेशाहीचे मोठे मोठे सरदार उपस्थित होते यावेळी राणोजीराव
शिंदे आपल्या पतका सोबत हाजर होते, मराठ्यांनी पोर्तुगीजांची रसद तोडून,
नाका बंदी केली,निंबाजीराव फाळके यांनी सुरुंगाला आग लावली,पोर्तुगीज मराठा
यांच्यात तुंबळ युद्ध झाले शेवटी १६ मे १७३९ ला किल्ला पडला,
पेशवा
बखर- कृष्णाजी विनायक सोहनी यात या मोहिमेबातचे वर्णन *"माहीम,तारापूर,वसई
या तिन्ही प्रसिद्ध वेढ्यात राणोजीने एक दिलाने सह्याकेल शीर पडले तरी वसई
काबीज करावयाची ही अप्पासाहेबांची मनीषा राणोजी शिंदे व त्यांच्या
सहकार्यांनी,जीवाची शर्थकरून सिद्धीस नेली,
या
मोहीमे नंतर निंबाजीरावांना सम्मानित करण्यात आले,शिंदेशाही सवाई
निशाण,शाही वस्त्र,कंठी,शिरपेच देऊन सरदार घोषित करण्यात आले व शिंदे
दरबारात राणोजीरावांच्या उजव्या हाताला बसण्याचा मान दिला,
पुढे
महादजी शिंदे,दौलतराव शिंदेच्या काळात देखील हे घराणं अग्रगण्य राहिले,व
शिंदे दौलतीला आपली सेवा अर्पण केली,श्रीमंत कै सरदार आनंदराव फाळके यांनी
शिंदेघराण्याची पत्रे प्रकाशित करून शिंदे शाहीइतिहासाची साधने खंड ४
प्रसिद्ध करून शिंदेशाहीला पुन्हा उजाळा देण्याचे अतुलनीय काम केले..!
------------------------------------------------------
•संदर्भ:-तवारीख-ए-शिंदेशाही
©शेखर शिंदे सरकार
No comments:
Post a Comment