विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 18 December 2023

रविराव शिंदे घराणे

 


रविराव शिंदे घराणे🔥🔥
मराठ्यांच्या इतिहासातील शिवपूर्व काळापासून प्रसिद्ध असलेल्या घरांणीमध्ये रवीराव शिंदे घराण प्रमुख होय रवीराव ही या घराण्याला मिळालेली पदवी असून हे देशमुख घराणे दख्खनच्या पठारावरील पुरातन काळापासून देशमुख वतनदारीवर दिसून येते याबद्दलचा उल्लेख शिवपूर्व काळातील तोंडला बांडले येथील जाधव पाटील घराण्यातील एका मजहर शिवपूर्व काळात झाले आहे या मध्ये संताजी शिंदे देशमुख लोणी काळभोर म्हणून उल्लेखआला आहे पण सदर उल्लेख आजचे लोणी कंद अथवा सुकलोणी असावे या घराण्यातील मौजे सकूलोनी तालुका सांडस प्रांत पुणे हे यांचे वतन गाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात औरंगजेब दख्खनच्या सुभेदार असताना औरंगजेबाच्या पदरी सरदार तुकोजीराव शिंदे रवी राव हे चाकरीच होते त्या नगारा आणि पालखी व निशाण होते व फौजेची सरंजामी होती विजापूरच्या आदिलशहाच्या काळात दुसरे तुकोजीराव शिंदे रवीराव हे पहिल्या तुकोजीराव शिदे यांचे नातू आदिलशाही सरदार होते छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या काळात तुकोजीराव तिसरे व मानाजीराव शिंदे रवी रावजी लोणी येथील लष्करी मोकासा होता यावेळी मानाजी शिंदे यास शाहू महाराजांनी रवी राव ही पदवी व सनद छ ३माहे सुत सफर सुत आशरीन मया अलफ चे साली दिली.. राक्षस भवन च्या लढाईत रघुनाथराव बाजीराव पेशवा यांची निजामाचा लढाईत संताजीराव बिन मानाजीराव व सुलतानजीराव बिन मानाजीराव शिंदे असामी यांनी पेशव्यांचा जीव वाचविला. . छ. २६ रविराबल सु सरासरी सितैन मयातैन व अलफ साली पेशवे यांनी राक्षस भवन च्या लढ्यातील पराक्रमाबद्दल हत्ती बक्षीस म्हणून दिले . जमादार खाण्यात लष्करीजाती त्याची तैनाती व स्वारीचा रोज मुरा तसेच पालखी भेट दिली छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या काळात संताजी बिन आनंदराव शिंदे रवी राव व सखोजी बिन मानोजी शिंदे रवी राव द संताजी जानराव बिन बजाजीराव शिंदे रवी राव यांचे उल्लेख सापडतात अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य
9049760888

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...