विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 16 February 2024

बागलणचे पहिले हिंदू राष्ट्र मोगलांनी जिंकले !

 

बागलणचे पहिले हिंदू राष्ट्र मोगलांनी जिंकले !
१५ फेब्रुवारी १६३८ (फाल्गुन शुद्ध द्वादशी, शके १५५९, संवत्सर इश्वरी, गुरुवार)
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील परिसरात "मुल्हेर” हा प्रसिद्ध किल्ला आहे.
मुल्हेर किल्ल्याला आवश्यक त्या सर्व ठिकाणी १०० फूट उंचीची भक्कम तटबंदी असल्याने हा किल्ला अभेद्य बनला आहे... सन १३०८ ते १६३८ पर्यंत सुमारे साडेतीनशे वर्षांच्या प्रदीर्घ काळात, मुल्हेर किल्ल्याच्या राजधानीतून आजूबाजूच्या प्रदेशावर राज्य करणाऱ्या “बागुल” घराण्याच्या नावावरून; हा प्रदेश “बागलाण” म्हणून ओळखला जात होता!
सुमारे २०० मैल लांब आणि १६० मैल रुंद असलेला हा प्रदेश बागलाणात येत असून या घराण्याने बांधलेला मुल्हेरचा किल्ला वैभवशाली हिंदू राज्याची राजधानी होता. सन १६३६ मध्ये औरंगजेबाच्या आज्ञेने दत्तीयाचा राजा शुंभकरण बुंदेला आणि त्याच्या जोडीला अब्दुल सय्यद याला फार मोठी फौज देऊन बागलाणावर आक्रमण करण्यास सांगितले!
त्याप्रमाणे बुंदेलाने या प्रदेशावर आक्रमण केले... मुल्हेरला मोगली सेनेचा करकचून वेढा आवळण्यात आला. या जबर हल्ल्यामुळे बागलाणाचा राजा बहिर्जी ढेपाळला! मोगलांच्या अफाट सेनेला प्रत्युत्तर देण्याचे सामर्थ्य आपल्या सैन्यात नाही, आपल्यात नाही हे जाणून राजा बहिर्जीने १५ फेब्रुवारी १६३८ रोजी साल्हेर-मुल्हेरसकट मोठा प्रदेश आणि मोठे ३३ किल्ले शहजादा औरंगजेबाला प्रतिकार न करता नजर केले.
सन १३३६ मध्ये विजयनगरचा हरिहर व बुक्कराय यांनी हिंदू राष्ट्र स्थापन केले. मात्र हरिहर आणि बुक्कराय यांच्याही २८ वर्षे आधी १३०८ मध्ये बागलाणात अस्तित्वात असलेले हिंदुराष्ट्र १५ फेब्रुवारी १६३८ रोजी संपुष्टात आले अन् बागलाणात मोगली सत्ता स्थापन झाली.
भीमदेव सक्सेनाच्या तवारीखानुसार पुढे बहिर्जीने मुस्लीम धर्म स्वीकारला व पुढे दौलतमंद खान या नावाने ओळखला जाऊ लागला तर खाफीखान मात्र, तो मुस्लीम झाल्याचा उल्लेख करत नाही तर औरंगजेबाने त्यांना ३ हजार स्वारांची मनसबदारी व सुलतानपूर परगण्याची जहागिरी दिली...
मात्र १५ फेब्रुवारी १६३८ ला ३५० वर्षांची परंपरा असणारे एक हिंदुराष्ट्र औरंगजेबाच्या राक्षसी वृत्तीने गिळंकृत केले होते...
(प्रतिकात्मक चित्र)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...