विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label #जनकोजी #शिंदे. Show all posts
Showing posts with label #जनकोजी #शिंदे. Show all posts

Tuesday, 14 January 2025

#जनकोजी #शिंदे

 #पानिपत चे स्मरण करत प्राणपणाने लढलेल्या सर्व जाती धर्माच्या समस्त मराठा वीरांना अभिवादन

मराठा बाणा दाखवून वीरगती प्राप्त झालेले दत्ताजींच बचेंगे तो और भी लढेंगे हा त्याचे वाक्य इतिहासात अजरामर झाले..
तर

#जनकोजी #शिंदे यांनी पानीपत वर पराक्रमाची शर्थ केली .
(प्रत्येक #श्रीगोंदेकराना अभिमान असावाच .)
पानिपत वर जनकोजी शिंदे हे देखील पानिपतच्या रणांगणात मराठ्यांची भक्कम फौज घेऊन लढले. होते, शिंद्याच्या तुकडीचे नेतृत्व महादजी बाबा, तुकोजी बाबा आन १६ वर्षाचा ऐन जवानीत आलेला तरुण जनकोजी शिंदे करत होते.भारदस्त उंचीपूरे पिळदार शरीर असलेला हा नुकताच वयात आलेला नवतरुण हातात तलवार घेऊन अब्दाली च्या विरोधात रणांगणात उभा ठाकला होता तो मराठे शाहीच रक्षण करायला .त्यांच्यापुर्वी उत्तर भारतात यशस्वी घौडदौड़ करत मराठ्यांच्या दौलतीसाठी प्राण पणाला लावणारे राणोजीराव शिंदे यांचे ते नातू जनकोजी होते . जय्यापाराव शिंदेंचे ते पुत्र जयप्पा रावाचा नागोर जवळ दगाफटका झाले नंतर दत्ताजीरावांनी स्वताच्या लेकराप्रमाणें जनकोजी ना सांभाळले होत . जनकोजी ही आपल्या आज्या प्रामानचे पराक्रमी होते .महादजी बाबा , दत्ताजीच्या तालमीत तयार झालेले जनकोजी मत्सुदी व साहसी होते. त्यांच्या रुपान मराठ्यांचा दौलती साठी शिंद्याची तीसरी पुढी खपत होती., बुराडी घाटाच्या रणसंग्रामा मध्ये दत्ताजी सोबत जनकोजींनी देखील मर्दुमकी गाजवीली होती, एक वर्षे आधी बुराडी घाटावर पानीपताच्या रण संग्रामची चिंगारी पेटली होती.आणि पुढे...१४जानेवारी १७६१ रोजी पानिपत भूमिवर मराठा आणि अफगान सैन्य सोमरा समोर आले.इकडे सारा देश मकर संक्रातीच्या सनात गोडधोड खात होता दूसरी कड़े मराठ्यांनी देशासाठी युद्ध पुकारल होते . जनकोजी आपल्या पथकात रनगर्जना करत होते, हर हर महादेव जय भवानीचे जय घोष करून मराठ्यांचे सैन्य अब्दाली वर तूटून पडले, एकमेकांवर दोन्ही बाजूने तलावरी आदळु लागल्या, हर हर महादेवचा जय घोष घुमु लागला, पहिल्याच तडाख्यात मराठ्यांनी अफगानी फळी सपा सप कापून काढली, चौतळलेला जनकोजी क्षत्रु वर वाघा प्रमाने पडले होते. लढताना त्यांना गोळी लागली ते पडले अशी वार्ता आली .
(जनकोजी यांचे लग्न ११/२/१७५७रोजी श्रीगोंदे येथे थाटामाटात कासीबाई सुल्तानजी आप्पा खर्डेकर यांच्याशी झालेले आणि लग्नानंतर चारच वर्षात ते वयाच्या सतरा अठराव्या वर्षी पानीपतावर कामी आले.)
पानिपत च्या नंतर जनकोजी शिंदे यांच्या तोतया बाबत चर्चा आणि उल्लेख )
(२८ फेब्रुवारी १७६१रोजी चे शिंदे दप्तरातील पत्र )
पानिपत च्या अब्दाली बरोबरच्या युद्धात विश्वासराव भाऊचा अंत झाला . सदाशिवराव भाऊ व जनकोजी शिंदे या दोघांविषयीं नाना प्रकारच्या बातम्या येत असल्याचे म्हंटले आहे.संबंधित पत्रात याबाबत भाऊ साहेब थोरले व जनकोजी शिंदे लढाई झाली तेथून विस कोसावर एक जमीदार याची गढी होते जमीदार मिळोन जाट याच्या मुलखात गेलेत. त्याची हातची पत्रे तो आले नाहींत परतु कायम आहेत' •
याबाबत आलेले पत्रात उल्लेख प्रथम बातमी आली. [इतिसंग्रह ऐटि १४ लेखाक २] [२] 'नजीबखान, सुज्यातदौला याचे वकिलानें भाऊचे वर्तमान खुणामुद्रानिशी विपरीत सागितलें [३] वरकड वकिलाच्या पत्रीं विकानेरकडे आहेत. [४] कोणी मला जाटाकडे लिहितात. [ पुरंदरे भाग १ लेखांक ४१७ ] विश्वासराव गोळी लागून ठार झाले, फौजेनें शिकस्त खादली. ज्यास जिकडे सोय पडली तिकडे निघाले. भाऊसाहेब व जनकोजी शिंदे कोणीकडे गेले त्याचे ठिकाण नाही,' अशी युद्धातून आलेल्या व कुंमेरीस थाबलेल्या सटवाजी रावाची प्रत्यक्ष स्थिति होती तेव्हां तत्संबंधीं नाना तर्कवितर्क चालले तर त्यांत नवल कोणते ? [ इतिमंजरी ३०० ] भस्तु या अनेक वार्तापैकी 'विकानेर, रूपनगर अजमेरकडे ' गेल्याची बातमी जास्त संभवनीय वाटली असे दिसतें आणि त्यादिशेने शोध करण्यासाठी पेशव्याची दोन पर्ने गुलगुल्यास आली. [लेखांक १३] इतकेंच नव्हे तर साहित्यासहित सैन्य पाठविण्याची देखील योजना झाली. [पुरंदरे दप्तर १ लेखांक ३९९,४०१ ते ४०६ व ४१०] परंतु भाऊसाहेव किंवा जनकोजी शिंदे यांचा शोध लागला नाहीं. जनकोजी शिंद्याप्रमाणे सदाशिवराव भाऊ या नावाचा तोतया पुढे निर्माण झाला व त्याचें इतकें खुळ माजलें कीं त्याच्या साठीं स्वतंत्र खारी करून महादजी शिंद्यांस त्याचे पारिपत्य करावें लागलें त्यासंबंधी पत्रव्यवहारात आहे .
19 ऑक्टोबर 1763 ,२ नोव्हेंबर १७६३चे शिंदें दप्तर पत्र
( जनकोजी शिंदे हे १४ जनवरी १७६१ चे भाऊगर्दीत राहिले किवा पुढे त्याचे काय झालें हें त्यावेळी कोणास कळू शकले नाही तथापि 'ते लढाईतून निघून जाटाच्या मुलकांतून लखे जंगल, बीकानेर, अजमेर प्राते आले' अशी एक वदंता होती दुसरी बातमी अशी आली की - बीजेपूर सवलगडापलीकडे वैरागियाचे मठी रात्री वस्तीत होते विठ्ठल शिवदेव याजकटील . खिजमतगार विठ्ठलराव यांचे पुतण्याच्या शोधास जात होते तो रात्रीचे बेराजियाचे वस्तीस राहिले तेथे खिजमतगाराने बाबासाहेबास वळखोन रामराम केला तेव्हां एकाती बोलावून व लष्करची व . मरदाराची नावे घेऊन वर्तमान पुसलें तो जाटाची माणसे होती त्यानी [ही] तर्क करून रामराम केला तेव्हा त्यावर राग केला. ते दूर सरकून बसले प्रात काळी माणसे निवस्थ सोडून कूच केले माणसानी बैरागियास पुसले. माणसे करोलीवरून मथुरेस दाखल झाले त्याजवर ठाकरानें इनामें दिली आनंद केला आम्हीही खुशवति केली दुसरे दिवशीं खिजमतगारात आम्ही व गंगोबा तात्या [चंद्रचूड] शपथ किरया करन पुसले तो जहालें वर्तमान सिद्धात सागितलें त्यास दिवसगत लागली, लष्करास पोचालयाचे पर्तमान येत नाहीं यामुळे चितार्णवी आहो वर्तमान येईल तो सुदिन असे यजमान नित्यानी दोन तीन कोस चालतात गुप्तरूपें जातात उजनीस जावयास एक मास पाहिजे लष्कर दरमजल गेले म्हणोन गाठ न पडली जिवंत आहेत बहुतानीं दृष्टीनी पाहिले, चिता न करावी ' [ चिंतो कृष्ण २८ मे व २७ सितंबर १७६१ ] ही दुसरीच बातमी मल्हारजी होळकर यास साहाजिकच लागली. त्यावरून त्यानी खोळंबा करून मार्गप्रतिक्षा केली पोहरीचे व विजेपुरचे फारसे अतर नव्हतें मल्हारजी होळकर शोध घेतल्यावाचून राहिले नसतील तथापि हे 'राजश्री ' अगदी जवळ असूनही 'गुप्तरुपे जात असल्यामुळे मेटीची पाळी आली नसावी तेव्हा साहाजिकच शंका उत्पन्न झाली त्यासंबंधी चिकित्सा होऊं लागली. ती इतकी की सितंबर १७६१ चे सुमारास हा 'शक पुराव्यास आला. तथापि त्याच्या सोक्षमोक्षाची घटका येईना. तोतया दोन वर्षानंतर 'कुरकुंभास जातो तो दहा चारा हजार फौजेचे तैनात जावते करितो. दोन हजार फौज जमा होते. खाणाखुणाहि त्याजला
( शिंदे दप्तरात मिळलेल्या पत्राच्या आधारे लिहले आहे.दप्तरातील काही उतारे जसेच्या तसे घेतलेले आहेत.)
शिवाजी साळुंके ,श्रीगोंदे
फोटो गुगल वरून साभार
(

अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

  अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...