विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label !!शिवाजी महाराजांचे आरमार!!. Show all posts
Showing posts with label !!शिवाजी महाराजांचे आरमार!!. Show all posts

Sunday, 17 July 2022

!! शिवाजी महाराजांचे आरमार भाग १० !!


 !! शिवाजी महाराजांचे आरमार भाग १० !!

(क्रमश्यः)
शिवाजी महाराजांचे आरमारी आज्ञापत्राप्राणे:- "गुराबा थोर ना बहुत लहाण यैस्या मध्यम रितीने सजाव्या तैसीच गलबत करावी. थोर -------- फरगात जे वारियावीण प्रयोजनाचेच नव्हेत यैसे करावयाचे प्रयोजन नाही " असे म्हटले आहे. आज्ञापत्रातील काही गोष्टी शिवाजी महाराजांच्या आरमारी धोरणाचा भाग म्हणून नोंद घेण्यासारखे आहे. १} आरमारावर मर्द मानसे, भांडी (तोफा), जंबुरे, बंदुखा, दारुगोळा ठेवावा. होके (होकायंत्र) असावे. २} प्रत्येक सुभ्यास ५ गुलाबा व १५ गलबते असावीत. ३} आरमारास तनखा मुलखातुन नेमून द्यावी. पैदास्तीवरी नेमनुक सहसा न करावी. पैदास्तीचे नेमनुकीमुळे सावकारास उपद्रव होऊन सावकारी बुडते. बंधरे राहीली पाहिजेत------ सावकारी वाढवावी. ४} आरमार सजीत सजीत असावे. आरमारकरी यांनी हमेशा दर्यात फिरुन गनिम राखावा. ५} जंजिरे याचे सामान व दारु वरचेवर पावित जावी ---------- सर्वकाळ दर्यावदी खबरीत राहुन गनिमाचे मुलुख मारावा. ६} दर्यात कौली सावकारी तरांडी यांची आमदारफक्ती करावी. ७} विदेशीची गैर कौली सावकारी तरांडी येता जाता आली तर त्यास सर्व साहित्य द्यावे. अल्पस्वल्प जकात घेऊन त्यास जाऊ द्यावे. युद्धप्रसंगी, "सर्वांनी कस्त करुन येक जमावे. गनिम दमानी घालुन जुंझावे. वारीयाचे बले गनिम दमानी न येता आपन दमानी पडलो, आपले गलबत वारीयावरी न चले यैसे जाहले, तरी कैसेही आपले बल असो, तर्ही गनिमास न घालता पाठ तोडीत तोडीत आपले जंजिरेयाची आश्रयास यावे. तरांडीयास व लोकांस सर्वथा दगा होऊ देऊ नये. आपनास राखून गनिम घ्यावा. गनिम दमानी पडोन हरीस आला, जेर झाला तरी येका येक उडी न घालो नये. दुरुन चौकीर्द घेरुन भांडियाचा मारा देत असावे." गनिम दगाबाज असेल तर विश्वास न ठेवता त्याचे जहाज फोडुन टाकावे.
युद्धाच्या वेळच्या या धोरणाबरोबर आरमाराचे तळ निरनिराळ्या ठिकाणी करण्याबद्दल योग्य सुचना दिल्या आहेत. आरमारी छावनी दर्यात तुफान येण्यापुर्वी करावी. ती जर वर्षि एकाच जंजिर्यावरी किंवा उघड्यावर करु नये. कारण गनिम बेभरवशाचा असतो आणि दर्यावर्दी स्वभावतः उन्मत्त असतात. " आरमारास तक्ते, सोट, डोलकाठ्या आदिकरुन थोर लाकुड असावे लागते ते आपले राज्यात आरंण्यात सागवाणी वृक्ष आहेत त्याचे जे अनकूल पडेल ते हुजूर लेहून हुजूरचे परवानगी ने तोडुन न्यावे. या विरहित जे लागेल ते घरमुलकिहून खरेदी करुन आनवित जावे. आंबा फनस हेही आरमाराच्या उपयोगीचे असल्याने त्याचे ही जतन करावे. ती वाढविण्यास कष्ट पडतात, म्हणून त्याच्या मालकास मोल देऊन ती घ्यावीत. त्यांना दुख्ख होईल यैसे काही करु नये." या विवेंचनावलुन शिवाजी महाराजांचे आरमाराविषयक धोरण किती सर्वंकष होते याची कल्पना येते. तसेच शिवाजी महाराजांचे आरमार किती सशक्त होते हे ही दिसुन येते.
संदर्भ:-
¤ शिवाजी महाराजांचे आरमारी आज्ञापत्र
¤ शिवाजी महाराजांचे आरमार:- भा.कृ.आपटे
मराठ्यांचा इतिहास खंड पहीला
{समाप्त}
शिवाजी महाराजांचे आरमार या विषयावर लिखाण करताना मि सर्व प्रकारच्या साधनांचा वापर केला आहे. कृष्णाजी अनंत सभासद बखर, चिटनीस बखर, पोर्तुगीज कालीन साधने व पत्र व्यवहार, इंग्रज कालीन प्रत व्यवहार, शिवाजी महाराजांचे आरमारी आज्ञापत्र, तसेच समकालीन पत्र व्यवहार अस्या साधनांचा आधार घेतला आहे. तसेच भा.कृ.आपटे यांच्या लिखीत साधनांचा प्रामुख्याने वापर केला आहे. सदर विषयावर माहीती संकलन करते वेळी शिवाजी महाराजांची युद्धनिती, सतर्कता, रयतेवरील प्रेम या सर्व गोष्टी नजरे समोर आल्या. खरे तर शिवाजी महाराजांचे आरमार या विषयावर लिखाण करताना विस्तृत असे लिखाण जेवढे करेल तेवढे कमीच आहे. मि जेवढे भाग लिखान करुन व माहीती संकलन करुन आपल्याला वाचनासाठी सादर केले व त्याला आपन चांगला प्रतिसाद दिला त्या बद्दल सर्व वाचकांचे खुप खुप धंन्यवाद.
संकलन
दुर्गवेडा कृष्णा घाडगे

!!शिवाजी महाराजांचे आरमार भाग ९!!

 


!!शिवाजी महाराजांचे आरमार भाग ९!!

(क्रमश्यः)
तिरकटी म्हणजे तीन लोडकाठ्यांचे जहाज. तरांडे, तारु, शिबाडे व मचवा ही जहाजे लहान असत. अगदि छोटी होडी म्हणजे पगार. "कल्याण भिवंडी खाडी, पनवेल, कुलाबा, विजयदुर्ग, मालवण येथे जहाजे बांधली जात." जहाज बांधनी करिता लागणारा साग म्हणजे सागवाणी लाकूड कोकणात व विषेशतः वसईच्या आसपास चांगल्या प्रकारचा मिळत असे. शिवाजी महाराजांच्या आरमारी व्यवस्थेत २०० जहाजांचा एक सुभा केला जात असे. मायनाक भंडारी व दौलतखान हे शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख होते. व्यापाराचे महत्व ओळखून शिवाजी महाराजांनी {वासंतिक नौदल} तयार ठेवले होते. "मस्कत व मोचा या अरबांच्या बंदराशी व्यापार करण्यासाठी त्यांनी तीन डोलकाठ्यांची जहाजे बांधली होती." आरमाराचे संरक्षण किनारपट्टीवरील किल्ले व खाड्या यांच्या आश्रयाने होत असे. शांततेच्या काळात तुफानापासुन बचावाकरीता खाड्या उपयोगी असतात. युद्धकाळात किल्ले व खाड्या यांना मोक्याचे ठिकाण म्हणून महत्व असते. हे ओळखून शिवाजी महाराजांनी किनारपट्टीवरील किल्ले दुरुस्त केले व नवे किल्ले बांधले. सिंधुदुर्ग हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेल्या जलदुर्गांचा उत्तम नमुना आहे. शिवाजी महाराजांच्या आरमारात कोळी, भंडारी, गाबित, भोई, खारवी, पारदी व इतर यांचा भरणा असे.
शिवाजी महाराजांच्या आरमाराचे वाटत असलेले महत्त्व आज्ञापत्रात स्पष्ट पणे उमटलेले आहे. "आरमार म्हणजे एक स्वतंत्र राजांगच आहे, त्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे. तद्वत त्याचे आरमार त्याचा समुद्र. या करती आरमार अवस्यमेव करावे." तसेच पुढिल भागात शिवाजी महाराजांचे आरमारी आज्ञापत्र पाहणार आहोत.
संदर्भ:-
¤ शिवाजी महाराजांचे आरमार:- भा.कृ.आपटे
मराठ्यांचा इतिहास खंड पहीला
{क्रमश्यः}
संकलन
दुर्गवेडा कृष्णा घाडगे

!! शिवाजी महाराजांचे आरमार भाग ८!!


 !! शिवाजी महाराजांचे आरमार भाग ८!!

(क्रमश्यः)
नोव्हेंबर च्या १६ तारखेस सिद्धी ५०० ते ७०० मानसे घेऊन इंग्रजांच्या मदतीस आला. त्याने नेहमीप्रमाणे किनारपट्टीवर धाडी मारल्याने दौलतखानास राग आला. त्याने इंग्रजांना त्या बाबत जाब विचारला. डिसेंबर अखेरपर्यंत परिस्थित सुधारणा झाली नाही. शत्रूचा डोळा चुकवून किनारपट्टीवर खांदेरी चा उपराळा करण्याचा उपक्रम मराठी जहाजांचा चालुच राहीला. त्यानी थळाच्या किनार्यावर तोफा ही उभारल्या. आपला टिकाव लागणार नाही इंग्रजांनी तहाची बोलणी सुरु केली. जाॅन चाईल्ड मुंबई चा दुय्यम गर्वनर व आन्नाजी दंत्तो पंडीत यांच्यात बोलणी होऊन तह झाला. १८/०१/१६८०. आन्नाजीने या तहास महाराजांची सम्मती मिळवुन देण्याचे आश्वासन दिले. मैत्रीचा तह होऊन इंग्रजांनी मराठ्यांच्या शत्रुना मदत न करण्याचे मान्य केले. ३० जानेवारी १६८० रोजी इंग्रजांचे आरणार मुंबई स परतले. मराठ्यांनी इंग्रजांचे पकडलेले कैदी व जहाजे देण्याचे मान्य केले. शिवाजी महाराजांना मोक्याचे खांदेरी चे बेट मिळाल्याने इंग्रज व सिद्धी यांना चांगलाच शह बसला. मराठ्यांपाशी एकंदर ४० ते ५० छोटी मोठी जहाजे असुन त्यावर सुमारे ४५० ते ५०० मानसे होती. त्यांची गलबते व गुराबा कमी वजनाची असल्याने खांदेरीच्या उथळ समुद्रात दृतगतीने हालचाली करु शकत. अक्षी नागावची खाडी मराठ्यांच्या जहाजास फार आश्रयास सोईची होती. जवळच कुलाब्याचा किल्ला होता. या मुळे मराठ्यांच्या मुख्य तळावर इंग्रज हल्ला करु शकले नाहीत.
शिवाजी महाराजांच्या आरमारात गुराबा, तरांडी, तारवे, गलबते, शिबाड, पगार या प्रकारची जहाजे असल्याचा उल्लेख सभासद बखर मध्ये आहे म्हणजे च कृष्णाजी अनंत सभासद सांगतो. मल्हार रामराव चिटनीस बखर मध्ये मचवे, बाभोर, तिरकती व पाल यांची नोंद सापडते. लढाऊ जहाजांत गलबत, गुराब व पाल ही प्रमुख होती. गलबतांपेक्षा गुराबा मोठ्या प्रमाणात असत आणि पाल सर्वात भारी असे. ही सर्व जहाजे उथळ बांधनीची म्हणजे लांबीच्या प्रमाणात अधिक रुंदीची असत. नाळीकडील भाग खुप निमुळता व उथळ असे, त्यामुळे त्याना समुद्राचे पाणि कमी घर्षनाने कापता येई. नाळीवर आलेले पाणि उघडेपणामुळे दोन्ही बाजुला वाहुन जाई. तीन डोल काठ्यांचे गुराब साधारण पणे ३०० टन वजनाचे असे व छोटे १५० टनांचे जहाजांवर तोफा असत. या जहाजांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या पठानाची लांबी आणि नाळिच्या तुळइची लांबी सारखी असे. पठाणाच्या नाळीकडील भाग टोकदार असे.
संदर्भ:-
¤ कृष्णाजी अनंत सभासद बखर
¤ चिटनीस बखर
¤ शिवाजी महाराजांचे आरमार:- भा.कृ.आपटे
मराठ्यांचा इतिहास खंड पहीला
{क्रमश्यः}
संकलन
दुर्गवेडा कृष्णा घाडगे

!!शिवाजी महाराजांचे आरमार भाग ७


 !!शिवाजी महाराजांचे आरमार भाग ७

(क्रमश्यः)
१० संप्टेंबर १६७९ या तारखेस आठ गुराबा खांदेरीच्या कुमकेस येत असल्याची आवई उठली. १४,१५ व १६ वादळी पावसाचा फायदा घेऊन मराठ्यांनी इंग्रजांच्या जहाजांना गुंगारा देऊन खांदेरी ला कुमक पोहोचवली. व मराठ्यांनी गनिमी काव्याचा डाव चांगलाच वापरला. १९ सप्टेंबर १६७९ ला आरमारी चकमक होऊन लेप्टनंट थाॅरपे, जाॅन ब्रॅडबरी व हेन्री वेल्चे हे इंग्रज अधिकारी मराठ्यांनी मारले, व कॅप्टन चे जहाज मराठ्यांच्या हाती लागले. मराठ्यांचा उत्साह मात्र द्विगुणित झाला. इंग्रज मात्र फार सचिंत झाले. २० सप्टेंबर १६७९ ला कॅप्टन मिनचिन याचा बेटाजवळ मानसे उतरविण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला, तो प्रयत्न फसला. ऑक्टंबरमध्ये कॅप्टन रिचर्ड केनविन याची नेमनुक होऊन जादा दोन गुराबा पाठवण्यात आल्या. इंग्रजांची एकंदरीत आठ लढाऊ जहाजे वेढ्यात अडकली होती व त्यावर २०० मानसे होती.
१८ ऑक्टोबर १६७९ ला एक जोरदार लढाई झाली. तांबडे फुटताच मतलईचा फायदा घेऊन नागावच्या खाडीतुन शिवाजी महाराजांचे आरमार किणारपट्टीच्या आश्रयाने इंग्रजांच्या दिशेने वल्ही मारीत पुढे गेले. तळापर्यंत गेल्यावर मराठ्यांच्या जहाजांनी इंग्रजांच्या आरमारावर हल्ला चढविला, तो इतक्या द्रुतगतीने, चलद कि इंग्रजांना त्यांच्या तोफा ही डागता आल्या नाहीत. त्यांची जहाजे मागे पडली. कॅप्टन केगविनचे गुराबा व दुसरे एक गुराब इतर आरमारा पासुन वेगळी पडली. या मुळे इंग्रजांची ताकत दुभेगली व मराठ्यांनी इंग्रजांना दुबळे बनवले. त्यांची मराठ्यांच्या एकुन चाळीस छोट्या मोठ्या जहाजांशी गाठ पडली. बरोबर मराठ्यांची जहाजे याच्याविरुध्द दिशेला असल्याने ते नागावच्या खाडीकडे गेले. कॅप्टन केगविनच्या मदतीसाठी असलेले गुराब व पाच तारवे मराठ्यांनी पकडुन नेली. इंग्रजांना नामोहरम करण्याकरीता शिवाजी महाराजांनी कल्याण जवळ मोठे सैन्य जमविले. पनवेल जवळ मुंबईवर हल्ला करण्यासाठी शिवाजी महाराजांनी ४,००० सैन्य जमविल्याची बातमी मुंबईस पोहोचली. २२ ऑक्टोबर १६७९ ला इंग्रजांनी मराठ्यांची तीन गुराबे बुलविली. ऑक्टोबरच्या १८ तारखेस फाॅरच्यून जहाज व दोन शिबाडे, मानसे व युद्धसाहीत्य भरुन पाठवले. २२ ऑक्टोबर १६७९ रोजी मराठ्यांच्या बारा गलबतांनी व २५ ऑक्टोबर १६७९ रोजी ७ तारवांनी खांदेरी बेटावर साहीत्य पुरवले. पुनः २८ तारखेस एक अठरा गलबत खांदेरीकडे निसटली. मराठ्यांनी योजिलेली पळापळीची पद्धत व सुरत लुटनारा शिवाजी मुंबईवर हल्ला करनार ही आवई मुळे इंग्रज चांगलेच जेरीस आले. मराठ्यांनी गनिमी काव्याने इंग्रजांना दिशाभुल करत आपले बेत आखून इंग्रजांना पुरते नामोहरम केले होते.
संदर्भ:-
¤ शिवाजी महाराजांचे आरमार:- भा.कृ.आपटे
मराठ्यांचा इतिहास खंड पहीला
¤ शिवछत्रपतींचे आरमार - ग.भा. मेहेंदळे
¤ इंग्लीश रेकॉर्ड्स
{क्रमश्यः}
संकलन
दुर्गवेडा कृष्णा घाडगे

!!शिवाजी महाराजांचे आरमार भाग ६!!


!!शिवाजी महाराजांचे आरमार भाग ६!!
(क्रमशः)
इसवी सन १६६४ मध्ये शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी काढला. त्यावेळी पोर्तुगीज कारागीर कामावर होते, (चित्रगुप्ताच्या बखरीतील उल्लेखा नुसार) पण कै.पांडुरंग पिसुर्लेकर यांच्या मताप्रमाने यास कागदोपत्री आधार नाही. कोकनच्या किनारपट्टीवर इंग्रजांनी वेलदोडे आणि मीरी याच्या व्यापाराकरीता राजापुरास १६४९ मध्ये वखार घातली. पुढे मुंबई बेटे पोर्तुगीजांकडुन त्यांना इ.स.१६६५ मध्ये मिळाली. इ.स. १६६८ मध्ये मुंबई इंग्लंडच्या बादशहाकडुन इष्ट इंडिया कंपनीकडे देण्यात आली. सत्तेचे संतुलण राखण्या करिता वृद्धींगत असलेल्या शिवाजी महाराजांच्या सत्तेविरुद्ध जमेल तेव्हा विजापुरकरांस जंजिरेकर सिद्धी ला किंवा मुगलांना सहाय्य करणे हे त्यांचे धोरण होते. दंडा राजापुरी मराठ्यांच्या हातातुन गेली ती मीळवण्यासाठी व जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी व तोफांकरीता इंग्रजांची मदत मिळावी म्हणून शिवाजी महाराजांनी प्रयत्न पण ते व्यर्थ ठरले. हे इंग्रज पाताळ यंत्री, लबाड, घातकी हे शिवाजी महाराजांचे हाड वैरी होते. ते शिवाजी महाराजांच्या विरुद्ध सदैव जंजिरेकर सिद्धी ला, मुगलांना, अदिलशाही ला मदत करत. तसेच हा सिद्धी ही इंग्रजांना मदत करत आणि त्यांच्या जहाजांना मुंबई बंदरात नांगरुन राहण्यात परवानगी देत. त्यामुळे सिद्धीचे आरमार मुंबई बंदराचा आश्रय घेऊन शिवाजी महाराजांच्या किनारपट्टीवर उत्पात करीत. इंग्रजांचा हा विरोध मोडून काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी मुंबईच्या दक्षिनेस असलेल्या खंदेरी बेटाचा ताबा घेऊन तटबंदी करण्याचे ठरविले.खांदेरी बेटावरुन मुंबई बंदरावरील हालचाली टेहाळता येणार होत्या. आणि ते बेटे हातात आलि म्हणजे इंग्रज व सिद्धी या दोघांवर ही वचक बसणार होती. शिवाजी महाराजांना खांदेरी सहज घेऊन देणार नव्हते, ते विरोध हा करनारच. यातुन च खांदेरी ची आरमारी लढाई झाली. त्यावर सविस्तर जानून घेऊयात.
इंग्रजांवर वचक करण्याकरीता खांदेरी घेण्याचा बेत शिवाजी महाराजांनी इसवी सन १६७२ च्या एप्रिल महीन्यात केला. शिवाजी महाराजांचे आरमारी अधिकारी मायनाक भंडारी व दौलतखान यांनी खांदेरी वर मानसे उतरुन तटबंदी करण्यास सुरवात केली. इंग्रजांनी जोरदार विरोध केल्याने त्याना माघार घ्यावी लागली. पुढे सात वर्षांनंतर २७ ऑगस्ट १६७९ शिवाजी महाराज खांदेरी घेण्यासाठी जय्यत तयारी करीत आहेत ही बातमी मुंबई ला इंग्रजांना कळाली. २ सप्टेंबर १६७९ ला थळहुन मानसे व साहित्य खांदेरीवर रवाना होऊन तटबांधनी चे काम सुरु झाल्याचे समजताच इंग्रजांनी इनझाईन डॅनिएल ह्यूजेस यास तीन शिबाड देऊन खांदेरी व किनारा यांमध्ये नांगरट करण्यास सुरवात केली. बेटावर मराठ्यांची ४०० मानसे असुन त्यांनी मोक्याच्या ठिकाणी सहा तोफा डागल्या होत्या. मुंबईच्या दुय्यम गव्हर्नराने खांदेरी व मुंबईच्या बेटाच्या परिसरात असलेल्यामुळे कायदेशीर इंग्रजांचे आहे व ते बेट मराठ्यांनी सोडुन द्यावे असे मायनाक भंडारी यांना कळवले. आपल्या धन्याच्या परवानगी शिवाय आपण काय करु शकत नाही असे मायनाक भंडारी यानी इंग्रजाना कळवले. पुर्वीच्या तीन सीबाडाच्या मदतीसाठी रिव्हेंज जहाज, मानसे व युद्धसाहीत्य भरुन पाठवण्यात आले.
संदर्भ:-
¤ शिवाजी महाराजांचे आरमार:- भा.कृ.आपटे
मराठ्यांचा इतिहास खंड पहीला
{क्रमश्यः}
संकलन
दुर्गवेडा कृष्णा घाडगे

!!शिवाजी महाराजांचे आरमार भाग ५!!


 !!शिवाजी महाराजांचे आरमार भाग ५!!

(क्रमश्यः)
इसवी सन १६५७ मध्ये शहाजीराजे याच्या मुलाने वरच्या चौलचा ताबा घेतला आहे. (पोर्तुगीज कागदपत्रातील उल्लेख) शिवाजी महाराज कंल्याण भिवंडी व पनवेल येथे आरमार बांधत आहेत याची नोंद पोर्तुगीज दप्तरात घेतली आहे व त्याचा उल्लेख पाठीमागील भागात केलेला आहे. इ.स.१६६५ मध्ये ८५ तारवे घेऊन शिवाजी महाराजांनी बेदुरच्या राज्यातील बसरुरवर हल्ला केला त्यात त्याना भरपुर अमाप लुट मिळाली. हा हल्ला शिवाजी महाराजांच्या आरमारी सत्तेचा दर्शक असला तरी त्यात प्रत्येक्ष आरमारी लढाई झाली नाही. या मोहीमे नंतर मराठ्यांच्या आरमाराशी पोर्तुगीजांच्या आठ तारवांशी लढाई झाली. शिवाजी महाराजांचे आरमार होनावर, बसरुर, गंगोळी,मंगळुर वगैरे कर्नाटकातील बंदरातुन १२० पडाव पकडुन नेत आहे, असी बातमी गोव्याच्या विजरई आंतोनियु द मेलु द कास्त्रु यास मिळाली. शिवाजी महाराजांची एकुन पंचवीस जहाजे होती. त्यापैकी तेरा पकडलेल्या पाडावात आघाडीवर होती व उरलेली पिछाडीस होती. मराठ्यांच्या आरमाराची व पोर्तुगीज आरमाराची मुगराजवळ गाठ पडुन पोर्तुगीजांनी मराठ्यांची आघाडीवरील तेरा तारवे पकडुन नेली. बाकीची जहाजे निसटली व सुखरुप पोचली. शिवाजी महाराजांनी वकीला मार्फत दिलगीरी व्यक्त केल्यामुळे पोर्तुगीजांनी मराठ्यांची आघाडीवरील पकडलेली तेरा जहाजे सोडुन दिली. या ठिकाणी शिवाजी महाराजांची विलक्षण बुद्धी दिसुन येते युद्ध न करता पकडलेली सर्व जहाजे सोडवू घेऊन गेले. शिवाजी महाराजांचे योग्य व अचूक नियोजन याचा प्रत्येय वारंवार पहाय मिळतो.
२६ मार्च १६६५ शिवाजी महाराजांच्या आरमाराने पोर्तुगीजांचे एक लढाऊ तारु पकडले. आनखी एक जहाज शिवरायांनी पकडले हे जहाज दमनहुन सुरतेकडे चालले होते. शिवाजी महाराज व पोर्तुगीज यांच्या मधील वादाचा प्रश्न म्हणजे दस्तकांचा (Cartares). ठराविक जकात देऊन दर्यावर संचार कराय पोर्तुगीज आपले दस्तक मोगल, अदिलशाही, व इक्केरीचे राजे यांना देत. पोर्तुगीज हिंदी महासागरावर आपले सार्वभौमत्व आहे असे मानीत. दस्तक विरहीत मराठ्यांची जहाजे ते पकडीत व शिवाजी महाराज ही पोर्तुगीजांची जहाजे कोनत्या न कोनत्या कारनाने पकडीत. शेवटी पोर्तुगीजांनी शिवाजी महाराजांच्या आरमाराला दर्यावर मोगलांना ज्या सवलती देत त्या सवलती देण्यास मान्य केले. यावरुन लक्षात येते की शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना ही जुमानले नाही व शेवटी पोर्तुगीजांसारख्या बलाढ्य आरमारी सत्तेला ही मराठ्यांच्या समोर झुकवले. जे मुगलांना, अदिलशाहा ला जमले नाही ते मराठ्यांनी म्हणजे च शिवाजी महाराजांनी व त्यांच्या आरमारी सत्तेने करुन दाखवले.
संदर्भ:-
¤ शिवाजी महाराजांचे आरमार:- भा.कृ.आपटे
मराठ्यांचा इतिहास खंड पहीला
¤ पोर्तुगीज कालीन साधने
{क्रमश्यः}
संकलन
दुर्गवेडा कृष्णा घाडगे

!!शिवाजी महाराजांचे आरमार भाग ४!!


 !!शिवाजी महाराजांचे आरमार भाग ४!!

(क्रमश्यः)
इसवी सन १६७२ च्या अखेरीस औरंजेब बादशहा ने सुरतेशरुन सिद्धीच्या मदतीसाठी ३६ जहाजांचा एक काफीला पाठविला. त्या जहाजांनी शिवाजी महाराजांच्या आरमारात धुमाकूळ घातला या काफील्याने शिवरायांच्या आरमाराची तब्बल ५०० तारवे नष्ट केली आणि तो मुंबई बंदरात शिरला. या वेळी गुप्तपणे फ्रेंचानी शिवाजी महाराजांच्या आरमारास ८० तोटा व २००० मन शिसे विकले. डचांनी शिवाजी महाराजांनी मुंबई घेण्यासाठी त्याना ३००० सैनिक मागीतले व मोबदल्यात त्यांनी शिवाजी महाराजांना दंडा राजापुरी घेण्यासाठी २२ जहाजे द्यावीत या अटीवर बोलनी सुरु केली. ती फलदृप झाल्याची दिसत नाही. परत इ.स.१६७४ सिंद्दी संबळने शिवरायांच्या एक नौदलाधिकारी दौलतखान यावर सातवळीच्या खाडीत हल्ला केला. सिद्याचा प्रराभव होऊन तो हरेश्वर कडे निघुन गेला.
इ.स. १७७५ च्या सप्टेंबर महिन्यात ५७ जहाजे जमवुन जंजिरा जिंकण्याचा अटीतटीचा प्रयत्न केला. त्या ५७ जहाजां पैकी १५ गुराबा असून बाकीची गलबते होती. जंजिरा जेरीस आनन्याकरीता किनारपट्टीवर शिवाजी महाराजांनी तरते तराफे तयार केली. आरमाराने वेढा दिला. किनार्यावर मोरोपंथ पेशव्याच्या अधिपत्याखाली १०००० सैन्य जमा झाले. सिद्धी कासीम हा आरमार घेऊन आला. त्याने मराठ्यांचा आरमाराची व तरफ्यांची फळी फोडली आणि जंजिरा किल्ल्यावरील हल्ला अयशस्वी झाला. पुढे इ.स.१६७८ ते १६८० सिद्धी व शिवाजी महाराज यांच्यात जळपोळ एखीदी चकमक चालुच होती. त्यात इसवी सन १६७८ मध्ये दर्यासारंग व दौलतखान यांना ४००० सैन्य देऊन शिवाजी महाराजांनी पनवेलातुन रवाना केले. याचा उद्देश सिद्ध्याचे माजगाव येथे नांगरुन ठेवलेले आरमार जाळणे, पण तो बेत फसला. जंजिरा घेण्याचा बेत हा सदैव फसत गेला याचे मुख्य कारण म्हणजे कमकुवत सिद्धीला ऐनवेळी इंग्रज व पोर्तुगीज यांच्या कडुन मदत मिळत गेली. कमकुवत सिद्धीला शक्तिशाली शिवाजी महाराजांविरुद्ध मदत करणे हे त्यांचे धोरण होते. सिद्धीने शिवाजी महाराजांच्या आरमारात विरुद्ध स्वबळावर लढला नाही तर त्याला ऐनवेळी इंग्रज व पोर्तुगीज यांची मदत मिळत होती. व जेव्हा मदत नाही मिळाली तेव्हा सिद्धी मार खाऊन, हार पत्करुन पळून जात होता. {आपण जंजिरा फीराय गेल्यावर यातील मुद्दे लक्षात ठेवावे, व तेथे गेल्यावर तेथील स्थानिक बोटवाले जो खोटा इतिहास सांगुन सिद्धींची लाल करतात त्यांना हा इतिहास सांगणे}
संदर्भ:-
¤ शिवाजी महाराजांचे आरमार"- भा.कृ.आपटे
मराठ्यांचा इतिहास खंड पहीला
¤ शिवछत्रपतींचे आरमार- ग.भा.मेहेंदळे
{क्रमश्यः}
संकलन
दुर्गवेडा कृष्णा घाडगे

!!शिवाजी महाराजांचे आरमार भाग ३!


!!शिवाजी महाराजांचे आरमार भाग ३!!
(क्रमश्यः)
कुलाब्याचा बराचसा भाग आणि जवळजवळ संपुर्ण रत्नागिरी जिल्हा इसवी सन १६६३ पर्यंत ताव्यात आल्यावर शिवाजी महाराजांनी यथाकाळ प्रसंग साधुन आपले लक्ष सध्याच्या कर्नाटक किनार्याकडे वळविले इ.स.१६६५ मधे शिवाजी महाराजांनी बसरुर लुटले आणि इ.स. १६६५ पर्यंत फोंडे, सोंधे, कारवार ताब्यात आणल्यामुळे त्यांचा अमल दक्षिनेस गंगावळी नदी पर्यंत बसला. उत्तर कोकनापासुन कर्नाटकातील गंगावळी पर्यंत जंजिरेकर सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रज या सागरी सत्ता सागरी किणार्यावर प्रमुख होत्या त्यांच्याशी शिवाजी महाराजांना स्वराज्याचे आरमार बळकट करण्यासाठी युद्धे करावी लागली. अहमदनगर ची नीजामशाही इ.स.१६३६ ला नष्ट झाल्यावर सिद्धी विजापुर चा अदिलशाहा च्या नोकरीत रुजु झाला. अदिलशाहाचा समुद्रावरील वॅपार व मक्केच्या यात्रेला जाणारे मुसलमान यांना संरक्षण देणे हे त्याची जबाबदारी असुन, त्यांच्याकडे त्याचा मुळाचा दंडा- राजापुरी, जंजिरा, या विभागापासुन बानकोटापर्यंतचा भाग देण्यात आला होता. शिवाजी महाराजांनी कुलाबा जिल्ह्याचा पुर्वभाग आपल्या ताब्यात आणल्यावर त्यांचा सिद्धीसी संघर्ष सुरु झाला. सिद्धी प्रमुख फतहखान याने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर हल्ले केले. शिवाजी महाराजांनी सिद्धीच्या पारिपत्याकरीता रघुनाथ बल्लाळ कोरडे यांच्या नेतृत्वाखाली ५ -७ हजार सैन देउन सिद्धी विरुद्ध रवाना केले. त्याने तळे, घोशाळ वगैरे महत्वाचे किल्ले देऊन शेवटी दंडा राजापुरी हे किनार्यावरील मोक्याचे ठीकाण देण्यास सिद्यास भाग पाडले व तह झाला. शिवाजी महाराजांनी दंडा राजापुरीची मजबुती करुन लिंगाणा वगैरे किल्ले बांधल्यामुळे सिध्याच्या किनारपट्टीवरील धाडीस पायबंद बसला. शिवाजी महाराजांनी सिद्धींला कायमचा नेस्तनाबूत इ.स.१६६९ मध्ये जंजिरा या त्यांच्या किल्ल्यावर हल्ला चडविला. इ.स.१६७० मध्ये शिवाजी महाराजांनी जंजिरा जिंकण्यासाठी आपली सर्व सागरी शक्ती एकवटली. फतहखान या सिद्धीच्या प्रमुखास शिवाजी महाराजांनी जहाजीरीचे आमीश दाखवुन जंजिरा ताब्यात देण्यासाठी फीतवले पण फतहखाना विरुद्ध बंड झाले व सिद्धी संबळ याची मोगलांच्या नौदलाधिकारी पदी नेमनुक झाली. त्याच्या हाता खाली सिद्धी कासीम यास जंजिरा अधिकारी नेमण्यात आले. आणि सिद्धी खैरीयत याची नेमनुक किल्ल्यावर झाली. याला शह देण्याकरीता शिवरायांनी इ.स.१६७० च्या नोव्हेंबर मध्ये जंजिरा पासुन दहा मैल अंतरावर नांदगाव जंजिरा किंल्ल्यास वेढा घालण्या करिता १६० जहाजे १०,००० घोडे २०,००० सैन्य जमा केले. सुरुंग लावण्याचे सामान व हत्यारे ही तयार ठेवली होती. या नौदलाचा बेत गुप्तपणे सुरतेकर खुष्कीने शिवाजी महाराजांनी स्वारी केली म्हणजे दर्यातुन त्याना जाऊन मिळणे असा होता. हा बेत तडीस नगेल्याने शिवाजी महाराजांचे आरमार मुंबई ला वळसा घालून माहीमकडे गेले व बेत बदलल्याने परत फिरले. पुढे दमण जवळून जात असताना त्यांच्या नौदलाधिकारी यानी १२,००० रु. किमतीचा माल घेऊन जाणारे पोर्तुगीजांचे जहाज पकडले. पोर्तुगीजांनी शिवाजी महाराजांच्या आरमारावर हल्ला करुन त्यांची बारा जहाजे पकडुन नेली; पण बाकीची दाभोळ कडे निसटली. सिद्धी कासीम ने इ.स. १६७१ मध्ये मराठ्यांच्या ताब्यातील दंडा राजापुरी चा किल्ला हल्ला करून जिंकुन घेतला. तो परत मीळवण्या करिता इंग्रजांची मदत व्हावी म्हणून वकील पाठवुन शिवाजी महाराजांनी प्रयत्न केला, पण त्याला यश आले नाही. तो बेत फसला.
संदर्भ:-
¤ शिवाजी महाराजांचे आरमार:- भा.कृ.आपटे,
मराठ्यांचा इतिहास खंड पहीला
{क्रमश्यः}
संकलन
दुर्गवेडा कृष्णा घाडगे

!!शिवाजी महाराजांचे आरमार भाग २!!


!!शिवाजी महाराजांचे आरमार भाग २!!
(क्रमश्यः)
वसईस जहाज बांधणारे कुशल पोर्तुगीज कारागीर होते. रुय लैतांव व्हीयेगस व त्याचा मुलगा फेर्नाव व्हीयेगस लैतांव या नौशिल्यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराजांनी आपली पहीली वीस लढाऊ गलबते (Sanguicis) बांधण्यास सुरवात केली. ही जहाजे आपन सिद्ध्याच्या विरोधात बांधत आहोत, असे शिवाजी महाराजांनी जाहीर केले होते. कारण तसे जाहीर केल्या शिवाय पोर्तुगीज त्यांच्या जहाचांना कल्याण भिवंडी खाडीतुन बाहेर पडुन देणे शक्य नव्हते. उपरोक्त पोर्तुगीज नौशिल्यांच्या हाताखाली तीनसेचाळीस कामगार व इतर लोक काम करीत होते. अर्किव्ह इस्कोरिकु ऊल्यामारीनुमध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पोर्तुगीज सिपाई होते असा उल्लेख आहे. म्हणजे याचा अर्थ असा असला पाहिजे कि जहाज बांधणारे तीनसेचाळीस पोर्तुगीज कामगार. पुढे इ.स.१६६८ मध्ये विजरई ने एक जाहीर नामा काढला मोगल अदिलशाहा व शिवाजी यांच्या सैन्यामध्ये नोकरीस असलेल्या पोर्तुगीज लोकांनी मायदेशी परत जावे अशी आज्ञा केली. शिवाजी महाराजांचे आरमार एकदा तयार झाले कि सिद्धींच्या बरोबर त्याचा त्रास आपनास ही होणार या भितीने शिवाजी महाराजांची नोकरी सोडून द्यावी, म्हणून वसई च्या कॅप्टन आॅतोनियु द मेलु कास्त्रु याने प्रयत्न केले. परिणामी ही सर्व लोके शिवाजी महाराजांची नोकरी सोडुन वसई व मुंबई येथे पळून गेली. अशा रितीने इसवी सन १६५७ ते १६५९ च्या दरम्यान शिवाजी महाराजांची वीस जहाजे बांधुन तयार झाली. याच सुमारास सिद्धी, विजानुर व पोर्तुगीज यांच्या ताब्यातील भाग वगळून बाकीचा उत्तर कोकण (कुलाबा जिल्हा) शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला होता. इसवी सन १६६१ ते १६६३ मध्ये विजापुरकरांच्या दाभोळ बंदरावर शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी हल्ला केला सुर्व्यांचे श्रुंगारपुर घेतले व राजापूर लुटले. या हल्ल्यामुळे जवळ पास रत्नागिरी चा सर्व समुद्र किनारा शिवाजी महाराजांकडे म्हणजे स्वराज्यात आला होता. अस्या वेळी आरमार वाढविण्याची आवश्यकता तीव्रतेने भासु लागली.
इसवी सन १६६२ च्या मे महीन्यात गोव्याच्या गवर्नर ला दाभोळचा सुभेदार राघो बल्लाळ याने शिवाजी महाराजांची पाच लढाऊ गलबते (Sanguiceis) एक तारु (pataxo) करंजाच्या नदीत अडकून पडली होती, त्यास समुद्रात जाऊन द्यावे असी आज्ञा केली. ह्याच गव्हर्नर एखादा धाडसी इसम पाठवुन गुप्तपणे गलबते जाळुन टाकावीत अशी आपल्या एका अधिकारीयास सुचना केल्याचा उल्लेख आहे. चौलच्या कॅप्टन ने पोर्तुगीजाना लिहिलेल्या पत्रानुसार (ऑगस्ट १६६४) वरच्या चौलमधे शिवाजी महाराज पन्नास तारवे बांधत होते आणि त्यातील सात तारवे बाहेर पडण्याच्या तयारीत होती. " शिवाजी चे वाढते आरमारी सामर्थ्य ध्यानात घेउन शिवाजी च्या तारवांना समुद्रात जाऊन देऊ नये असे धोरण पोर्तुगीजांचे होते." इसवी सन १६६७ च्या अखेरीस शिवाजी महाराजांच्या वाढत्या सामर्थ्याबद्दल विजरई कोंदी द सांव्हिसेंती याने एका पत्रात व्यक्त केलेले मत " शिवाजीचे नौदल ही मला भितीदायक वाटते कारण त्याच्या विरुद्ध आम्ही सुरवातीला कारवाई न केल्यामुळे त्यानी किणार्यावर किल्ले बांधले आणि आज त्या जवळ पुष्कळ तारवे आहेत. पण ही तारवे मोठी नाहीत."
संदर्भ:-
¤ शिवाजी महाराजांचे आरमार:- भा.कृ.आपटे (मराठ्यांचा इतिहास खंड १)
इ.स.१६६४ चौल कॅप्टन पत्र सारांश
इ.स. १६६७ विजरई कांदी द सांव्हीसेंती याच्या पत्रातील उल्लेख
{क्रमश्यः}
संकलन
दुर्गवेडा कृष्णा घाडगे

!!शिवाजी महाराजांचे आरमार!! भाग १

 


!!शिवाजी महाराजांचे आरमार!!

भाग १
शिवाजी महाराजांचे आरमार जर आपण पाहीले तर ते किती बलाढ्य होते याची प्रचिती येते. पोर्तुगीज,इंग्रज, डच, फ्रेंच, फीरंगी हे आरमारी सत्ता असलेली बलाढ्य साम्राज्ये ही शिवरायांनी निर्माण केलेल्या आरमारी सत्तेला भित होते याचे पुरावे त्यांच्याच पत्रात आढळतात. हे लिखान करताना समकालीन पत्रे, सभासद बखर, जेथे शकावली, मराठ्यांचा इतिहास, पोर्तुगीज साधने अस्या साधनांचा आधार घेतला आहे.
शिवरायांनी हिंदवी स्वराज्याच्या आरमाराची बांधणीची पावले ही १६५५ --५६ ला जावळी ताब्यात घेतल्यानंतर उचलली गेली. त्याचे कारण म्हणजे जावळी तसेच राजगड स्वराज्यात आला व स्वराज्याच्या सिमा या समुद्रा पर्यंत जाऊन पोचल्या. त्या मुळे जंजिरे कर सिद्धी हा उपद्रव करु लागला तसेच इतर आरमारी सत्ताधारी ही समुद्र किणारच्या प्रदेशात उपद्रव करीत. तसेच "ज्याचे आरमार त्याचा समुद्र" हे पाहता स्वराज्याचे आरमार असणे हे स्वराज्याच्या हितासाठी व सिमा बळकटी साठी, राज्य बळकटी साठी खुप महत्वाचे होते. जेव्हा शिवाजी महाराजांच्या राज्याच्या सिमा समुद्राला जाऊन मिळाल्या तेव्हा सिद्धी, टोपीकर (इंग्रज), फिरंगी (पोर्युगीज), वलंदेज (डच), व फरासीस (फ्रेंच) या सागरी सत्तांशी संबंध आला. यातील सिद्धी उर्फ हबशी यांचे मुख्य आरमारी ठाणे जंजिरा बेटावर होते. सिद्धी समुद्रात चाचेगीरी करी आणि कोकण किणार्यावर जाळपोळ, लुटमार, व बाटवा बाटवी करणे हा त्यांचा नित्त्याचा उद्योग होता. हिंदू धर्म बाटवणे, बायका पळवणे, त्याना बाटवणे, त्याना भोगणे हा सिद्ध्यांच्या उद्यागातील एक भाग होता. १६५७ कंल्याण भिवंडी ताब्यात घेऊन राजापूर पर्यंतचा भाग काबीज केला. तेव्हा सिद्धी शी संपर्क- संघर्ष होणे अपरिहार्य होते. (कृष्णाची अनंत सभासद बखर मधील सारांश) "सिद्ध्याच्या लोकांनी राजियांच्या देशास उपद्रव मांडीला. पुढे राजियास राजापुरीचे सिद्धी, घरात जैसा उंदिर तैसा शत्रु यास कैसे तजबिज करावे म्हणून तजबिज पडली. सिद्ध्याचे पारिपत्य करण्याकरीता शिवाजी महाराजांना आरमार उभारण्याची निवड होती.आरमार निर्मिती मुळे इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच या सत्तांना शह बसुन समुद्रात त्यांच्या बरोबरीने सार्वभौमत्व सिद्ध होणार होते. अगदि याच राजकिय कारणाकरीता शिवाजी महाराजांनी समुद्रात आरमार उभारले. 'दर्यास राजियांनी पालाण घातले" रघुनाथ बल्लाळ यांची नेमणूक तळे घोसाळे राजापुरीपावेतो होऊन सर्व दर्याकिणारा मोकळा केला.
इ.स.१६५७ मध्ये कंल्याण भिवंडी घेतल्यावर कल्याण खाडीत सुमुहुर्ताने आपल्या आरमाराची पहीली पठाणे तरकी केली. आरमार बांधणीस सुरवात झाली. पोर्तुगीज दप्तरातील साधनाप्रमाणे शिवाजी महाराजांनी इ.स.१६५९ ला मराठ्यांच्या आरमाराची मुहूर्त मेढ रोवली. त्याचा तपशील असा " अदिलशहा चा बंडखोर सरदार शहाजी याच्या एका मुलाने वसई व चौलकडील प्रदेश काबीज केला असुन तो बलीष्ठ झाला आहे. त्याने काही लढाऊ गलबते भिवंडी, कंल्याण व पनवेल या वसई तालुक्याचे बंदरामध्ये बांधली आहेत. त्यामुळे आम्हाला सावध राहणे भाग झाले आहे. हि गलबते समुद्रात फिरुन न द्यावी म्हणून (पोर्तुगीज) कॅप्टन ला आम्ही आज्ञा केली आहे की, त्याने सदर गलबते बंदरातुन बाहेर येऊन देऊ नयेत."
संदर्भ:-
¤ शिवाजी महाराजांचे आरमार:- भा.कृ.आपटे
मराठ्यांचा इतिहास खंड पहीला
¤ सभासद बखर ¤ पोर्तुगीज साधने
{क्रमश्य:}
संकलन
दुर्गवेडा कृष्णा घाडगे

अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

  अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...