विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label औरंगजेब. Show all posts
Showing posts with label औरंगजेब. Show all posts

Thursday, 18 March 2021

आणि औरंग्या कायमचा अधू झाला

 


आणि औरंग्या कायमचा अधू झाला 
🚩साभार : दै. सकाळ 🚩
माणदेश हा कायम दुष्काळी पट्टयातला प्रदेश, माण नदीच्या आसपासचा परिसर मिळून जो प्रदेश येतो तो माणदेश. खटाव, माण, खानापूर, सांगोला तालुक्यांच्या काही भाग मिळून आज माणदेशाची ओळख आहे. या दुष्काळी भागाला इतिहास मात्र मोठा लाभला आहे. शिवकालीन इतिहासातील अशाच एका घटनेबाबत माहिती या लेखात वाचायला मिळणार आहे. काबूलपासून बंगालपर्यंत पसरलेल्या प्रचंड मोठ्या साम्राज्याचा शहेनशहा औरंगजेबापूढे अनेक राजे महाराजांनी आपल्या समशेरी म्यान करत त्याची चाकरी पत्करली. मात्र त्याच्या समोर धिप्पाडपणे उभे होते रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज... त्यांचे स्वराज्य.. स्वराज्यावर मोगलांनी अनेक हल्ले केले. मात्र औरंगजेबला स्वराज्यावर विजय मिळवता आला नाही.
छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर मोगल बादशहा औरंगजेब याला स्वराज्यावर विजय मिळविणे सहज शक्य होईल असे वाटले होते. मात्र त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी मोगलांसह इतर शत्रूंना जोराची टक्कर देत स्वराज्यापासून दूर ठेवले. त्यामुळे औरंगजेब दिल्ली सोडून मोठ्या फौजफाट्यासह स्वतः स्वराज्यावर चालून आला. त्याने संभाजी महाराजांना पकडून हाल हाल करुन मारले. औरंगजेबाला वाटले आता तरी आपण स्वराज्य सहज काबीज करु, मात्र संभाजीराजांच्या मृत्यूचा अंगार मावळ्यांच्या रक्तात फुलत होता. मावळे चौताळून उठले होते. छ. संभाजींच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज गादीवर आले. त्यांनी दक्षिणेतील जींजी किल्ल्यावरून राज्यकारभार सुरु करत मोगलांशी लढा सुरू ठेवला. मात्र 2 मार्च 1700 साली त्यांचा मृत्यू झाला. त्यांनतर त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनी स्वराज्याची सुत्रे हाती घेतली. ताराबाई यांनी मोठ्या जिद्दीने मोगलांना तोंड देत होत्या. मावळे गनिमी काव्याने डाव साधून ते मोगल सैन्यावर हल्ला करत अन वाऱ्याच्या वेगाने गायब होत. मुठभर मावळे कधी येत कधी हल्ला करत अन निघून जात, याचा थांगपत्ताही मोगलांना लागत नसे. संताजी-धनाजीच्या भितीने तर मोगलांना झोपही लागत नव्हती.
औरंगजेबही मोठ्या त्वेशाने मराठा सैन्याशी लढत होता. तोरणा, सिंहगड, विशाळगड, अजिक्यतारा, परळीचा सज्जनगड असे महत्वाचे किल्ले मोगलांनी ताब्यात घेतले. दरम्यानच्या काळात पाऊस, नद्यांना आलेले पुर यामुळे मोगल सैन्याचेही मोठे नुकसान झाले होते. तरीही औरंगजेब एक एक किल्ला ताब्यात घेत होता. पावसामुळे औरंगजेबाच्या सैन्याचे मोठे नुकसान झाले होते. सैन्य, जनावरे यांची अतोनात हानी झाली होती. खजिना रिकामा होत चालला होता. सैन्याचा पगारही वेळेत होत नव्हता. त्यामुळे सैन्यावर उपासमारीची वेळ आली होती.
असे असताना 21 जून 1700 रोजी सध्याच्या सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील भुषणगडाकडे औरंगजेबाच्या सैन्याने कूच केली. पावसामुळे बादशाही फौजेचे मोठे नुकसान झाले होते. अनेक जनावरे दगावली होती. जी शिल्लक होती ती म्हणायलाच जिंवत होती अशी त्यांची अवस्था होती. बादशहाच्या अनेक उमरावांना मुसळधार पावसात सोसाट्याच्या वाऱ्यात पायी चिखल तुडवित प्रवास करावा लागत होता. मौगल सैन्यावर निसर्गाचे एक प्रकारे आस्मानी संकटच कोसळले होते. दिवसाकाठी केवळ तीन मैलाचा प्रवास मोगल सैन्य करत असे.
●अचानक माण नदीला पूर आला●
परळीवरुन भुषणगडाचे साधारण 45 मैलाचे अंतर कापायला 35दिवस लागले. भुषणगड ताब्यात घ्यायला मोगलांना 1 महिना गेला. महिनाभरानंतर मोगल सैन्य भूषण गडाकडून 36 मैलाचे अंतर कापून 30 ऑगस्ट रोजी माण नदीजवळील खवासपूर येथे आले. तेथे कोरड्या नदीत मोगल फौजांनी छावणी टाकली. मोगल सैन्याची महिनाभर खवासपूरजवळ नदीत छावणी होती. 1 ऑक्टोंबर 1700 रोजी रात्री आजूबाच्या परिसरात अचानक मुसळधार पाऊस पडला. यामुळे अचानक माण नदीला पूर आला. या पुरात मौगलांचे अनेक सैन्य, खजीना, जनावरे, वाहून गेली. मध्यरात्री काळोखात पुराचे पाणी अचानक छावणीत घुसल्यामुळे मोगल छावणीत हाहाकार माजला. अचानक छावणीत गोंधळ सुरू झाल्यामुळे औरंगजेबाला जाग आली. मराठ्यांनी छावणीवर हल्ला केल्याचा त्याचा समज झाला. दचकुन बिछाण्यातून औरंगजेब पळायला लागला, मात्र अडखळून त्याचा तोल गेल्याने तो जोरात आपटला. यात त्याचा गुडघा निखळला. कसाबसा स्वत:ला सावरत तो सुरक्षित ठिकाणी गेला.
🚩मराठ्यां सोबतच या महाराष्ट्राच्या सह्याद्रीने
(महाराष्ट्राच्या मातीने) सुद्धा औरंग्याचा अक्षरशः छळ छळ केला.🚩
पुढे वैद्य, हकिमांनी अनेक उपचार करुनही औरंगजेबाचा पाय सरळ झाला नाही. तो कायमचाच आदू झाला. या घटनेनंतर बादशहाचे खुशमस्करे बादशहाला बरे वाटावे म्हणून त्याची तुलना तैमुर लंग याच्याशी करू लागले. या पुरात मोगली सैन्याची मोठी हानी झाली. त्यानंतर औंरंगजेबाला नवीन घोडे, सैन्य भरती करावी लागली. मात्र पायला आलेले अपंगत्व अखेरपर्यंत राहिले.

Wednesday, 30 September 2020

औरंगजेबाच्या अखेरच्या दिवसातील साक्षीदार असलेले शहर नगर

 

औरंगजेबाच्या अखेरच्या दिवसातील साक्षीदार असलेले शहर नगर
- तब्बल 49 वर्षे हिंदुस्तानवर राज्य करणा-या औरंगजेबाचे अखेरचे तेरा महिने भिंगारमध्ये व्यतित झाले. नगर हे तेव्हा जणू देशाची राजधानीच बनले होते. अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा साक्षीदार होण्याची संधी तेव्हा या शहराला मिळाली. याच मातीत वयाच्या 89 व्या वर्षी औरंगजेबाने अखेरचा श्वास घेतला. मोगल साम्राज्याचा डोलारा त्या क्षणापासून ढासळायला सुरूवात झाली..
आयुष्यातील अखेरची २६ वर्षे औरंगजेबाने दख्खनच्या मोहिमेवर खर्च केली. 1681 मध्ये सुरू झालेली ही मोहीम 1707 मध्ये संपली ती औरंगजेबाच्या मृत्यूनंतरच. या काळात घडणाऱ्या घडामोडींचं महत्त्वाचं केंद्र होतं अहमदनगर. औरंगजेबाचं 1683 मध्ये नगरला आगमन झालं, तेव्हा मोगल सैन्याची पाच लाखांची छावणी भिंगारपासून चार मैल अंतरापर्यंत पसरली होती. नंतर औरंगजेबाने विजापूर, गोवळकोंडा घेतला, पण मराठ्यांचं स्वराज्य नेस्तनाबूत करणं त्याला शक्य झालं नाही. संताजी, धनाजीसारख्या शूरवीरांनी मोगलांची रसद तोडून, गनिमी काव्याने हल्ले करून त्यांना जेरीस आणलं. शेवटी कंटाळलेला औरंगजेब परतीच्या प्रवासला निघाला. जानेवारी 1706 मध्ये तो नगरला आला, तेव्हा आपली अखेर जवळ आल्याचं त्याला जाणवलं. "ये मेरा आखरी मुकाम है...' असे उद््गार त्याच्या मुखातून निघाले. नगरच्या मातीतच फेब्रुवारी 1707 मध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला.
औरंगजेबाचे पार्थिव त्याच्या इच्छेप्रमाणे दफनासाठी खुलताबादला नेण्यापूर्वी जिथे त्याला स्नान घालण्यात आले तो चौथरा, बादशहाचा दरबार जिथे भरत असे ती बारादरी, तेथील संग्रहालयात असलेल्या कुराणाच्या दुर्मिळ प्रती, रयतेला दर्शन देण्यासाठी बादशहा जिथे बसे ती मेघडंबरी, मशीद व कारंजी, मशिदीच्या तळघरात असलेली बादशहाची विश्रांतीची जागा अशा अनेक गोष्टी पाहताना इतिहासात डोकावल्याचा आभास होत होता. आलमगीरची तटबंदी, बुरूज, प्रवेशद्वार, तसेच मलग्या अजून सुस्थितीत आहेत.
 औरंगजेब के सिंहासन की 'रक्त रंजित' कहानी | India History

Tuesday, 4 August 2020

औरंगजेब एक अजब रसायन भाग २

औरंगजेब एक अजब रसायन भाग २
एखाद्या राज्याचा अपकर्ष हा त्याच्या शासन व्यवस्थेच्या कमकुवतपणा मुळे होत असतो. औरंगजेबाचा अपकर्ष होण्यामागे काही अंशी त्याच्या राज्य व्यवस्थेअंतर्गत काम करणारे मनसबदार व त्यांची व्यवस्था हेही कारणीभूत ठरले.
मोगल काळात जहागिरीची पद्धत ही वंशपरंपरेच्या परंपरेचा तत्वावर आधारलेली नव्हती. बादशहा हा राज्यातील सर्व जमिनीचा मालक समजला जाई. राज्याचे बैत ऊलमाल नावाचे स्वतंत्र खाते होते. या खात्याकडे या व्यक्ती वारस न ठेवता भूत होत त्यांची आणि त्याचप्रमाणे अमीर उमराव आणि राज्याचे इतर अधिकारी मरण पावत त्यांची मालमत्ता सोपवली जाई. या पद्धतीचे मुख्य कारण असे होते की, प्रत्येक अधिकाऱ्याकडे सरकारी देणे थकलेले असे. मोगल राज्यात प्रत्येक अधिकारी हा मनसबदार असे. त्याचा पगार त्याच्या जहागिरीच्या उत्पन्नातून त्याला मिळे. हा पगार त्यांनी ठेवलेल्या स्वरांच्या संख्येशी मिळता आहे किंवा नाही याची नोंद त्या स्वरांची मोजदाद केल्याशिवाय होत नसे. हे काम व्यवस्थित असे शांततेच्या काळात होइ. औरंगजेबाची ची कारकीर्द सतत युद्धात गेल्यामुळे कोणत्याही अधिकार्याचे हिशेब पूर्ण होत नसत. अशा परिस्थितीत प्रत्येक अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर तात्पुरती का होईना त्याची मालमत्ता सरकार कडून जप्त केली जाई. असे करण्यामध्ये बादशहाचा उद्देश मृत व्यक्ती सरकारचे जे देणे आहे ते वसूल व्हावे असा असे. औरंगजेबाचे याबाबत हुकूम अगदी स्पष्ट होते. परंतु एखाद्या म्रुत अधिकाऱ्याचा वारस देण्याबद्दल जामीन राही त्यावेळी मालमत्ता जप्त करण्यात येत नसे.
या पद्धतीचे मूळ काही असले तरी या पद्धतीचे परिणाम खूप विघातक होते. आपल्या पाठीमागे आपल्या कुटुंबीय मंडळी करता आपण काहीही ठेवू शकत नाही या जाणिवेने सरदार मंडळी आपल्या हयातीत पैशाची उधळमाधळ करीत, आणि आपली संपत्ती नाच रंग दारू आणि स्त्रिया यावर खर्च करीत. सहाजिकच मोगल साम्राज्यातील एक महत्त्वाचा वर्ग समाजाच्या दृष्टीने कुचकामी ठरला. या पद्धतीचा आणखी एक वाईट परिणाम झाला आणि तो म्हणजे खाजगी भांडवलाची साठवण होईनाशी झाली आणि समाजाच्या आर्थिक विकासाला त्यामुळे खो बसला. राजकीय दृष्टिकोनातून देखील या पद्धतीचे अनेक दुष्परिणाम झाले. बादशहाच्या सत्तेला पायबंद घालणारा आणि सार्वजनिक स्वातंत्र्याचे रक्षण करणारा असा सरदार वर्ग अतिशय कमकुवत बनला. लढाईच्या काळात अथवा वारसा हक्काचे युद्ध चालू असताना जिथे जय असेल तिकडे जाऊन मिळण्याची सरदार वर्गाची वृत्ती बनली. परिणामी सरदार वर्गाप्रमाणेच सरकार ही अस्थिर व दुबळे बनले.
अमीर उमरावावर मोगल बादशहाची वरील पद्धतीमुळे अतिशय हुकुमत चाले. त्याशिवाय बादशहाच्या हातात उमरावावर सत्ता चालवण्यासाठी आणखी एक शस्त्र होते. औरंगजेबाच्या उमरावामध्ये पुष्कळसे उमराव पर्शिया पूर्व आशिया आणि तुर्कस्थान यामधून आलेले होते. हिंदुस्थानातील मुसलमानांपेक्षा ते श्रेष्ठ आहेत असे औरंगजेब मानीत असे. आपल्या देशातील बादशहाच्या संतापाला बळी पडल्यामुळे जेव्हा अशी सरदार मंडळी हिंदुस्तानात येत तेव्हा मोगल दरबारात त्यांना अतिशय मान दिला जाई. त्यांनी येथील बादशहा जवळ प्रामाणिक राहावे म्हणून त्यांना फार मोठी किंमत द्यावी लागे. आपली बायका-मुले हिंदुस्तानात आणण्याची त्यांच्यावर सक्ती केली जाई. त्याकरिता त्यांना मोठ्या जागेवर कायम करण्यात येत नसे किंवा स्वतंत्र अधिकार दिले जात नसत. त्याबरोबर जेव्हा-जेव्हा ते सुभ्यावर कामगिरी करता जात तेव्हा त्यांना दरबारात आपला मुलगा प्रतिनिधी म्हणून ठेवावा लागे.

औरंगजेब एक अजब रसायन भाग १

औरंगजेब एक अजब रसायन भाग १
postsaambhar ::Amar Salunkhe Bhau Maratha
बाप मारतोय म्हटलं की आनंदित होणारी इस्लामची संस्कृती होती. याच पार्श्वभूमीवर हिंदुस्तानचा बादशहा शहाजहान आजारी पडला आणि त्याला भेटण्यासाठी म्हणून त्याची मुल सशस्त्र सैन्य घेऊन बापाला भेटायला निघाली. शहाजहानने पत्र पाठवून त्यांना कळवल कि मी अगदी ठणठणीत आहे मला काहीही झालेल नाही. पण पोरांच्या हातात आयत कोलीत सापडल होत ती कसली ऐकणार होती. त्या पोरांमध्येही आपापसात अविश्वास होता आणि कित्येक वर्षे त्यांनी एकमेकांना पाहिलेले नव्हत.
ही मोगल सल्तनतिच्या वारस युद्धाची नांदीच होती. शहाजहानच्या या पोरांच्या वारसा युद्धाबद्दल आपण पुन्हा कधीतरी पाहू आज आपण चर्चा करणार आहोत ती शहेनशहा म्हणून गादीवर आलेल्या एका अपरिचित शहजाद्याची.
वारस युद्धात औरंगजेबाची फत्ते झाली आणि औरंगजेबाने आपला मोठा भाऊ दारा शिकोह यांची निर्दयी आणि आणि क्रुर अशी हत्या घडवून आणली.दारा शिकोह बरोबरच त्याने आपल्या आप्त नातेवाईकांपैकी ३० ते ४० लहान मोठ्या आप्तजणांची हत्या घडवून आणली. दारा शिकोह हे एक वेगळे समीकरण होत. दारा शिकोह जर राजगादीवर आला असता तर आज हिंदुस्थानच राजकारण काही वेगळंच असत. परंतु कदाचित नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होत.
औरंगजेब एक कडवा मुसलमान तर होताच परंतु तो एक कट्टर इस्लामला मानणारा व स्वतःच्या राज्यावर इस्लाम लादणारा एक सनकी परंतु तितकाच धोरणी राज्यकर्ता होता. राज्य सत्ता हातात आल्यावर त्याने इस्लामला मान्य नसणाऱ्या काही गोष्टीवर निर्बंध लादले. चित्रकला, संगीत, शायरी हे त्यापैकी एक होत. वस्तुस्थिती अशी होती की मुसलमानांमध्ये कित्येक पट्टीचे शायर होते, संगीतकार होते संगीत प्रेमी होते. अचानक औरंगजेबाने या सगळ्या गोष्टी बंद केल्यामुळे जनतेमध्ये प्रक्षोभ निर्माण झाला.
कोण हा औरंगजेब? एक तर ह्याने रयतेच्या लाडक्या दारा शिकोह चा अतिशय कूर असा वध केला होता, शिवाय गेल्या तीस ते पस्तीस वर्षात वर्षात रयतेला हा औरंगजेब कोण आहे हे माहीतच नाही. त्याची कारकीर्द इतकी वर्षे दक्षिणेत गेलेली होती त्यामुळे हा नक्की कोण आहे अशा एका प्रश्नाने संपूर्ण राज्याला ग्रासलं होत.
अचानक एखादा धूमकेतू उमटावा तसा हा औरंगजेब मोगलांच्या राजकीय राज पटलावर उमटला होता त्यामुळे सगळ्यांसाठी हा औरंगजेब म्हणजे एक मोठ्ठ प्रश्नचिन्ह होत. सहाजिकच मोगल साम्राज्यात औरंगजेबा बद्दलअसंतोष निर्माण झाला. या असंतोषाचा फलित म्हणून मोगल साम्राज्यात जे संगीतप्रेमी होते त्यांनी औरंगजेबाचा निषेध म्हणून संगीताच प्रेत काढलं आणि प्रेताच्या आजूबाजूला मोठ्याने आक्रोश करायला सुरुवात केली. अर्थातच हा आक्रोश औरंगजेबाच्या कानावर पडला. ही नक्की काय भानगड आहे म्हणून औरंगजेबाने त्यातील काही प्रतिनिधींना बोलावून घेतले.
जेव्हा औरंगजेबाने त्या प्रतिनिधींना विचारले की हा सर्व काय प्रकार आहे, तेव्हा त्यांनी सांगितले की ही संगीताची अंत्ययात्रा आहे. का तर तुम्ही संगीता विरुद्ध फतवा काढलाय. त्यावर औरंगजेबाने अशी प्रतिक्रिया नोंदवली की "खयाला रखीयेगा की ये संगीत जो है वह अच्छी तरह से दफन हो जाये क्यूकि अगर ये संगीत ठीक से दफन नही हुलागु और इसने फिरसे अपना सर उठाया तो मै आप सब के सर कलम कर दूंगा.
औरंगजेब म्हणाला तुम्ही खूप चांगलं काम केलय, आता एक काम करा, खोल खड्डा खाना आणि त्या खड्ड्यात या संगीताचा जनाजा खोलवर दफन करा. संगीताचं प्रेत जर व्यवस्थित दफन झालं नाही आणि यदाकदाचित जर मला राज्यात कोठे संगीत ऐकू आलं किंवा जिवंत आहे असं आढळलं तर मी तुम्हा सर्वांची डोकी कलम करेन. त्यांच्या लक्षात आले की खरोखरच हे काहीतरी वेगळेच रसायन आहे .
जे कोणी औरंगजेबासमोर आले होते ते अक्षरशः तोंडात मारल्यासारखे निशब्द होऊन परतले. औरंगजेबासाठी किंवा त्याच्या विरोधात या जनसमुदायाकडे बोलण्यासारखं किंवा निषेध नोंदवण्यासारखं काहीही उरल नव्हत. कारण या सगळ्या गोष्टींगोष्टींची जर पाठराखण करावी तर हा माणूस इस्लामचा आश्रय घेऊन आपले मुडदे गाडल्याशिवाय राहणार नाही.
तर असा हा औरंग आणि त्याच्या अंगी असलेल्या रंगा पैकी हा एक हा एक रंग .
सांगण्याचा उद्देश एवढाच ही धर्म मग तो कोणताही असो हिंदू, मुसलमान, सिख, ईसाई किंवा बौद्ध यांच्यापैकी कोणत्याही धर्माच्या विरोधात आपण जर बोलला मग ते योग्य असो किंवा अयोग्य तुम्हाला त्याच्या कचाट्यातून कोणीही वाचू शकत नाही आणि याच गोष्टीचा पुरेपूर फायदा उचलणारा औरंगजेब हा हिंदुस्तानच्या पटलावर राज्य करणाऱ्या राजकारराजकारण्या पैकी एक धूर्त व धोरणी राज्यकर्ता होता यात शंका नाही.
औरंगजेबाला त्याच्या धर्माबद्दल किती आस्था होती हा भाग वेगळा परंतु त्याने एक राज्यकर्ता म्हणून आपल्या धर्माचा राज्यासाठी किंवा राज्य विस्तारासाठी पुरेपूर फायदा करून घेतला हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे.
असं नाही कि त्याने फक्त हिंदुविरोधी कारवाया केल्या त्याने स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी स्वतःच्या इस्लाम धर्मातही खाचा लक्षात घेऊन स्वतःच्या सोईप्रमाणे त्याचा उपयोग करून घेतला.
_ अमर श्रीरंग साळुंखे.

अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

  अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...