विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label भोसले कुळ. Show all posts
Showing posts with label भोसले कुळ. Show all posts

Monday, 18 July 2022

मालोजी भोसलेचा मृत्यू



 मालोजी भोसलेचा मृत्यू
शाहजीच्या जन्मानंतर थोड्या वर्षांनीच मालोजीचा मृत्यू झाला. उपलब्धसाधनांमधे ह्या घटनेचा नेमका दिवस सापडत नाही. शाहजीच्या जन्मानंतर पाचवर्षांनी मालोजी वारला असे शिवभारतात म्हंटले आहे. शाहजीचा जन्म सन १५९९ चाधरला तर ह्या घटनेला सन १६०४ च्या आसपास बसवावे लागते. पण इतरसाधनांप्रमाणे मालोजी २३ मे १६१० पर्यंत जिवंत होता. त्यामुळे उपलब्धसाधनांआधारे मालोजीचा मृत्यू इंदापूरजवळच्या एका लढाईत ११ नोव्हेंबर १६११पूर्वी झाला असे म्हणता येईल.
मालोजीची पत्नी उमाबाई सती गेली नाही.बहुदा दोन लहान मुलांचा सांभाळ करण्यासाठी तिने हा निर्णय घेतला असावा.ह्या दुखद घटनेनंतर मालोजीचा भाऊ विठोजी, याने शाहजी व शरीफजीचा सांभाळकेला. त्याने निजामशाहकडून मालोजीची जाहगीर त्यांच्या नावे मिळवून दिली.दोन्ही मुले लहान असल्याने विठोजीला जाहगिरीची देखरेख करण्याकरीता नेमण्यातआले.

परमानंद कवींनी मालोजींचे फार प्रभावीपणे वर्णन केले आहे. (शिवभारतात)
देवगिरीकर यादवांचा १४ व्या शतकाच्या सुरुवातीसच अल्लाउद्दीन खिलजीनेविशेषत: त्याचा लाडका सरदार मलिका काफूर यास पाठवून पाडाव केला होता.त्यानंतर जवळजवळ तीनशे वर्षांचे आत मालोजींनी सुपे परगणा जिंकला होता.भीमेच्या आसपासचा अत्यंत विस्तीर्ण प्रदेश पादाक्रांत करून जिंकून जहागिरीप्रस्थापित केली होती आणि काही वर्ष सत्ता राबवली. दुर्दैवाने इंदापूरयेथील लढाईत त्यांचा मृत्यू झाला. आज ज्यांची समाधी जेमतेम दोन तीन गुंठाजमिनीवर दुर्लक्षित, उपेक्षित, असुरक्षित स्थितीत आहे.

वेरुळ गावचे पाटील मालोजीराजे भोसले आणि घृष्णेश्वराचे मंदिर:-

 


वेरुळ गावचे पाटील मालोजीराजे भोसले आणि घृष्णेश्वराचे मंदिर:-
सुमारे चारशे वर्षापूर्वीची गोष्ट .वेरुळच्या
लेण्याजवळील घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर मोडकळीस आले होते.त्यांच्या
भिंतीना भेगा पडल्या होत्या.मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून
गेला होता.एवढे महान दैवत ! पण कोण अवकळा आली होती.त्या
मंदिरावर.त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे.येणारे जाणारे ही
हळहळत,उसासे सोडत,पण त्याच्या दुरुस्तीचा विचार कोण करतो?
त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्य नियमाने येत असे.
शिवाच्या पिंडीवर बेलफुल वाहत असे.हात जोडून आपल्या मनातले
श्रीशिवाला सांगत असे.एक दिवस त्याने गडीमानसे आणली.मंदिराच्या
पडक्या भिंती नीट केल्या.मंदिराची सारी व्यवस्था लावली.घृष्णेश्वराचा
जीर्णोद्धार केला.मंदिराच्या आत बाहेर दिवे लावले.घृष्णेश्वराचे गेलेले
वैभव परतले .हे कोणी केले ? कोण होते हे शिवभक्त ? ते होते
मोलोजी भोसले
वेरुळचे भोसले : वेरुळ गावचे पाटील मालोजीराजे भोसले हे थोर
शिवभक्त होते. विठोजीराजे त्यांचा धाकटा भाऊ.वेरुळच्या बाबाजीराजे
भोसल्यांची ही मुले.वेरूळ गावची पाटीलकी बाबाजीराजे भोसाल्यांकडे
होती.
मालोजीराजे व विठोजीराजे मोठे कर्तबगार होते,तसेच ते शूर होते.
त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते.तो काळ फार धामधुमीचा
होता.निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशाहाने स्वारी केली होती.त्या
वेळी दौलताबाद ही निजामशाहीची राजधानी होती.तेथे मालिक अंबर
नावाचा त्याचा वजीर होता.तो मोठा कर्तबगार व हुशार होता.त्याने
दौलताबादजवळील वेरूळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली.त्याने
निजामशाहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाणणी केला.निजामशाहाने
मालोजीराजांना पुणे व सुपे परगण्यांची जहागिरी दिली.
भोसल्यांच्या घरी वैभव आले.उमाबाई ही मालोजीराजांची पत्नी .ती
फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती.या उभयतांना दोन मुलगे होते.
एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी .शहाजी पाच वर्षाचा
असताना मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले.विठोजीराजांनी
आपल्या पुण्यांचा आणि जाहीगीरीचा सांभाळ केला.पुढे त्यांनी
शहजीसाठी लखुजीराव जाधवांच्या मुलीला मागणी घातली.जाधवांची
लेक जिजाई मोठी सुलक्षणी होती.जिजाईसाठी विठोजीराजांनी घातलेली
मागणी लखुजीरावांनी स्वीकारली.लखुजीराव म्हणजे निजामशाहीतील एक शूर
व पराक्रमी सरदार होते.ते मोठे फौजफाटा बाळगून होते.निजामशाहाच्या
दरबारातही त्यांची मोठी प्रतिष्ठा होती.त्यांनी शहाजीराजे आणि जिजाई यांचा
विवाह मोठ्या थाटात साजरा केला.जिजाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली.
शहाजीराजे :-निजामशाहीने मालोजीराजांची जहागिरी शहाजीराजांना
दिली.शहाजीराजे पराक्रमी होते.निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान
होता.उत्तरेच्या मुघल बादशाहाने निजामशाही जिंकायचा बेत केला.
विजापूरचा आदिलशाहाही त्याला मिळाला,तेव्हा निजामशाही
वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले.दोन्ही
फौजांचा त्यांनी पराभव केला.अहमदनगरजवळ भातवडी येथे प्रसिद्ध
लढाई झाली.या लढाईत शरीफजी मारले गेले,पण शहाजीराजांनी मोठा
पराक्रम गाजवला.त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक
झाला.दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली.इतकी की खुद्द मलिक
अंबरला त्यांच्याबद्दल असूया वाटू लागली. त्यातून उभयतांत वितुष्ट
निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या
आदिलशाहीला जाऊन मिळाले. आदिलाशाने त्यांना ‘सरलष्कर’ हा
किताब देऊन त्यांचा सन्मान केला.पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी
झाल्या.वजीर मलिक अंबर मृत्यू पावला.त्याचा पुत्र फत्तेखान हा मोठा
कारस्थानी होता.तो आता निजामशाहीचा वजीर झाला.त्याच्या
काळात निजामशाहीला उतरती कळा लागली.मुघलांच्या स्वारीचा धोका
निर्माण झाला.त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशाहाच्या आईने
शहजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले,तेव्हा शहाजीराजे
आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले.

मराठे सरदार भोसल्याचे कर्तबगार घराणे

 


मराठे सरदार भोसल्याचे कर्तबगार घराणे
धामधुमिचाकाळ :-
संतांनी लोकांच्या मनांत भक्तीभाव निर्माण
केला.तर शूर मराठे सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली.
तो काळच मोठा धामधुमीचा होता.विजापूरचा आदिलशहा आणि
अहमदनगरचा निजामशाहा ह्या सुलातांनामध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया
होत.लढाईसाठी त्यांना फौज लागे.ह्या कामी ते मराठा सरदाराचा
उपयोग करून घेत.
शूर मराठे सरदार : मराठे काटक व शूर होते.तसेच ते धाडसी
होते,स्वामिनिष्ठ होते.लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना
मोठा अभिमान वाटे. हातात भाला,कमरेला तलवार असे हे धाडशी
मराठा जवान घड्यावर मांड घालून सरादारांच्या फौजेत दाखल होत.
मराठे सरदार फौजबंद असत.कोणताही फौजबंद मराठा सरदार
सुलतानाकडे गेला,की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी. त्याला
सरदारकी देई.कधीकधी जहागिरीही देई.जहागिरी मिळालेले सरदार
स्वत:ला आपल्या जहागिरीचे राजे समजत.
विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे
मराठे सरदार होते.त्यांत सिंदखेडचे जाधव,फलटणचे निंबाळकर,
मुधोळचे घोरपडे,जावळीचे मोरे,वेरुळचे भोसले हे प्रमुख होते.
सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज.जिजाई सिंदखेडच्या लखुजी जाधवांची मुलगी होती.
शौर्याची परंपरा :-हे सारे सरदार शूर वीर होते,पण आपापसात
त्यांचे हाडवैर असे.स्वकीयांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी
त्यांना नव्हती.त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी परक्यांच्या उपयोगी पडत.
असे,पण असे असले तरी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी
पराक्रमाची गोडी लावली.त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले.मराठे
सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले.महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी
वेरूळ चे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले.

Sunday, 17 July 2022

!! खंडागळे हत्ती प्रकरण आणि भोसले व जाधवराव यांच्या वैराचे बीजारोपण.!!

 !! खंडागळे हत्ती प्रकरण आणि भोसले व जाधवराव यांच्या वैराचे बीजारोपण.!!

निजामशाहीमधे घडलेली एक घटना आपल्यासमोर त्यावेळच्या मानसिकतेचे चित्र उभे करते. ही घटना शाहजी राजांच्या विवाहानंतर काही वर्षांनी झाली असावी. निजामशाहचा दरबार संपल्यानंतर सर्व सरदार त्यांच्या जमावाबरोबर बाहेर पडत होते. त्यावेळी असलेल्या गडबडीमुळे किंवा इतर काही कारणाने सरदार खंडागळ्यांचा एक हत्ती बिथरला व धावत सुटला. वाटेत येणाऱ्या लोकांना ठेचत व सोंडेने फेकत ते धूड गर्दीतून धावू लागले. त्या बेधुंद झालेल्या हत्तीसमोर जायची कोणाची छाती होत नव्हती.
ह्या साऱ्या कोलाहलात सरदार लखुजी जाधवांचा मुलगा दत्ताजी त्या ठिकाणी पोहोचला. त्याने त्याच्या मावळ्यांना हत्तीला जेरबंद करायला सांगितले. पण हत्ती काही त्यांना ऐकेना. रागाने लाल झालेल्या दत्ताजीने एकदम त्या हत्तीसमोर उडी घेतली. तेवढ्यात विठोजी भोसलेंचा मुलगा संभाजी तिथे आला व दत्तीजीला थांबवू लागला.
पण दत्ताजी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्याने तलवारीच्या एका झटक्यात हत्तीची सोंड कापली. आर्त आवाजात किंचाळत हत्ती तेथून निघुन गेला. दत्ताजी एवढ्याने थांबला नाही. त्याला थांबवणाऱ्या संभाजीवर त्याने तलवार उगारली.
हे पाहून भोसले - जाधव समर्थकांमधे खडाजंगी सुरू झाली. दत्ताजीला हेही भान राहिले नाही की संभाजी हा त्याच्या मेहुण्याचा भाऊ होता. संभाजीला स्वतःच्या बचावासाठी तलवार उगारावी लागली. पण त्यात संभाजीच्या हातून दत्ताजी मारला गेला.
त्याचे वडील लखुजी जाधव हे सगळे सुरू होण्याआधी तिथून गेले होते. दत्ताजीच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासरशी त्यांच्यापर्यंत पोहोचली. लखुजी तिथे गेले तोवर दोन गटांमधे रणकंदन चालूच होते. त्या गर्दीत त्यांना शाहजी राजे दिसले. मुलाच्या मृत्यूने बेभान झालेल्या लखुजीने प्रत्यक्ष जावयावर वार केला. दैवयोगाने तो त्याच्या खांद्यावर बसला वशहाजीराजे मूर्छीत होऊन पडले.
मग लखुजीनी जवळच लढणाऱ्या संभाजीकडे मोर्चा वळविला. सोयरीक झालेल्यांच्या तलवारी भिडल्या व एका जाधवासाठी एक भोसले पडला - संभाजी गतप्राण झाला. लखुजी भानावर आले व अचानक सुरू झालेले रणकंदन शांत झाले. निजामापर्यंत ही सगळी बातमी गेली. त्याने दोन्ही गटांचे सांत्वन केले व त्यांना शांत राहण्यास सांगितले. हे सगळे एका वेड लागलेल्या हत्तीपायी झाले !
काय म्हणावे ह्याला - बिथरलेल्या हत्तीवर चालून जाणाऱ्या दत्ताजीच्या हिमतीचे कौतुक करावे का स्वतःच्या नातलगावर चालून गेला म्हणून त्याला दूषण द्यावे. ह्या घटनेमुळे जिजाबाईनी भाऊ गमावला व एक दीरही.
संदर्भ:-
राजा शिवछत्रपती, पृष्ठ ५४-५७.
मराठ्यांचा इतिहास – खंड १, पृष्ठ ९४-९५

Monday, 11 July 2022

भोसले कुळ मालोजी भोसले

 भोसले कुळ

मालोजी भोसले
पूर्ण नाव मालोजी बाबाजीराजे भोसले
वडील बाबाजीराजे भोसले
पत्नी उमाबाई
संतती मालोजीराजे भोसले,
व्यंकोजीराजे भोसले
राजघराणे भोसले
चलन होन
बालपण
मालोजीरावांचे लग्न
मालोजी यांचे लग्न फ़लटणचे देशमुख जगपालराव निंबाळकर यांची बहीण दिपाबाई हिच्याशी झाले होते. त्यांना लवकर संतान होईना म्हणून मालोजी व दिपाबाई यांना वाईट वाटत होते. त्यांनी नगरचा पीरशहा शरीफ़ यांस नवस केला. त्याच्या अनुग्रहाने दिपाबाईला १५९४ व १५९७ ला दोन मुले झाली. त्यांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवण्यात आली. पुढे शहाजीना संभाजी, शिवाजी व व्यंकोजी ही ३ मुले झाली.
कारकीर्द
बाबाजीराव भोसले यांचे चिरंजीव मालोजीराजे भोसले हे पराक्रमी, युद्धप्रसंगी दाखवायची बुद्धिमत्ता असलेले व उत्तम प्रशासक होते. भोसले घराण्यांच्या उत्कर्षाचा पाया मालोजी यांनी घातला.वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून मालोजीची पत्नी उमाबाई हिच्या हस्ते पिंडीला अभिषेक करण्यात आला. मंदिराच्या तटामध्ये दास मालोजी बाबाजी भोसले व विठोबा बाबाजी भोसले असा आपला व आपल्या भावाच्या नावावर बसवलेला शिलालेख आजही पहावयास मिळतो. मालोजीनी साताऱ्यातील श्रीशिखरशिंगणापूरच्या डोंगराच्या पायथ्याशी भिंत बांधून तलाव तयार केला आणि यात्रेकरूंचा दुवा मिळवला. निजामशाहीने ऒरंगाबादेत ’मालपुरा’ व ’विठापुरा’अशा दोन पेठा भोसले घराण्याच्या नावे वसवल्या. मालोजीचा पराक्रम वाढतच गेला. आपल्या कामगिरीने मालोजीनी बुऱ्हाणपूरच्या निजामाचा विश्वास संपादन केला.त्यामुळे सरहद्दीवरील इंदापूरच्या बाजूच्या शत्रूचा बदोबस्त करण्याची कामगिरी निजामाने मालोजीवर सोपवली. या वेळी झालेल्या एका लढाईत मोठा पराक्रम गाजवून मालोजी रणक्षेत्रावर मरण पावले. भोसले घराण्यातील वीराच्या पराक्रमाचे ’पहिले स्मारक’ मालोजीच्या छत्रीच्या रूपाने इंदापूरला बांधले गेले.
शहाजीचे लग्न
मालोजीचा मुलगा शहाजी व लखुजी जाधवाची मुलगी जिजाऊ हे लहानपणी एकत्र खेळत असत. पण घरातील विरोधामुळे लखुजींनी संबंध नाकारले. मालोजीला कमी लेखले गेले. मालोजी पुन्हा वेरूळला आले. तिथे त्यांना देवीचा दृष्टांत होऊन द्रव्याने भरलेला हंडा सापडला. त्यातून मालोजीनी हजारो घोडे घेतले व आपली फौज तयार ते करून सरदार बनले. निजामशाहीवर मोगलाचे संकट आल्याने मालोजी भोसले निजामशाहीत कर्तबगार सरदार बनले, व लखुजी जाधवाने आपली मुलगी शहाजींना देऊन सोयरीक जमवली.
भोसले यांची वंशावळ
१. सजनसिंघ २. दिलीपसिंघ ३. सिंघजी ४. 'भोसाजी' ५. देवराज ६. इंद्रसेन ७. शुभकृष्ण ८. रूपसिंघ ९. भूमींद्र १०. धापजी ११. बरहटजी १२. खेलोजी १३. कर्णसिंघ १४. संभाजी १५. बाबाजी १६. मालोजी १७. शहाजी १८. शिवाजी १९. संभाजी २० शाहू.
संदर्भ
"राजा शिवछत्रपती", लेखक : बाबासाहेब पुरंदरे "ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे", स्थळ : [www.manase.org] सिद्धान्त विजयः पृष्ट ८४-८५ आनंद घोरपडे लिखित "शिवछत्रपती समज-अपसमज" प्रा. रा आ. कदम, 'कदम्ब' लिखित "क्षत्रियकुलावतंस छत्रपती श्रीशिवाजी महाराज"

भोसले कुळ बाबाजी भोसले


भोसले कुळ
बाबाजी भोसले

मालोजी ( मालकर्णजी माहाराज ) हे एके दिवशी चाकणजवळच्या चासकमान (थोरल्याबाजीरावांच्या पत्नीचे माहेरही याच गावचे होते) गावात जलक्रिडा करावयासगेले असता बुडून मृत्यू पावले. त्यांचे पुत्र बाबाजीराजे (जन्म शके १४५५)हे लहान असल्याने निजामशाहाने मालोजींची ईनामदौलत अनामत करवून सरकारात दाखलकेली. मालोजींची पत्नी आपला पुत्र बाबाजीला घेऊन दौलताबादेपासून पाचकोसांवर असणार्‍या वेरूळ जवळच्या घृष्णेश्वरासन्निध जाऊन राहिली. तिच्याजवळअसणार्‍या पिढीजात आसवाबातून आणि मालोजींच्या असणार्‍या थोड्याफार जमिनीतशेती करवून त्यांचा निर्वाह चालला होता. पुढे बाबाजीराजे मोठे झाल्यानंतरभीमा नदीच्या काठावर ‘मौजे देऊळगाव तर्फ पाटस परगणे पुरंदर’ येथे येऊन मौजेदेऊळगाव, मौजे खानवटे आणि मौजे कसबे जिंती (?) या भीमातीरावरच्या तीनगावांच्या पाटीलक्या खरेदी केल्या. पुढे परिधावीनाम संवत्सरे शके १४७४मध्ये बाबाजीराजांची पत्नी प्रसुत होऊन पुत्र झाला. या पुत्राचे नावठेवण्यात बाबाजीराजांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ ठेवले मालोजीराजे !यानंतर बाबाजीराजांना आणखी एक पुत्र झाला, याचे नाव ठेवण्यात आलेविठोजीराजे. पुढे मालोजी आणि विठोजी हे आपल्या तीर्थरूप आणि मातोश्रींसहदेऊळगावास येऊन राहिले. येथून जवळच सातारा-फलटण या भागात शंभू-महादेवाचेपवित्र शिवालय होते. तुळजापूरची भवानीही जवळच होती. ही दोन्ही शिसोदियाम्हणजेच भोसले घराण्याची कुलदैवते !

 

भोसले कुळ खेलकर्णजी माहाराज आणि मालकर्णजी माहाराज-----------2

 भोसले कुळ
खेलकर्णजी माहाराज आणि मालकर्णजी माहाराज---------------2

बखरकार म्हणतो, की या उभयतां भावांना खेलकर्ण आणि मालकर्ण ऐवजी खेलोजी आणिमालोजी अशी नावे पडली. याचे कारण बखरकार लढाईच्या निमित्ताने देत असला तरीयाचे मूळ कारण असे असावे- सुलतानी अंमलात, मुसलमान लोक हे एखाद्याहिंदूला, जरी तो बडा सरदार अथवा सेनापती असला तरीही काफर म्हणून तुच्छतेनेचसंबोधत असत. यासाठी पुढील व्यक्तिंची उदाहरणे पाहू. महाराजांच्या पंताजीगोपिनाथ बोकील या वकीलाला अफजलखान ‘पंतू’ म्हणायचा. औरंगजेब नेतोजीपालकराला ‘नेतू’, खुद्द शिवाजी महाराजांना ‘सिवा’ आणि संभाजी महाराजांना ‘संभा’ म्हणायचा हे अस्सल पत्रांतू दिसून येतं. त्यामूळेच इथेही साहजिकच, ‘खेलकर्णजी’ आणि ‘मालकर्णजी’ ही नावे गळून पडून खेलो आणि मालो असेच उल्लेखकेले गेले असावेत. अर्थात, हे दोघेही कितीही झालं तरी निजामशाहाचे सरदारअसल्याने त्यांच्या नावापुढे ‘जी’ हे आदरार्थी विशेषण लावणे भागच होते.म्हणूनच यांची नावे पुढे ‘खेलोजी’ आणि ‘मालोजी’ अशीच रुढ झाली. पुढे खेलोजीहे लढाईत ठार झाले आणि मालोजी हे एके दिवशी चाकणजवळच्या चासकमान (थोरल्याबाजीरावांच्या पत्नीचे माहेरही याच गावचे होते) गावात जलक्रिडा करावयासगेले असता बुडून मृत्यू पावले.

भोसले कुळ खेलकर्णजी माहाराज आणि मालकर्णजी माहाराज----------------1

 भोसले कुळ खेलकर्णजी माहाराज आणि मालकर्णजी माहाराज----------------1



शेडगावकरांच्या बखरीत सुरुवातीलाच, “ सिसोदे महाराणा याची वौशावळ मारवाडदेशाचे ठाई उदेपुरानजिक चितोडे शहर आहे तेथे एकलिंग माहाराज शंभू माहादेव वश्री जगदंबा देवी आहे तेच कुळस्वामी तेथील संवस्थानी सिसोदे माहाराणेआहेत. त्यांतिल एक पुरुष सजणसिव्हजी माहाराणे याजपासून संततीचा विस्तार: ” असे म्हणून त्यातील एकेक करून चौदा पुरुषांचे फक्त नाव नमुद केलेले आहे.त्यावरून कोण नेमका कोणाचा पुत्र अथवा कोणाचा भाऊ हे समजून येत नाही. तीसर्व नावे पुढीलप्रमाणे-
१. सजणसिव्हजी माहाराणा २. दिलिपसिव्हजी माहाराणा ३. सिव्हाजी माहाराणा
४. भोसाजी माहाराणा ५. देवराजजी माहाराज ६. इंद्रसेनजी माहाराज
७. शुभकृष्णजी माहाराज ८. स्वरूपसिव्हजी माहाराज ९. भुमिंद्रजी माहाराज
१०. यादजी माहाराज ११. धापजी माहाराज १२. बर्‍हाटजी माहाराज
१३. खेलकर्णजी माहाराज १४. मालकर्णजी माहाराज.
इथे बखरीत असं नमुद केलं आहे की, चितोडगडाच्या जवळच भोशी किल्ला आहे, त्याकिल्ल्याच्या जवळच असणार्‍या भोसावत या गावी रहायला आल्यापासून याराजवंशाचे शिसोदे हे आडनाव मागे राहून ‘भोसले’ असं झालं. तर्क असा आहे, कीअल्लाउद्दीन खलजीने चितोडगडावर आक्रमण केल्यानंतर चितोडचा महाराणालक्ष्मणसिंह शिसोदिया हा आपल्या सात मुलांसह लढता लढता मारला गेला, आणित्याच्या आठव्या पुत्राला, अजयसिंहाला राजपुतांनी खलजीपासून वाचवूनसुरक्षित ठिकाणी लपवून ठेवले. कदाचित अजयसिंहांचेच हे पुढचे वंशज खलजीपासूनबचाव करण्यासाठी, आपला शिसोदिया म्हणून निर्वंश होवू नये म्हणून ‘भोसावत’ या नावाने राहू लागले असावेत. पण या गोष्टीला हवा तसा पुरावा आजुन सापडलेलानाही.
या शिसोदिया कुळातल्या राजांच्या दक्षिणेतल्या प्रवेशाबद्दलशेडगावकरांचा बखरकार म्हणतो, “ येकंदर पुरुष चौदा त्यांपैकी खेलकर्णजीमाहाराज व मालकर्णजी माहाराज असे दोघे बंधू हे दक्षणदेशी आलें ते आमेदशापातशहा दौलताबादकर ( दौलताबादचा अहमदशहा निजामशहा) यास येऊन भेटले. त्यानीत्यांचा मोठा सन्मान करून नंतर दर असामीस प्रथक प्रथक (?) पंधरा पंधराशेस्वारांच्या सरदार्‍या मणसब देऊन हे (भोसले बंधू) पातशाही उमराव म्हणवीतहोते. त्या उभयता बंधूंच्या नावे सरंजाम चाकरीबद्दल चाकण चौर्‍यासी (चाकणआणि भवतालची चौर्‍यांशी खेडी) परगणा व पुरंधेरचे खाली परगणा व सुपे माहालअसे तीन माहाल तैनातीबद्दल त्याजकडे लाऊन दिल्हे त्याप्रमाणे ते उभयेताबंधू चाकरी करीत होते ”.

अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

  अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...