*कराड येथील पंतप्रतिनिधी चा भुईकोट*
मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Monday, 14 December 2020
*कराड येथील पंतप्रतिनिधी चा भुईकोट*
*कराड येथील पंतप्रतिनिधी चा भुईकोट*
Monday, 26 October 2020
अंबाजी इंगळे - एक ऐतिहासिक सागा भाग १०
अंबाजी इंगळे - एक ऐतिहासिक सागा भाग ९
अंबाजी इंगळे - एक ऐतिहासिक सागा भाग ८
अंबाजी इंगळे - एक ऐतिहासिक सागा भाग ७
अंबाजी इंगळे - एक ऐतिहासिक सागा भाग ६
अंबाजी इंगळे - एक ऐतिहासिक सागा भाग ५
अंबाजी इंगळे - एक ऐतिहासिक सागा भाग ४
अंबाजी इंगळे - एक ऐतिहासिक सागा भाग ३
अंबाजी इंगळे - एक ऐतिहासिक सागा भाग २
अंबाजी इंगळे - एक ऐतिहासिक सागा भाग १
Sunday, 25 October 2020
मराठेशाहीतील उत्तर हिंदुस्थानातील दबंग मर्द मराठा वीर अंबाजी इंगळे भाग ४
मराठेशाहीतील उत्तर हिंदुस्थानातील दबंग मर्द मराठा वीर
अंबाजी इंगळे
भाग ४
इ. स. १८०३ मध्येंच शिंद्यांचें इंग्रजांशीं युद्ध झालें. यावेळीं अंबाजी इंगळे हा गोहद प्रांताचा मामलतदार होता. त्या युद्धांत इंग्रज उत्तर हिंदुस्थानांतील शिंद्यांचा मुलूख भराभर काबीज करीत चालले आहेत असें पाहून अंबाजी इंगळे हा शिंद्याविरुद्ध बंड केल्याचें मीष करून इंग्रजांस जाऊन मिळाला. व त्याच्यांशीं तह करून त्यानें गोदहच्या राण्याच्या मुलुखांतील कांहीं मुलूख स्वत:करितां मिळविला. पण शिंदे व इंग्रज यांच्या दरम्यान तह होतांच अंबाजी पुन्हां शिंद्याकडे गेला; व आपण आपल्या धन्याचा कोणत्या ना कोणत्या तरी रूपानें कांहीं मुलूख बचावण्याकरितांच केवळ इंग्रजांनां जाऊन मिळालों होतों असें सांगून त्यानें शिंद्याकडून आपल्या समयोचित वर्तणुकीबद्दल शाबासकी मिळविली. महादजीनें सन १७८४ सालीं गोहदच्या राण्यापासून त्याचा मुलूख जिंकून घेतला असल्यामुळें त्याला ग्वालेरचा किल्ला इंग्रजांस देण्याचा कांहींच हक्क नाहीं, हा मुद्दा स्वत: अंबाजीनेंच उकरून काढला होता असें ग्रांटडफ, अंबाजीच्या जांवयानें त्याला तोंडीं सांगितलेल्या माहितीवरून लिहितो. पुढील सालीं होळकर व इंग्रज यांच्यामध्यें युद्ध उपस्थित झालें. तेव्हां अंबाजीनें होळकराला मिळण्याविषयीं शिंद्यास सल्ला दिला होता असें म्हणतात.
यानंतर शिंद्याची अंबाजीवर पुन्हां इतराजी झाली; व शिंद्याच्या अर्धवट संमतीनें यशवंतराव होळकरानें अंबाजीस (इ. स. १८०५ सालीं) कैद केलें. पण मागून होळकरानें आपल्या फौजेस देण्याकरितां अंबाजीपासून बराच पैसा घेऊन त्यास बंधमुक्त केलें. व सर्जेराव घाटग्यास काढून शिंद्याकडून त्यास दिवाणगिरी देवविली. अंबाजी हुषार असल्यामुळें आपल्या कार्यांत त्याजपासून कांहीं मदत होईल अशी होळकरास आशा वाटत होती परंतु अंबाजी हा होळकर व इंग्रज या दोघांसहि खूष ठेवूं इच्छित असल्यामुळें त्याचें वर्तन एकंदरींत धरसोडीचें राहिलें. अंबाजी हा इ. स. १८०९ च्या सुमारास मरण पावला. असें दिसतें (टॉड व ग्रांटडफ)
मराठेशाहीतील उत्तर हिंदुस्थानातील दबंग मर्द मराठा वीर अंबाजी इंगळे भाग ३
मराठेशाहीतील उत्तर हिंदुस्थानातील दबंग मर्द मराठा वीर
अंबाजी इंगळे
भाग ३
इ. स. १८०३ च्या सप्टेंबर महिन्याच्या सुमारास अंबाजीनें आपल्या कारस्थानांनीं पेरॉन यास हुसकून लावून त्याची जहागीर व शिंद्याच्या सैन्याचें आधिपत्य मिळविलें. याच सुमारास शिंद्याची लखबादादावर खप्पा मर्जी होऊन लखबादादाच्या ऐवजीं अंबाजीचा भाऊ बाळाराव हा मेवाडांत गेला. तेथें बाळारावानें मेवाडच्या चोंडावत सरदारांकडून पैसा वसूल करण्याच्या कामीं इतका बेसुमार जुलूम केला कीं चोंडावतांनीं उलटून बाळारावास कैद केलें. तेव्हां बाळारावास कोट्याच्या जालीमसिंहाची दोस्ती कामीं पडलीं. अंबाजीच्या बापानें जालिमसिंह हा पूर्वी एकदां उज्जनीच्या लढाईंत जखमी होऊन मराठ्यांच्या हातीं लागला असतां त्याचा जीव वांचवून त्याची मुक्तता केली होती. हे उपकार आठवून या प्रंसगीं तो उदेपुरावर चाल करून आला व राण्याच्या सैन्याचा पराभव करून त्यानें बाळारावास बंधुमुक्त केले.
मराठेशाहीतील उत्तर हिंदुस्थानातील दबंग मर्द मराठा वीर अंबाजी इंगळे भाग २
मराठेशाहीतील उत्तर हिंदुस्थानातील दबंग मर्द मराठा वीर
अंबाजी इंगळे
भाग २
इ. स. १७९५ सालच्या सुमारास अंबाजीची शिंद्यांचा प्रतिनिधि म्हणून उत्तरहिंदुस्थानांत नेमणूक झाली. तेव्हां अंबाजी गणेशपंत नामक आपल्या एका अधिकार्याकडे मेवाडचें काम सोंपवून उत्तरहिंदुस्थानांत गेला. अंबाजीचा धनी दौलतराव हा यावेळीं वयांत आलेला नसल्यामुळें प्रथम प्रथम अंबाजीच्या हातीं उत्तरहिंदुस्थानांत 'कर्तुमकर्तुं' सत्ता आली. पण लवकरच त्यास लखबादादा हा प्रतिस्पर्धी उत्पन्न झाला. अंबाजीचा अधिकारी गणेशपंत हा मेवाडांत आपल्या वर्तनानें लोकांस अगोदरच अप्रिय झाला होता. ही संधि साधून लखबादादानें राण्यास अंबाजीचें वर्चस्व झुगारून देण्याविषयीं गुप्तपणें उत्तेजन दिलें व स्वत: त्यास गणेशपंताविरूद्ध मदत करण्यासाठीं पुढें आला. अंबाजीच्या पक्षाच्या व राण्याच्या पक्षाच्या लोकांत कित्येक चकमकी होऊन त्यांपैकीं बहुतेकांत अंबाजीच्या पक्षाच्या लोकांचा पराजय होत गेला. अशा स्थितींत इ. स. १८०० च्या सुमारास हिंदुस्थानचा कारभार अंबाजीकडून काढून तो लखबाकडे सोंपविल्याचा शिंद्याचा हुकूम आला व त्यामुळें गणेशपंतास मेवाडमध्यें लखबाच्या ताब्यांत जे काय किल्ले व शहरें होतीं ती लखबाच्या स्वाधीन करून निघून यावें लागलें
Thursday, 22 October 2020
मराठेशाहीतील उत्तर हिंदुस्थानातील दबंग मर्द मराठा वीर अंबाजी इंगळे भाग १
अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय
अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...
-
*बहिर्जी नाईक* शिवाजीराजेंचे गुप्तहेर _(आपल्या मुलांना माहिती असणे गरजेचे आहे. आजही CBI, CID अशी सरकारी खाती यावरच काम करतात.)_ बघायल...
-
25 सप्टेंबर 1750 रोजी नानासाहेब पेशवे व राजाराम महाराज द्वितीय यांच्यात सांगोला करार झाला सांगोला करार :- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थाप...
-
°°°छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यंकोजी राजांना पत्र °°° छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाच्या वेळेस व्यंकोजीराजांना लिहिलेली चार पत...








