विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label पहिले रघूजी भोसले. Show all posts
Showing posts with label पहिले रघूजी भोसले. Show all posts

Thursday, 14 December 2023

मराठाशाहीतील ताकदवर मराठे पहिले रघूजी भोसले

 

मराठाशाहीतील ताकदवर मराठे
१ ) थोरल्या शाहूमहारांच्या कालखंडात नागपूरचे सत्ताधारी झालेल्या

पहिले रघूजी भोसले
२ ) बंगाल मध्ये "भास्कर पंडत" म्हणून प्रसिध्द असलेले नागपूर संस्थानचे कारभारी भास्करराम कोल्हटकर
यांचा इतिहास
लेखन माहिती ::©®सुरेश नारायण शिंदे, भोर
भाग
shindesn16@gmail.com
भास्कररामच्या खुनाचा सूड घेण्यासाठी रघुजी भोसले व त्यांचा मुलगा जानोजी यांनी १७४८ मध्ये बंगालवर स्वारी केली. त्यावेळी जानकीरामचा मुलगा दुर्लभराम यास कैद करून नागपूरास आणले तर जानोजी भोसले व मीरहबीब यांनी अलिवर्दीखानास त्रस्त करून सोडले. शेवटी अलिवर्दीखानाने भोसल्यांशी १७५१ मध्ये तह करून ओरिसा प्रांत दिला तर बंगाल व बिहारची चौथाई बारा लाख रुपये देण्याचे कबूल केले. रघुजी भोसलेंनी आपल्या हयातीत वऱ्हाडापासून ते पूर्वेस कटकपर्यंत व गढामंडल्यापासून ते दक्षिणेस चंद्रपूरपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला. रघुजी भोसले यांस पोटदुखीचा विकार होता. त्यांचे निधन नागपूर येथे १४ फेब्रुवारी १७५५ रोजी झाले तेव्हा त्यांचे वय सुमारे साठपेक्षा अधिक असावे.
पांडेवाडी गावातील ग्रामदैवत असलेल्या पांडवजाईचे मंदिराबाहेरूनच दर्शन घेतले. आजही काही कोल्हटकर कुटुंबे येथे आहेत, अशी माहिती मिळाली. गावात समाधीस्थळ किंवा वीरगळ आढळून आली नाही.
©®सुरेश नारायण शिंदे, भोर
shindesn16@gmail.com

मराठाशाहीतील ताकदवर मराठे पहिले रघूजी भोसले

 

मराठाशाहीतील ताकदवर मराठे
१ ) थोरल्या शाहूमहारांच्या कालखंडात नागपूरचे सत्ताधारी झालेल्या


पहिले रघूजी भोसले
२ ) बंगाल मध्ये "भास्कर पंडत" म्हणून प्रसिध्द असलेले नागपूर संस्थानचे कारभारी भास्करराम कोल्हटकर
यांचा इतिहास
लेखन माहिती ::©®सुरेश नारायण शिंदे, भोर
भाग
shindesn16@gmail.com
इ.स.१७४० मध्ये थोरल्या शाहूमहाराजांनी फत्तेसिंह भोसले ह्यास कर्नाटक मोहिमेवर पाठविले होते. तंजावरच्या प्रतापसिंह भोसल्यांस अर्काटचा नवाब दोस्तअली व त्याचा जावई चंदासाहेब हे पांडेचेरीचा फ्रेंच गव्हर्नर डुमास याच्या मदतीने त्रास देत होते. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी फत्तेसिंह भोसले, मुरारराव घोरपडे व रघुजी भोसले यांच्या फौजांनी यश संपादले व दोस्तअलीचा जावई चंदासाहेब यास कैद करून साताऱ्यास आणले.
बंगाल व ओरिसा येथे मूर्शिदकुलीखान याचा पराभव करून अलिवर्दीखानाने सत्ता स्थापन करून तो नवाबपदी विराजमान झाला. यावेळी मूर्शिदकुलीखानचा प्रामाणिक सरदार मीर हबीब हा अलिवर्दीखानावर सूड उगविण्यासाठी मराठ्यांची मदतीसाठी नागपूरला पोहोचला. मीर हबीबसोबत भास्करपंत कोल्हटकर सैन्य घेऊन इ.स.१७४२ ला बिहार मधून अलिवर्दीवर गेले. अलिवर्दीखान व भास्करपंत यापैकी कोणासही निर्णायक यश मिळाले नाही तेव्हा भास्करपंत पावसाळ्यात नागपूरास आले. इ.स.१७४३ मध्ये पुन्हा रघुजी भोसले व भास्करपंत ह्यांनी बंगालवर स्वारी केली परंतु शत्रूला फक्त हैराण करण्यात यशस्वी झाले. पुढील वर्षी म्हणजे १७४४ मध्ये पुन्हा भास्करपंतांनी बंगालवर स्वारी केली तेव्हा अलिवर्दीखान मराठा सैन्याशी लढून कंटाळला होता. भास्कररामने यावेळी आपल्या सैनाला सरसहा कत्तल करण्याचा हुकूम केला. अनेक प्रकारच्या छळाने बंगालची रयत हैराण झाली. तेथे "भास्कर पंडत" म्हणताच लोकांना कापरे भरायचे, इतकी दहशत भास्करराम निर्माण झाली होती. मराठ्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी आपला सेनापती मुस्तफाखान याच्या सल्ल्याने कपटनीतीचा वापर करण्याचे निश्चित केले. मुस्तफाखान व त्याचा कारभारी जानकीराम यांनी भास्करपंतांशी तहासाठी वाटाघाटी सुरू केल्या. भास्करपंत व अलिवर्दीखान यांच्या छावण्या कटवाजवळच होत्या. मुस्तफाखानाने नबाब अलिवर्दीखानाच्या वतीने भास्करपंतास मेजवानीस निमंत्रण देऊन दिवस निश्चित केला. ठरलेल्या दिवशी भास्करपंत आपल्या निवडक वीस सरदारांसहित नबाबाकच्या डेऱ्यात दाखल होताच, दरवाजात जानकीराम व मुस्तफाखानाने त्यांचे स्वागत केले. नबाबाने देखील सर्वांचे स्वागत करून काहीतरी निमित्ताने तो बाहेर पडला. पूर्वसंकेताप्रमाणे नबाबाच्या लोकांनी तंबूचे तणावे कापून आतील भास्करपंतासहित वीस सरदारांना कापून काढले. भास्करपंत व वीस सरदारांचे हत्याकांड हे ३१ मार्च १७४४ रोजी कटवा नजीक असलेल्या मानकुरा येथे घडले. भास्करपंताचा एकमेव सरदार राघोजी गायकवाड हा तळावर राहिल्याने जिवंत राहिला होता. या हत्याकांडाची बातमी पोहोचताच त्याने सैन्यासह नागपूरकडे पळ काढला तर भास्करपंतांची गरोदर असलेली पत्नी ताईबाई काशी येथे गेली. काशी येथे तिला पुत्र झाला म्हणून त्याचे नाव "काशीराव" ठेवण्यात आले.

मराठाशाहीतील ताकदवर मराठे पहिले रघूजी भोसले

 

मराठाशाहीतील ताकदवर मराठे
१ ) थोरल्या शाहूमहारांच्या कालखंडात नागपूरचे सत्ताधारी झालेल्या

पहिले रघूजी भोसले
२ ) बंगाल मध्ये "भास्कर पंडत" म्हणून प्रसिध्द असलेले नागपूर संस्थानचे कारभारी भास्करराम कोल्हटकर
यांचा इतिहास
लेखन माहिती ::©®सुरेश नारायण शिंदे, भोर
भाग
shindesn16@gmail.com
ऐतिहासिक पांडेवाडी - ता. वाई, जि.सातारा
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात पांडेवाडी नावाचे एक खेडेगाव आहे.
वाई नगरीच्या पश्चिमेस सुमारे पाच कि.मी.अंतरावर पंतकवी वामन पंडित यांची प्रतीकात्मक समाधी असलेले भोगांव आहे. याच भोगांवच्या ईशान्येस सुमारे एक ते दीड कि.मी.अंतरावर पांडेवाडी गाव आहे. थोरल्या शाहूमहारांच्या कालखंडात नागपूरचे सत्ताधारी झालेल्या पहिले रघूजी भोसले यांचे बालपण येथे गेलेले आहे तर बंगाल मध्ये "भास्कर पंडत" म्हणून प्रसिध्द असलेले नागपूर संस्थानचे कारभारी भास्करराम कोल्हटकर यांचे हे गाव आहे.
रघूजी भोसले नागपूरकर यांचे मूळ घराणे अहमदनगर जिल्ह्यातील भीमा नदीकाठी असलेल्या हिंगणी बेर्डी येथील होय. रघूजीचा मूळ पुरूष मुधोजी भोसले. मुधोजी भोसले पुत्र तीन बापूजी, परसोजी व साबाजी हे होय. यापैकी परसोजी भोसले हे थोरल्या शाहूमहाराजांची इ.स.१७०७ मध्ये मुघलांच्या कैदेतून सशर्त सुटकेनंतर सुरूवातीला त्यांना प्रथम पाठींबा देणारे होते. परसोजी भोसले यांचे निधन इ.स. १७०९ मध्ये झाल्यावर त्यांचे पुत्र कान्होजी भोसले हे सेनासाहेबसुबा झाले. परंतु त्यांना मुलगा नसल्यामुळे त्यांचे चुलत बंधू बिंबाजी व काशीबाई भोसले यांचा पुत्र रघुजीला आपल्या हाताशी धरून त्यांनी भाम ( जि.यवतमाळ)या आपल्या मूळ गावी आपले बस्तान बसविले. परंतु पुढे कान्होजीस रायाजी नामक पुत्र झाल्यावर रघुजी बाबत अनास्था निर्माण झाली. रघुजीचे बालपण हे आपली आई काशीबाई व आजी बयाबाई यांच्यासोबत वाई तालुक्यातील पांडववाडी (आजची पांडेवाडी)येथे गेले. पांडेवाडी गावातील रामभक्त असलेल्या संत रामजीपंत कोल्हटकर यांच्या आशीर्वादामुळे निंबाजी भोसले पुत्र झाला अस मानलं गेल्यामुळे त्याचे नाव रघु ठेवण्यात आले होते. रामभक्त रामजीपंत कोल्हटकरांना कोण्हेराम व भास्करराम असे दोन पुत्र होते. पुढे रघुजी नागपूरकर घराण्याचा प्रमुख झाल्यावर हे कोल्हटकरांच्या दोन्हीही मुलांनी रघुजीच्या कारभारात आपले योगदान दिले. कान्होजींच्या वर्तनानात झालेला बदल पाहून रघुजी भोसले हे देवगडचे राजे चांद सुलतान यांच्याकडे गेले. राजे चांद सुलतान हे मूळचे हिंदू. त्यांचे वडील बखतशहा हे देवगडचे राजे असताना, त्यांच्या भावांनी त्यांच्याविरूद्ध बंड करून त्यांना देवगड सोडण्यास भाग पाडले. देवगडचे राज्य परत मिळविण्यासाठी औरंगजेब बादशाहाची मदत मागितले तेव्हा औरंगजेबाने धर्म बदलण्याची अट ठेवली. राज्यप्राप्तीसाठी धर्म बदलणाऱ्या बखतशहाचा, बखतबुलंद झालेल्या राजाने राजापूर बारसा नावाच्या बारा वाड्या होत्या, त्या एकत्र करून नागपूर शहराची स्थापना व नामकरण केले होते. सेनासाहेबांचे पुतणे आपल्याकडे आले म्हणून चांदसाहेब यांनी त्यांची बडदास्त ठेवली. काही दिवसांनी रघुजी भोसले हे सातारा येथे छत्रपती थोरले शाहूमहाराजांकडे आले. दरम्यानच्या काळात कान्होजी सेनासाहेब सुभा यांच्यावर महाराजांची अवकृपा झाली तर रघुजी महाराजांच्या मर्जीत आले. महाराजांनी रघुजीचे लग्न सुलाबाईशी लावले. सुलाबाई ही महाराजांच्या धाकटया सगुणाबाई राणी, ज्या कन्हेरखेडच्या शिंदे घराण्यातील होत्या त्यांची चुलत बहीण लागत होती.
गोंडवण देवगडचा राजे चांद सुलतान हा इ.स.१७३५ मध्ये मृत्यू पावल्याने वारसाहक्काचा झगडा अनौरस पुत्र वलिखान व औरस दोन पुत्रात यांच्यात सुरू झाला, तेव्हा चांद सुलतानची विधवा राणी रतनकुंवर हीने सेनासुभा रघुजी भोसले यांची मदत मागितली. रघुजी भोसले सैन्याने देवगडवर स्वारी करून सोनबरडी व गिरोली या गावांच्या दरम्यान झालेल्या युद्धात वलिखानचा पराभव केला व त्यास कैद केले. अशाप्रकारे विधवा राणीला त्यांनी सहकार्य केले. रतनकुंवर राणीला दोन मुलगे होते. राज्यप्राप्ती झाल्यावर तिने दोन्ही मुलांना व रघुजी भोसलेंना मिळून राज्याच्या तीन वाटण्या केल्या. गोंडवण प्रांतातील किल्ले पवनी, मारूड व मूळतापी वरघाट हा भाग रघुजींस मिळाला. याच प्रदेशातील नागपूर येथे रघुजीनी आपल्या राज्याच्या राजधानीची स्थापना केली. यानंतर ख-या अर्थाने रघुजी या प्रदेशाचा शास्ता झाला.

अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

  अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...