विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label राजमाता जिजाऊ आईसाहेब. Show all posts
Showing posts with label राजमाता जिजाऊ आईसाहेब. Show all posts

Wednesday, 13 January 2021

।। राष्ट्रमाता मातोश्री जिजाऊआईसाहेब ।।

 

 
 


।। राष्ट्रमाता मातोश्री जिजाऊआईसाहेब ।।
 
प्राचीन भारताचा इतिहासात काही स्त्रियांची नावे येतात. वैदिक परंपरेतल्या मैत्रेयी,गार्गी ते बौद्ध संस्कृतीतल्या आम्रपाली पर्यंत.मध्ययुगात परकियांच्या आक्रमणामुळे स्त्री वर्गावर बंधने घालण्यात आली.महाराष्ट्राचा विचार केला असता नेमक्या ह्याच काळात महाराष्ट्राचा मनू बदलला..
शिवछत्रपतींचे अवघे आयुष्य म्हणजे महाराष्ट्राचा स्वभावधर्म .मग त्यात महाराजांचे "स्त्रीदाक्षिण्य" "न्यायप्रियता" नैतिकता सर्वच आले.जरा अधिक विस्ताराने विचार केला असता सहज दिसून येईल कि शिवछत्रपतींचा -राजश्री सिऊबाराजे ते छत्रपती श्री राजा शिवाजी हा प्रवास जिजाऊआईसाहेबांच्या भक्कम आधारावर झाला.भोसले-जाधवराव ह्या दोन्ही घराण्यात राजकारण होतेच पण वारश्याचा उपयोग "स्वराज्यलक्ष्मी "म्हणून प्रसन्न करण्यास जर कुणी केला असेल त्या म्हणजे जिजाऊआईसाहेब....
महाराष्ट्राच्या दोन छत्रपतींच्या स्वभावावर जिजाऊआईसाहेबांची छाप स्पष्ट दिसते.राधामाधवविलासचंपू ह्या काव्यग्रंथाच्या लेखकाची जयराम पिंडे प्रतिभा बहरली ती अवर्णनीय अशीच..
जशी चंपकेशी खुले फ़ुल्लजाई ।
भली शोभली ज्यास जाया जिजाई ।
जिचे किर्तीचा चंबू जंबूद्विपाला ।
करी साऊली माऊलीसी मुलाला ।
शहाजी महाराजांच्या धामधुमीला हि जिजाऊआईसाहेब धैर्याने सामोर गेल्या.महाराजांनी पोरसवदा वयात रांझेकर पाटलाला केलेल्या शास्तीच्या निर्णयात आईसाहेबांची शिकवण स्पष्ट दिसते..आग्रा कैदेत हि स्वराज्याची इंचभर जमिन न गमवता रांगणा स्वराज्यात आला...अफजल वधाच्या प्रसंगात "संभाजीचे ऊसने फेडणे आहे "ह्या एका वाक्यात एक दुखावलेली आई स्पष्टपणे जाणवते..अज्ञातदासानी पोवाड्यात लेकराच कौतुक केलं म्हणून त्याला सोन्याचा तोडा घालणारी वत्सल माऊली दिसते...महाराजांनी मुधोळचे घोरपडे ज्या प्रथमिक कारणामुळे उद्धवस्त केले त्या पतीच्या अपमानाचा सूड हि छत्रपतीस प्रेरणा आऊसाहेबच होत्या...
पाषाणच्या पाटिलकीच्या कथल्यात कोन्हेर रुद्र ह्या देशाधिकरीस महाराज म्हणतात ."स्वामी धाकुटपणापासून या देशात आहेत; मिरासदार कोण ?गैर मिरासदार कोण हे जाणताती;माणसाचे माणूस वळखतात." महाराजांच्या धाकुटपण ते थोरपण हा प्रवास आईसाहेबांच्या आईपणाच्या कर्तुत्वाचे पर्व आहे."माणसाचे माणूस वळखतात" ह्या माणूस जोखण्याची प्रक्रिया हि जिजाऊआईसाहेबांनीच घडवली.
जिजाऊआईसाहेबांच्या कर्तुत्वाचा प्रभाव भोसल्यांच्या घराण्यात तीन पिढ्यात दिसतो महाराणी येसूबाई,महाराणी ताराबाई,करवीर राजमाता जिजाबाई हि महाराष्ट्रातल्या जिजाऊपर्वाची अस्सल उदाहरणे आहेत...
महाराजांचे चरित्रकार म्हणतात"शिवाजी आईच्या अर्ध्या वचनात होता " त्या अर्ध्या वचनाने पूर्ण महाराष्ट्र घडवला,लेकी बाळींची अब्रू जपली.आमच्या मर्दानी मनाच्या कोंदणात वसलेल्या ह्या मराठ्यांच्या मातृदेवतेस जयंती निमित्त विनम्र अभिवादन...
-सचिन शिवाजीराव खोपडे देशमुख.
# बारा मावळ परिवार

राजेजाधव आणि राजेभोसले यांचे कौटुंबिक, राजकीय संबंध, त्यामागील इतिहास

 





राजेजाधव आणि राजेभोसले यांचे कौटुंबिक, राजकीय संबंध, त्यामागील इतिहास
पोस्टसांभार : Raj Prabhavati G Jadhav
सोशल मीडियाच्या माध्यमातून काही मूलतत्त्ववादी लोक उत्तरकालीन बखरा आणि पूर्वग्रहदोषीत विचारातून राजेजाधव आणि राजेभोसले घराणे यांच्या संबंधाबद्दल चुकीचा इतिहास मांडून गैरसमज पसरवत आहेत. राजेजाधव आणि राजेभोसले यांचे कौटुंबिक, राजकीय संबंध, त्यामागील इतिहास समजून घेण्याआधी यामागील आपण थोडी पार्श्वभूमी आणि सत्यता तपासायला हवी..
बाबाजीराजे भोसले यांच्या मृत्यूच्या वेळी काही पाटीलक्या व पांडेगावची मोकासदारी मालोजीराजेंकडे होती. वेरुळास शेती होती, शिवाय पांडेगावच्या आसपास पाटस, चांभारगोंदे, जिंती इत्यादी ठिकाणी वतने पाटीलक्या होत्या. मालोजीराजे भोसले हे निजामशाहीतील मातब्बर सरदार, मनसबदार होते. शिवभारतकार मालोजीराजे यांना महाराष्ट्रभूमिप: संबोधित करतो. याचा अर्थ भोसले घराण्याची आर्थिक स्तिथी अत्यंत चांगली होती.लखोजीराजे जाधव हे देखील निजामशाहीत पंचहजारी मनसबदार होते, शिवाय सिंदखेडची देशमुखी त्यांच्याकडे होती. पुढे लखोजीराजे जाधव यांना १० हजारी मनसबदारी, २८ महाल, ५२ चावडयांचे वतन मिळाले. याचा अर्थ राजेजाधव घराण्याची देखील आर्थिक परिस्थिती संपन्न होती.
इंदापूरच्या स्वारीवर असताना मालोजीराजे भोसले १६०६-१६०७ मध्ये मृत्यूमुखी पडले. शहाजी महाराज आणि माँसाहेब जिजाऊ यांच्या विवाह प्रसंगातून राजेभोसले आणि राजेजाधव घराण्यात वैर निर्माण झाले असे काही इतिहास अभ्यासक समजतात. रंगमहालातील रंगपंचमीची कल्पित कथा ही पूर्णपणे उत्तरकालीन बखरीवर आधारलेली आहे. शहाजी महाराज आणि जिजाऊ माँसाहेब यांच्या विवाहाबद्दल शिवभारतकार नोंदवतो " उत्तम लक्षणांनी युक्य, दानशील, दयाशील, युद्धकुशल आणि महातेजस्वी अशा मालोजी पुत्र शहाजीस पाहून कुबेरागत श्रीमंत जाधवरावाने ज्योतिष्याने सांगितलेल्या अनुकूल ग्रह असलेल्या मुहूर्तावर आपली विजय लक्षणा, कमलनेत्रा आणि कुळास शोभा आणणारी कुलावन कन्या जिजाऊ वर दक्षिणेसह शहाजीस अर्पण केली " वरील नोंदीवरून लखोजीराजे जाधव यांनी स्वेच्छापूर्वक, आनंदाने हे लग्न लावून दिलेले स्पष्ट होते. यावेळी राजेभोसले आणि राजेजाधव या दोन घराण्यात कोणताही वैरभाव किंवा कौटुंबिक संघर्ष नव्हता..
दुसरी एक घटना ज्याआधारे राजेभोसले आणि राजेजाधव घराण्यात वैमनस्य होते असे मांडले जाते, ती घटना म्हणजे खंडागळे हत्ती प्रकरण (१६२३). मोगलांच्या विरुद्ध लढा देण्यासाठी निजामशहाने सर्व सरदारांना बोलवून दौलताबाद येथे दरबार भरवला होता. तेंव्हा दरबार संपल्यानंतर सरदार मंडळी परतत असताना गर्दी उसळली, त्यावेळी खंडागळे यांचा आघाडीचा हत्ती बिथरला आणि दुसऱ्याचे सैन्य तुडवत निघाला. खंडागळे हत्ती प्रकरणात शहाजी महाराज यांचे चुलतबंधू संभाजीराजे भोसले यांनी लखोजीराजे जाधव यांचे पूत्र दत्ताजीराव जाधव यांना ठार केले. ही गोष्ट समजतास लखोजीराजे जाधव यांनी संभाजीराजे भोसले यांना ठार केले, यात शहाजीराजे भोसले देखील लखोजीराजे जाधवराव यांच्या हल्ल्यात बेशुद्ध पडले. खंडागळे हत्ती हे प्रकरणाचे वर्णन शिवभारत या साधनात सविस्तरपणे आले आहे. या घटनेनंतर लखोजीराजे जाधव यांना पश्चाताप झाला असे शिवभारतकार नोंदवतो. दोन कुटूंबात उदभवलेले हे भांडण प्रासंगिक, तत्कालिक आणि अनपेक्षित होते हे पुढील इतिहासावरून दिसून येते..
खंडागळे हत्ती प्रकरणात निजामशाहने राजकारण केले, लखोजीराजे जाधव यांनी या खंडागळे हत्ती प्रकरणानंतर निजामशाही सोडली. १६२४ साली भातवडीच्या लढाईत आदिलशाह आणि मोगलांच्या संयुक्त सैन्यात लखोजीराजे जाधव तर निजामशाहीकडून शहाजीराजे भोसले होते. लखोजीराजे जाधव आणि शहाजीराजे भोसले परस्पर विरुद्ध ठाकलेले असताना या युद्धात लखोजीराजे हे रणांगणावर कोणतीही कामगिरी न करता मागे फिरले याचा उल्लेख शिवभारतात आहे. राजेजाधव आणि राजेभोसले कायमचे वैर असते तर शहाजीराजेंवर सुड उगवायची संधी लखोजीराजे जाधव यांनी सोडली नसती. परंतु लखोजीराजे जाधव युद्ध न करताच आपल्या सहकाऱ्यासह निघून गेले, यावरून राजेभोसले आणि राजेजाधव कुटुंबात कायमचे वैर नव्हते हेच दिसून येते..
जिजाऊ माँसाहेब गरोदर असताना लखोजीराजे जाधव यांनी शहाजीराजे-जिजाऊ माँसाहेब घोड्यावरून जात असताना पाठलाग केला इत्यादी कल्पित कथांची भर उत्तरकालीन बखरांच्या आधारे टाकली गेली आहे. वास्तविक पाहता १६२९ साली निजामशहाने दगा करून लखोजीराजे जाधव आणि त्यांची दोन मुले व नातू यांची हत्या केली होती. लखोजीराजे जाधव यांची हत्या झाली त्यावेळी शहाजी महाराज आणि जिजाऊ माँसाहेब परांडा येथे होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १६३० मधील आहे हे आजमितीला अनेक संशोधनानंतर साधार सिद्ध झाले आहे. १६२९ साली मयत झालेले लखोजीराजे जाधव १६३० मध्ये जिजाऊ माँसाहेब - शहाजीराजे यांचा पाठलाग कसा करतील ?
स्वराज्याच्या कार्यात देखील राजेजाधव घराण्यातील अनेक वीर पुरुषांनी योगदान दिलेले दिसते. संताजी जाधव, शंभूसिंह जाधव, पतंगराव जाधव, धनाजीराजे जाधव, पिलाजीराजे जाधव अशा राजेजाधव घराण्यातील कित्येक ज्ञात अज्ञात लोकांनी स्वराज्यासाठी योगदान दिलेले आहे. तसेच राजेभोसले - राजेजाधव घराण्यात अनेक सोयरिकी झालेल्या इतिहासातील नोंदीतून आपणास दिसून येतात. राजेभोसले आणि राजेजाधव यांच्यात कायमचे वैर असते तर हे नातेसंबंध पुढे दृढ होताना इतिहासाने पाहिले नसते. राजेभोसले आणि राजेजाधव या घराण्यात खंडागळे हत्ती प्रकरणातील प्रासंगिक आणि तत्कालिक भांडण सोडले तर कुठेही वैर, वितुष्ट किंवा सूड उगवण्याची भावना दिसून येत नाही हाच खरा इतिहास आहे..
- राज जाधव

राजमाता जिजाऊ जन्म स्थान, सिंदखेड राजा, बुलढाणा

 













राजमाता जिजाऊ जन्म स्थान, सिंदखेड राजा, बुलढाणा
विदर्भाच्या काळ्या कसदार भूमीमधे अनेक वीर नर-नारी रत्नांची निर्मिती झाली. शिवरायांची जन्मदात्री जिजामाताही याच भूमीत जन्मल्या. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड नावाचे गाव हीच जिजाऊंची जन्मभूमी. त्यांचा जन्म ज्या जाधव घराण्यात झाला. त्या घराण्याने आपल्या पराक्रमाने राजवैभव मिळविले व खर्या अर्थाने ते रयतेचे राजे झाले, म्हणून या गावाला सिंदखेडराजा हे नाव पडले. आज तालुक्याचे गाव असलेले सिंदखेडराजा प्राचीन काळी आलापूर या नावाने ओळखले जात असे. सिंधुरम नावाच्या राजाने हे खेडे वसविले म्हणून त्याचे नाव सिंदखेड पडले असे म्हणतात.
सिंदखेडकर राजे जाधवरावांच्या बखरीमध्ये बखरकार म्हणतो की, 'कदीम वस्ती आलापूर नंतर सिंदुराजा गौळी याने अलिकडे सिंदखेड वस्ती केली.' परंतु बखरकारांच्या या उल्लेखाशिवाय सिंदुराजाचा कोणताही पुरावा आढळत नाही. उपलब्ध पुअराव्यावरून सिंदखेडचे मूळ नाव सिद्धपूर किंवा सिद्धक्षेत्र हे असावे. सिंदखेड येथील जुन्या कागदपत्रांमधे सिध्दक्षेत्र, सिद्धपूर असा उल्लेख आढळतो. येथील निळकंठेश्वराच्या मंदिरामध्ये शके 1509 मधील शिलालेख कोरलेला आहे. त्यात 'परगणे शीधपूर' असा स्पष्ट उल्लेख आहे. त्याचप्रमाणे सिंदखेडचे प्रसिध्द संतकवी गोसावीनंदन यांच्या चरीत्रामधे "सिंदखेड स्थळ | सिध्दांचे केवळ | देखोनी तात्काळ | वास केला ||" असे या गावाचे वर्णन आहे. यावरुम या परिसरात अनेक सिध्द, योगी होऊन गेलेत म्हणुन 'सिध्दपूर' हे या गावाचे मूळ नाव असून त्याला कालांतराने 'सिध्दक्षेत्र' म्हटले गेले असावे व त्याच्र रुपांतर 'सिंदखेड' असे झाले असावे हे स्पष्ट होते. बुलढाणा गॅझेटीयरमध्ये सिंदीच्या झाडावरुन हे नाव या गावाला पडले असावे असा उल्लेख आहे. 'वर्र्हाडाचा इतिहास' लिहिणारे या.मा.काळे यांनाही तसेच वाटते. पण या परिसरात सिंदीची झाडे नाहीत, तसेच यापूर्वीही नव्हती. त्यामुळे हे म्हणणं खरे नाही.....!
अकबराच्या काळात व त्यानंतरी बरीच वर्षे सिंदखेड मेहेकर सरकाराखाली असल्याचे उल्लेख आढळतात. येथील नीलकंठेश्वर मंदीर, पुतळा, बारव, रामेश्वर मंदीर यासारख्या प्राचीन अवशेषांवरुन सिंदखेड हे बाराव्या शतकापासून अतिशय महत्वाचे स्थळ होते हे दिसून येते.

Saturday, 22 August 2020

स्वराज्यजननी जिजामाता

 

स्वराज्यजननी जिजामाता
त्यागाची मूर्ति, मायेची सावली, महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला त्या विश्वमाता, राष्ट्रामता, राजमाता माँसाहेब जिजाऊ यांना मानाचा मुजरा...
आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या मनात स्वातंत्र्याचा धगधगता लावरस ओतला, गुलामगिरीच्या विरोधात बंडचा जाळ पेटवला. ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राजमाता!
पूर्ण नाव:- जिजाबाई शहाजीराजे भोसले.
जन्म:- जानेवारी १२, इ.स. १५९८.
जन्मस्थान :- सिंदखेडराजा, बुलढाणा.
मृत्यू:- जून १७, इ.स. १६७४.
समाधीस्थळ:- पाचाड, रायगडचा पायथा.
वडील:- लखुजीराव जाधव.
आई:- म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई.
पति:- शहाजीराजे मालोजीराजे भोसले.
संतती: संभाजीराजे भोसले, छत्रपती शिवाजीराजे भोसले.
पार्श्वभूमी:- जिजामातांचे माहेर बुलढाणा जिल्हयातील सिंदखेडचे. जाधव कुटुंब देवगिरी येथील यादव घराण्याचे वंशज.
महत्वाचे प्रसंग:-
बालपण:-
लाखोजीराव जाधव हे सिंदखेड वतनाचे पाच हजारी मनसबदार होते. कर्तृत्ववान, पराक्रमी पिता आणि म्हाळसबाई यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. वयासोबत त्यांची पारतंत्र्याची जाणीवही वाढत गेली आणि लाचारीच्या व फितुरीच्या रोगाचा त्या मनापासून तिरस्कार करू लागल्या.
ज्या वयात बाहुल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुलं दंग असतात, त्या वयात जिजाऊ तलवारीची मूठ घट्ट धरून लखोजिरावांकडे लष्करीप्रशिक्षण साठी हट्ट करत. जिजामातांचा विवाह 1605 साली शहाजीराजांसोबत दौलताबाद येथे झाला.
भोसले व जाधवांचे वैर:-
भोसले आणि माहेरच्या जाधव घराण्यात वैमनस्य निर्माण झाल्यानंतर पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला, तरीही जिजाऊंनी पतिनिष्ठेला महत्व देत माहेरशी कायमचे संबंध तोडले. भावनांना आणि नात्याला बाजुला ठेवुन कर्तव्याला महत्व देत खंबीरपणे व धैर्याने त्या प्रत्येक प्रसंगात उभ्या राहिल्या आणि त्यांचा हाच गुण शिवरायांच्या अंगी देखील आला होता.
अपत्ये:-
जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर आपल्या मृत दीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले. त्यानंतर त्यांना ४ मुले झाली, चारही दगावली. ७ वर्षाचा काळ निघून गेला. १९ फेब्रुवारी १६३०, फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवले.
शिवाजी महाराजांवरचे संस्कार आणि राज्यकारभाराची जवाबदारी:-
छत्रपती शिवराय लहानाचे मोठे आपल्या आईच्या छत्रछायेखाली झाले. त्यांची संपुर्ण जवाबदारी जिजामातांनी स्वतः उचलली. त्यांच्यावर अतिशय उत्तम संस्कार करून त्यांना घडवलं.
शहाजी महाराजांनी जिजाऊंवर पुण्याची जवाबदारी सोपवल्याने त्या शिवाजी महाराजांसमवेत पुणे येथे आल्या. शहाजीराजानी जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी पाठवून स्वराज्य स्थापनेसाठी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली. परंतु शत्रुचे सततचे हल्ले पुण्यावर होत असल्याने पुण्याची जोखीम वाढली होती. बाजी पासलकर, रघुनाथ बल्लाळ अत्रे, कान्होजी जेधे नाईक व सातारचे शिंदे देशमुख यांच्या मदतीने त्यांनी पुण्याची जवाबदारी समर्थपणे पेलली.
पुण्याचा विकास, राज्यकारभार हाताळणे, शेतकर्याना मदत करणे, तंटे सोडवणे, यांसारख्या जवाबदार्या पार पाडतांना त्या शिवाजी महाराजांच्या जडण घडणीकडे देखील बारकाईने लक्ष देत.
जिजाऊंनी शिवरायांना गोष्टी सांगीतल्या त्या पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या. सीतेचे हरण करणार्या दुष्ट रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता. बकासुरचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता. अश्या प्रत्येक गोष्टीत पराक्रमाला भगवंताचे स्थान दिले तर स्वातंत्र्याला ध्येयाचे स्थान दिले.
शिवाजी महाराजांवर संस्कार करत असतांना त्यांनी त्यांना कर्तव्याबरोबरच राजनिती देखील शिकवली. न्याय करतांना समान करावा आणि अपराध करणार्याला कठोरात कठोर शासन करतांना देखील तयार असावे हे संस्कार जिजाऊंनी महाराजांवर बिंबवले. राजांच्या मोहिमांचा, युध्दांचा, सर्व तपशील स्वतः ठेवायच्या. महाराजांच्या मुत्सद्देगिरीत, खलबतांमधे स्वतः जातीने लक्ष घालायच्या. वेळप्रसंगी योग्य सल्ला द्यायच्या. मोठया मोहिमांवर जेव्हा शिवराय जात तेव्हां राज्यकारभारावर जिजामाता स्वतः लक्ष ठेवत.
हिंदवी स्वराज्य:-
राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्याच प्रेरणेने कानंद, गुंजन, वेळगंड मोसे खोर्यातील वीर बाजी पासलकर, झुंजारराव मारळ, तानाजी मालुसरे आदी अठरापगड जातीच्या संवगड्यांना सोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. मोठ्या युक्तीने जिजाऊंच्या मार्गदर्शनामध्ये अत्यंत मुत्सद्देगिरीने बिना लढाई किल्लेदार पळून गेला असे आदिलशाहीला कळवून पहिला किल्ला तोरणा ताब्यात घेतला‌. त्यानंतर नरसाळा किल्ला, कोंढणा, पुरंदर, सुभानमंगळ असे अनेक किल्ले स्वराज्यात सामील केले. अठरापगड जातींच्या मावळ्यांसह जिजाऊ व शिवाजी महाराजांनी अभेद्य राजगडाला राजधानी बनवून स्वराज्याला सुरक्षित केले.
आपल्या मनात असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना त्यांनी महाराजांकरवी पुर्ण करून घेतली आणि त्याकरता त्यांनी तसे संस्काराचे बीज महाराजांमधे पेरले. महाराजांनी देखील आईच्या सर्व आदेशांना जागले आणि म्हणुन हिंदवी स्वराज्य प्रत्यक्षात अवतरले. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जुन इ.स. १६७४ ला रायगडावरती पार पडला.
निधन:-
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ.स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, राजमाता जिजाऊंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले, याच गावी राजमाता राजमाता जिजाऊंची समाधी आहे.

Tuesday, 18 August 2020

💐 माँसाहेब 💐

 

💐
माँसाहेब 💐
 
लेखन ✒️
डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे
शिवाजीराजे आता छत्रपती झाले होते. राज्याभिषेक जिजाऊंनी अगदी जवळून पाहिला होता. राज्याभिषेकानंतर राजांनी खूप दानधर्म केला. त्यामुळे जिजाऊसाहेबांन खूप समाधान वाटले. राजांनी अन्नछत्र कित्येक दिवस चालू ठेवले होते, प्रत्येकाची विचारपूस करून प्रेमाने त्यांचे सन्मान केले ,आशीर्वाद घेतले. मंदिराची व्यवस्था लावून दिली. कायमचे पुजारी नेमले. हे सर्व पाहण्यासाठी जिजाऊंना देवाने भरपूर आयुष्य दिले होते. जिजाऊंना रायगडची हवा सोसवत नव्हती. त्यांना खूप थकवा वाटत होता.त्यांना आपल्या जीवाची आशा वाटत नव्हती. म्हणून राज्याभिषेकाच्या दुसऱ्या दिवशी पालखीत बसवून मातोश्रींना रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला पोहोचविण्यात आले होते. राज्याभिषेकाच्या प्रचंड गडबडीतही महाराजांचे पूर्ण लक्ष आई साहेबांकडे होते. आईसाहेब म्हणजे तर महाराजांचा प्राण होता. सर्वस्व होते. महाराजांचे दैवत होते. आई साहेबांची प्रकृती अतिशय नाजूक तोळामासा झाली होती. गडावरची थंड हवा, वारा त्यांना मानवेना म्हणून महाराजांनी खास त्यांच्यासाठी उत्तम वाडा पाचाड येथे बांधला होता. त्यांची राहण्याची व्यवस्था तेथेच केली होती. आईसाहेबांचे वय आता उताराकडे लागले होते. त्यांना आता काय हवे होते? त्यांना काहीही नको होते .पण महाराजांना मात्र त्या हव्या होत्या. सती निघालेल्या आईसाहेबांना पूर्वी महाराजांनी महत्प्रयासाने मागे फिरवले होते. त्यावर आता कित्येक वर्षे उलटून गेली होती. रायगड सोडून राजे पाचाडला आले होते. जिजाऊंची प्रकृती पाहून राजांना शोक आवरत नव्हता. जिजाऊ म्हणाल्या," शिवबा, हा शोक तुम्हाला शोभत नाही. तुम्ही आता लहान नाही. स्वारी गेली तेव्हा सती जात होते. तुम्ही आम्हाला सांगितले, 'आमचा पुरुषार्थ बघायला कोणी राहिले नाही. मासाहेब तुम्ही जाऊ नका! तुमच आम्ही ऐकलं .आम्ही राहिलो, त्याचा आम्हाला आनंद झाला. खरोखरच तुमचा पुरुषार्थ आम्हाला पाहायला मिळाला. तुम्ही छत्रपती झालात, ते पाहायला मिळालं. राहिल्याचं सार्थक झालं. शिवबा आम्ही का जन्माला पुरलो? मुलांचे करते पण पहात ज्येष्ठांनी जावं, यातच जीवनाचे यश नाही का? आणि मी गेले तरी कुठे जाणार? देहाने गेले तरी मनाने इथेच आहे .आमच्या आठवणीने कधी डोळ्यात पाणी आणू नका. ते पाहून आमच्या मनाला दुःख होईल. राजे, तुमच्यात जीव पुरा जखडून गेला आहे. मागे पाहिलेत तरी तुमची सावली बनून आम्ही राहिलो आहोत, हे तुमच्या ध्यानी येईल." छत्रपती शिवरायांना घडवण्याचे सामर्थ्य फक्त जिजाऊंच्या मध्ये होते. आणि ते त्यांनी पार पाडले होते . आईसाहेबांची प्रकृती अत्यंत बिघडली. आयुष्याचा हिशेब संपत आला .वर्षे, महिने ,आठवडे ,दिवस संपले .आता अवघ्या काही तासांची थकबाकी राहिली.सूर्यपराक्रमी पुत्र जवळ असतानाही मृत्यूचे पाश पडू लागले .कोणाचेही ईथे काही चालत नाही .आई साहेबांनी डोळे मिटले! श्वासोच्छ्वास संपला!चैतन्य निघून गेले! आईसाहेब गेल्या! छत्रपतींचे छत्र मिटले गेले ! मराठ्यांचा राजा पोरका झाला! स्वराज्यावरचा आपला पहारा संपवून आईसाहेब निघून गेल्या. महाराज दुःखात बुडाले.आईवेड्या शिवबाच्या आईसाहेब गेल्या. शिवनेरीवर अंगाई गाणार्या, लाल महालात लाड करणार्या, राजगडावर स्फूर्ती देणार्या, आणि रायगडावर आशीर्वाद देणार्या आई कायमच्या निघून गेल्या. राज्याभिषेकानंतर बाराव्या दिवशी म्हणजेच 17 जून 16 74 रोजी पाचाड येथे जिजाऊ साहेबांचे निधन झाले. वयाच्या सत्तराव्या वर्षापर्यंत खडतर पणे कृतार्थ जीवन जगलेल्या जिजाऊंना आलेल्या मृत्यूने महाराजांचे सर्वस्व हिरावून नेले. राजांच्या शोकाला तर पारावरच उरला नाही. त्यांच्या मनाचे सारे बांध फुटले. धन्यती जिजाऊ माऊली ज्यांनी शिवरायांसारख्या एका महान वीराला जन्म दिला व धन्यते छत्रपती शिवाजीराजे ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण भारताची अस्मिता ठरलेल्या राजमाता जिजाऊसाहेबांची कूस खऱ्या अर्थाने सार्थकी ठरली . 🙏 माँसाहेबांना कोटी कोटी प्रमाण.🙏 लेखन ✒️ डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

Saturday, 8 August 2020

माय लेकरू हृदयभेट :-

 माय लेकरू हृदयभेट :-Chhatrapati shivaji maharaj & masaheb jijabai | Shivaji maharaj hd ...

औरंगजेबासारख्या साक्षात मृत्यूच्या कराळ दाढेत अडकले शिवराय परत यावेत म्हणून आऊसाहेबांनी काय काय म्हणून केलं नसेल. स्वतःच्या पोटचा गोळा दूर आहे, प्राणापेक्षा प्रिय नातूही दुरावलाय. अन्न-पाणी तरी गोड लागत असेल काय
त्या माऊलीला?
आणि अश्यात एक दिवस वर्दी येते, काही बैरागी आले आहेत. भेटायची इच्छा नसताना आऊसाहेब त्यांना भेटल्या असतील. मायबाप विठू-माऊलीच्या पताक्याच्या भगव्या रंगात रंगलेल्या, तुकारामांच्या अभंगांत तल्लीन झालेल्या, खांद्यावर शहाजी राजांनी स्वराज्यासाठी दिलेला भगवा घेतलेल्या सगळ्या बैराग्यांना वरवरचं भेटून परतीला निघालेल्या आऊसाहेबांना त्यातल्याच एका बैराग्यानं आर्त हाक मारली असेल, "माँसाहेब, आम्हाला न भेटताच परत जाताय."
अचानक शिवबाचा आवाज ऐकून काय वाटलं असेल आऊसाहेबांना?

कानात पंचप्राण गोळा झाले असतील आऊसाहेबांच्या. क्षणार्धात मागे वळून बैराग्यांच्या गर्दीतून शिवबांना शोधलं असेल. डोळ्यातल्या झर-झर झरणाऱ्या आसवांनी शिवबाला जलाभिषेक घातला असेल त्यांनी. चेहऱ्यावरून- केसांवरून- पाठीवरून मायेचा हात फिरवला असेल. जंगलात हरवलेलं पाडस परत भेटल्यावर हरिणी जशी सैरभैर होते तशी काहीशी अवस्था झाली असेल आऊसाहेबांची. "शिवबा" म्हणून हंबरडा फोडून शिवबा राजांना कडकडून हृदयाशी धरलं असेल त्यांनी. जशी यशोदा कृष्णाला धरायची, सीतामाई लव-कुशाला धरायची. केवढा भारलेला असेल तो क्षण, तमाम मराठी जणांनी स्वतःच्या हृदयात कोरून ठेवावा असाच हा क्षण

आऊसाहेबांच्या डोळ्यात आसवांचा फुटलेला बांध, शिवबाला त्यांनी मारलेली कडकडून मिठी. आऊसाहेबांच्या एक कापरा हात महाराजांच्या हृदयावर तर एक खंबीर हात शिवरायांच्या पाठीवर. राजांच्याही डोळ्याच्या कडांमध्ये उमळुन आलेल्या गोदा-कृष्णा. सगळं कसं एकदम जिवंत.

या चित्रात मागे दोन व्यक्ती थांबलेल्या दिसताहेत. कोण आहेत ती दोन पात्रं ?
आऊसाहेबांच्या मागे थांबलेल्या आहेत त्या पुतळाराणी सरकार आणि शिवबांच्या मागे थांबलेला रांगडा वीर, पण आऊसाहेब- शिवबाराजे भेटीचा अनुपम देखावा पाहून सदगतीत झालेला वीर म्हणजे महाराजांना आग्र्याहून स्वराज्यात सुखरूप आणणारा गुप्तहेर खात्याच्या प्रमुख बहिर्जी नाईक. डोळ्यातून ओघळणारे आनंदाश्रू लपवण्यासाठी पुतळाराणीसरकारांचा नकळत पदराला गेलेला हात, दोन्ही हाताच्या मुठी जोडून स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या माता-पुत्रांना भरल्या डोळ्यांनी नमन करणारे बहिर्जी नाईक. मागे दिसणारी राजगडाची डौलदार राजसदर, मशालींच्या जर्द लालपिवळ्या प्रकाशातला हा भावविभोर प्रसंग आज महाराष्ट्र अनुभवू शकतोय.

🚩|| जय जिजाऊ||🚩
🚩||जय शिवराय।।

Saturday, 25 July 2020

❤️ जिजाऊंनी शिवरायांसाठी ठेवलेले 25 लाख होन ❤️

❤️
जिजाऊंनी शिवरायांसाठी ठेवलेले 25 लाख होन ❤️
शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला आणि त्यानंतर 11 दिवसांनी जिजाऊंचे निधन झाले. ती तारीख 17 जून 1674.
शिवरायांवर जिजाऊंचे फार प्रेम होते. जिजाऊंच्या संस्कारांनी शिवरायांना 'छत्रपती शिवाजी महाराज' केले होते. मुलगा कितीही मोठा झाला तरी आईची माया कधीच कमी होत नाही. ती नेहमी आपल्या मुलाची काळजी घेत असते.
महाराजांच्या राज्याभिषेकावेळी फार खर्च झाला होता. दान खूप दिले होते. सभासद म्हणतो 1 कोटी 42 लाख होन म्हणजे एक होनाची किंमत 3.5 रुपये धरल्यास 4,970,0000 रुपये एवढा खर्च राज्याभिषेकाचा झाला होता. त्यावेळी स्वराज्याच्या तिजोरीवर नक्कीच भार आला असणार.
जिजाऊंनाही त्याची चिंता असेलच. एक डच पत्र याची साक्ष देते.
दि. 3 ऑक्टोबर 1674 ला वेंगुर्लाहुन बताव्हिया ला एक पत्र लिहिले गेले. त्यात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकबद्दलची हकीकत होती. त्यात राज्याभिषेकाचे सविस्तर वर्णन त्याने केलेले होते. राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन करून आणि हकीकत सांगून पुढे तो लिहितो 'शिवाजीची आई 80 वर्षाची वयातीत म्हातारी होती. तरी राज्याभिषेकाला उपस्थित राहून 12 च दिवसांनी ती मरण पावली. तिने 25 लाख होन काहींच्या मते अधिकच आपल्या मुलाला मागे ठेवले'
12 दिवस सांगताना त्याची गल्लत झाली असावी. पण यात महत्वाचे हे की जिजाऊंनी शिवरायांना 25 लाख होन मागे ठेवले होते. शिवरायांना त्या पैशाची नक्कीच मदत झाली असणार. आईची माया कधी कमी होत नाही याचे हे उत्तम उदाहरण.
🙏❤️💐
चित्र- सनी कोळेकर.
- आशुतोष सुनील पाटील.
#HiStoryteller #AshutoshPatil

जिजाऊमाँसाहेब

जिजाऊमाँसाहेब
लेखन ✒️
डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

शिवाजीराजे आता छत्रपती झाले होते. राज्याभिषेक जिजाऊंनी अगदी जवळून पाहिला होता. राज्याभिषेकानंतर राजांनी खूप दानधर्म केला. त्यामुळे जिजाऊसाहेबांन खूप समाधान वाटले. राजांनी अन्नछत्र कित्येक दिवस चालू ठेवले होते, प्रत्येकाची विचारपूस करून प्रेमाने त्यांचे सन्मान केले ,आशीर्वाद घेतले. मंदिराची व्यवस्था लावून दिली. कायमचे पुजारी नेमले. हे सर्व पाहण्यासाठी जिजाऊंना देवाने भरपूर आयुष्य दिले होते. जिजाऊंना रायगडची हवा सोसवत नव्हती. त्यांना खूप थकवा वाटत होता.त्यांना आपल्या जीवाची आशा वाटत नव्हती. म्हणून राज्याभिषेकाच्या दुसऱ्या दिवशी पालखीत बसवून मातोश्रींना रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला पोहोचविण्यात आले होते.
राज्याभिषेकाच्या प्रचंड गडबडीतही महाराजांचे पूर्ण लक्ष आई साहेबांकडे होते. आईसाहेब म्हणजे तर महाराजांचा प्राण होता. सर्वस्व होते. महाराजांचे दैवत होते. आई साहेबांची प्रकृती अतिशय नाजूक तोळामासा झाली होती. गडावरची थंड हवा, वारा त्यांना मानवेना म्हणून महाराजांनी खास त्यांच्यासाठी उत्तम वाडा पाचाड येथे बांधला होता. त्यांची राहण्याची व्यवस्था तेथेच केली होती. आईसाहेबांचे वय आता उताराकडे लागले होते. त्यांना आता काय हवे होते? त्यांना काहीही नको होते .पण महाराजांना मात्र त्या हव्या होत्या. सती निघालेल्या आईसाहेबांना पूर्वी महाराजांनी महत्प्रयासाने मागे फिरवले होते. त्यावर आता कित्येक वर्षे उलटून गेली होती.
रायगड सोडून राजे पाचाडला आले होते. जिजाऊंची प्रकृती पाहून राजांना शोक आवरत नव्हता. जिजाऊ म्हणाल्या," शिवबा, हा शोक तुम्हाला शोभत नाही. तुम्ही आता लहान नाही. स्वारी गेली तेव्हा सती जात होते. तुम्ही आम्हाला सांगितले, 'आमचा पुरुषार्थ बघायला कोणी राहिले नाही. मासाहेब तुम्ही जाऊ नका! तुमच आम्ही ऐकलं .आम्ही राहिलो, त्याचा आम्हाला आनंद झाला. खरोखरच तुमचा पुरुषार्थ आम्हाला पाहायला मिळाला. तुम्ही छत्रपती झालात, ते पाहायला मिळालं. राहिल्याचं सार्थक झालं. शिवबा आम्ही का जन्माला पुरलो? मुलांचे करते पण पहात ज्येष्ठांनी जावं, यातच जीवनाचे यश नाही का? आणि मी गेले तरी कुठे जाणार? देहाने गेले तरी मनाने इथेच आहे .आमच्या आठवणीने कधी डोळ्यात पाणी आणू नका. ते पाहून आमच्या मनाला दुःख होईल. राजे, तुमच्यात जीव पुरा जखडून गेला आहे. मागे पाहिलेत तरी तुमची सावली बनून आम्ही राहिलो आहोत, हे तुमच्या ध्यानी येईल." छत्रपती शिवरायांना घडवण्याचे सामर्थ्य फक्त जिजाऊंच्या मध्ये होते. आणि ते त्यांनी पार पाडले होते .
आईसाहेबांची प्रकृती अत्यंत बिघडली. आयुष्याचा हिशेब संपत आला .वर्षे, महिने ,आठवडे ,दिवस संपले .आता अवघ्या काही तासांची थकबाकी राहिली.सूर्यपराक्रमी पुत्र जवळ असतानाही मृत्यूचे पाश पडू लागले .कोणाचेही ईथे काही चालत नाही .आई साहेबांनी डोळे मिटले! श्वासोच्छ्वास संपला!चैतन्य निघून गेले! आईसाहेब गेल्या! छत्रपतींचे छत्र मिटले गेले ! मराठ्यांचा राजा पोरका झाला! स्वराज्यावरचा आपला पहारा संपवून आईसाहेब निघून गेल्या. महाराज दुःखात बुडाले.आईवेड्या शिवबाच्या आईसाहेब गेल्या. शिवनेरीवर अंगाई गाणार्या, लाल महालात लाड करणार्या, राजगडावर स्फूर्ती देणार्या, आणि रायगडावर आशीर्वाद देणार्या आई कायमच्या निघून गेल्या.
राज्याभिषेकानंतर बाराव्या दिवशी म्हणजेच 17 जून 16 74 रोजी पाचाड येथे जिजाऊ साहेबांचे निधन झाले. वयाच्या सत्तराव्या वर्षापर्यंत खडतर पणे कृतार्थ जीवन जगलेल्या जिजाऊंना आलेल्या मृत्यूने महाराजांचे सर्वस्व हिरावून नेले. राजांच्या शोकाला तर पारावरच उरला नाही. त्यांच्या मनाचे सारे बांध फुटले.
धन्यती जिजाऊ माऊली ज्यांनी शिवरायांसारख्या एका महान वीराला जन्म दिला व धन्यते छत्रपती शिवाजीराजे ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण भारताची अस्मिता ठरलेल्या राजमाता जिजाऊसाहेबांची कूस खऱ्या अर्थाने सार्थकी ठरली .
 

Friday, 24 July 2020

।। राजमाता मातोश्री जिजाऊआईसाहेब ।।

।। राजमाता मातोश्री जिजाऊआईसाहेब ।।

प्राचीन भारताचा इतिहासात काही स्त्रियांची नावे येतात. वैदिक परंपरेतल्या मैत्रेयी,गार्गी ते बौद्ध संस्कृतीतल्या आम्रपाली पर्यंत.मध्ययुगात परकियांच्या आक्रमणामुळे स्त्री वर्गावर बंधने घालण्यात आली.महाराष्ट्राचा विचार केला असता नेमक्या ह्याच काळात महाराष्ट्राचा मनू बदलला..
शिवछत्रपतींचे अवघे आयुष्य म्हणजे महाराष्ट्राचा स्वभावधर्म .मग त्यात महाराजांचे "स्त्रीदाक्षिण्य" "न्यायप्रियता" नैतिकता सर्वच आले.जरा अधिक विस्ताराने विचार केला असता सहज दिसून येईल कि शिवछत्रपतींचा -राजश्री सिऊबाराजे ते छत्रपती श्री राजा शिवाजी हा प्रवास जिजाऊआईसाहेबांच्या भक्कम आधारावर झाला.भोसले-जाधवराव ह्या दोन्ही घराण्यात राजकारण होतेच पण वारश्याचा उपयोग "स्वराज्यलक्ष्मी "म्हणून प्रसन्न करण्यास जर कुणी केला असेल त्या म्हणजे जिजाऊआईसाहेब....
महाराष्ट्राच्या दोन छत्रपतींच्या स्वभावावर जिजाऊआईसाहेबांची छाप स्पष्ट दिसते.राधामाधवविलासचंपू ह्या काव्यग्रंथाच्या लेखकाची जयराम पिंडे प्रतिभा बहरली ती अवर्णनीय अशीच..
जशी चंपकेशी खुले फ़ुल्लजाई ।
भली शोभली ज्यास जाया जिजाई ।
जिचे किर्तीचा चंबू जंबूद्विपाला ।
करी साऊली माऊलीसी मुलाला ।
शहाजी महाराजांच्या धामधुमीला हि जिजाऊआईसाहेब धैर्याने सामोर गेल्या.महाराजांनी पोरसवदा वयात रांझेकर पाटलाला केलेल्या शास्तीच्या निर्णयात आईसाहेबांची शिकवण स्पष्ट दिसते..आग्रा कैदेत हि स्वराज्याची इंचभर जमिन न गमवता रांगणा स्वराज्यात आला...अफजल वधाच्या प्रसंगात "संभाजीचे ऊसने फेडणे आहे "ह्या एका वाक्यात एक दुखावलेली आई स्पष्टपणे जाणवते..अज्ञातदासानी पोवाड्यात लेकराच कौतुक केलं म्हणून त्याला सोन्याचा तोडा घालणारी वत्सल माऊली दिसते...महाराजांनी मुधोळचे घोरपडे ज्या प्रथमिक कारणामुळे उद्धवस्त केले त्या पतीच्या अपमानाचा सूड हि छत्रपतीस प्रेरणा आऊसाहेबच होत्या...
पाषाणच्या पाटिलकीच्या कथल्यात कोन्हेर रुद्र ह्या देशाधिकरीस महाराज म्हणतात ."स्वामी धाकुटपणापासून या देशात आहेत; मिरासदार कोण ?गैर मिरासदार कोण हे जाणताती;माणसाचे माणूस वळखतात." महाराजांच्या धाकुटपण ते थोरपण हा प्रवास आईसाहेबांच्या आईपणाच्या कर्तुत्वाचे पर्व आहे."माणसाचे माणूस वळखतात" ह्या माणूस जोखण्याची प्रक्रिया हि जिजाऊआईसाहेबांनीच घडवली.
जिजाऊआईसाहेबांच्या कर्तुत्वाचा प्रभाव भोसल्यांच्या घराण्यात तीन पिढ्यात दिसतो महाराणी येसूबाई,महाराणी ताराबाई,करवीर राजमाता जिजाबाई हि महाराष्ट्रातल्या जिजाऊपर्वाची अस्सल उदाहरणे आहेत...
महाराजांचे चरित्रकार म्हणतात"शिवाजी आईच्या अर्ध्या वचनात होता " त्या अर्ध्या वचनाने पूर्ण महाराष्ट्र घडवला,लेकी बाळींची अब्रू जपली.आमच्या मर्दानी मनाच्या कोंदणात वसलेल्या ह्या मराठ्यांच्या मातृदेवतेस पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...

-सचिन शिवाजीराव खोपडे देशमुख.
#बारा_मावळ_परिवार

महापराक्रमी 'स्वातंत्र्य सूर्य' निर्माण करणाऱ्या वीरांगना राजमाता जिजाऊ आईसाहेब

महापराक्रमी 'स्वातंत्र्य सूर्य' निर्माण करणाऱ्या वीरांगना राजमाता जिजाऊ आईसाहेब.

जिजाऊ आईसाहेबांचे सर्व आयुष्य जर पाहिले तर प्रचंड धैर्य, शौर्य, साहस, पराक्रम, कष्ट आणी त्याग ह्यांनी भरलेले दिसते.
  • निजामशाहीच्या दौलताबाद येथील दरबारात झालेली वडिलांची आणी भावांच्या हत्या पाहिल्या.
  • आयुष्यभर पतीपासून दूर राहून पतीचा वियोग सहन केला.
  • जेष्ठ पुत्र संभाजी राजे हे शहाजी राजांच्या जवळ बंगळुरास राहिल्यामुळे आयुष्यभर पुत्र वियोग सहन केला.
  • जेष्ठ पुत्र संभाजी राजांची विजापूर दरबाराने षडयंत्र रचून केलेली हत्या पाहिली.
  • विजापूर दरबाराने आपल्या पतीस अपमानित करून हातकड्या लावून साखळदंडाने बांधून नेलेले पाहिले.
  • पतीच्या निधनानंतर म्हणजे शहाजी राजांच्या मृत्यूनंतरचा वियोग पाहिला.
  • 'रात्रंदिनी आम्हा युद्धाचा प्रसंग..' म्हणत जीवावर उदार होऊन रणांगण गाजविणारे कनिष्ठ पुत्र शिवाजी राजांचे महा-पराक्रम, साहस पाहिले.
  • प्रसंगी स्वराज्यासाठी हातात तलवार घेऊन रणांगणावर जाण्याची धमक दाखविली. स्वराज्य रक्षिले, स्वराज्य वाढविले.
  • छत्रपती शिवाजी महाराजांवर दिवस रात्र आलेली संकटे पाहिली.
सगळ्यात महत्वाचे: पातशह्यांच्या छाताडावर पाय देऊन आणी मुघल सल्तनत पालथी घालून मराठ्यांचा छत्रपती निर्माण केला. अतुल्य साहस केले.
मुलगा शिवाजीराजे ह्यांनी जिजाऊ आईसाहेबांस त्यांच्या सर्व त्यागाचे फळ मिळवून दिले. आता ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणून राज्यभिषेक करून श्रीमंत राजमान्य राजश्री छत्रपती झाले आणी जिजाऊ आईसाहेबांस 'राजमाता' केले.
जिजाऊ आईसाहेबांनी सर्व प्रजेवर आपल्याच लेकरा सारखे अथांग प्रेम केले. रयत जपली, पोटाशी धरली. स्वराज्य जपले आणि वाढविले.
त्यांच्या ह्या त्यागामुळेच प्रत्येक आईला जिजाऊ आईसाहेब व्हावेसे वाटते आणी आपल्या पोटी शिवाजी राजांसारखा थोर पुत्र जन्मास यावा असे वाटते.
जेष्ठ वद्य नवमी, बुधवारी, मध्यरात्री, तारीख १७ जून १६७४ रोजी जिजाऊ आईसाहेब रायगडाखालील पाचाड मुक्कामी निधन पावल्या.
जिजाऊ आईसाहेबांच्या पावन स्मृतीस समर्पित...
श्री भवानी शंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम
निरंतर

अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

  अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...