विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label छत्रपती संभाजी महाराज. Show all posts
Showing posts with label छत्रपती संभाजी महाराज. Show all posts

Friday, 14 May 2021

चिक्कदेवराय आणि संभाजी महाराज


 चिक्कदेवराय आणि संभाजी महाराज

पोस्तसांभार ::आशिष माळी
म्हैसूर चे शासक चिक्कदेवराय वडियार (म्हैसूर चे 14 वे शासक) याना संभाजी महाराजांनी मारले नाही.
मराठा साम्राज्याच्या झालेल्या एका चुकीमुळे आज म्हैसूरचे राज्य दिमाखात उभे आहे. ती चूक केलेली शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाने म्हणजे व्यंकोजीने . त्याने चिक्कदेवरायला केवळ ३ लाखा साठी बंगलोर विकले होते . (त्या वेळचे )
चिक्कदेवराय हा डोद्दा देव राजाचा मुलगा. इसवीसन १६४५ साली त्याचा जन्म झाला आणि वयाच्या २८ व्यावर्षी म्हणजे इ.स. १६७३ साली तो गादीवर बसला. त्याने माद्देगिरी जिंकून आपल्या सीमा शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी (बंगलोर) च्या सीमेपर्यंत नेल्या .
पण कर्नाटक मध्ये आज पर्यंत हा चिक्क देवराया प्रसिद्ध आहे तोे त्याच्या विचित्र कर प्रणाली साठी. त्याने सैनिक सोडून सर्व लोकांवर जबरदस्त कर लावले. त्यामुळे म्हैसूर चा जंगम (लिंगायत् मध्ये शिव पुजारी) समाज खवळला."बसवण्णाने (बसवेश्वर) जमीन दिली, इंद्राने पाऊस दिला मग आम्ही या राजाला पैसे का देऊ ?" अशा घोषणा देत त्यांनी राजा विरुद्ध आंदोलन केले.
या वेळी चिक्कदेवरायाने १००० जंगम लोकांना जेवायला बोलावले. प्रत्येकाला भेटवस्तू दिली आणि एक अरुंद बोळक्यातून तो त्यांना बाहेर पाठवत होता. त्यावेळी त्याने बोळक्यात अंगरक्षक ठेवले होते. एकीकडून अंगरक्षकांनी या जंगम लोकांना चेंगरले आणि दुसरीकडून सैन्याने चेंगरले. अशा रीतीने त्याने १००० जंगमांची हत्या केली. त्यानंतर ते आंदोलन बंद झाले.
त्यांनी व्यंकोजीकडून बंगलोर प्रांत हा फक्त 3 लाख रुपयांना विकत घेतला. व्यंकोजीला आपली राजधानी तंजवारला हलवायची होती आणि आर्थिक दृष्ट्या तो कमजोर पण झाला होता. त्यावेळी कासीमखानने बंगलोरवर हल्ला केला. मोंघलांशी खास सख्य असलेल्या चिक्कदेवराय ला व्यंकोजीने बंगलोर विकले.
इ.स. १६८० ला औरंगझेब दख्खन मध्ये घुसला त्याने कर्नाटक चा खूप भाग काबीज केला विजपुरची आदिलशाहि संपवली . पण चिक्कदेवरायाने आधीपासूनच औरंगजेबाशी संधान साधले होते. औरंगजेबाशी संधान साधायला त्याने त्यावेळी कासीम खान या मोगलांच्या मुख्य सरदाराची मदत घेतली होती .
इ.स. १६८१ च्या उत्तरार्धात मोगलांचे दक्षिण भारतातील आक्रमण रोखण्यासाठी संभाजी राजांनी हरजीराजे महाडिक या मातब्बर मराठी सरदारास २०००० सेना घेऊन दक्षिणेकडे रवाना केले. दक्षिणेतील सरदार औरंगजेबा ला सामील होवू नये यासाठी संभाजी राजांनी मैसूर च्या चिक्कदेव राजाशी मैत्रीचा प्रयत्न केला होता.पण त्या चिक्कदेव ने मराठ्यांच्या काकडे काटकर सरदारांची कत्तल करून त्यांची मुंडकी श्रीरंगपट्टणम च्या वेशीवर टांगली होती.चिक्कदेवराय याने वरकरणी मराठ्यांशी मैत्री दाखवून आतून बादशाहाशी संधान साधले होतेे. दक्षिणेकडे ३२० किलोमीटर धडक मारून मदुराई ताब्यात घेतले. त्यामुळे तंजावर व पश्चिमेकडील त्रिचनापल्ली आणि पूर्वेकडील नेगापट्ट हि मराठी स्थानके धोक्यात आली. चिक्कदेवराय व मोगल यांची युती मोडून काढणे आवश्यक असल्यामुळे तीस हजाराचे घोडदळ बरोबर घेवून संभाजीराजे स्वतः सातारा, मिरज, धारवाड या मार्गाने चिकमंगरूळ कडे रवाना झाले. म्हैसूरवर हल्ला करण्याच्या दृष्टीने चिक्कदेवरायचा शत्रू मदुराईचा नायक याच्याशी लष्करी करार करून व तंजावरच्या एकोजी राजांच्या तुकड्या घेवून १६८३ च्या जानेवारीत संभाजी राजांनी म्हैसूर च्या पूर्वेस धर्मपुरी येथे आपली छावणी प्रस्थापित केली. ऑक्टोबर १६८३ मध्ये संभाजी राजांनी त्रिचनापल्ली कडे जाऊन मदुराईचा कब्जा घेतला. व तेथून पूर्वेकडे वळून मद्रासच्या दक्षिणेस असलेल्या मायावरम व पोर्टोनोब्से येथे मराठी अंमल बसविला. पण त्यात मराठ्यांचा पराभव झाला. त्यांच्याशी शस्त्रसंधी करून मध्य महाराष्ट्रात होणाऱ्या मोगली आक्रमणाला थोपविण्यासाठी राजे रायगडला परतले.
पुढे संभाजी महाराज यांची हत्या झाल्यावर, संताजी धनाजी यांनी कर्नाटकात धुमाकूळ घातला.त्यावेळी तटस्थ राहण्याची भूमिका घेतलीन पन अंतस्थ तो मुघलांना मदत करत होता.पण संताजी घोरपडे ने कासीम खान ला संपवले. तो पर्यंत चिक्कदेवराय ने सालेम आणि बारामहाल हे भाग स्वतःच्या राज्याला जोडून घेतले.मराठ्यांना मदत करणाऱ्या मदुराई च्या नायक ला हरवले.त्रिचनापल्ली ओण स्वतःच्या राज्याला जोडले.देवराय ने कासीम खान मरण पावल्यामुळे वकील पाठवला , तेंव्हा खुश होऊन औरंगझेब ने फिरंगी तलवार दिली अन त्याला जुग देवो राज हि पदवी दिली .
संदर्भ
.2औरंगजेब | Sambhaji Maharaj
३]How the Mughals sold Bengaluru for Rs 3 lakh 330 years ago

Thursday, 8 April 2021

छत्रपती संभाजी महाराज की जय...

 

*सह्याद्रीनेच बोलवले होते त्याला त्या दिल्ली च्या तख्तावरून.... आमचे छत्रपती शंभुराजें हुतात्मा झाले...., आम्ही आमचा राजा गमावला पण त्या औरंगजेब ला याच महाराष्ट्रात गाडला...*
*तडफडत राहिला औरंगजेब दिल्ली जाण्यासाठी... ओरडत राहिला आपल्या शेवटच्या क्षणा पर्यंत...*
*हमारा सबसे बडा ख्वाब था !! पुरा हिंदोस्ता जीतने का....!! पर आज वो ख्वाब अधुरा रह गया...!! हमने सोचा की वो दख्खन का शेर सिवाजी मर गया तो अब ये दख्खन हात आ जायेगा हमारे पर...नहीं... पता नहीं क्या ताकत थी उसके लफ्ज़ो मे की उसके एक लफ्ज़ की खातिर उसका वो बच्चा संभाजी और उसके वो मावले अपनी जान तक गवाने को राजी हो गये...!! हमने उस संभा को कैद कर लिया... फिर भी वो झुका नहीं हमारे सामने !! कितने जुल्म ओ सितम किये हमने उस पर...हमने आंखे निकाल दी उसकी पर अंधे हम हो गये !! हमने जुबान काट दी उसकी पर बेजुबान हम हो गए...!! हमने हात काट दिये उसके पर आज अपाहिज हम हो गए....!! भिकारी हो चुके है हम...फकिरो को अशरफीया तक दे नही सकते इतने....!! सच कहा था उस काफर संभा ने...की उसके मौत के बाद इस स्वराज मे हर घर में संभाजी पैदा होगे...!! पच्चीस साल से हम इस दख्खन के लिए जंग लढ रहे हैं !! पर नहीं जीत पाये ये दख्खन.... आखिर तडफ तडफ कर इस मुघलीया सल्तनत का बादशाह मर रहा है !! पर.... इस छोटे से स्वराज को नहीं जीत पाया..... इस्लाम मे अगला जन्म वगैरा मानते नहीं... पर अगर खुदा ने हमे बक्श दिया अगला जन्म.... तो खुदा कि कसम अब फिरसे हम दख्खन कभी नहीं आयेंगे....!! इस तैमूर चंगेज की खानदान मे कई औलादे पैदा हुई... पर सिवाजी और संभाजी जैसा कोई भी नहीं....!..हमारी सबसे बड़ी जुर्रत हो गई जो हमने इन मरहट्टो की चौखट पर पांव रख दिया.... आखिर लंगडे हो कर मर रहे हैं....!! तील तील कर खत्म हो रहे हैं.... कभी देखा था ख्वाब इस दख्खन पर मुघलीया परचम लहराने का पर बदकिस्मती देखो मरते वक्त स्वराज पर अब भी भगवा देख कर मर रहे हैं.... बस्स ये भगवा ही तो सबसे बडी ताकत है इन मरहट्टो की...इस भगवे को कोई भी झुका नहीं सकता....!! इस भगवे को कोई हरा नही सकता.....🔥🚩*
*छत्रपती शिवाजी महाराज की जय..*
*

छत्रपती संभाजी महाराज की जय...*
✍🏻अक्षय चंदेल ( लेख अधिकृत)

'सिर्फ नाम ही काफी है…' आणी ते नाव म्हणजे 'छत्रपती संभाजी महाराज'


 

नावाचा धाक
छत्रपती संभाजी महाराजांचा धाक इतका जबरदस्त होता की इंग्रज, पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्दी, आणी मुघल हे छत्रपती संभाजी महाराजांचे नुसते नाव घेतले तरी भयंकर घाबरत असत.
एक छोटस उदाहरण माझ्या शब्दांत सांगतो.
16 मार्च 1681 च्या थोडं पूर्वी म्हणजे बहुदा 10 फेब्रुवारीच्या आसपास मराठयांच्या फटक्यांचा मार सहन न होऊन जंजिऱ्याचा सिद्दी जीव वाचवून त्याच्या सर्व आरमारासहित वेंगुर्ल्याच्या बाजूस गेला होता.
ह्या सिद्दीचे खास मित्र होते मुंबईचे इंग्रज.
फेसबुकवरील महाराष्ट्र धर्म समुहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
मराठ्यांचे फटके सिद्दीच्या पार्श्वभागावर पडायला लागले कि हा सिद्दी पळून इंग्रजांच्या आश्रयास जात असे.
बर ह्या सिद्याला आपल्या मुंबईच्या घरात घ्यावे तर हे मराठे आपल्याही पार्श्वभागावर फटके देतील ह्या धाकाने इंग्रजही सिद्दीस मुंबईस आश्रय देण्यास हो-नाही करत असत…
पण हा सिद्दी म्हणजे इंग्रजांच्या घरचा 'बिन बुलाए मेहमान'.
..आता पावसाळा सुरू झाला होता त्यामुळे हा सिद्दी वेंगुर्ल्याहून मुंबईस इंग्रजांकडे निघाला.
वाटेत जाताना ह्या सिद्दीच्या आरमाराला छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलखातील मुंबईजवळ एक मराठयांची होडी आडवी आली. होडीत होते चार मराठे. सिद्दीच्या दोन गलबतांनी ही मराठ्यांची होडी पकडली आणी आपल्याबरोबर मुंबईला नेली.
चुकीला माफी नाही..
चौल बंदरात मराठ्यांचा 3 हजार फौजेनिशी एक शूर सरदार बसलेला होता. त्याला ह्या सिद्दीने पकडलेल्या मराठ्यांच्या होडीची खबर मिळाली.
मराठा मुळात हुशार आणी महा-शूर.
धाक घालण्यात मराठ्यांचा हात कोणी धरणार नाही.
शत्रू तरी काय करणार; मराठ्यांच्या फटक्यांपेक्षा धाक परवडला.
ह्या चौलच्या मराठा सरदाराने सिद्दीस काहीही न म्हणता सरळ मुंबईच्या इंग्रजांस पत्र पाठवून सांगितले की,
"आमच्या फटाक्यांमुळे घाबरून जाऊन तुमच्या घरात आलेल्या सिद्दी पाहुण्याने आमची मराठ्यांची एक होडी पकडलेली आहे.
ती होडी बिनबोभाट आमच्याकडे रवाना करावी.
ती होडी आमच्याकडे पाठवली नाही तर मला ही बातमी छत्रपती संभाजी महाराजांना सांगावी लागेल.
आणी ही गोष्ट जर छत्रपती संभाजी महाराजांना कळाली; तर मग महाराजांचे फटके तुमच्याही पार्श्वभागावर बसतील आणी मग तुम्हाला पाहुणा बनून दुसऱ्याचे घर शोधावे लागेल."
मराठा सरदाराने इंग्रजांना दिलेली ही धमकी इतकी जबरदस्त होती की; पत्र मिळताच आजिबात वेळ न दवडता घाबरून जाऊन इंग्रजांनी फटके न बसलेल्या आपल्या पार्श्वभागावर हात फिरवीत तातडीने ती मराठ्यांची होडी 12 एप्रिल पूर्वीच चौलच्या मराठा सरदाराकडे पाठवून दिली आणी प्रकरण मिटते घेण्याची काकुळतीने विनंती केली.
बर हे प्रकरण एव्हड्यावर मिटवतील तर ते मराठे कसे?
कारण?
चुकीला माफी नाही..
फेसबुकवरील महाराष्ट्र धर्म समुहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
जशी चूक सिद्दीने मराठ्यांची होडी पकडून केली होती; तशीच चूक सिद्दीला इंग्रजांनी आपल्या घरात घेऊन केली होती.
ह्या अवघड प्रसंगातून जीव वाचविण्याचा आता मुंबईकर इंग्रज आटोकाट प्रयत्न करू लागले. आणि त्यांना मार्ग सापडला. तो मार्ग म्हणजे सुरतेचे इंग्रज.
सुरतेच्या इंग्रजांबरोबर मुंबईच्या इंग्रजांचे पटत नसे.
रात्रीचा-दिवस करून हे मराठे ह्या सिद्दीच्या बोकांडी बसायला मुंबईला कधीही येतील आणी मग आपली काही धडगत राहणार नाही त्यामुळे ही सिद्दीची ब्याद सुरतेच्या इंग्रजांच्या घरात धाडली तर किती बरे?
असा धूर्त विचार मुंबईकर इंग्रजांनी केला.
मराठ्यांची धास्त खाऊन इंग्रजांनी आपल्या घरात बळेबळे आलेल्या ह्या 'बिन बुलाए मेहमान' ला बळेबळे घरातून बाहेर काढून सुरतेच्या इंग्रजांकडे जाऊन पाहुणचार घेण्याचा बळजबरीचा सल्ला दिला.
सिद्दी बिचारा खजील होऊन '..बी का कुत्ता ना घर का ना घाट का..' ह्या म्हणी प्रमाणे निमूटपणे मुंबई सोडून सुरतेस चालता झाला आणी इंग्रजांनी मोकळा श्वास सोडला.
ह्याला म्हणतात नावाचा धाक.
'सिर्फ नाम ही काफी है…'
आणी ते नाव म्हणजे
'छत्रपती संभाजी महाराज'
लेख समाप्त.
लेखाविषयी तुमची प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये कळवा आणी आपल्या महाराष्ट्र धर्मवर मित्रमंडळींना आमंत्रित करा.
श्री भवानी शंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम
निरंतर

Thursday, 1 April 2021

( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी ) भाग 11

 

व्हडले राजीक’ – गोव्याची ‘थोरली स्वारी’

( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी )
भाग 11
भिमगडच्या तहाची कलमे –
१) संभाजीने जे पोर्तुगीजांचे प्रदेश व किल्ले हस्तगत केले असतील ते तेथील तोफा व हत्यारे यांसह परत करावे.
२) युद्ध सुरु झाल्यापासून व त्यापूर्वी जी जहाजे एकामेकांनी घेतली असतील ती त्यातील सामानासह परत करावी.
३) एकमेकांनी पकडलेले कैदी सोडून द्यावेत.
४) वसईच्या मुलखातील गावखंडी व दमण प्रांतातील चौथाई ज्याप्रमाणे चौथ राजास देत असत त्याप्रमाणे संभाजी राजास पोर्तुगीजांनी द्यावी आणि संभाजीने ह्याबद्दल त्या प्रदेशाचे रक्षण करावे.
५) एकमेकांच्या मुलखात पूर्वीप्रमाणे व्यापारास मोकळीक असावी, आरमारास कोणतीही अडचण असू नये.
६) पोर्तुगीजांच्या किल्ल्यातील तोफखानाच्या संरक्षणाखाली धान्य सामग्री घेऊन मुघलांच्या फौजेकडे जाणा-या जहाजांना पोर्तुगीजांनी परवानगी देऊन नये, पण ज्या प्रदेशात पोर्तुगिजांचा तोफखाना नसेल तिथे हे कलम लागू होणार नाही.
७) कोकणातील देसाई संभाजी विरुद्ध बंड करून गोव्यात राहिले होते त्यांना माफी द्यावी.
८) पोर्तुगीजांच्या मुलखाच्या सीमा शेजारी संभाजीने किल्ला बांधू नये.
ही सर्व तहाची कलमे निळोपंत पेशवे यास अजिबात मंजूर नव्हती. कशी असणार ? तहाचे एक-एक कलम जर निट वाचले तर लक्षात येते की या तहानुसार फायदा होणार होता तो फक्त पोर्तुगीजांना ! मराठ्यांच्या वाट्यास काहीच येणार नव्हते. कलशाच्या प्रेरणेमुळे झालेला हा तह पाळला जाऊ नये हे निळोपंत पेशवे यास वाटत होते अशी नोंद पोर्तुगीज कागदपत्रात मिळते (पो.म.सं-११५) शत्रूच्या मुलखामधे आक्रमण करून त्यास जेरीस आणून जो तह केला जातो तो जेत्याच्या फायद्याचा असतो. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास शिवाजी महाराजांचा पुरंदरचा तह हे उदाहरण घ्यावे लागेल. मिर्झा राजा जयसिंगने पूर्णपणे शिवाजी महाराजांना जेरीस आणून तहाच्या कलमानुसार स्वत:चा जय करून घेतला. पण गोवे मोहिमेत प्रस्तुत असणारा तह हा पराजेत्याच्या फायद्याचाच जास्त होता. स्वराज्याचे सुदैव म्हणून हा तह अमलात आला नाही.
गोवे मोहिमेत संभाजी महाराजांनी केलेला पराक्रम हा विलक्षण होता. प्रसंगी स्वताच्या जिवाची पर्वा देखील त्यांनी केली नाही. त्यांच्या या पराक्रमची आणी शौर्याची पोर्तुगीजांना चांगलीच दहशत बसली. पोर्तुगीजांसोबत तह करण्याची संभाजी महाराजांची इच्छा नव्हतीच पण प्रसंग पाहून त्यांनी हा निर्णय घेतला होता. शहा आलम आला नसता तर शिवाजी महाराजांचे स्वप्न पूर्ण झाले असते ! फिरांगण प्रदेश मराठ्यांच्या अंमलाखाली आला असता. हे स्वप्न पुरे व्हायला पुढे अनेक वर्ष लागली. उत्तर फिरंगाणातून १७३९ साली चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांचे उच्चाटन झाले. गोव्यातून पोर्तुगीजांची हकालपट्टी व्हायला तर तब्बल ४५१ वर्ष उलटावी लागली. इ.स.१५१० मध्ये तिमय्याच्या मदतीने विजापुरी सल्तनतीला हादरा देत पोर्तुगीझांनी गोव्यात प्रवेश केला. पुढे १९६१ साली स्वतंत्र भारताचे स्वामित्व झुगारून जेव्हा पोर्तुगाल गोव्यावर अधिकार सांगू लागले तेव्हा Major General कुन्हीरमण कॅन्डेथ आणि Air Vice Marshall एलरिक पिंटो यांनी ऑपरेशन विजय आखले आणि गोमंतकाला भरत भूमीत सामील केले. छत्रपती संभाजी महाराजांना नशिबाची थोडी साथ मिळाली असती तर ह्या पोर्तुगीजांचे संभाजी महाराजांनी भारतामधून समूळ उच्चाटन १६८३ सालीच केले असते. असो. इतिहासाला जर-तर मान्य नसते. गोमंतकाचे मराठीपण टिकण्यासाठी आहुती गेलेल्या ज्ञात अज्ञात समरवीरांना सादर समर्पित.
|| लेखन सीमा ||
विशाल खुळे – padmadurg@gmail.com
संदर्भ
पोर्तुगीज-मराठे संबंध
असे होते मोगल
फुतुहते आलमगिरी
तारीखे दिलकुशा
जेधे शकावली
संभाजी कालीन पात्रसार संग्रह
शिव चरित्र साहित्य खंड २
ज्वलज्वलनतेजस संभाजी
मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर
मल्हार रामराव चिटणीस बखर

( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी ) भाग 10

 

व्हडले राजीक’ – गोव्याची ‘थोरली स्वारी’

( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी )
भाग 10
जेधे शकावली प्रमाणे – “शके १६०५ रुधिरोदागरी संवत्सरे पौष व ६ शहा आलम रामघाटे उतरोन कुडाळ व बांदे जाळून घाटावरी फाल्गुन शु पौर्णिमेस गेला लष्कर फार मेले “
तारीखे दिलकुशा प्रमाणे – शहजादा बादशहाचा निरोप घेऊन कोकणच्या रामदरा घाटाच्या दिशेने रवाना झाला. हा घाट पन्हाळगडापासून ३० कोसांवर आहे. रामदरा घाटाखालचा भाग समृद्ध नव्हता मोगल फौजेला अन्नधान्य आणि रसद मिळेनाशी झाली. बादशाहने सागरी मार्गाने रसद पाठवली पण ती जास्त काळ पुरली नाही. मोगली फौजेची दुर्दशा झाली आणि असंख्य माणसे जाय झाली.
शहा आलम सैन्य घेऊन आल्याचे कळताच संभाजी महाराजांनी माघार घेतली. मुघली सैन्य जर ऐनवेळी मदतीस पोचले नसते तर संभाजी महाराजांनी गोवे एकदम खणूनच काढले असते पण नियतीस हे मंजूर नव्हते. शहा आलम जवळ येत होता व पोर्तुगीज आणि मुघल यामधे मराठा सैन्य अडकले असते, आणि यामुळे संभाजी महाराजांनी माघार घेऊन तहाची बोलणी सुरु केली. मुघलांचे सैन्य गोव्यात दाखल होईपर्यंत मराठी सैन्यांनी माघार घेतली होती आणि शके १६०५ पौष शु. पौर्णिमेस संभाजी महाराज रायगडास आले (जे.श)
संभाजी महाराजांच्या सोबत झालेल्या युद्धामधे विजरईस कळून आले की मराठ्यांविरुद्ध गोवे शहराचे रक्षण करणे ही एक अशक्य गोष्ट आहे. पोर्तुगीजांकडे आरमार होते. गोवे शहरास तट असून जागोजागी गडगंज बुरुज होते. शहरामधे मोठा दारूखाना होता. नदीच्या मुखावर मुरगाव, आग्वाद, रेइशमागुश, काबू असे किल्ले होते. असे असून देखील विजरईस मराठ्यांच्या भीतीने राजधानी गोवे शहरातून हलवण्याची गरज भासली.(पो.म.सं-११६)
रायगडावर पोचल्यानंतर पोर्तुगीजांसोबत तह करण्याची जबाबदारी संभाजी महाराजांनी कवि कलश यास सोपवली. संपूर्ण गोवे प्रकरणात पोर्तुगीज कागदपत्रामधे कवि कलशाचा उल्लेख कुठेही मिळत नाही पण फक्त तह करण्याच्या वेळी त्याचा उल्लेख मिळतो. हे असे का ? पुराव्या अभावी सांगता येणे मुश्कील आहे .
जेधे शकावली मधे मिळतो तो उल्लेख असा – ” शके १६०५ रुधिरोदागरी संवत्सरे माघ शु कवि कलश अकबरास घेऊन भिमगडाच्या झाडीत गेले फिरंगी यासी सला केला “
प्रस्तुत तहात काय कलमे होती याची माहिती पोर्तुगीज कागदपत्रातुनच प्राप्त होते.

Tuesday, 30 March 2021

( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी ) भाग 9

 व्हडले राजीक’ – गोव्याची ‘थोरली स्वारी’


( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी )
भाग 9
दि.२४-११-१६८३ रोजी सुमारे रात्री ८ वा. मराठा सैन्यांनी जुवे बेटात जाऊन तेथील किल्ला काबीज केला. विजरईचे तर धाबेच दणाणले. जुवे बेट मराठ्यांनी घेतल्याची नोंद जेधे शकवालीत मिळते – ” मार्गशीर्ष मासी फिरंगी याचे कुंभारजुवे घेतले, साष्टी व बारदेश मारिला “
मनुची लिहितो – ” संभाजीने ओहटीच्या वेळी आपले चार हजार सैन्य पाठवून सँटो एस्टेव्होचा किल्ला ताब्यात घेतला. संभाजीचे सैन्य किल्ल्यात घुसले आणी किल्ल्यातील सर्व शिबंदीची कत्तल केली. संभाजीच्या सैन्याची मुळीच हानी झाली नाही. किल्ला ताब्यात आला याचा इशारा म्हणून संभाजीच्या सैनिकांनी अनेक(तोफेचे)गोळे (गोव्याच्या दिशेने) सोडले. त्यावेळी गोव्यात विलक्षण गोंधळ उडाला. दि.२५-११-१६८३ या दिवशी सकाळी ७ वा. सुमारास विजरई कोंदि द आल्व्होर याने ४०० शिपायांसोबत जुवे बेटाकडे कूच केले. मराठ्यांचे सैन्य जणू वाटच बघत बसले होते. पोर्तुगीज सैन्याने माऱ्याच्या टप्प्यात येताच मराठ्यांनी हल्ला चढवला व पोर्तुगीजांना ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडले. मराठ्यांच्या घोडदळास घाबरून पोर्तुगीजांचे शिपाई जीव वाचवण्यासाठी विजरईस एकटे सोडून डोंगरावरून खाली नदीच्या तीराकडे पळत गेले. या लढाई मधे विजरई घायाळ झाला. केवळ सुदैवाने तो बचावला. जुवे बेट मराठ्यांच्या ताब्यात गेल्यामुळे नदीच्या बाजूस लागून ज्या शेतीच्या जमिनी होत्या त्याचे बांध पोर्तुगीजांनी फोडून टाकले. त्यामुळे जवळील मांडवी नदीचे पात्र वाढू लागले. (पो.म.सं-१०५) त्यांच्या सोबत आता विजरई कोंदि द आल्व्होर हा देखील पळत सुटला. तिथे झालेल्या झटापटीत त्याच्या दंडाला गोळी लागली. कसाबसा जिव वाचवत तो मांडवी नदीच्या तीरावर आला. आता विजरई कोंदि द आल्व्होर पुन्हा एकदा दोन्ही बाजूने कात्रीत सापडला होता.
बांध फोडून स्वताच्याच हाताने नुकसान करून घेतले असे त्याला वाटू लागले कारण पोर्तुगीजांना आता पलीकडे काही जाता येत नव्हते आणि पाठीमागून त्याचा पाठलाग खुद्द संभाजी महाराज ससैन्य करत होते. आपण संभाजी महाराजांच्या तावडीत सापडलो तर अंत निश्चित हे त्यास चांगलेच उमगले होते. संभाजी राजे किती इरेला पेटले होते हे यावरून दिसते. विजरई कोंदि द आल्व्होर तीरावर पोहोचताच एका मचव्यात बसला आणि पळाला. संभाजी महाराज देखील तीरावर पोहचले विजरई कोंदि द आल्व्होर याला मचव्यात बसून जाताना पाहताच त्या तुडुंब भरलेल्या मांडवी नदीच्या पात्रात संभाजी महाराजांनी आपला घोडा घातला ! आपल्या जीवाचे काय बरे वाईट होईल याची पर्वा देखील संभाजी महाराजांनी केली नाही. नदीला आलेल्या भरतीमुळे संभाजी महाराजांचा घोडा पोहणीला लागला यावेळी खंडो बल्लाळ तिथे शंभूराजांसोबत सोबत होते. घोडा पोहणीला लागलेला पाहताच, त्यांनी देखील त्या नदीच्या पात्रात उडी घेतली आणि जावून संभाजी राजांचे प्राण वाचवले. दैव बलवत्तर म्हणून मोठी हानी टळली. (म.स्वा-१४४) वर्षभरापूर्वीच संभाजी राजांनी खंडो बल्लाळ यांच्या वडिलांना (बाळाजी आवजी चिटणीस) देहदंड दिला होता. मनात कुठल्याही प्रकारची द्वेष न ठेवता स्वराज्याच्या छत्रपती साठी ही स्वामीनिष्ठा आणखी कुठे पहावयास मिळणार ? हे मराठी मातीचे गुण आणि सळसळत्या मराठी रक्ताचे ऋण आहे ! खंडो बल्लाळ यांनी केलेल्या कामगिरीबद्दल संभाजी महाराजांनी त्यांचा सत्कार केला. त्याचा उल्लेख असा मिळतो – ” महाराजांनी खासा घोडीयावरून जिनास पाणी लागे तो घोडा घातला. त्याजबरोबर खंडो बल्लाळ यांनी घोडा घालून तरवार मारिली, शिपाई गिरी केली.पाणी चढले तेव्हा घोडा पोहणीला लागला, खंडो बल्लाळ यांनी उडी टाकून महाराजांचा घोडा धरून पोहून बाहेर निघाले. ते समयी संभाजी महाराजांनी बहुत संतोष होऊन पोटाशी धरिले, घोडा बक्षिस दिला, खासा उतारपोशाख दिला. मोत्याची कंठी व तुरा दिल्या. सोबत पालखीचा मान दिला. ” (म.रा.चि.ब)
विजरई कोंदि द आल्व्होर हा पुरता घाबरला होता. मांडवी नदी पार करून कसाबसा जिव वाचवत तो थेट सेंट झेविअर कडे आश्रयास गेला. त्याने झेविअरची करुणा भाकली. सर्व मशाली पेटवून तळघरात जाऊन सेंट झेविअरची शवपेटी उघडली. त्याने आपला राजदंड आणि राजचिन्हे, स्वलिखित अर्ज झेविअरच्या पायथ्याशी ठेवला आणि प्रार्थना केली – ” हे राज्य तूच निर्माण केलेस आता तूच ह्याचा सांभाळ कर”. विजरई पूर्णपणे हवालदिल झाला होता. मराठ्यांचा मोर्चा आता साष्टी आणी बारदेश कडे वळला. संभाजी महाराज २०००० शिपाई, ५००० स्वार, आणि १० हत्ती घेऊन स्वारी केली. मराठे साष्टी आणि बारदेशात शिरल्यापासून जिकडे तिकडे जाळपोळ आणि लुटालूट करत होते. साष्टी आणि बारदेश मधील आग्वाद, रेइशमागुश, रायतूर, मुरगाव हे किल्ले सोडून सर्व प्रदेश मराठ्यांनी जिंकला. रायतूरच्या किल्ल्यास मराठ्यांचा सहा दिवस वेढा सुरु होता. साष्टी आणी बारदेश मधे मराठे २६ दिवस धुमाकूळ घालत होते. यावेळी संभाजी महाराजांनी ४६ तोफा बारदेश येथील किल्ल्यातून काढून नेल्या (पो.म.सं-१०८) विजरई कोंदि द आल्व्होर हा आता मुघलांच्या मदतीची वाट बघत बसला होता..आणि चमत्कार व्हावा असेच घडले. जणू सेंट झेविअरने त्याला कौल दिला. पोर्तुगीजांच्या मदतीसाठी निघालेला शहा आलम रामघाट उतरून गोव्यानाजिक दाखल झाला. या प्रवासात त्यालाही फार कष्ट झाले होते. बरेच मुघल सैन्य मृत्युमुखी पडले होते. या भागात घनदाट अरण्ये होती. नाईलाजाने शहा आलम यास घाटाच्या तोंडाशी चार मुक्काम करावे लागले. सैन्य आणि बुणगे यास घाट ओलांडण्यास फार कष्ट पडले. (फु.आ-१८)

( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी ) भाग 8

 व्हडले राजीक’ – गोव्याची ‘थोरली स्वारी’



( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी )
भाग 8
विजरई कोंदि द आल्व्होर हा दुर्भाट बंदर सोडून गोव्यास परतला. दि.१२-११-१६८३ या दिवशी सकाळचे आठ वाजले होते. विजरई निराश होऊन जुन्या गोव्यातील ‘बों जेजूस’ (Bom Jesus Basilica) या चर्चच्या शेजारी असलेल्या मठात जाऊन ४ दिवस राहिला. या चार दिवसात त्याने कोणाचीच भेट घेतली नाही. फोंडा किल्ल्यावर पोर्तुगीजांनी केलेल्या सततच्या मा-यामुळे किल्ल्याची अवस्था जिर्ण झाली होती. परत असा काही हल्ला झाला तर अथवा परत ही वेळ नको या विचाराने संभाजी महाराजांनी फोंड्याचा कोट पाडून जवळच एक नवीन किल्ला बांधला. त्यास त्यांनी किल्ले “मर्दनगड” हे नाव दिले.(पो.म.सं-१०२) फोंड्याचा संग्राम संपला तरी चौलचा वेढा सुरु होताच. निळोपंत पेशवे चौल येथे वेढा चालवीत होते. फोंड्यावरून संभाजी महाराज परत जातील असे विजरई कोंदि द आल्व्होर याचा समज होता, पण झाले उलटेच. संभाजी महाराजांनी तर आता थेट गोव्यातच शिरून निकाली हल्ला करण्याचे ठरवले. धर्मांध पोर्तुगीजांबद्दल संभाजी महाराजांना राग किती होता हे यावरून दिसून येते. मराठ्यांचे लक्ष होते आता ‘जुवे’ बेटाकडे. यास पोर्तुगीज ‘सांत इस्तेव्हांव’ असे म्हणत असत. गोव्याच्या ईशान्येला दोन मैलावर जुवे बेट आहे. हे बेट धावजी ह्या तीसवाडीतील गावाच्या पैल तीरास आहे. त्या बेटातून ओहटीच्या वेळी पायवाटेने गोवे शहरात येणे-जाणे कठीण नसे. म्हणून या पायवाटेस पोर्तुगीज Passo Seco असे म्हणत असत. पूर्वी दि.२५ नोव्हेंबर (साल उपलब्ध नाही) या दिवशी गोवा हे शहर पोर्तुगीजांच्या ताब्यात आले होते. या विजयाच्या स्मरणार्थ त्यांनी ‘सांत इस्तेव्हांव’ येथे ‘सेंट कॅथेरीन’ नावाचे चर्च बांधले होते. या बेटावर एक छोटेखानी किल्ला देखील होता. इतर काही कारणांमुळे विजरईने तिथे सैनिक ठेवले नव्हते.(अ.हो.मो-२१९)

( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी ) भाग 7

 व्हडले राजीक’ – गोव्याची ‘थोरली स्वारी’


( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी )
भाग 7
फोंड्याच्या वेढयात येसाजी आणि कृष्णाजी कंक यांनी पराक्रमाची शर्थ केली. दोघांना ब-याच जखमा झाल्या होत्या. संभाजी महाराजांनी दोघांना घरी मावळात जाण्याची आज्ञा दिली. घरी परतल्यानंतर कृष्णाजी कंक यांचा जखमा फुटून मृत्यू झाला. त्यांच्या पराक्रमाबद्दल संभाजी महाराजांनी कृष्णाजीस बक्षिसाची मोईन करून दिली अशी – ” पत्रवतन कृष्णाजी कंक पडती नायेक राज्यामंडळ शके १२ क्रोधन नाम संवत्सर आषाढ शु २. फोंडीयाच्या कोटात फिरंगीयांनी लगट केला (,) राजश्री स्वामी राजापुरीहून फोंडीयास गेले (,) गानिमासी गाठी घालून झुंज बहुत केले (,) ते वक्ती दोघांना जखमा लागून चकचूर झाले (,) स्वामिनी घरी जावयाची आज्ञा केली (,) जखमा फुटोन कृष्णाजी मयत झाले ” सदर मोईन पत्र मोठे असून आशयास्तव हे पत्र संक्षिप्त स्वरुपात दिले आहे (शि.च.सा.ले-३९९)
विजरई कोंदि द आल्व्होर याने फोंड्यावर स्वारी का केली हे त्याने पोर्तुगीज राजाला लिहून पाठवलेल्या पत्राद्वारे समजते.
त्यात तो पुढील प्रमाणे कारणे देतो –
१) शत्रूस चौलचा वेढा उठविण्यास भाग पाडणे.
२) पोर्तुगीज अमलातील गोवा-साष्ट-बार्देश यांचे रक्षण करणे.
३) संभाजीच्या जुलमामुळे कोकणातील जनतेस आपणावर पोर्तुगीजांची सत्ता असावी असे वाटते, म्हणून त्या प्रदेशाला आपल्या अंमलाखाली आणण्याकरिता प्रयत्न.
४) कोकणाचे उत्पन्न मोठे असल्यामुळे तो प्रदेश ताब्यात घेणे.
५) मोगलांनी दक्षिण कोकण घेण्यापूर्वी ते पोर्तुगीझांनी हस्तगत करणे. (पो.म.सं-९८)
मनुचीने तर विजरई कोंदि द आल्व्होर याचे फोंड्यावर स्वारी करण्याचे कारणच वेगळे दिले आहे तो म्हणतो – ” त्याने (संभाजीने) पढवून पाठवलेले हेर गोव्याच्या विजरई कडे आले. मराठी राज्यातील फोंडा हा किल्ला गोव्याहून अगदी जवळ आहे. त्या किल्ल्यात खजिना भक्कम आहे. तो किल्ला तुम्ही घेतलात तर मुबलक खजिना तुमच्या हाती पडण्याची शक्यता आहे. अशी बातमी संभाजीने पढवून ठेवलेल्या हेरांकडून विजरई कोंदि द आल्व्होर यास समजली ” (अ.हो.मो-२१३). सदर माहिती विश्वसनीय वाटत नाही.
जेधे शकावली प्रमाणे – “रुधिरोदागरी संवत्सरे कार्तिक व ७ शके १६०५ संभाजी राजे बांदयास गेले. गाविकार फिरंगी यांनी कोतास वेढा घातला होता त्यासी लढाई करून तो वेढा उठविला तेथे येसाजी कंक आणि कृष्णाजी कंक यांनी युद्धाची शर्थ केली”
तसेच फोंडा किल्ल्यात पीर अब्दुल्लाखान याचे देवस्थान आहे. किल्ल्यातील मराठा सरदारांनी त्यास नवस केला होता, जो त्यांनी नंतर संभाजी महाराजांकरवी फेडून देखील घेतला. संभाजी महाराजांनी पीर अब्दुल्लाखान या देवस्थानास बक्षिसाची मोईन दिली. संभाजी महाराजांचा प्रिय कवि कलश याने फोंड्यास पाठवलेले पत्र उपलब्ध आहे त्यात तो लिहितो – ” हजरत पीर अब्दुल्लाखान कोट फोंडा, बहुत जागृत स्थळ. फिरंगीयांनी गानिमाई करून कोटास वेढा घातला, कोट बहुत जर केला तेव्हा कोटाचा हवालदार, सरनोबत, सबनीस, लोको प्रार्थना केली, गनिमाचा पराभव करणे. छत्रपती स्वामी विनंती करून ‘उर्जा चाले सारखी पोख्ती सरंजाम करून घेऊन’ राजश्री स्वामीची फत्तेबाजी होऊ देणे. स्वामीची स्वारी कोट मजकुरी होऊन फिरंगी गनीम मारून काढिले. स्वामी आले. फत्ते झाली. ऐसी पिराची करामात म्हणून धर्मदाय देवीला “ (स.प.सा.ले-१११)

( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी ) भाग 6

 व्हडले राजीक’ – गोव्याची ‘थोरली स्वारी’



( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी )
भाग 6
एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते. नारावे येथे सप्तकोटीश्वराचे मंदिर आहे. याचा जिर्णोद्धार खुद्द शिवाजी महाराजांनी केला होता. यासंबधीचा शिलालेख देखील शिवाजी महाराजांनी कोरून घेतला होता. शिवराज्याभिषेक-कल्पतरू या निश्चलपुरी गोसावी यांनी लिहलेल्या पोथीत याचा उल्लेख मिळतो तो असा – ” श्री सप्तकोटी शके किलकाब्दे कार्तिक कृष्ण पंचम्या सोम श्री शिवराज्ञा देवालयस्य प्रारंभ “ (ज्व.सं-२१०)
कृष्णाजी कंक यांना देण्यात आलेली मोईन – अस्सल पत्र
परिणामी संभाजी महाराजांनी आता पोर्तुगीजांशी उघडपणे युद्ध पुकारले. मराठ्यांनी चौल आणि रेवदंड्याला वेढा घातला. चौलचा वेढा हा सहा महिने सुरु होता तर रेवदंड्याच्या वेढ्या संदर्भात आपल्याला उल्लेख मिळतो तो असा – ” जेष्ठ वद्य ११ संभाजी राजे स्वार होऊन राजापुरास गेले फिरंगी यासी बिघाड केला रेवदंडी यासी वेढा घातला “(जे.श) मराठ्यांनी चौलचा वेढा उठवावा म्हणून विजरईने फोंडा किल्ल्यावर स्वारी करण्याचे योजले व त्याप्रमाणे दि.२७-१०-१६८३ रोजी विजरई ‘आगाशी’ येथे जाऊन राहिला. त्याच्यासोबत ३२०० लढाऊ लोक, २५ घोडेस्वार व ४ तोफा होत्या. दि. २८-१०-१६८३ रोजी सर्व सैन्य घेऊन विजरई ‘दुर्भाट’ येथे जहाजातून उतरला. ‘दुर्भाट’ हे संभाजी महाराजांच्या ‘फोंडे’ महालातील एक महत्वाचे बंदर होते. फोंडे येथील देसाई दुलाबा नाईक हा फितूर झाला होता. विजरई तेथे येताच तो विजरईला जाऊन मिळाला व सोबत त्याने विजरई यास मदती करिता ७० शिपाई आणले होते. दुर्भाटहून विजरईचे सैन्य दि.१-११-१६८३ रोजी फोंड्यास पोहचले. वाटेत जात असताना ३०० मराठ्यांसोबत विजरईची चकमक उडाली. फोंड्यास यावेळी मराठा सरदार येसाजी कंक आणि त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक हे तैनात होते. येसाजी तर शिवाजी महाराजांचे बालपणाचे संवगडी ! राजगड जवळील भुतोंडे हे त्यांचे गाव. स्वराज्याचा श्रीगणेशा: झाल्यापासून येसाजी इमाने-इतबारे स्वराजायची सेवा करत होते. फोंड्याच्या किल्ल्यात यावेळी मराठ्यांचे ६०० शिपाई होते आणी २०० शिपाई हे रानात योग्य त्या संधीची वाट पाहत लपून बसले होते. फोंड्यास पोहचल्यावर विजरईने तोफांचा भडीमार सुरु केला. सतत होणा-या तोफांच्या मा-यामुळे किल्ल्याच्या आतील भागास भगदाड पडले, तरीदेखील मराठे काही हटेनात. निकराने ते प्रतिकार करत होते. फोंड्यास सतत नऊ दिवस तोफांची सरबत्ती सुरु होती. विजरई पुरता हैराण झाला. अखेर त्याने दि.९-११-१६८३ रोजी शेवटचा निकाली हल्ला करण्याचे ठरवले. तो हल्ल्याला सुरुवात करणार त्याच वेळी संभाजी महाराज राजापूरहून फोंड्यास दाखल झाले. किल्ल्यातील शिपायांच्या साथीला आता आणखी ६०० शिपाई व खुद्द स्वराज्याचे छत्रपती शंभूराजे होते. सैन्याचे मनोबल अफाट वाढले. संभाजी महाराजांनी यावेळी आणखीन ८०० शिपाई किल्ल्याच्या वेढ्याच्या बाहेरील मेटावर संरक्षणाकरिता ठेवले. अश्या परिस्थितीत मराठे दोन्ही बाजूने आपल्याला कात्रीत पकडतील आणि आपण त्यांच्या तावडीत सापडू या भीतीने विजरईने वेढा दि.१०-११-१६८३ या दिवशी उठवला आणि गोव्यास परत जाण्यास निघाला. त्याच्या या निर्णयाने पोर्तुगीज सैन्यात एकच घबराट उडाली आणि ते सैन्य दुर्भाटच्या दिशेने पळत सुटले ! (पो.म.सं-९५)

( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी ) भाग 5

 व्हडले राजीक’ – गोव्याची ‘थोरली स्वारी’



( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी )
भाग 5
विजरई ‘कोंदि द आल्व्होर’ याच्या दुटप्पी धोरणाचा आणखी एक नमुना म्हणजे त्याने औरंगजेबाच्या पत्राला दिलेले उत्तर यात तो म्हणतो – “त्याचे (संभाजीचे) पत्र आपणास मिळण्यापूर्वीच आपण संभाजीच्या विनवणीकडे लक्ष न देता मोगल सैन्यास पोर्तुगीज हद्दीतून वाट देण्यास आपल्या अधिका-यास ताकीद दिली होती. ह्या व इतर मदतीबद्दल जो कोकणचा प्रदेश मोगल जिंकून घेतील तो पोर्तुगीजास बहाल करावा”. विजरईच्या आणखी काही अपेक्षा होत्या. त्यास वाटत होते मोगल-मराठा संघर्षामधे संभाजीचा पराभव हा निश्चित होईल तेव्हा वाहत्या गंगेत हात धुवून दक्षिण कोकण पोर्तुगीज अंमलाखाली आणावा हे त्याचे स्वप्न होते. विजरई इथेच थांबला नाही, तर त्याने उत्तर कोकणातून (साष्टी व वसई प्रांत) देखील मुघलांना जाण्यास वाट दिली. मोगलांच्या आरमारास प्रतिबंध करण्यासाठी संभाजी महाराजांनी कल्याण नजीक ‘पारसिक’ येथे किल्ला बांधण्याचे ठरवले आहे ही बातमी समजताच त्याने अंजदीव बेटा प्रमाणे तिथे देखील किल्ला बांधला.(पो.म.सं-९१) यावरून हे प्रत्ययास येते की ही फिरंगी मंडळी अत्यंत जागरूक होती. यांच्या चेह-यावर एक आणि मनात एक असे दुटप्पी वागणे असत. अश्या वागण्यामुळे मराठा -पोर्तुगीज संबधामधे वितुष्ट येण्यास सुरवात झालीच होती. त्यात मोगलांना केलेल्या उघड मदतीमुळे मराठा-पोर्तुगीज सलोख्याचे संबध जवळ-जवळ संपुष्टात आले होते.
कोंदि द आल्व्होर याचे साहस तर एवढे वाढले की जणू त्याची काही परिसीमाच नसावी. त्याने आता खुद्द संभाजी महाराजांनाच जिवंत पकडण्याचा मनसुबा रचला. असे करून औरंगजेबाची मर्जी संपादन करणे आणि आपल्या पदरात कोकणातील मुलुख पाडून घेणे हे प्रयोजन ! त्याने रचलेल्या कटाचा उल्लेख मिळतो तो पुढील प्रमाणे – ” प्रतिवर्षी श्रावण महिन्यात गोकुळअष्टमीस भतग्रामातील नारावे येथे जत्रा भरत असे. त्यावेळी पंचगंगा ह्या नदीत स्नान करण्यासाठी हजारो लोक जातात. ह्या नदीच्या दक्षिण तीरावर दिवाडी हे बेट आहे व उत्तर तीरावर भतग्रामातील नारावे हे गाव आहे. दिवाडी बेट पोर्तुगीजांच्या अमलाखाली होते तर नारावे हे संभाजीच्या राज्यात होते दि. १२-८-६८३ रोजी कोंदि द आल्व्होर यास बातमी आली की संभाजीराजा नारव्यास नदीत स्नान करण्यासाठी येणार आहे असे झाल्यास त्यावर अचानक छापा घालून पकडण्याचा विचार होता पण संभाजी महाराज आलेच नाही आणि कोंदि द आल्व्होर याचा बेत फसला ” (पो.म.सं-९३)

( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी ) भाग 4

 व्हडले राजीक’ – गोव्याची ‘थोरली स्वारी’


( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी )
भाग 4
यावेळी खासा औरंजेब दख्खन काबीज करावयाच्या हेतूने दिल्लीहून निघाला होता. संभाजी महाराजांना कोंडीत पकडण्यासाठी त्याने पोर्तुगीजांना हाताशी धरले आणि आपला वकील शेख महंमद यास गोव्यास पत्र घेऊन पाठवले. यात औरंगजेब लिहितो – ” मोगल बादशाहने संभाजी विरुद्ध युद्ध पुकारले आहे.पोर्तुगीजांनी देखील संभाजी विरुद्ध युद्ध करावे अशी बादशाह यांची इच्छा आहे. तसेच मोगलांच्या सैन्यास पोर्तुगीजांच्या प्रदेशातून धान्य विकत घेण्यास परवानगी असावी आणि सुरतहून मुंबईला येणा-या मोगलांच्या तारवांस व काफिलांस पोर्तुगीजांकडून उपद्रव होऊ नये “. हे पत्र गोव्यास २०-१-१६८३ रोजी पोहचले. आता मात्र विजरईची चांगलीच अडचण झाली. औरंगजेब आणि मुघल सैन्य किती बलवान होते हे त्यास माहिती होते. त्यांना विरोध करणे सोयीचे नव्हते तर इकडे मराठ्यांसोबत तहाची बोलणी सुरु असताना औरंगजेबाला साथ देणे म्हणजे दुहेरी पेचात अडकण्यासारखे होते. विजरईने औरंगजेबाची विनंती मान्य केली खरी पण संभाजी महाराजांशी युद्ध करण्याची अट नाकरली. औरंगजेबाच्या या पत्राचा मजकूर पोर्तुगीज भाषेत असल्याने त्याने ते पत्र भाषांतरित करून घेण्यासाठी हे पत्र निकोलाय मनुची याकडे पाठविले. मनुचीने ते पत्र वाचून नंतर स्वतः विजरईस सल्ला दिला की ” या नीतीने पोर्तुगीजांचे काहीही भले होणार नाही. औरंगजेबाने एकदा संभाजीचा नाश केला की मग त्यानंतर तो पोर्तुगीजांना स्वस्थ बसू देणार नाही “ आणि मग विजरईने संभाजी विरोधात युद्ध पुकारले. (अ.हो.मो-२१२) विजरईचे धोरण आता दुटप्पी पणाचे होते हे यावरून लक्षात येते. यासोबतच औरंगजेबाचे धूर्त धोरण देखील विजरईसं पाठवलेल्या पत्रातून स्पष्ट होते. शत्रूचा जो शत्रू तो आपला मित्र या सूत्राने औरंगजेबाने विजरईस संभाजी महाराजांविरोधात युद्ध करावयास सांगितले होते.

( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी ) भाग 3

 व्हडले राजीक’ – गोव्याची ‘थोरली स्वारी’


( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी )
भाग 3
१६८२ च्या सुरवातीस संभाजी महाराजांनी कारवार जवळील अंजदीव बेट घेऊन त्यावर किल्ला बांधण्याची तयारी केली. विजरई याचा सेक्रेटरी ‘दोतार-लुईस-गोंसाल्व्हीस-कोत’ याने ही बातमी पत्राद्वारे कळवली त्यात तो लिहितो – ” आताच दुभाष्याने मला येऊन सांगितले, संभाजीने दगड व चुना अंजदीव बेटाकडे पाठवला असून तेथील कामास जो पैसा खर्च होईल तो खर्च करण्याची आज्ञा दिली आहे. ” या पत्राची तारीख आहे दि.२९-४-१६८२.बातमी मिळताच विजरईने त्याच्या मंत्र्यांची बैठक बोलावली आणि लगेच अंजदीव बेट मराठ्यांच्या ताब्यात जाण्यापूर्वी आपण बेटावर सामान व माणसे पाठवून किल्ला बांधावा व तेथे सहा तोफा ठेवाव्या तसेच सदर बेटाच्या रक्षणार्थ काही लढाऊ ‘तारवे’ ठेवावी अशी आज्ञा केली. अंजदीव बेट मराठ्यांकडे जाणे ही धोक्याची घंटा होती हे विजरई चांगल्याच प्रकारे जाणून होता. कर्नाटकातून येणारी साधन-सामग्री सागरी मार्गाने अंजदीव बेटाच्या जवळून येत असे. शिवाजी महाराजांनी ‘हेंद्री-केंद्री’ येथे किल्ला बांधल्यापासून चौलला उपद्रव होऊ लागला होता हे तो जाणून होता व असा धोका परत न पत्करणे योग्यच हे ठरवून त्यांनी अंजदीव बेटाचा ताबा घेतला. दि.२-७-१६८२ रोजी आमरू सिमोंइस पेरैर याने किल्ला बांधण्यास सुरवात केली व ६ महिन्याच्या आत किल्ला बांधून काढला. संभाजी महाराजांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी आपल्या वकिलामार्फत विजरईकडे विचारणा केली असता – ” हे बेट आमचे असल्यामुळे संभाजीस बोलण्याचा अधिकार नाही असे उर्मटपणे उत्तर विजरईने दिले “ (पो.म.सं-८८) संभाजी महाराजांना ही गोष्ट सहन झाली नाही, तरीदेखील संभाजी महाराजांनी अगोदर थोडे नरमाईचे धोरण स्वीकारले. मराठा पोर्तुगीज संबंध बिघडण्यास सुरवात झाली होती खरी पण यावेळी कुणीच उघडपणे शत्रुत्व घेत नव्हते. दि.२८-७-१६८२ रोजी विजरई याने संभाजी महाराजांना पुत्रप्राप्ती झाल्यामुळे अभिनंदनाचे एक पत्र पाठवले. सोबत त्याने नजराणा म्हणून एक दागिना पाठवला. पत्रास उत्तर म्हणून संभाजी महाराजांनी विजरईस आपण डिचोली आणि कुडाळ परिसरात दारूचे (तोफेची दारू) कारखाने उभारल्याची बातमी दिली. कर्नाटक येथून मराठ्यांसाठी येणा-या सामानास पोर्तुगीजांच्या आरमाराचा त्रास होऊ नये असे देखील या पत्रामधे नमूद करण्यात आले होते.(पो.म.सं-९०)

( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी ) भाग 2



 ‘व्हडले राजीक’ – गोव्याची ‘थोरली स्वारी’

( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी )
भाग 2
खऱ्या अर्थाने या स्वारीची सुरवात होते ती शिवाजी महाराजांच्याच काळात. राज्याभिषेकानंतर अवघ्या एक वर्षातच शिवाजी महाराजांनी ‘वैशाख शु २ १७ एप्रिल १६७५ रोजी फोंडा किल्ला जिंकून घेतला’.(जे.श) पोर्तुगीजांचा प्रदेश असणारा व किनारपट्टी लाभलेला आणि व्यापाराला अनुकूल असणारा गोमांतक प्रदेश मराठ्यांच्या अंमलाखाली असावा ही शिवाजी महाराजांची खूप जुनी मनीषा होती. पण मुघल आणि पोर्तुगीज यांच्या सोबत एकाच वेळी लढणे शक्य नव्हते. याच काळात शिवाजी महाराजांनी दक्षिणेची मोहीम देखील हाती घेतली होती. एकाच वेळी सर्वाना तोंड देणे हे काही शक्य नव्हते यामुळे पोर्तुगीजांवर स्वारीचा विचार शिवाजी महाराजांनी तूर्तास रद्द केला असावा. या निर्णयामुळे पोर्तुगीजांच्या जीवात जीव आला व ते गोव्यात आपले हात पाय पसरू लागले. काही वर्षाच्या अंतरानी शिवाजी महाराजांचा कैलासवास झाला. यावेळी संभाजी महाराजांनी गोव्याचा विजरई अंतोनियो-पाइस-द-सांदे याला महाराजांच्या निधनाची बातमी पत्राद्वारे दिली. यावेळी मराठ्यांचा वकील हा रामजी नाईक ठाकूर होता. ५ मे १६८० रोजी रामजी नाईक सोबत विजरईने सलोख्याचे पत्र पाठवले यात पोर्तुगीज व मराठे यांच्यात मैत्रीचा तह करण्यासंदर्भात मसुदा होता, पण याबद्दल पुढे काही हालचाल झाली नाही. यानंतर बरोबर १ वर्षाच्या अंतराने मे १६८१ च्या सुमारस संभाजी महाराज डिचोलीला गेले. याच सुमारास विजरईने संभाजी महाराजांना एक पत्र लिहिले त्यात तो लिहितो – ” शिवाजी महाराजांच्या मरणानंतर ज्या काळी तुम्हास सर्व गोष्टी अनुकूल नव्हत्या त्यावेळी तुमच्याशी आम्ही कशी वर्तवणूक ठेवली ” – याची आठवण त्याने या पत्राद्वारे करून दिली. यानंतर येसाजी गंभीरराव हा गोव्यास व्यापार व तहाची बोलणी करण्यासाठी गेला. (पो.म.सं-८७)
या सुमारास ‘दो-फ्रांसिस्कू-द-ताव्हर- कोंदि- द-आल्व्होर’ हा गोव्याचा नियुक्त विजरई (Viceroy) म्हणून कारभार पाहत होता.

( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी ) भाग १

 ‘व्हडले राजीक’ – गोव्याची ‘थोरली स्वारी’


( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी )
भाग १
पोर्तुगीज भारतात व्यवसाय करण्याच्या हेतूने आले आणि इथेच कायमचे स्थायिक झाले. या पोर्तुगीजांना ‘गोव्याचे फिरंगी’ अथवा ‘वसईचे फिरंगी’ या नावाने देखील ओळखले जात असे. मराठे आणि पोर्तुगीज यांचे संबध शिवाजी महाराजांपासूनच कधीच सलोख्याचे नव्हते. ज्यावेळी पासून ह्यांचा संबध स्वराज्यासोबत आला त्यावेळ पासून ह्यांचे धोरण एकच – ‘मुघल-मराठा संघर्षामधून फायदा घायचा’. यांची ही असली दुटप्पी निती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज चांगलीच ओळखून होते. शिवाय पोर्तुगीज मंडळी ‘धर्मांध’ वृत्तीची. इतर धर्माच्या लोकांना त्रास देणे हा त्यांचा ‘उद्योग’ सतत सुरु असे. याचा प्रत्यय खुद्द शिवाजी महाराजांना देखील १६६७ साली आला होता. अश्या दुटप्पी वागणा-या फिरंग्यांनी कधीच मराठ्यांशी सख्य ठेवले नाही. लहान मोठे खटके हे अधून-मधून कायमच उडत असत. त्यामुळे त्यांचे समूळ उच्चाटन करणे जरुरी होते आणि याच कारणास्तव श्रीशंभूछत्रपतींनी गोव्यावर एक नियोजित ‘थोरली स्वारी’ आखली. सदर प्रकरणामधे संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी, या स्वारीत केलेला पराक्रम, गोव्याचा विजरई (Viceroy ) कोंदि द आल्व्होर याची झालेली फजिती, मराठ्यांनी गोव्यात घातलेला धुमाकूळ या सर्व घटना क्रमाने पाहणार आहोत.

Saturday, 27 March 2021

*'संभाजीकेन च भ्रात्रा ज्वलज्ज्वलनतेजसा'*

 



*'संभाजीकेन च भ्रात्रा ज्वलज्ज्वलनतेजसा'*
- केशवपंडित
*छत्रपती संभाजी महाराज यांना ज्वलज्ज्वलनतेजस ही बिरुदावली कोणी प्रदान केली ?
छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावासमोर जी विशेषणे किंवा बिरुदे लावली जातात त्याविषयी एक लेखमाला लिहिण्याच मागे बोललो होतो त्यातील हा पहिला लेख.
शिवरायांच्या निधनानंतर तलवार व लेखणीच्या जोरावर गाजवलेली ९ वर्षांची झंझावाती कारकीर्द.परकीयांसहित स्वकीयांचाही विरोध असताना प्रखरपणे लढतच राहिले असे संभाजी महाराज.संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर औरंगजेबाने स्वराज्य नष्ट करण्याचा डाव आणखीन तीव्र केला.झुल्फीकारखान याने रायगडाला वेढा दिला.यावेळी छत्रपतींच्या परिवारातील सर्व मंडळी रायगडावर होती.अश्या वेळी जर रायगड पडला तर सर्व कुटुंब मुघलांच्या कैदेत जाईल पण महाराणी येसूबाई यांनी अत्यंत हुशारीने छत्रपती राजाराम महाराज यांना रायगडावरून बाहेर काढून दिले व रायगड मुघलांच्या ताब्यात दिला आणि शाहुराजे यांच्यासमवेत त्या कैद झाल्या(यामध्ये शिवरायांच्या पत्नी सकवारबाई या पण कैद झाल्या).
येथुन राजाराम महाराजांचा स्वराज्य वाचवण्यासाठीचा एक खडतर असा रायगड ते जिंजी प्रवास चालु झाला.
या प्रवासाची माहिती व छत्रपती राजाराम महाराज यांचे चरित्र तत्कालीन कवी व पंडित केशवभट दामोधरभट उपाध्ये यांनी १६९० साली राजारामचरितम् या संस्कृत ग्रंथात लिहिले.सध्या या ग्रंथाची हस्तलिखित प्रत तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालय येथे आहे.या ग्रंथात एकुण पाच सर्ग आहेत यातील तिसऱ्या सर्गात संभाजी महाराज यांचे ज्वलज्ज्वलनतेजस असे वर्णन केलेला श्लोक.....
महाराजेन पित्रास्य घातुकेन महीभृताम् |
श्रीशिवछत्रपतिना सिंहासननिषेदुषा || ५ ||
संभाजीकेन च भ्रात्रा "ज्वलज्ज्वलनतेजसा" |
विलुंठितेषु सर्वेषु पौरजानपदेषु च || ६ ||
*मराठी अर्थ - सिंहासन लालसेने महीपालांचा पाडाव करणारे त्यांचे पिता श्री शिवछत्रपती व जळजळीत ज्वलंत अश्या तेजाने चमकणारे भाऊ संभाजी यांच्यामुळे विरहित झालेले राजाराम महाराज.
१६९० सालीच केशवपंडित यांनी संभाजी महाराज यांच्यासाठी प्रदान केलेले बिरुद.यासाठी त्यांनी संभाजी महाराजांची संपुर्ण कारकीर्द अत्यंत जवळुन पाहिली असल्याने त्यांनी हे बिरूद फक्त आणि फक्त त्यांनाच प्रदान केले.समकालीन पुराव्यानुसार संभाजी महाराज यांची अशीच ज्वलज्ज्वलनतेजस प्रतिमा आपल्याला पहावयास मिळते.डॉ.सदाशिव शिवदे यांनी महाराजांवर लिहिलेल्या चरित्रग्रंथाला 'ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा' हेच नाव दिले.
*केशवपंडित कोण होते ?
केशवपंडित यांचे पुर्ण नाव केशवभट दामोधरभट उपाध्ये.हे राहणार मुळचे कोकणातले शृंगारपूरचे.तेथे ते उपाध्याय होते.छत्रपती शिवाजी महाराजांनी सुर्वे यांच्याकडून शृंगारपूर ताब्यात घेतले तेव्हा ते स्वराज्याच्या चाकरीत रुजू झाले.केशवभट, गणेशभट, कवी कलश व शिवयोगी पंडित यांनी २३ मार्च १६७८ ला संभाजी महाराजांचा कलशाभिषेक केला.यांनीच संभाजी महाराजांना काली व तुळजाभवानी देवीची उपासना करण्यास सांगितले व ते शाक्त उपासक बनले.केशवभट यांनी शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना प्रयोगरुप रामायण सांगितलेले आहे.केशवभट यांनी संभाजी महाराजांनी लिहिलेल्या बुधभूषण ग्रंथातर्गत दंडनिती हे प्रकरण लिहिले.याशिवाय त्यांनी धर्मकल्पकता, राजारामचरितम, परभूकथा याशिवाय आणखीही काही ग्रंथाचे लिखाण केले असावे असे मत वा.सी.बेंद्रे यांनी मांडले आहे.ते स्वराज्याशी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिले.
*संदर्भ साहित्य :
१) केशवपंडितकृत श्री छत्रपति राजाराम महाराज यांचे चरित्र जिंजीचा प्रवास - संपादक वासुदेव सीताराम बेंद्रे
२) परमानंदकाव्यम् - संपादक डॉ.सदाशिव शिवदे अनुवादक डॉ.स.मो.अयाचित
३) शिवपुत्र संभाजी - डॉ.सौ.कमल गोखले
४) छत्रपति संभाजी महाराज संस्कृतसाहित्य - संपादन प्रा.रामकृष्ण आनंदराव कदम
५) छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ - डॉ.जयसिंगराव पवार
६) ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा - डॉ.सदाशिव शिवदे
लेखन - सुशांत संजय उदावंत
'तुळजाई'नाथापुर,बीड
दि२४/०३/२०२१

Saturday, 20 March 2021

औरंगजेबाच्या दरबारातील आणि शंभूराजांच्या हत्येचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या ईश्वरदास नागर याने लिहिलेल्या "फुतूहात-इ-आलमगीर" या ग्रंथातील संदर्भ

 


औरंगजेबाच्या दरबारातील आणि शंभूराजांच्या हत्येचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या ईश्वरदास नागर याने लिहिलेल्या "फुतूहात-इ-आलमगीर" या ग्रंथातील संदर्भ :- ( मूळफारसी भाषेत असलेल्या या ग्रंथाचे मराठी भाषांतर सेतू माधवराव पगडी यांनी केले.)
"बादशहाच्या आज्ञेप्रमाणे इखलास खान आणि बहादूर खान हे संभाजीराजे, कवी कलश आणि त्यांचे इतर साथीदार यांना घेऊन बादशहाच्या छावणीत पोहोचले. बादशाहने आज्ञा केल्यावरून इखलास खान आणि हमिदुद्दीनखान यांनी संभाजीराजे, कवी कलश आणि त्यांचे इतर साथीदार यांची उंटावरून धिंड काढली. त्यांची हजार प्रकारे फजिती करण्यात येत होती. अशाप्रकारे त्यांना छावणीत आणण्यात आले. संभाजीराजेंनी बादशहा संबंधी न झेपणारे शब्द उच्चारले आणि त्याची निंदानालस्ती केली.
त्यांनी जे काही म्हटले ते रुहुल्लाखानाने बादशहाला सांगितले नाही पण ते बोलणे कशाप्रकारचे होते याचा त्याने बादशहाला इशारा दिला. यावर बादशाहने आज्ञा केली कि, संभाजीराजांच्या डोळ्यात सळई फिरवून त्याना नवी दृष्ठी द्यावी, पण संभाजीराजे स्वाभिमानी होते त्यांच्या पहारेकऱ्यांनी त्यांना अन्न सेवन करण्याबद्दल पुष्कळ सांगितले पण त्याचा काही उपयोग झाला नाही, त्यांना काही उपवास घडले.
शेवटी हि बातमी बादशाहाला कळवण्यात आली. बादशाहाच्या आज्ञेने त्यांना वधस्तंभाकडे नेण्यात आले. तेथे त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले. राजांचे डोके औरंगाबादेहून बुऱ्हाणपूरपर्यंत फिरवण्यात आले. यानंतर ते दिल्लीला नेण्यात येऊन शहराच्या द्वारावर लटकावण्यात आले."
(संदर्भ - मोगल मराठा संघर्ष पान ३० ते ३१)

संभाजीराजे अन दिलेरखान प्रकरण

 

छत्रपती संभाजी महाराज 

संभाजीराजे अन दिलेरखान प्रकरण
संभाजीराजे अन दिलेरखान यांची भेट झाली दिनांक १३ डिसेंबर १६७८. दिलेर ने दिलेरपणे संभाजीराजांचे स्वागत करताना एक हत्ती, तीन घोडे, पोशाख, तलवार, चौघडा हा नजराना दिला. शिवाय संभाजीराजांना ७००० स्वार आणि ७००० जातीच्या मनसबीचे आलमगीर बादशहाचे फर्मान हाती दिले. संभाजीराजे दिलेरच्या छावनित आल्याने दिलेरला निम्मा दक्षिण देश फत्ते केल्याचा आनंद झाला होता.
संभाजीराजांच्या दिलेरखानाला जावून मिळन्याच्या या नवीन आणि अनपेक्षित खेळीने सिद्धिमसूद आणि दिलेरची ८० हजार फौज जी चालून येण्यास तयारच होती, त्या प्रयत्नांच खिळ बसली गेली. याचे वर्णन प्रत्यक्ष इंग्रजांनी करून ठेवले हे बरे.
मुंबईहुन सुरतला गेलेले हे पत्र असे होते.
" शहजादा दक्षिणेस येवून २ महीने झाले आणि शिवाजीचा मुलगा संभाजी दिलेरखानाकडे पळून गेला. परंतु शिवाजी पन्हाळ्यामध्ये ठाणे धरून बसलेले असून मोगल अन आदिलशहा या दोघांनाही ते मोजीत नाहीत. किंवा यापैकी कोणीही त्यांच्यावर चालून जात नाही." या पत्राची तारीख आहे १० मार्च १६७९.
आता आपणच विचार करा हे कसे घडले. संभाजीराजे १३ डिसेंबरला दिलेरच्या छावनित गेले. तेव्हा पासून म्हणजे १० मार्च हे पत्र लिहालेले गेले. तोवर सगळे स्तब्ध कसे. ना विजापरकरांनी स्वराज्यावर हमला केला ना दिलेरने स्वराज्याविरोधात मोहिम उघडली या दोन्ही शत्रूंना जागच्या जागी खिळवुन ठेवण्याचे यशस्वी राजकारण कोणी केले! याचे उत्तर आहे शिवाजीराजे अन संभाजीराजांच्या या अभूतपूर्व खेळीने.
संभाजीराजे विशिष्ट उद्देशाने दिलेरला मिळाले असावेत यावर परमानंद यानेही चांगला प्रकाश टाकला आहे. संभाजी राजांनी दिलेरला बहुत किल्ले व बाकीचा मुलुख हस्तगत करून देतो अशी आश्वासने देऊन चांगलेच प्रेरित केले आणि आश्चर्य म्हणजे दिलेरनेही लगेच विश्वास ठेवून विजापुरकरांच्या दिशेने आपला मोर्चा वळवीला. पहा याला म्हणतात की नाही खरा गनिमिकावा?? कालपर्यंत स्वराज्यावर एकत्र चालून जाणारे दोन मित्र संभाजी राजांच्या या वचनामुळे एकमेकांविरुद्ध लढायला तयार झाले.
अन हो अजुन एक शिवाजीमहाराजांनी हंबीरमामांना आदेश दिला पाठलाग करा अन पाहा,
"संभाजीस वाटेतच पकडून इकडे आणावा. बहुत दौडिने फौजेने पाठलाग करवा." आता शिवाजी महाराजांचे नाटक पहा कसे बेमालुम. संभाजीराजांच्या जवळ फक्त ३०० स्वार आणि पाठलाग करणार्या हंबीरमामा यांच्या जवळ २५००० फौज. हंबीररावांनी महाराजांच्या आदेशाप्रमाने अत्यंत वेगाने पाठलाग केला दरम्यान संभाजी राजांनी वाटेत दोन दिवस मुक्काम केला तरी तरी मोहिते त्यांना पकडू शकले नाही????
लेख साभार : golden.history.of.maharashtra

Thursday, 18 March 2021

वयाच्या १३ व्या वर्षी राजकारण करणारा राजा


वयाच्या १३ व्या वर्षी राजकारण करणारा राजा
एक छोटासा किस्सा :
मित्रांनो संताजी घोरपडे यांना शिवाजी महाराजांनी अंगरक्षक म्हणून संभाजी राजे यांच्या सोबत मोघलांशी झालेल्या तहामुळे शहजादा मुअज्जम औरंगाबादेत दोनदा जाव लागले.शहजादा मुअज्जम चे वय संभाजी राजे यांच्या पेक्षा किती तरी लहान होते म्हणजे फक्त १३ वर्ष ..!
संभाजी राजे यांच्या संगतीत चांगले च रमले नाच-गाण्यात बसू लागले..
मोघली कपडे घालू लागले त्
याचं हे सगळ बघून संताजी ना राहवलं नाही...
तेंव्हा संताजी म्हणतात महाराज हे आपल्याला शोभत नाही हे काय चाललय तुम्हला महाराजांनी कशासाठी पाठवल आहे ...
पण तेंव्हा राजे म्हणतात तुम्ही आम्हाला विचारणारे कोण....?
त्या नंतर महाराज संताजीना भेटतात व म्हणतात आम्हला अस उलट प्रश्न कोणी विचारला नव्हता ..व संभाजी राजे माफी मागतात व म्हणतात आम्ही तुम्हाला बोललो ...
पण आमचही ऐका हे राजकारण आहे थोरल्या महाराजांनी सांगिलत होत कि शहजाद्याशी गट्टी जमवा...
शाजाद्या आपलस बनवा त्यास वाटले पाहिजे कि आपण सच्चे दोस्त आहोत... म्हणून हे सगळ सोंग करावी लागतात संताजीबाबा..
तेंव्हा संताजी थक्क होऊन जातो...
आणि मनात म्हणतो तेरा वर्षाच्या चीमुकल्याला राजकारणात इतका समज असू शकतो..?
एवढा पोक्तपणे बोलू वागू शकतो..?
या वयात मुलांना खेळायच समजत नाही...
हे राजे राजकारण खेळतात ...
संत थक्क होतात
-संदर्भ ...संताजी कादंबरी...

 

Tuesday, 2 February 2021

छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वर येथे कैद व म्हाळोजीबाबा घोरपडे यांचे वीरमरण

 

छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वर येथे कैद
व म्हाळोजीबाबा घोरपडे यांचे वीरमरण 
 
लेखन 
डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर

 
सरलष्कर म्हाळोजीबाबा घोरपडे यांना स्मृतिदिनानिमित्त मानाचा मुजरा 
"लाख गेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जाता कामा नये." म्हणून छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी शेवटच्या श्र्वासापर्यत गनिमाशी लढणारे स्वराज्यासाठी एक नव्हे, दोन नव्हे तिन पुत्र देणारे (सरसेनापती संताजी, बहिर्जी व मालोजी घोरपडे) महापराक्रमी सरलष्कर म्हाळोजीबाबा घोरपडे यांची आज पुण्यतिथी. आपल्या या महापराक्रमी पुर्वजाच्या पवित्र स्मृतीस अभिवादन.
आपल्या ज्वलंत पराक्रमाने
मराठ्यांच्या इतिहासात चमकणारे घोरपडे ते मूळचे भोसलेच होते. बहामनी काळात घोरपडीच्या साह्याने विशाळगड किल्ला जिंकल्यामुळे त्यांना 'राजे घोरपडे बहाद्दर ही पदवी बहामणी सुलतानांनी दिली व त्यांचे आडनाव भोसले ऐवजी घोरपडे रूढ झाले.
१६५२ मधे शहाजीराजांचे थोरले पुत्र संभाजीराजे हे पन्हाळ्याची सुभेदारी सांभाळत असताना म्हाळोजी बाबा संभाजीराजांच्या तैनातीत होते.१६५४ मधे अफझलखानाच्या कारस्थानामुळे संभाजीराजे कनकगिरीच्या लढाईत मारले गेले. त्यानंतर म्हाळोजी बाबांनी आपली सेवा छत्रपती शिवरायांकडे रुजू केली. शिवरायांनी पन्हाळा जिंकल्यानंतर पूर्वीपासून या भागाचा अनुभव असल्याने म्हाळोजी बाबांना या भागात नेण्यात आले.
छ. शिवरायांच्या मृत्यूनंतर शंभूराजे छत्रपती झाले.म्हाळोजी बाबांनी आपली निष्ठा शंभूराजांच्या चरणी अर्पण केली.यावेळी म्हाळोजीबाबांचे पुत्र संताजी,बहिर्जी व मालोजी स्वराज्यात तलवार गाजवीत होते. छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने महाराष्ट्रात येऊन मराठ्यांच्या राज्यावर हल्ला केला. छत्रपती शंभूराजांनी अतिशय जिद्दीने ,चिकाटीने आणि दुर्दम्य इच्छाशक्ती ने आपल्याहून कैकपट मोठ्या मोगली सैन्याला प्रचंड धावपळीच्या लढाया मारून सुरुवातीच्या काळात यश मिळू दिले नाही. म्हाळोजीबाबांचे पुत्र पराक्रमी संताजीराव हेही या धामधुमीच्या काळात शत्रुंना आपल्या तलवारीचे पाणी पाजत होते. या सर्व काळात म्हाळोजीबाबा हे पन्हाळा सुभ्याचा बंदोबस्त चोख ठेवत होते.
शंभूराजाच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या प्रखर प्रतिकाराने नाउमेद होऊन औरंगजेबाने आपला मोर्चा विजापूरची आदिलशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही यांच्याकडे वळविला .प्रचंड सैन्यासह वेढा घालून औरंगजेबाने १६८७ पर्यंत या दोन्ही शाह्या नष्ट केल्या. त्यांचे सैन्य, खजिना, युद्धसामग्री यांच्या समावेशाने औरंगजेबाचे सामर्थ्य आणखीनच वाढले. या सामर्थ्यामुळे औरंगजेब आता मराठ्यांच्या वर तुटून पडला .अशातच मराठ्यांचे सेनापति हंबीरराव मोहिते हे आॅक्टोबर १६८७ मध्ये वाई येथे धारातिर्थी पडले. मोगल मराठा संघर्षाच्या या विलक्षण धामधुमीच्या काळात औरंगजेबाला हवी होती ती घटना घडली. छत्रपती शंभुराजे संगमेश्वर येथे मुघलांच्या हाती लागले.
१६८८ मध्ये विशाळगडावरून रायगडाकडे जाताना संगमेश्वर येथे थांबले. इथे रयतेच्या तक्रारींचा निपटारा करण्यात त्यांचे दोन दिवस गेले.१ फेब्रुवारीला रायगडाकडे निघण्याचे ठरवून काही राहिलेली कामे उरकत असतानाच त्यांच्या पाळतीवर असणारा शेख निजाम हा मोगली सरदार अचानक मोठे सैन्य घेऊन संगमेश्वरला धडकला. शंभूराजे बरोबर यावेळी फक्त ५०० सैन्य होते. म्हाळोजीबाबा ,संताजी व त्यांचे बंधू खंडोबल्लाळ हे सर्वजण शंभूराजे बरोबर होते.शेख निजामाने संगमेश्वर वेढून आक्रमण करताच सर्वांनी जमेल तसे वेढा फोडून रायगडाकडे जाण्याचे ठरवून प्रतिआक्रमण केले. संताजी राव व खंडोबल्लाळ मोगलांची फळी तोडून निसटले . म्हाळोजीबाबा ,कवीकलश व शंभूराजे यांना मोगलांनी पक्के घेरले .या अटीतटीच्या प्रसंगी म्हाळोजीबाबांनी लढाईचा भार पुढे होऊन आपल्या अंगावर घेतला. आपला राजा वाचला पाहिजे या विचाराने बेभान होऊन ते मोगलांशी लढू लागले. पण लढाईच्या धुमश्चक्रीत प्राणपणाने झुंजणारे म्हाळोजीबाबा प्राणांतिक जखमा होऊन रणांगणावर धारातीर्थी पडले.
छत्रपती शंभूराजांना वाचविण्यासाठी त्यांनी आपले प्राण दिले तेव्हा ते ६९ वर्षाचे होते. सतत बावन्न वर्ष स्वराज्याची सेवा बजावून म्हाळोजीबाबा धारातीर्थी पडले. म्हाळोजीबाबा पडल्यानंतर जखमी कवीकलशांना वाचवण्यासाठी मागे फिरलेल्या छ. शंभूराजांना मोगलांनी कवी कलशांसह कैद केले. स्वराज्याचे छत्रपती औरंगजेबाच्या अजगरी विळख्यात सापडले.
संगमेश्वरच्या पूर्वेला १३ किलोमीटर अंतरावर कारभाटले हे गाव आहे .या गावातील घोरपडे वाडीत ग्रामदैवत काळीसरी देवीच्या मंदिराच्या उजव्या बाजूला पाच शिवकालीन समाध्या आहेत. यापैकी सर्वात पुढे असलेली समाधी ही म्हाळोजीबाबांची समाधी म्हणून ओळखली जाते. घोरपडे मंडळी पुर्वापार चालत आलेल्या माहितीवरून या समाधीचे पूजन करतात.
अशा या प्रामाणीक, स्वराज्याचे निष्ठावंत म्हाळोजीबाबा घोरपडे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा.

Wednesday, 7 October 2020

#रणधुरंदर_संभाजी_राजा

 

[ छत्रपती संभाजी महाराज आणि मराठे ह्यांच्या धाडसीपणामुळे मोगल सरदारांची मनसब थांबवण्याची औरंजेबची कडक सूनवाई ]
मराठ्यांनी मोगलांच्या प्रदेशातील समृद्ध गावांवर रोख धरला होता तसेच मोगलांनी मराठा सरहद्दीवरील व इतर गडांना वेढे दिले होते पण ते परतवून लावण्याचे मराठ्यांनी शिकस्तीपणे करत असता मोगलांचा प्रदेश उध्वस्त करून तिथे लूटमार करण्याचे धोरण मराठे अवलंबित होते . वऱ्हाड समृद्ध असल्यामुळे तिथे लूटमार करण्यास मराठ्यांना चांगला वाव होता .
असाच प्रकारचा हल्ला करून मराठ्यांना दुहेरी फायदा मिळत होता कारण शब्दास पूर्ण करणारे मराठे सैन्य ह्यांना संभाजी राजियांनी स्वराज्य चांगलाच समजवून दिला होता. सैन्य वाढवून पोसण्यासाठी पैसा मिळत होता आणि त्याच
लुटा-लुटीमुळे शत्रूचं नुकसान फार झाले .
हा मराठ्यांचा धक्का मोगलांना स्वस्त बसू देत नव्हता . इ, स १६८३ च्या मार्च महिन्यामधे मराठे वऱ्हाडात मधे गेल्याचे कळताच मोगल सरदार खान जहान बहाद्दूर त्यांना तंबी देण्यासाठी गेला. मराठा फौजा वऱ्हाडात सारख्या फिरत होत्या , त्यात एक तुकडी अकोल्याकडे गेल्याचे कळताच त्या तुकडी वर बऱ्हाणपूरचा नाजीम सय्यदमुनबर्रबखान चालून गेला तेव्हाच मराठ्यांची एक तुकडी बाळापूर मधे चौथाई वसूल करण्यात गेली होती .
त्याच पुढे मराठे जामोधाजवळ चौथाई वसुली करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांची मोगल शेखशहा याशी लढाई झाली त्यात कईक मराठे माती साठी प्राण देऊन आपली निष्ठा संभाजी राजे आणी स्वराज्यसाठी जोपासली आहे.
दुसऱ्या मराठा तुकडीने बादशाही मुलुखातील अकोला तालुक्यातील मौजे मकनगाव मधे जाऊन ते लुटले आणि जनावरे पळवताच हे कळता मुघल सरदार सैफुहखान चवताळला होता .
खानजहान बहादूरने मराठ्यांबरोबर तळेगाव येथे सामना केला पण तोपर्यंत मराठे चांद्याच्या गावावरून हैदराबाद मधे पोहोचलेले तर काही मराठे एलीचपुरला गेले. ह्या सर्व बातम्या औरंगजेब वारंवार ऐकून हैराण झाला आणि त्याने आपल्या सरदारांना तंबी देऊन सांगितले कि मराठ्यांना कैद करावे किंव्हा त्यांचा पाठलाग करावा आणि हे न जमल्यास त्या सगळ्या सरदारांची मनसब थांबविण्यात येईल , [[ एवढा थरार संभाजी राजे ह्यांनी आपल्या धर्यशीलता औरंगजेब च्या मनात बसवून ठेवला होता ]] . ह्यावरूनच मराठ्यांनी गनिमी कावा करून मुगलास लुटले व त्यांना हैराण करून संभाजी राजे ह्यांमुळे यश प्राप्त केला आहे .

#रणधुरंदर_संभाजी_राजा
Ref -
१) सेतू पगडी , मोगल मराठा संघर्ष
२ ) डॉ - वि . गो . खोबरेकर

अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

  अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...