विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label यादवकालीन खानदेश. Show all posts
Showing posts with label यादवकालीन खानदेश. Show all posts

Sunday, 18 April 2021

खानदेशातील मानवी वसाहतीचा इतिहास



 खानदेशातील मानवी वसाहतीचा इतिहास

पुरातत्वेत्यांनी गिरणा आणि तापी नदीच्या परिसरात केलेल्या उत्खननामुळे या प्रदेशातील प्रागैतिहासिक काळातील भटक्या मानवाची वस्तुरूप संस्कृती काही प्रमाणात उजेडात आली. तापीच्या खोऱ्यात जवळपास पंधराशे एवढी मानवी वसतीचे पुरावे असलेली स्थळे डॉ.वसंत शिंदे आणि इतर तज्ञांनी शोधली आहे. या दोन्ही नद्यांच्या काठी मिळालेल्या प्राचीन अश्मयुगीन हत्यारांमुळे जळगाव परिसरात एक-दीड लाख वर्षांपूर्वी मानव वस्तीला राहत असावा. चांगदेवपासून अवघ्या तीन किलोमीटर आग्नेयेस असलेल्या मानेगावी आद्य पुराश्म युगातील म्हणजे काही अवशेष सापडले आहेत.
बी.पी.बोपर्डीकर यांनी उत्खनन केले आहे. "Early stone age site at Manegav of the Purna river, Jalgaon district Maharashtra, indian antiquity असा त्यांचा लेख इंडियन अंटीक्वेरी खंड 4 मध्ये 1970 मध्ये प्रसिद्ध झाला.
पाटणे या गावी चाळीसगाव तालुक्यातील, मध्यपुराश्म युगाच्या(middle paleolithic) म्हणजे शेवटच्या काळापासून उत्तर पुराश्म युगातील म्हणजे अप्पर पेलीओलेथिक आणि त्यापुढील मध्याश्मयुगातील म्हणजे मेझोलेथिक काळात मानवी वसाहतींचे यांचे पुरावे आढळले आहेत. पाटणे येथील उत्खननाचा रिपोर्ट बघितल्यास आपल्यास ही माहिती मिळते. पाटणे बद्दल सविस्तर वेगळा लेख लिहिन. यावरून खानदेशात इसवी सन पूर्व दिड लाख ते एक लाख वर्षे या कालावधीत मानवी वसाहत होती. गिरणेच्या काठी येथे बहाळ आणि टेकवडे येथे 1952 व
57 मध्ये केलेल्या उत्खननावरून ताम्रपाषाण युगात इसवी सन पूर्व २७०० ते इ.स. सहाशे येथे निश्चित मानवी वसतीचे पुरावे मिळाले आहेत.
लासन (Lassen) या इतिहासकारांच्या मते संस्कृत भाषा बोलणारे लोक दक्षिण गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरून तापीच्या खोऱ्यात शिरले व तेथून पुढे पूर्वेकडे गेले तशीच एक वसाहत करणाऱ्यांची लाट पूर्वेकडे आल्याचे काही उल्लेख आख्यायिका मध्ये आहेत. या आख्यायिका ग्राह्य धरल्या तर किंवा काही कणही ग्राह्य धरले तक्ष इसवी सन पूर्व सोळाशे शतकाच्या अगोदर खानदेशातील गडावर विविध राजपूत अधिपतींचे राज्य होते असे अनुमान करता येईल. नाशिकच्या सातवाहन लेणीतील सातवाहन काळातील लेणीतील शिलालेखात ऋषिक हा उल्लेख आहे या प्रदेशात सातवाहन काळात म्हणजे इसवी सन पूर्व 250 ते इ स 250 ऋषिक नावाचे हिमालयात वस्ती करून राहणारे लोक आले. त्यांचा स्वामी कृष्ण, कान्हा, कण्ह असा बदल होऊन कानदेश आणि पुढे खानदेश असे नाव पडले असावे. येथील राजे अभीर म्हणजेच मध्ययुगातील आहेत, जरी ते नंतरच्या काळात उल्लेख सापडतो तरी सुरवातीच्या काळात वसती केली असावी. आसिक हा ऋषिक नावाचा अपभ्रंश मानला तर प्राचीन खिंड आसिरगडला पुष्टी मिळते. त्याविषयी सविस्तर संशोधन लेख मी आशिरगड या पुस्तकात लिहिले आहे. ते अप्रकाशित आहे. ते व्यवसायांनी गवळी होते. म्हणजेच कृष्णाची नाते सांगणारे काही काळ खान्देशावर त्यांनी राज्य केले. नंतरच्या काळात चालुक्य बदामींचे ते मांडलिक दिसतात. तसेच अजिंठा लेणी येथील शिलालेखात उल्लेख असलेले वाकाटक राजांचे मांडलिक राजे अभिर असण्याची शक्यता दिसते. अजिंठा आणि खानदेश या संदर्भात सविस्तर लिहिले आहे. तर नाशिक लेणीतील शिलालेखात शिवपुत्र शिवदत्त याचा पुत्र ईश्वर सेन या राज्याची इसवी सन 419 मध्ये खानदेशावर सत्ता होती असे नाशिक लेणीतील एका शिलालेखातून दिसून येते.
प्राचीन काळ समजून घेण्यासाठी खानदेशात असलेल्या लेणी नाशिक अजिंठा यातील शिलालेखांचा आधार घ्यावा लागतो. स्थानिकांनुसार रामायणातील रामायणकालीन शरभंग ऋषीचा आश्रम उनपदेव चोपडा येथे तालुका चोपडा आणि वाल्मिकींचा आश्रम वालझरी चाळीसगाव येथे होता. तसेच खानदेशात फिरतांना अनेक ऋषिंच्या आश्रमांचा उल्लेख येतो. कानळदा कण्व, शिंगद येथे शृंग इत्यादि अजून उदाहरणे देता येतील. यांची कथा आणि दंतकथा सांगितल्या जातात.
ऋषींचे आश्रम तसेच अजिंठा परिसर गौतम ऋषींचा म्हणून ओळखला जातो, तर महाभारतात उल्लेखलेली एकचक्रा नगरी म्हणजे आत्ताचे एरंडोल असेही सांगतात. इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व तीनशे या काळात विदर्भ खानदेशात आर्य लोक आले, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यात रेणुकामाता आणि तिच्या कथा प्रामुख्याने आहे. अनेक जण तिला कुलदेवता मानतात. दंतकथांवर विश्र्वास नसला तरी काही कण सापडतात एवढं मात्र नक्की.
खानदेशाविषयी पहिला विश्वसनीय संदर्भ टॉलेमी इसवीसन 150 चा लेखनात मिळतो. टॉलेमीने फिलीट आणि कोंडली किंवा गोंडली यांचे मुळस्थान नर्मदा नदीच्या दक्षिणेकडे असल्याचे नमूद केले आहे. ते फिलिट म्हणजे बहुतेक भिल असावेत. आजही खानदेशात बरेच भिल्ल आहेत. भारतात नंतर आलेल्या टोळ्यांनी नर्मदेकाठून भिल्लांना खानदेशात पिटाळले. त्यावेळी खानदेश हीच भिल्लांची मुख्य वसाहत झाली होती. गोंडली याचे गोंधळी या शब्दाशी जसे उच्चार साम्य आहे. तसेच गोंड्या शब्दाचीही आहे. गोंडू गवळी गोंड महार हे गोंडांचेच वंशज असावेत. त्यांची वस्ती चाळीसगाव भागात जास्त प्रमाणात आहे.
नाशिक लेण्यातील इसवीसन 419 च्या एका शिलालेखात नाशिक खान्देश भागांवर अहिरांची सत्ता होती. या काळी या भागात आहिर वंश स्थायिक झाला होता. आज अहिरांपैकी अहिर सोनार, अहिर सुतार, आहिर शिंपी इत्यादी पोटभेद जिल्ह्यात आढळतात. खान्देश शिवाय ते वायव्य सीमा प्रांत, बंगाल, मध्य प्रदेश, कच्छ व काठेवाडतही आहे. ते सिथियन वंशाचे असावेत व मध्य आशिया व पुढे सिंधू खोऱ्यातून भारतात आले असावेत. काहींच्या मते अभीर हे आर्य वंशाचे आहेत. मात्र त्यास विश्वसनीय पुरावा नाही. स्थानिक आख्यायिकेनुसार काठेवाड हे अहिरांचे मुख्य केंद्र होते व येथिल आहिरांचे यांचे बाराव्या व तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांची जवळचे राजकीय संबंध जोडले होते.
गुजरातेतील मुसलमान स्वाऱ्यांना कंटाळून अकराव्या शतकात लेवा पाटीदार व लेवा गुजर हे तापीच्या खोऱ्यात आले. अल्लाउद्दीन खिलजीच्या देवगिरी वरील स्वारीच्या वेळी म्हणजे इ.स.१२९६ मध्ये मुसलमान प्रथमच या भागात आले. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठे दक्षिणेकडून तेथे आले. फारुकी राजवंशाचा संस्थापक मलिक राजा तथा राजा अहमद हा दुसऱ्या खलिफाचा वंशज होता. त्याची राजवट थाळनेरला १३७० पासून सुरू झाली. याच काळात अरब लोक या भागात आले. आठव्या शतकातील राष्ट्रकुट राजांच्या सैन्यात बरेच अरब होते हे दिसते. याच काळात फरिश्ता या इतिहासकाराने नुसार याच काळात पहिल्या दुर्गादेवी दुष्काळात भिल्ल व कोळी वगळता बहुतेकांनी येथून स्थलांतर केले. फारुकींच्या काळात या भागाची भरभराट झाली व शेजारच्या राज्यातील बरेच हिंदू व मुसलमान या भागात येऊन स्थायिक झाले. मुगल काळात येथे भिल्ल व कुणबी यांची भरभराट झाली.
अहमदनगर आणि विजापूरच्या राजवटीचा अस्त झाल्यानंतर तेथे अराजक माजून दक्षिणेत अस्थिरता आली. खानदेशात त्या मानाने शांतता असल्याने बरेच लोक येथे येऊन राहिले. औरंगजेबाच्या कारकिर्दीत खानदेशातील काही हिंदूंनी स्वेच्छेने इस्लाम धर्म स्वीकारला तर अनेकांना बळजबरीने मुसलमान करण्यात आले. खानदेशावर मराठ्यांची सत्ता स्थापन झाल्यावर म्हणजे १७६०-१८१८ हिंदूंना पुन्हा स्थैर्य प्राप्त झाले.
इसवीसन अठराशे तीन मध्ये भयंकर दुष्काळामुळे भिल्ल व कोळी यांच्याशिवाय इतरांनी काही काळ परत स्थलांतर केले. दुष्काळामुळे इथले जनजीवन पार विस्कळीत झाले. स्थलांतरित आणि पैकी बरेच लोक परत आलेच नाहीत. या कालखंडात येथे स्थानिक सरदारांनी उत्तर भारतातील अरब, उत्तर भारतातील परदेशी ब्राह्मण व कर्नाटकातील नाईकडा या तीन जमातींच्या सेना आपल्या पदरी बाळगल्या होत्या.
ब्रिटिश राजवट आल्यावर अठराशे अठरा मध्ये नाईकडा सैन्य हे कर्नाटकात गेले तर अरबहे हैदराबाद कडे गेले, तर काही परदेशी ब्राम्हण मात्र तिथेच शेती व्यवसाय करून स्थायिक झाले. मात्र जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित झाल्यावर विदर्भ व गुजरातमध्ये गेलेले मूळचे लोक परत आले.
हैदराबादचा निजाम व शिंदे यांच्या राज्यातूनही बऱ्याच लोकांनी खानदेशात स्थलांतर केले. तरीही एकोणिसाव्या शतकात बरीच दशके येथे वस्ती विरळच होती. इसवीसन १८५२ मध्ये जिल्ह्याचा बराच भाग विरळ लोकवस्तीचा होता. त्यामुळे उपजीविकेची साधने कमी असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातून लोकांना आणण्याचे प्रयत्न झाले, परंतु एवढ्या दूर लोक यायला तयार नव्हते. उदार शेतसारा पद्धती व रेल्वे सुरू झाल्यावर नजीकच्या भागातून मोठ्या संख्येने लोक आले.इ.स.१७७४ मध्ये खान्देश मिल सुरू झाल्यावर पुणे सातारा भागातील बरेच मराठा मजूर जळगावला आले. तरीदेखील २८७२ मध्ये खान्देश इतर जिल्ह्याच्या मानाने विरळ वस्तीचा गणला जात होता.
ब्रिटिश राजवटीत आलेल्या स्थलांतरित लोकांमध्ये प्रामुख्याने मारवाडी, व्यापारीवर्ग, रंगारी व तेल कामगार वर्ग आणि मराठा व कुणबी व मजूर वर्ग येथे आला.
येथील बंजारी लोक समुद्रकिनाऱ्यापर्यंत बैलगाडीने मालाची वाहतूक करत. रेल्वे आल्यानंतर बंजारांना वाहतुकीच्या बाबतीत रेल्वे स्पर्धा करावी लागली. काहींना पारंपारिक व्यवसाय पूर्ण सोडावा लागला. तांडा नायकांची जवळ भांडवल असल्यामुळे ते व्यवसाय करू लागले व्यापार करू लागले आणि तांड्यातील बाकीचे लोक शेती व्यवसाय करू लागले. काहींनी लुटमारीचा मार्ग स्वीकारला.
आता ह्या भागात झपाट्याने औद्योगिकीकरण होत असून इतर भागातील लोक येथे येत आहेत.
तरीही प्राचीन व्यवस्था, प्राचीन इतिहास आणि व्यवस्था समजून घ्यायला आशिरगड तसेच अजिंठा याचा क्रमाक्रमाने अभ्यास करूया. या आधी या भागात झालेली उत्खनने आणि त्यांचा आढावा घेतल्यास बराच उलगडा होईल.
संदर्भ:१. महाराष्ट्र राज्य गॅझेटियर जळगाव जिल्हा: १९९४
२. हिस्टरी ऑफ मिडीएव्हल डेक्कन, एच.के.शेरवानी,पी.एम. जोशी
३.बी.पी.बोपर्डीकर, अर्ली स्टोन एज साईट ऑट मानेगाव ऑन दि पुर्णा रिव्हर जलगांव डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र, इंडियन अन्टिक्वरी खंड ४

उत्तरपथ आणि दक्षिणपथ जोडणारी पुरातत्विय स्थळे

 













उत्तरपथ आणि दक्षिणपथ जोडणारी पुरातत्विय स्थळे

बौध्द साहित्यातील बुध्दकाळातील बावरीच्या आणि पुर्णावदानातील पूर्णाच्या कथेवरून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे उत्तरपथ आणि दक्षिणपथ यांच्यात व्यापार आणि दळणवळण सुरू होते. बुध्दपुर्व काळात काय स्थिती होती? याचा लेखाजोखा घेण्यासाठी मात्र या प्रदेशात झालेल्या पुरातत्विय स्थळांच्या उत्खननावरून मिळालेल्या भौतिक पुराव्यांच्या आधारेच अनुमान लावता येते. महाराष्ट्रातील सोपारा यासारखे अजून त्याकाळात कुठली बंदरे होती का? याचा अभ्यास करून पडताळून बघावे लागेल. शिवाय सिंधु संस्कृतीच्या काळातील लोथल हे गुजरातमधील अहमदाबाद जवळ असणारे प्राचीन नगर आणि बंदर होते हे पुरातत्विय तज्ञांनी सिध्द केले आहे. तसेच महाराष्ट्रात कुठले बंदर होते का ? या स्थळावरील उत्खननावरून जवळपास गुजरात किनाऱ्यावर वाहतूक आणि तिथल्या गोदामांवरून व्यापार होत होता याची प्रचिती येते. याचा खानदेशाशी संबंध काय ? हा व्यापार तर सिंधू लोकांशी म्हणजे उत्तरेकडील राज्यांतील लोकांशी चालत होता का असा प्रश्न पडू शकतो.
उत्तर महाराष्ट्रातील पुरातत्विय स्थळांचा आढावा घेतला तर तापी, गोदावरी आणि भीमा नदीच्या काठावर वसलेल्या स्थळांमध्ये ताम्रपाषाणयुगीन काळातील जवळजवळ १५० स्थळे सापडली आहे. यासाठी खानदेशातील जी पुरातत्विय स्थळे आहेत त्यांचा आढावा घेतला तर काय लक्षात येते. खानदेशातील महत्वाची उत्खनने प्रकाशे, बहाळ, टेकवडा, मानेगाव, पाटणे येथे झाले आहे. इंडियन आर्किअॅलॉजी - ए रिव्ह्यू या यादीवरून खानदेशातील अनेक गावे साक्री तालुक्यातील प्राचीन गावे : १.अश्मयुगीन स्थळे (इ.स. पूर्व १ लाख ते ३० हजार वर्षे) किरवाडे, भोनगाव, भाडणे, भामेर, साक्री, दातरती, धवळविहीर इ.२. मध्ययुगीन अश्मयुगीन स्थळे : कासारे, गणेशपूर, खोरी, घोडदे, छडवेल, टिटाणे, नवडणे, मालपूर, म्हसदी, वसमार, शेणपूर, शेवगे. ३. उत्तर अश्मयुगीन स्थळे - आष्टाणे, आमखेल, इंदवे, धनेर, नवडणे, ब्राम्हणवेल, वासखेडी.४. ताम्रपाषाणयुगीन स्थळे - (इ.स.पूर्वी ४ हजार २७०० वर्षे) उभंड, चिंचखेडे, छडवेल, जैताणे, दुसाणे, भाडणे, धाडणे, रूणबळी, साक्री. नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील जास्त प्रमाणात आहेत कारण त्या परिसरात अभ्यास झाला आहे तर जळगाव जिल्ह्यात मात्र चारच ठिकाणी उत्खनन झाले आहे. पण ती महत्त्वाचे स्थळे आहेत
तापी खोर्यात त्या काळात ज्या वसाहती झाल्यात, त्याची कारणे खालीलप्रमाणे –१. खानदेशात तापी खोर्याची वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना.२. उत्तर व दक्षिण भारताच्या मधोमध असल्याने प्रारंभीपासून मानवी स्थलांतर.३. व्यापारास उपयुक्त. ४. योग्य पाऊस, तापी व उपनद्या (पांझरा, कान, बुराई, गिरणा) या बारमाही वाहणार्या नद्या इत्यादींमुळे महाराष्ट्रातील आद्य शेतकरी तापी खोर्यात उदयास आले. साक्री तालुक्यात पांझरा कान खोर्यात मोठ्या प्रमाणात वरील गावांना वसाहती निर्माण झाल्या आहेत.
ताम्रपाषाण युगी समाज रचनेची व संस्कृतीची साक्री जवळील कावठे गावी डेक्कन कॉलेजने केलेल्या सन १९८४ आयत उत्खनाने येथील आद्य शेतकर्यांच्या जीवन संस्कृतीवर प्रकाश पडला. कावठे येथील वसाहत तीस हेक्टर भूभागात पसरली होती. साक्री तालुक्यातील चिंचखेडे येथे (इ.स.पूर्व १४०० ते १०००) या कालखंडातील जोर्वे संस्कृती उत्खननात मातीची भांडी व तांब्याचा भाला सापडला.
त्यातील प्रमुख नंदुरबार जिल्ह्यातील शहादा प्रकाशा येथे १९६४-६५ मध्ये बी. के. थापर यांनी केले आहे. त्यांच्या अनुमानानुसार प्रकाशा हे इतिहासपूर्व काळात एक नगर होते. काळी आणि लाल रंगाची मातीची भांडी तसेच लोखंडी वस्तू मिळाल्या आहेत. तापीच्या दोन्ही किनाऱ्यावर वसती होती, शिवाय आज जिथे प्रकाशा वसलेले आहे, तिथेही काही उंचवटे पांढरीची टेकाडे आहे म्हणजे आजच्या शहर हे जुन्या शहरावर वसलेले आहे. ढवळीकर यांनी चर्चा केली आहे आणि चार कालखंड निश्चीत केले आहे. पहिला माळवा संस्कृती इ.स.पुर्व १६००-१३०० २. इ.स.पुर्व १३००-१००० जोर्वे संस्कृती २. इ.स.पुर्व १०००- ४०० उत्तर जोर्वै संस्कृती ३.इ.स.पुर्व २००-इ.स. ४०० सातवाहन काळ व पश्र्चिम क्षत्रप काळ ४ इ.स.४००-१००० ५. इ.स.१३००-१६०० मुगल मराठा प्राचीन इतिहास काळ या काळातील वस्तू सापडल्या आहेत.
बहाळ येथे १९५६-५७ मध्ये उत्खनन झाले तिथे पाच कालखंड निश्चीत केले आहे. पहिला काळ हा ताम्रपाषाणयुगीन काळ आहे. पहिल्या टप्प्याचे दोन अ आणि ब असे भाग केले आहेत. पहिला माळवा संस्कृती तर दूसरा उत्तर जोर्वै संस्कृती अर्थातच हा अभ्यास तिथे सापडलेल्या मृद्भांड्यांच्या सखोल अभ्यासावरून करण्यात आला आहे. बहाळची विशेषतः ही आहे की तिथे दफन नदीच्या दुसऱ्या काठावर टेकवडा येथे सापडलेल्या आहे. ढवळीकरांनी १९६८-६९ मध्ये येथील सापडलेल्या वस्तूंचा नीट पट मांडला. माळवा प्रदेशातील लोक हे महाराष्ट्रात दुसऱ्या सहस्रकाच्या पुर्वीपासून स्थलांतरीत होऊन वसतीला होते हे लक्षात आणून दिले. विशेषतः दायमाबाद आणि बहाळ येथील अवशेषांवरून होय.
एस.ए. साळी यांनी १९६८ मध्ये धुळे जिल्ह्यातील जे उत्खननात सापडलेल्या वस्तू वरून ताम्रपाषाणयुगीन काळातील नविन मृद्भांडी सापडल्याचा उल्लेख केला आहे.
खानदेश गॅझेटियर मध्ये प्राचीन काळ या लेखात डॉ. गो.बा. देगलूरकर यांनी लिहिलेल्या लेखाचा थोडक्यात आढावा घेतला तर पुर्व पुराश्म युगातील स्थळांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथे प्रवरा नदीच्या काठावर चिरकी नाला गोदावरी नदीला येऊन मिळतो तिथे एक स्थळ आले. मोठमोठ्या शिलांच्या निवाऱ्याला या युगातील माणूस रहात असे अशी काही स्थळे धुळे जिल्ह्यात आहे अशी जळगाव आणि नंदुरबार मध्ये असण्याची शक्यता आहे. दुसरा काळ म्हणजे मध्य पुराश्म युग या काळात माणूस मोठ्या आकाराच्या हातकुऱ्हाडी, टोकाची बाणं, गिरमीट,चाकू, अशी दगडी हत्यारे बनवून वापरायला मानव शिकला. या काळातील स्थळांमध्ये नेवासा आणि पाटणे चाळीसगाव तालुक्यातील ही स्थळे महाराष्ट्रात आहेत. अशीच हत्यारे तापी आणि तिची उपनदी पूर्णा यांचा संगम जळगाव जिल्ह्यात चांगदेव येथे आहे. मानेगाव येथे होतो जवळच पूर्णा नदीच्या मिळणारा गंगनाला असून त्या साठी केलेल्या उत्खननावरून नाल्या काठावर पूर्व पुराश्म युगातील आदि मानवाची मानवाचे वस्ती स्थळ होते असे लक्षात येते. गंग नाल्याच्या काठावर आज आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त पात्र रूंद असावे. मात्र नंतरच्या काळात झालेल्या हालचालींमुळे ते अरूंद झाले असावे.
महाराष्ट्रात आणि जळगाव जिल्ह्याबाबत नेमके बोलायचे झाले तर उत्तर पुराश्म युगाचे
निक्षेपण असलेली पायाची हाडे, शिंगे, हस्तिदंत यांचा हत्यारा साठी व अलंकार यासाठी उपयोग केलेला आढळतो. महाराष्ट्रात उत्तर पुराश्म युगाचा पुरावा ढवळापुरी आणि चिटके जिल्हाअहमदनगर तसेच पितळखोरा म्हणजे पाटणा आणि औरंगाबाद जिल्हा येथे सापडले आहेत तर कांदिवली मुंबई नेवासा, बेलपांढरी, इनामगाव, झरपटनाला चंद्रपूर आणि पाटण येथे सापडलेल्या आहे.
मध्यपुराश्मयुगात जास्पर ह्या कठीण जातीच्या दगडापासून हत्यारे बनवलेले दिसतात. जळगाव जिल्ह्यात पाटणे येथे उत्तर पुराश्मयुग वस्तीस्थळाच्या उत्खननात अनेक हत्यारे सापडली आहेत. यावरून तसेच कवड्या, शिंपले शहामृगाच्या अंड्यांच्या कवचावर केलेल्या कलाकृती वरून त्यांच्या संस्कृती जीवनाची कल्पना येते. दगडी पात्याच्या खोबणी साठी हाडांचा उपयोग केलेला जात असे. शहामृगाच्या अंड्याच्या कवचाच्या तुकड्यांना आकार देऊन शिंपल्याच्या छिद्र पाडून मण्यासारखा उपयोग केला जात असे.
पाटणे उत्खननात पडलेल्या शहामृगाच्या अंड्यांच्या उपलब्धतेमुळे तत्कालीन हवामानाबद्दल अंदाज करता येतो. पाटणे येथील उत्खननातील तिस-या कालखंडात जळगाव जिल्ह्यात जवळजवळ आजच्यासारखे हवामान होते, झोपडी बांधताना लावलेल्या लाकडी टेकूसाठी खणलेले खड्डे व अन्न्न शिजवण्यासाठी तयार केलेली ओबडधोबड चूल होय. पुढचा काळ ताम्रपाषाण युग महाराष्ट्रातील या युगाचा पहिला पुरावा अहमदनगर येथील संशोधनानंतर नाशिक, नेवासा, बहाळ, टेकवडे, चांडोली, सोनेगाव, आपेगाव, कवठे, इनामगाव या मुख्यत्वे गोदावरी आणि भीमा खोऱ्यातील प्रागैतिहासिक वसती स्थळांच्या उत्खननानंतर महाराष्ट्रातील ताम्रपाषाण संस्कृतीचा कालखंड व आलेख विभागणी त्या काळातील उपजीविका सामाजिक व धार्मिक उतार-चढाव हे स्पष्ट झाले.
बहाळ येथील ताम्र पाषाण युगीन संस्कृतीचे वैशिष्ट्ये म्हणजे महाराष्ट्रात इतर ठिकाणी उत्खननात आढळून आलेल्या दफन यांचा अभाव होय. ताम्रपाषाण युगात मृतांच्या घरात अथवा घरालगतच एखाद्या खड्ड्यात भांड्यांची तोंडे एकमेकास जोडून त्यात पुरण्याची पद्धती होती. तसेच नुसत्या खड्ड्यात ही पुरण्याची पद्धती होती. येथे अशी दफने सापडत नाही, मात्र पलिकडच्या तिरावर असलेल्या टेकावडे येथील उत्खननात असे दफने मिळाले आहेत. येथील पहिल्या कालखंडात उत्खननाचे दोन भाग कल्पिलेले आहेत. पहिल्या उपखंडात जाड तोंडाचे लोटे पुढचे वाडगे आहेत. काही भांडी रंगपुर येथील गुजरातमधीलउत्खननातलापडलेल्सा लाल चकचकीत भांड्यांसारखी आहे. वरच्या थरात नाशिक सारखी रंगाची नक्षी असलेली लाल भांडी मिळतात. येथे ताम्रपाषाण युगाचा काळ हा इसवी सन पूर्व अठराशे ते इसवी सन पूर्व सातशे इतका असावा, असे दिसते टेकवडे येथील दफनाची पद्धती बृहदश्मयुगीन भांड्यांचा आकार लक्षात घेता येथील दुसरा कालखंड येथील दुसरा कालखंड इसवी सन पूर्व सहाशे ते इसवी सन पूर्व तीनशे आहे. पहिला ताम्रपाषाण युगाचा काळ इसवी सन पूर्व अठराशे ते इसवीसन पूर्व सातशे असावा.
तिसऱ्या कालखंडात उत्तरेतल्या सारखी चकचकीत काळी भांडी निरनिराळ्या इतर रत्नांचे मणी, काशाचा आरसा, लोखंडी खिळे इत्यादी चित्रे असलेली कवचे, उत्तर सातवाहन काळातील वस्तू मिळाल्या आहेत. या पुराव्यांवरुन असे अनुमान काढता येते की या लोकांना लघु अश्म हत्यारे व तांब्याची माहिती होती. तसेच जळगाव जिल्हा पहूर अजिंठा मार्गावर अठरा किलोमीटर वाकड येथे अशीच ताम्रपाषाणयुगीन वस्ती सापडली आहे तर आहात नाणी येथे उत्तरेच्या मौर्य सम्राटाच्या काळी जळगाव जिल्हा सांस्कृतिकदृष्ट्या एकाकी नव्हता, मौर्यांच्या सत्तेनंतर सातवाहनांनी साम्राज्य स्थापन केले. पैठण व बहाळ यांच्यात सरळ एका रेषेत पितळखोरे आहे. जळगाव दक्षिण सीमेवर सातपुड्याच्या डोंगर रांगात हे आहे. बौद्ध गुफा अजंठा दहा ते बारा या पहिल्या टप्प्यातील याच काळात कोरल्या गेल्या. खानदेशात गुजरात मध्यप्रदेशात उपलब्ध होणाऱ्या अभिलेखावरून तसेच शिवदत्तचा मुलगा ईश्वरात हा पहिला अभिलेख राजा ठरतो आणि ईश्वरात्याने तापी तीरावर प्रकाश येथून दानपत्र दिले होते.
लोथल हे गुजरातमधील सिंधू संस्कृतीचे प्राचीन नगर आहे. इ.स.पूर्व ३७०० वर्षांपुर्वीचे जगातील पहिले बंदर आहे. लोथलला सर्वात आधी उत्खनन १९५५ मध्ये ए. एस. आय.ने केले शोध १९५४ मध्येच लागला होता. साबरमतीच्या मुखाशी अरबी समुद्रात व्यापार होत असे. तसेच सिंधप्रांतातील हडप्पा संस्कृतीच्या शहरांशी जोडलेले होते आणि जो कच्छच्या खाडीचाही भाग होता. लोथल हे बंदर आहे की फक्त इरिगेशनसाठी तयार केलेला भाग आहे, यावर बरीच तज्ञांमध्ये घमासान चर्चेनंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्रोफी या संस्थेच्या तज्ञांच्या अभ्यासाअंती ते बंदर होते हे सिद्ध झाले.
येथून कसला व्यापार होत होता तर मणी, मौल्यवान खडे, आणि मौल्यवान दागिने हे आफ्रिका आणि पश्चिम आशियातील कानाकोपऱ्यात हा माल पोचत होता. हे बनवण्यासाठी लागणारी खनिजशास्राचे ज्ञान आणि तंत्रज्ञान हे चार हजार वर्षांपूर्वी प्रगत होते. कच्छच्या रणात सापडलेली दुसरे महत्त्वाचे स्थान ढोलावीरा, कालीबंगन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मणी तयार करण्यात येत होते हे दिसते.
लोथल हे अहमदाबाद जिल्ह्यातील सारगवाला गावाजवळ अहमदाबाद भावनगर रेल्वे लाईनवर अहमदाबादपासून साठ किलोमीटर अंतरावर आहे. लोथल म्हणजे मृतांची टेकडी. थल म्हणजे स्थळ असाच अर्थ मोहेंजोदडो या शब्दाचा आहे. लोथलच्या पुरातत्विय खोलात न जाता तिथल्या काय विशेषतः आहेत तर वैशिष्ट्य पूर्ण नगररचना, डाकयार्ड, गोदाम, जहाज येण्याजाण्यासाठी जागा, विहीर, कॅनाल, बाथरूम, टायलेट, मृतांच्या दफनाची जागा, लोथलला सापडलेले सील किंवा मुद्रा यांचे साम्म हे सिंधू संस्कृतीच्या मुद्रांशी आहे. मुख्य नगर, उपनगर अशी विभागणी केली आहे.
याचा आणि खानदेशचा काय संबंध हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे, पण रंगपूर येथील उत्खननात सापडलेल्या मृद्भांडी आणि प्रकाशे येथे सापडणारी भांडी यात साम्य आहे आणि डॉ.वसंत शिंदे यांच्या लेखात त्यांनी या लोकांचा एकमेकांशी संपर्क येत होता हे लक्षात आणुन दिले आहे तर रंगपूर हे लोथल जवळच लहान बंदर आहे. शिंदेच्या मते प्रकाशे आणि कुकुरमुंडा या भागात सापडलेल्या पुरातत्विय स्थळांवरून येथे नदीजवळ पण एकदम काठावर नाही घनदाट वस्ती होती आणि नदीच्या बाजूला हे लोक शेती करत आणि सतत जागा बदलत असत जमीन व पाण्याच्या सुविधेनुसार होय. सावळदा जे तापीच्या काठावर प्रकाशेच्या विरूध्द काठावर वसलेले हो. ते तिथल्या संस्कृतीशी मिळत्याजुळत्या एकोणतीस स्थळे सापडली आहे. जिला त्यांनी सावळदा संस्कृती असे नाव दिले आहे ती तापीच्या उपनद्या विशेषतः पांजरा, बुराई, अमरावती या धुळे जिल्ह्यातील आहे. प्रकाशे ते कुकुरमुंडा भागात वढोदे, बहुपुरा, कोरीट, उभाड ही काही स्थळे आहेत.
साक्री तालुक्यातील कायथा येथे चार किलोमीटर अंतरावर पांजरा नदीच्या पासून तर कान नदीच्या काठावरून अर्धधा किलोमीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी एस. ए.साळी यांनी केलेल्या १९८६ उत्खननावरून तिथे उत्तर हडप्पा संस्कृतीच्या अवशेष दिसतात असा निष्कर्ष काढला आहे. आणि खालील कालखंड निश्चीत केले आहेत.
सावळदा संस्कृती इ.स.पुर्व २२००-२०००, उत्तर हडप्पा संस्कृती इ.स.पुर्व २०००-१८००, दायमाबाद इ.स.पुर्व १८००-१६००, माळवा संस्कृती इ.स.पुर्व १६००-१४००, जोर्वे संस्कृती इ.स.पुर्व १४००-१००० होय. पहिले शेतकरी या भागात म्हणजे महाराष्ट्रात सौराष्ट्र मधून आले ज्यांचा संबंध हा हडप्पा संस्कृतीच्या शहरांशी होता. आणि मग त्यांनी शेतीबरोबरच आधीचे पशुपालन व शिकार ही सुरू ठेवली आणि एक मिश्रण असलेली आयुष्य जगत राहिला. म्हणून या भागात भटकी शेती, जी नदीच्या बाजूला असलेल्या वस्तीत दिसते बहुपुरा, कोपर्ली, कोरीत तर हिंगोणी, चिंचाडा या भागात दिसते तर पिकांमध्ये गहु, बार्ली, उडिद, मुग, मसूर ही पिके घेतली जात होती.
रंगपुर विषयी हे वनाळा जवळ सौराष्ट्रात खंबात आणि कच्छच्या खाडीच्या मध्यभागी आहे. लोथलच्या उत्तरेला आहे येथील उत्खननात सिंधू संस्कृतीचे अवशेष दिसतात. सिंधू संस्कृतीच्या नंतरच्या काळातील गुजरात येथील संस्कृती म्हणता येईल. येथील पहिल्या टप्प्यात १९३१ मध्ये एम.एस.वॅट्स, १९३९ मध्ये घुरे, १९४७ दिक्षित, १९५३-५६ एस.आर. राव यांनी उत्खनन केले आहे. राव यांनी चार कालखंड निश्चीत केले आहे तर क्षूद्रास्रे हा इ.स.पुर्व ३०००, हडप्पा, उत्तर हडप्पा, आणि संक्रमण काळ होय. बाभुळच्या लाकडाचा वापर शस्रे, घरगुती वापर, आणि बांधकामासाठी केलेला दिसतो. बाजरी आणि मिलेटचे अवशेष तर मणी काळीतांबडी हॅडलची भांडी मिळतात.
बऱ्हाणपूर ते चांगदेव या परिसरात म्हणजे जळगाव जिल्ह्यात तशी स्थळे असावीत पण संशोधन झालेले नाही. कानळदा येथेही गिरणा नदीच्या काठी असाच पांढरीचे टेकाडे दिसतात.
महाराष्ट्रातील नेवासे आणि मध्यप्रदेशातील महेश्वर येथील उत्खननात असे दिसून आले आहे की दोघांमध्ये चार हजार वर्षांपूर्वी देवाणघेवाण होती. तर नावडाटोली येथील उत्खननात इराण आणि मध्यभारतात देवाणघेवाण सुरू होती असे दिसते. तर नविन झालेल्या उत्खननात व संशोधनात पश्र्चिम आशिया व मध्यभारतातील संबंध हे मध्यभारतातील उदयपूर जवळचे आहार येथील उत्खननाातील झालेल्या संशोधनातून अधोरेखित झाले आहे.
लोथलची काही फोटो,आंतरजारावरून साभार,
मातीची भांडी विहीर, आणि शहरातील ड्रेनेज कालवे
घरांची स्नानगृह-शौचालय रचना पुरातत्व वैशिष्ट्य
गोदाम मुख्य ड्रेनेज कालव्यात चार छिद्रे असलेल्या विटांचा अडथळा, त्यातून घनकचरा काढून टाकण्यासाठी जाळी बसविण्यात आले.
जुळे दफन. मुद्रा
मुद्रेची प्रतीकृती मुख्य विहीर
नदीमध्ये पाणी वाहू देण्यासाठी नलिका कालवा उघडण्याचे अवशेष, जळलेल्या विटाने बांधलेले.
उघडत गोदी, त्याद्वारे स्थिर पाण्याची पातळी राखली जाते.
खालचे शहर
संदर्भ:
• JOURNAL ARTICLE
M. K. Dhavalikar, Archaeological Excavations, Bulletin of the Deccan College Post-Graduate and Research Institute , Vol. 33, No. 1/4 (1973), pp. 41-76 (38 pages) Vice Chancellor, Deccan College Post-Graduate and Research Institute (Deemed University), Pune
• JOURNAL ARTICLE
Vasant S. Shinde, SETTLEMENT PATTERN OF THE SAVALDA CULTURE: THE FIRST FARMING COMMUNITY OF MAHARASHTRA, Bulletin of the Deccan College Post-Graduate and Research Institute Vol. 49 (1990), pp. 417-426 (10 pages), Published by: Vice Chancellor, Deccan College Post-Graduate and Research Institute (Deemed University), Pune
• S. R. Rao, 1974, Ancient India no.18, Excavation at Rangpur and other exploration at Gujrat

शिवकालीन जळगाव जिल्हा विषयीचा इतिहास


 शिवकालीन जळगाव जिल्हा विषयीचा इतिहास

शिवाजी महाराजांच्या काळात या गावास जलग्राम असे संबोधित असत. इ.स. १६३७ मध्ये जलग्राम वासी रूद्र भटाचा मुलगा सोम दैवज्ञ याने लिहिलेल्या " पध्दतीभूषण" नामक संस्कृत ग्रंथात या नगरीचे वर्णन केले आहे. सन १८१८ मध्ये ते इंदोरच्या होळकरांकडून ब्रिटीशांच्या ताब्यात आले. सन १८६१-६५ मध्ये अमेरिकेत यादवी युद्धामुळे खानदेशात कापसाला मागणी वाढली आणि जळगाव कापसाची मोठी बाजारपेठ बनली. सन १८७४ मध्ये मुळजी जेठा आणि कंपनीने खानदेश स्पिनिंग आणि लिव्हिंग मिलची स्थापना केली.आणि जळगाव औद्योगिक शहर बनले. पण जळगावच्या सोने सराफ बाजाराचा इतिहास हा दैवज्ञ या शब्दाशी जोडलेला आहे.
अधिक संशोधनाची गरज आहे. हा फक्त सापडलेला पुरावा आहे. अजुन संदर्भासठी स.ना.भालेराव यांनी संपादित केलेले गिरणाई बघावे. वरील संदर्भ: खानदेश गॅझेटियर १९६५.
(दैवज्ञ ब्राह्मण हा बहुतांश पश्चिम किनारपट्टीवर राहणारा हिंदू ब्राह्मण समाज आहे. ही ब्राह्मण पोटजात गोवा, किनाऱ्यावरील कर्नाटक, तसेच किनाऱ्यावरील महाराष्ट्राची निवासी आहे. या क्षेत्रात यांना 'शेठ' म्हटले जाते, जे 'श्रेष्ठ' किंवा 'श्रेष्ठिन्' चा अपभ्रंश आहे. हे लोक मूळचे गोव्यातील असून इस्लामी व पोर्तुगीज आक्रमणांमूळे कर्नाटकात ,महाराष्ट्रात तसेच केरळात स्थायिक झाले.ते कोंकणी तसेच मराठी बोलतात, पौरोहित्य करणारे दैवज्ञ पुरोहित वगळता ईतर मत्स्याहारी असून जवाहिरे आणि सोन्याचा धंदा करतात. त्यांच्यात अत्रि,कौशिक,भारद्वाज,वत्स इ. गोत्रें असून ते प्रामुख्याने शांकरमतानुयायि आहेत तसेच थोडे लोक मध्वानुयायि आहेत.ते आपले पुर्वज शाकद्वीपि मग लोक आहेत असे मानतात. संदर्भ: विकिपीडिया)

यादवकालीन खानदेश भाग १२

 




यादवकालीन खानदेश

भाग १२
भिल्लम पाचवा
भिल्लम (पाचवा) इथून यादव साम्राज्याची खरी कारकीर्द सुरु होते. भांडारकर यांच्या म्हणण्यांनुसार दृढप्रहर ते भिल्लम पाचवा यांदरम्यान सुमारे २३ यादव राज्यकर्ते होऊन गेले. त्यातील बरेचसे राजे हे एकाच पिढीचे (म्हणजे भाऊ) असल्यामुळे खूप साऱ्या पिढ्यांचा काळ गेला नाही. राष्ट्रकुट साम्राज्याकडून चालुक्यांचा पराभव झाला, तेव्हापासून सुमारे ४३७ वर्ष यादव राज्य करत होते. त्यामुळेच दख्खनच्या इतिहासात यादव काळाचे महत्त्व वाढते.
भिल्लम पाचवा याचे काळात यादव साम्राज्य पदाची घोषणा झाली, त्याची शिलालेख विजापूर आणि धारवाड जिल्ह्यात सापडले आहे, ते बहुतेक कानडी आहेत. त्याचे प्रतिबिंब यादवकालीन साहित्य उमटलेले आपल्याला दिसून येते.तसेच श्रीवर्धन बहुतेक बीड असावे, प्रत्यंडक म्हणजे परांडा, मंगलवेष्टक म्हणजे मंगळवेढा ,कल्याण म्हणजे कर्नाटकातील या महत्वाच्या नगरांचा उल्लेख येतो.हेमाद्रीच्या राजप्रशस्ती व्यतिरिक्त जल्हणाची सुक्तीमुक्तावली या ग्रंथात त्याचे विजयाचे गान सापडते. तसेच सोलापूर जिल्ह्यात मार्डी येथील शिलालेखात योगेश्वरदेवाचे मंदिरास भिल्लम पाचवा यांचे काळातील मिळालेली दाने सिंघण देव द्वितीय याचे काळात लिपिबध्द करण्यात आली.
चालुक्य सिंहासनावर असलेल्या सोमेश्वर चतुर्थ इ.स. ११८४-१२०० असा हा काळ आहे. बहुतेक सामंत स्वतंत्र होऊन परस्परांच्या विरोधात ठाकले. द्वारसमुद्राचे होयसाळ, उच्छंगीचे पांड्य, गोव्याचे कदंब, वारंगळचे काकतीय हे झाले दक्षिणेकडील तसेच उत्तरेतही चाहमान, परमार, कलचुरी हे होतेच.
कलचुरी नृपती बिज्जलाने कल्याणी नगर जिंकून सार्वभौमत्वाची घोषणा केली.
भिल्लमाच्या राजप्रशस्तीत उल्लेख आलेले श्रीवर्धन हे कोकणातील नसून बीड असावे असे ब्रम्हानंद देशपांडे यांच्या म्हणणे आहे की मंगळवेढा, कल्याणी, परेंडा, या परिसरात शोधायला हवे. कदाचित ते सिन्नर असण्याची शक्यता जास्त आहे.
भिल्लमाने कलचुरी बिज्जणाचा वंशज मैलुगि याचे विरोधात विजय संपादन केला पण याच काळात चालुक्य परत थोडे स्थिरावले असे दिसते. कारण चालुक्य सोमेश्वर चतुर्थ याचे काही लेखांमधून त्याने भिल्लमाचा पराभव करून कल्याणीचे उत्तरेकडील गोदावरी नदीच्या काठावर आपल्या सैन्याचा तळ ठोकला अशी वर्णने आहेत. ते गाव म्हणजे मंजरातिर्थ बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील असावे.( Dr. Shrinivas Ritti, The seunas,page 74) या पराभवानंतर थोड्याच वेळात भिल्लम याने पलत कल्याणी जिंकले असावे.
नंतर लाखुंडी जे अजून महत्वाचे नगर जिंकण्यासाठी मात्र होयसाळांबरोबर घनघोर रणसंग्राम झाला. आणि पराभव पत्करावा लागला.
भिल्लमचा उदय आणि देवगिरी
बाराव्या शतकाच्या शेवटच्या काळात चालुक्य घराण्याचा पाडाव होताच दख्खनेत असलेल्या अस्थिरतेचा पुरपूर फायदा यादवांनी घेतला. ह्या काळात अमरमल्लुगी चा मुलगा बल्लाळ (अमरमल्लुगी हा मल्लुगी चा मुलगा) यादव साम्राज्यावर राज्य करत होता. परंतु यादव साम्राज्याची आणि देवगिरीची पायाभरणी केली ती पाचव्या भिल्लमने. भिल्लम हा मल्लुगीचा मुलगा होता किंवा पुतण्या ह्यावरून साशंकता आहे. आपल्या घराण्यातीलच दुफळी टाळण्यासाठी भिल्लमने सेउणप्रदेशाच्या बाहेर आपल्या साम्राज्याची स्थापना केली आणि दख्खनेत आपले स्वातंत्र्य घोषित केले.
भिल्लमाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली ती श्रीवर्धनचा किल्ला घेऊन पण . आणि तदनंतर प्रत्यंडगड परांडा वर हल्ला केला. त्यानंतर दक्षिणेच्या दिशेने जाऊन ‘मंगलवेष्टके’ म्हणजे आजचे मंगळवेढे येथील राजाची हत्या केली. अशा पद्धतीने भिल्लम हा पुणे, रत्नागिरी, सोलापूर प्रदेशावर सहज ताबा मिळवून गेला. त्यामुळे भिल्लमचे स्वतःचे साम्राज्य हे यादवांच्या मूळ ‘सेउणदेश’ पेक्षा आकाराने बरेच मोठे झाले आणि भिल्लमच्या भावंडांमध्ये वितंड वाढले. परंतु भिल्लमाने इतर सर्व यादवांना थोपवत स्वतःला राज्यकर्ता घोषित केले. ह्याचा कालखंड इसविसन ११७५ च्या सुमारास धरता येईल.
स्वतःला राज्यकर्ता घोषित करताच आपल्या कारकिर्दीची सुरुवातीची काही वर्षे त्याने उत्तरेकडेच्या गुर्जर आणि माळवा प्रांताशी युद्धात घालवली आणि तिथे भरपूर यशही मिळाले. त्याने थेट मारवाड पर्यंत मजल मारल्याचे दाखलेही आहेत. मुत्तुगी आणि पाटणच्या शिलालेखात म्हटल्याप्रमाणे भिल्लम हा ‘माळव्याची डोकेदुखी’ बनला होता. त्याची उत्तरेतील कारकीर्द सुमारे इसवीसन ११८४ ते ११८८ दरम्यान राहिली असावी. उत्तरेत त्याने मारवाड पर्यंत मजल मारली असल्याचे दाखले असले तरी त्याला त्या प्रदेशांचा ताबा मिळवता आला नाही, मात्र मारवाड पर्यंत मारलेली मजल त्याला आत्मविश्वास देणारी ठरली असावी. म्हणून त्याने पुढे चालून संपूर्ण दख्खनचा सम्राट होण्याचे स्वप्न आखले. आधीच दख्खनच्या वर्चस्वावरून चालुक्य, होयसळ आणि कलचुरी साम्राज्यांमध्ये तणाव होताच. त्यात शेवटचा चालुक्य राजा सोमेश्वर ह्याला दक्षिणेतून होयसळ राजा वीरबल्लाळ आणि उत्तरेतून भिल्लम ह्यांना एकाच वेळी तोंड द्यावे लागले आणि ह्यात होयसळ राजा वीरबल्लाळशी तोंड देतानाच सोमेश्वर चालुक्याचा पराभव झाला आणि तो राज्य सोडून इतरत्र निघून गेला.
याच गोंधळात भिल्लमदेवास समोर असलेली संधी दिसून आली. चालुक्य राजा सोमेश्वराने पुनःश्च सैन्य उभारून लढण्याची तयारी न दाखवता राज्य सोडून निघून जाण्याचा घेतलेल्या निर्णयाने समोरचा मार्गच मोकळा मिळाला अन होयसळ सैन्य येण्यापुर्वीच भिल्लमाने चालुक्यांची राजधानी कल्याणी (आजचे बसवकल्याण) आपल्या ताब्यात घेतली. तत्कालीन होयसळ नोंदीनुसार भिल्लमाने कल्याणीवर ताबा घेतल्याचा उल्लेख केला नसला तरी हेमाद्री (हेमाडपंत) ने त्याचा उल्लेख केला आहे. अन भिल्लमाने तत्काळ चालुक्यांच्या दक्षिणेत असलेल्या होयसळ सैन्यावर हल्ला केला. आधीच चालुक्यांवरच्या विजयामुळे आनंदात असलेल्या होयसळ सैन्याला भिल्लमाने पराभूत केले आणि म्हैसूर राज्यातील हसन प्रांताच्या भागापर्यंत थोपवून ठेवले. उपलब्ध माहितीनुसार इसविसन ११८७ ते ११८९ पर्यंत वरील घटना घडल्या असाव्यात. कल्याणीला असलेली राजधानी भिल्लमने देवगिरीला हलवली आणि आजचं देवगिरी हे शहर वसवलं. मुळात कल्याणी ही होयसळ साम्राज्याच्या अत्यंत जवळ होती, त्यामुळे बहुदा ती हलवून राज्याच्या अंतर्गत भागात हलवण्याचा विचार भिल्लमने केला असावा. भिल्लम पाचवा याने देवगिरीचा किल्ल्याच्या पायथ्याशी एक नगर वसविले.त्यास कटक म्हणजे राजधानी सैन्याचा तळ होय. महानुभाव वाड्मयात वारंवार कटक नगराचे उल्लेख येतात. या कटक कटकी- खटकी- खडकी झाले असावेत. औरंगाबादचे प्राचीन नाव खडकी आहे. देवगिरीच्या किल्ल्यासमोरील प्रचंड मैदानात हे अवशेष दिसतात.
अशा पद्धतीने देवागिरीची पायाभरणी झाली आणि हळू हळू इथे किल्ला उभा राहत गेला. संपूर्ण किल्ला हा पाचव्या भिल्लमाने उभा केला नसला तरी त्याने त्याची सुरुवात केली हे नक्की. काहींच्या मते देवगिरीचा किल्ला हा राष्ट्रकुट राजांनी उभा केला असे मत व्यक्त केले जाते. कारण किल्ल्याच्या उभारणीतील मानवी हातांनी तासलेले कडे आणि भूलभुलय्या पाहता ते राष्ट्रकुटकालीन कार्य वाटते, असेच कार्य वेरुळच्या लेणी मध्येही आढळते, पण त्याबद्दल कुठलाही पुरावा अथवा लिखित माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे हा किल्ला भिल्लमानेच उभा करण्यास सुरुवात केली असे मानावे लागेल.
तिकडे दक्षिणेत पराभवाने चिडलेला होयसळ राजा वीरबल्लाळने पुनश्चः दख्खन विजयाकरिता मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आणि तत्काळ त्याने बनावासी आणि नोलमबावडी वगैरे शहरे परत मिळवली. भिल्लमला येणाऱ्या काळाची चाहूल मिळाली आणि त्याने २ लक्ष पायदळ आणि १२००० घोडदळ घेऊन धारवाड कडे प्रयाण केले. इसविसन ११९१ च्या सुमारास धारवाड मधील सोरातूर येथे ह्या दोन्ही साम्राज्यांत युद्ध होऊन त्यात भिल्लम यादवाचा दारूण पराभव झाला. भिल्लमाचा सेनापती जैत्रपाल ह्याने मोठ्या हिमतीने लोकीगुंडी (लोकुंडी) चा किल्ला लढवला मात्र तो लढाईत मारला गेला. होयसळ वीरबल्लाळने येलबुर्ग, गुट्टी, बेल्लतगी आदी किल्ले जिंकून घेतले आणि कृष्णा व मलप्रभा नदीच्या दक्षिणेकडील संपूर्ण प्रदेशावर आपला ताबा प्रस्थापित केला.
ह्या युद्धात झालेल्या दारूण पराभवात झालेल्या आघाताने भिल्लमचा मृत्यू झाला. होयसळ नोंदीनुसार भिल्लम हा युद्धात मारला गेला व त्याचे शीर बल्लाळने तलवारी वर उचलून नेल्याचे म्हणतात परंतु ही नोंद इसविसन ११९८ मधील असून ११९२ मधील गदगचा शिलालेख मात्र भिल्लमच्या मृत्यूचा उल्लेख करत नाही.
त्याच्या पराभव केल्या नंतरही होयसळ बल्लाळने कृष्णा नदी ओलांडून पलीकडे जाण्याची योजना कधी केली नाही. त्यामुळे भिल्लम हा तत्कालीन दख्खनेतील एक हुशार आणि शौर्यवान योद्ध होता असे म्हणता येईल.
भिल्लमाने आपल्या भोवती पराक्रमी सामंतांची वलय निर्माण केले. यातील काही नावे महामंडलेश्वर बंदीरस किंवा बंदुगि हा तार्दावाडी 1000 चा शासक होता, तो विजापूर येथील धनसंग्रह याचे कुलातील असून त्याचे नाव शिलाहार असे होते. "जिमुतवाहनांन्वयजात" आणि "कोपणपुरवराधीश्वर' अशा पदव्या घेतल्या होत्या. याच कुळातील डांकरस मल्लिदेव हा सुद्धा दुसरा सामंत होता. तर कदंब कुळातील बिज्जणतृतीय हा भिल्लमाचा करडकल ३००० या प्रदेशावर म्हणजे मुदगल येथून शासन करीत असे असा उल्लेख या करडकल शिलालेखात सापडतो.
निंबाळ शिलालेखात महाप्रधान मायिदेव याचा उल्लेख आहे तर पिरापूर शिलालेखात तारीकाडू येथून शासन करणाऱ्या लक्ष्मीदेवी दंडनायकाचा उल्लेख येतो." मगर मुरारी" त्याने बिरूद घेतले होते. हिप्परगी शिलालेखात त्याचा पट्टसहाणी, म्हणजे सैनिकी अधिकारी ,पेयिय साहणि व त्याचे हाताखालचे अधिकारी मल्ल साहाणि यांचा उल्लेख येतोो. याशिवाय देव्ररस, वाच, भास्कर,वज्ररस, जल्ह हे शिलालेखातून समजतात.
भिल्लमाचा उजवा हात जैत्रपाल किंवा जैत्रसिंग हा होयसाळांविरुद्ध लक्कुंडी दुर्गा जवळ यादव सैन्याचे प्राणपणाने रक्षण करता करता मारला गेला. सिन्नर येथील भिल्लम मठ ही वास्तू भिल्लमनेच बांधली असावी असा तर्क आहे. लीळाचरित्रात श्री चक्रधर स्वामी या मठात उतरले होते, "भिलमठीये अवस्थान: हा अंतू दैवते पुर्वे उत्तराभिमुख आसन:" इथेच महादेव यादव आणि त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला.
संदर्भ
• डॉ. तुळपुळे शं.गो. लीळाचरित्र पुर्वार्ध भाग १
• डॉ. श्रीनिवास रीत्ती, द सेऊणा
• खरे ग.ह. , दक्षिणेच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने खंड १.
• तुळपुळे शं.गो. प्राचीन मराठी कोरीव लेख
• ब्रह्मानंद देशपांडे, देवगिरीचे यादव

यादवकालीन खानदेश भाग ११

 


यादवकालीन खानदेश

भाग ११
शिरपुर तालुक्यातील बाबाकुंवर गावातील स्तंभलेख
मल्लुगीचा काळ इसवी सन ११४५ ते ११६५ असा गृहित धरला तर अमरगांगेय, अमर मल्लुगि, गोविंदराज कालीयबल्लाळ, कर्ण यांचा शासन काल हा इसवी सन १२६५ ते ८५ या वीस वर्षाच्या काळात बसवावा लागतो. कारण पाचवा भिल्लमचा प्रथम लेख म्हणजेच विजापूर संग्रहालय लेख हा इसवी सन ११८५ चा आहे. म्हणजेच इसवी सनाचे बारावे शतक संपता संपता आपल्या मांडलिकत्व झुगारून देऊन भिल्लम पाचवा ह्याने आपल्या मांडलिकत्व झुगारून साम्राज्यपदाची घोषणा केली. या काळातील दक्षिण भारतातील अस्थिर परिस्थितीमुळे यादव साम्राज्य याचे महत्त्व आहे. त्याचे शिलालेख विजापूर, धारवाड बहुतेक कानडी आहे. त्याच्या कर्तुत्वाचा प्रारंभिक भाग विजापूर, धारवाड, सोलापूर जिल्ह्यात घडला आहे सहज दिसते. त्याचे प्रतिबिंब यादवकालीन साहित्यातही आपल्याला दिसून येते.
मंल्लुगिनंतर आलेले राजे जवळजवळ पाच राजे आणि वीस वर्षे यावरून बरीच फाटाफूट झालेली दिसून येते. हेमाद्रीच्या राजप्रशस्तीनुसार आणि ताम्रशासनानुसार आमरगांगेय,अमरमल्लुगि, गोविंदराज कालियबल्लाळ कर्ण भिल्लम पाचवा हा क्रम(early history of Deccan,,R.G.Bhandarkar) तर यादवांच्या शिलाताम्रशासनातून वेगळ्याच वंशावळ समोर येतात. भिल्लम पाचवा याचा गदग शिलालेख मल्लुगि याचे अमरगांगेय आणि कर्ण असे दोन वंशज तर कर्ण याचे नाव प्रशस्तीत नाही. सिंघण देव द्वितीय याचे धारवाड ताम्रपटात अमरगांगेय- मल्लुगि- भिल्लम तर रामचंद्र देव याचा पैठण ताम्रपटात सिंघण देव प्रथम- मल्लुगि- भिल्लम असा क्रम आहे.
यादव कृष्ण देवरायाच्या मेथी येथील शिलालेखात भिल्लम पाचवा याचा पिता कृष्ण आहे.
हेमाद्री याचे प्रशस्तीत कायीकबलळ यांच्या पुत्रांना सोडून, राजलक्ष्मी त्याचा चुलता भिल्लम पाचवा यांचे भुजबळाचा आश्रय घेती झाली असे वर्णन आहे. ब्रम्हानंद देशपांडे यांनी याची चर्चा केली आहे.त्यात त्यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्र यातील विभागणी झालेली असावी, नाशिक सिन्नर मराठी भागात तर पळियंडा म्हणजे परेंडा, सोंन्नलिंगे म्हणजे सोलापूर या कानडी प्रदेशात म्हणून काही नावे कानडी तर काही मराठी संभवतात. भिल्लम पाचवा याने आपले राज्य प्रारंभिक विजय हे परांडा, मंगळवेढा या भागात सुरवातीच्या काळात प्रस्थापित केले असावे कारण सर्व ताम्रशासने आणि लेख कानडी आहे.
कल्याणी, लोकीगुंडी, धारवाड, गदक, निंबाळ याच भागात कर्तृत्व दिसते. एकुण सतरा लेख उपलब्ध आहे आणि ते कानडी आहे, महाराष्ट्रात एकही नाही.एक अपवाद वगळता. सोलापूर जिल्ह्यात मार्डी येथील शिलालेखात योगेश्वर मंदिरात मिळालेल्या दानात भिल्लम पाचवा यांचे काळातील दाने, सिंघण देव द्वितीय याचे काळात शिळेवर लिपीबध्द करण्यात आली. नंतर विजय मिळवत नाशिक सिन्नर आणि खानदेशात वर्चस्व प्रस्थापित केले. या भागात राज्य करणारे अमरमल्लुगि याचे पुत्र असावे.
खानदेशात, थाळनेर पासून २४ किलोमीटर अंतरावर शिरपूर तालुक्यात बाबाकुंवर या गावी एक स्तंभावर लेख आहे. हा अद्याप अज्ञात आणि अप्रकाशित आहे. त्याचे वाचन असे,
ओळ १ श्रीअमरदेवाचे व खामु
२. खलादिशेषे मेलुगिदेवे
हा अमरमल्लुगि याचा शिलालेख असावा. मल्लु्गिचा धाबादेव शिलालेख आणि शिरपुर परिसरातील हा लेख या प्रदेशात त्यांचे शासन होते हे दर्शवते.
चालुक्य सिंहासनावर सोमेश्वर चतुर्थ हा शासक राज्य करीत असताना द्वारसमुद्रचे होयसाळ, उच्छंगीचे पांड्या, गोव्याचे कदंब आणि वारंगल काकतीय या सर्वांनी चालुक्य सत्तेचा अध:पात आपल्या विद्रोहांनी जवळ आणला. आणि ११८४ ते १२९० चा इतिहास या शासकांच्या परस्पर विरुद्धच्या युद्धांनी भरलेला आहे. सोमेश्वर चतुर्थ त्रिभुवनमल्ल हा या सर्वांना तोंड देताना कंटाळून गेला. कलचुरी नृपती बिज्जलाने तर काळ कल्याणी जिंकून घेऊन आपल्या सार्वभौम महत्त्वाची घोषणा केली.
हा स्तंभ शोधून जतन करता आला तर महत्वाचे काम होईल.. संदर्भ: ब्रम्हानंद देशपांडे

यादवकालीन खानदेश भाग १०

 





यादवकालीन खानदेश

भाग १०
यादव मेलुगी याचा धाबादेव शिलालेख या शिलालेखाचा शोध द. रा. भट यांनी लावला. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील बोराडी गावाजवळ नऊ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. तेथे एक भग्न देवालय आणि काही अवशेष आहेत. त्याच लेखाची शिळा पडलेली आहे. ह्या लेखाचे संपादन आणि वाचन द. रा. भट आणि शं. गो. तुळपुळे यांनी केले आहे. संशोधक वर्ष २६ अंक एक ते चार पृष्ट ७८ ते ८० यात तसेच तुळपुळे यांचा मराठी कोरीव लेख यांनी केले आहे. लेखाची भाषा मराठी आहे. लेखात सिंघणदेवाचा पुत्र मेलुगिदेव याने कोंडव्व देवीचे मंदिर आणि वापी बांधल्याचा निर्देश आहे. हा सिंघणदेव देव म्हणजे यादव वंशातील सिंघण देव प्रथम होय. या लेखात तिथीचा स्पष्ट उल्लेख नाही कारण अक्षरे वेगळी पडली आहे. तरीही तो "सहस्र-नवसिकावरि'' असे वाचल्यास त्याचा काळ इसवी सन ११६७ या लेखाची तारीख होईल.(खानदेशातील अभिलेख वैभव, ब्रम्हानंद देशपांडे)
धाबादेव लेणी
बोराडी जवळ सातपुड्याच्या पायथ्याशी दोन नाल्यांच्या संगमावर धाबादेव लेणी आहे. ही लेणी सातव्या शतकातील यादवकालीन असल्याचे सांगण्यात येते. येथील लेणी दगडावर नक्षीकाम करुन सर्व दगड एकमेकांवर रचल्याप्रमाणे ठेवले आहेत. विशेष म्हणजे हा दगड बाहेरुन आणलेला असावा कारण परीसरात अशा प्रकारचा दगड मिळत नाही. .सध्या तीन खोल्या(गाळे) शिल्लक आहेत. पुर्वी येथे १८ गाळे असावेत असे अवशेषांवरून वाटते. प्रत्येक खोली साधारण चार फुट लांब व रुंद असुन,ऊं चीसुद्धा चार फुट पर्यंत आहे. भिंतींवर नक्षीकाम असुन वेगवेगळ्या कोरीव मुर्त्या बसविलेल्या आहेत. छत चौकोणी आकाराचे असुन त्यावर वर्तुळात पानाफुलांची सुबक नक्षी काढलेली आहे. खांबाच्या वर यक्षांची मुर्ती काढलेली आहे. याठिकाणी पद्मासन अवस्थेतील गौतम बुद्ध, महावीर, महादेव, विष्णु, हनुमान, यक्ष, अशा वेगवेगळ्या सुबक कोरीव काम केलेल्या अनेक मुर्त्या आहेत. व अनेक मुर्त्या परिसरात विखुरलेल्या आहेत. अजिंठा-वेरुळ सारख्या हत्ती, माणसांच्या कोरीव नक्षीकाम केलेल्या मुर्त्यापण आहेत. 20/25 वर्षापुर्वी एक शिलालेख चांगल्या अवस्थेत होता. आज त्याचे तुकडे झाले आहेत. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी येथे अतिशय घनदाट जंगल होते. येथे येण्यासाठी रस्ताही नव्हता. काही जाणकारांच्या मते इथे तप- साधना होत असावी किंवा उत्तर-दक्षिणेकडुन येणारे धर्मसाधकांसाठी थांबण्याचे ठीकाण असावे.जवळच अतिशय निसर्गरम्य वातावरण असुन नाल्यांवर तीन-चार धबधबे आहेत. पाऊस पडल्यानंतर फेसाळणारे पांढराशुभ्र पाणी पाहुन मन आनंदित होते. यामुळे येथे पर्यटकांचा वावर वाढला आहे. सध्या ही लेणी मोडकळीस आली असुन छताच्या दगडांना तडे पडले आहेत. जर डागडुजी केली नाही तर छत पडुन लेणी अस्तित्व व इथला इतिहास नष्ट होईल. त्या काळात इथे जवळपास वस्ती असली पाहीजे शिरपूर तालुक्यातील अतिशय पुरातन, ऐतिहासिक ठेवा आहे व तो जतन झाला पाहीजे. नवादेवी, गुर्हाडपाणीचे तोरणमाळसारखे निसर्गसौंदर्य, धाबादेव लेणी, दुर्बड्याचे मुळ बिजासनी मंदीर, बिजासन अशा भागाला पर्यदनाच्या दृष्टिने महत्त्व येऊन या भागाचा विकास होऊ शकतो.
फोटो गणेश भामरे बोराडी*
कोंडव्व देवीचे मंदिर
लेणीतील शिल्पांवरून ती नाथपंथी असावी असे दिसते पण काहींच्या मते ती जैन असावी.

यादवकालीन खानदेश भाग ९




 यादवकालीन खानदेश

भाग ९
त्यानंतर येणारा दुसरा राजा म्हणजे सिंघण प्रथम किंवा सिंहराज हा राजा झाला. तो आयरमदेवाचा भाऊ होता असे प्रशस्ती वरून दिसते. नवभारत ऑगस्ट १९७० मध्ये ब्रह्मानंद देशपांडे यांनी आंबेजोगाई जवळ चनई या गावी सिंहणदेव प्रथम यांचा शिलालेख प्रसिद्ध केला. आणि आंबेजोगाई येथील संगीत मशिद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मशिदीतील लेख तसेच हा सिंगणदेवाचा आहे, हे सुद्धा सप्रमाण दाखवून दिले आहे, हा लेख प्रतिष्ठान मे १९७२ मध्ये प्रसिद्ध झाला. हे दोन लेख तसेच वृत्त खंडातील राज्य प्रशस्तीचा उतारा आणि यादवांच्या काही ताम्र शासनातून येणारे सिंघण याच्या प्रशस्तीवरून आपल्याला या राज्याची कल्पना येते.
आंबेजोगाई जवळ उपलब्ध झालेल्या शिलालेखात आंबेजोगाई पासून तीन किलोमीटर असलेल्या चेनई या गावी देवालयाचे आणि शिल्पखंडाचे अवशेष सापडली आहे. तसेच दोन हेमाडपंती शिवालये आणि एक पुष्करणी सुद्धा आहे. हा शिलालेख दोन मंदिरांपैकी सोमनाथ म्हणून मंदिर ओळखले जाते त्या मंदिरावर आहे. या लेखाच्या पाचव्या आणि सहाव्या ओळीत महाकुमार श्रीसिंघणदेवराणक असा उल्लेख आला आहे. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात येते की या लेखातील सिंघणदेव तेव्हा सेऊनदेणकर सिंघणदेव प्रथम यादव हा असावा आणि सेऊणदेशकर यादवांची या संदर्भातील वंशावळ ही सेऊणचंद्र द्वितीयचे दोन पुत्र आयरमदेव आणि सिंघणदेव असे म्हणता येईल.
सेऊणदेशकर यादव हे कल्याणी चालुक्यांचे मांडलिक होते. कल्याणी चालुक्यांचे राज्य ही बीड आणि उस्मानाबाद या भागात होते. त्यामुळे त्यांच्या मांडलीकांचे शिलालेख या भागात सापडणे स्वाभाविक आहे. तसेच या काळात सेऊणदेशकर सिंघणदेव हा बीड आंबेजोगाई भागात महाकुमार म्हणून काम पाहत होता हे लक्षात येते. कारण तसाच उल्लेख लेखातही आहे.. या प्रदेशातील अजून दुसरा एक उल्लेख हा लीळाचरित्र या महानुभाव ग्रंथात आहे या गावाचा उल्लेख म्हणजे "खोल नायकाचे आंबे" असा आहे. त्यावेळी हा गाव देवगिरीकर यादवांचा वैदर्भीय ब्राह्मण सेनापती खोलेश्वर याचे अधिकारात होता. सामंतांच्या नावावरून गावाचे नामकरण करण्याची रीत सर्वत्र आढळते. "बिज्जलाचे बीड" "अनंतपालाचे शिऊर" ही तशीच उदाहरणे आहेत.
आंबेजोगाई येथील खोलेश्वर मठ शिलालेखात आम्रपूर असाच उल्लेख केला आहे. सेऊणदेशकर यादवांचा हा खानदेशाबाहेरील पहिलाच शिलालेख असल्याने महत्वाचा आहे.त्यांचे ताम्रपट मात्र वसई, अश्वी या कोकणातील गावात सापडले आहेत.
आंबेजोगाई या गावात अनेक मंदिरे आणि आवश्यक असल्यामुळे प्राचीन काळी तसेच यादव काळातही हा गाव भरभराट असलेला आणि समृद्ध होता असेच यादव सम्राट सिंघणदेव त्याचा सेनापती खोलेश्वर याचे शिलालेखावरून वाटते. या एकट्या गावात आतापर्यंत पाच शिलालेख सापडले आहे आणि ते सर्व प्रकाशितही झालेले आहेत.
सेऊणदेशकर यादव सिंघण प्रथम आणि कर्नाटकातील त्याचे सम्राट चालुक्य यांचे संबंध यादव महादेव यांच्या काळेगाव ताम्रपट आणि पैठण ताम्रपट यावरून लक्षात येतात. तसेच पैठण ताम्रपट यातील वंशावळ सिंघणदेव प्रथम याचे पासून सुरू होते. या लेखातून सिंघणाने कर्नाट नावाच्या राजाला वशीभूत केले तसेच हेमाद्री यांच्या प्रशस्तीत कर्पूर तिलक गज आणून चालुक्य सम्राट परमार्दि याचे कर्पुरव्रत पुर्ण केले असा उल्लेख आहे.
याच लेखातील अजून उल्लेख म्हणजे त्याने पांड्य राजाला शासन करून त्याची राज्यात विजयस्तंभ रोवला. तसेच होयसळ विष्णूवर्मन याची मदत करून चालुक्य राज्य उलथून टाकण्याचा प्रयत्न चालवला होता. यात त्यांना गोव्याचा कदंब जयकेशी द्वितीय, येलबुर्गा येथील सिंद अच्छुगी द्वितीय यांनीही मदत केली होती. परंतु चालुक्य विक्रमादित्य सहावा याने सर्वांचे मनोरथ धुळीस मिळवले, याच युध्दात सिंघणाने भाग घेतला असावा. त्याने युध्दात गुर्जरांना हरवले, परंतु याबाबत अधिक माहिती मिळत नाही. या शूर कृत्यामुळे त्याला साहसांग ही पदवी मिळाली आणि तो चालुक्य सम्राट याचा कृपा पात्र बनला.
(संदर्भ: गुलाम याजदानी, अर्ली हिस्टरी ऑफ डेक्कन)
• संदर्भ: डॉ. शं.गो.तुळपुळे, प्राचीन मराठी कोरीव लेख
• श्री ग.ह.खरे, दक्षिणेच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने
• ब्रम्हानंद देशपांडे, देवगिरीचे यादव

यादवकालीन खानदेश भाग ८

 


यादवकालीन खानदेश

भाग ८
सेऊणचंद्र द्वितीय
चालुक्य साम्राज्य खिळखिळी होत असल्याच्या अवस्थेत असतांना कल्याणी नगराचा अधिपत्य मिळवण्याचा प्रयत्न होयसाळ आणि यादव या दोघांनी केला आणि त्यांच्या सैन्यात एक निकराची झुंज सोराटूर या ठिकाणी झाली या युद्धात यादवांचा पराभव झाला आणि म्हणूनच होयसाळ नृपती द्वितीय वीरबल्लाळदेव द्वितीय याच्या आणि त्याच्या वंशजांच्या शिलालेखातून या युद्धाची लांबलचक अतिशयोक्त वर्णने मिळतात. (संदर्भ: ओ.पी. वर्मा यादव अँड देअर टाईम)
द्वितीय सेऊणचंद्रानंतर हेमाद्री आईरमदेव याचे नाव येते. त्याच्या राज्यकाळातील अश्वी ताम्रपट सापडला आहे. नाशिक जवळील गोंदेश्वर मंदिराजवळच ऐश्वरेश्वर मंदिर आहे जे आयेश्वर म्हणून ओळखले जाते. ते आईरमदेव याने बांधले असा कयास आहे. आईरमदेवाच्या वर्णनासाठी हेमाद्रीच्या राजप्रशस्तीत आणि अश्वी ताम्रपटात जे वर्णन येते, त्यात पहिल्या श्लोकाचा अर्थ असा की जे राज्य चालुक्य राजा भुवनैकमल याला जिंकता आले नाही ते आयरमदेवाने जिंकले आणि तिला सेवावृत्तीने देऊन टाकले. यात स्पष्ट होते की सोमेश्वर द्वितीय या चालुक्य राजा आणि विक्रमादित्य सहावा यांच्या यादवी युद्धाच्या वेळेस आयरमदेवाने विक्रमादित्य सहाव्या याच्या बाजूने भाग घेतलेला दिसतो. तसेच या ताम्रपटतील श्रीनगर २५०० या प्रदेशातील संगमनेर ८४ ह्या भागात असलेले कोकणेग्राम हे ब्राह्मणांना दान दिले. या विषयी लेख आहे. यावेळी राजा नर्मदापूर येथे नामक गावात राहत होता हे लक्षात येते. सिन्नर येथील आयरेश्वर हे देवालय आयरमदेवाने बांधले. आयरमेश्वर याचा आयेश्वर असा अपभ्रंश होत ऐश्वरेश्वर असा झाला असे म्हणता येते.
आयेश्वर
सभामंडपातले स्तंभ नक्षीदार. सुरसुंदरींची शिल्पे स्तंभांवर कोरलेली दिसतात.
शालभंजिका गंगा
कर्पुरसुंदरी,बलराम
विष्णू द्वारपाल स्तंभ,युगल
स्तंभावर मंदिराचा डोलारा आपल्या हातांनी पेलणारे भारवाहक यक्ष आहेत. ह्यांनाच किचक असेही म्हणतात. -
गर्भगृहाच्या द्वारावर जे एक शिल्प आहे ते, नटराज शिव. मकरांच्या मुखातून निघालेली अर्धगोलाकार नक्षीदार शिल्पपट्टिका. दोन्ही बाजूंना शिवाचा एकेक अनुयायी मकरांचे सारथ्य करतोय. शिल्पपट्टीकेवर वादक वाद्य वाजवताहेत, मधेच शरभादिल प्राणी आहेत तर त्याच्या वरच्या पट्टीकेवरील मोरांची रांगच आहे. तर संपूर्ण पटाच्या मध्यभागी शिव तांडवनृत्य करतोय. त्याच्या एका बाजूला पार्वती आहे तर दोन्ही बाजूला अनुयायी आहेत. पखवाजसदृश वाद्य वाजवताना एकजण तर अगदी स्पष्ट दिसतोय. ह्याच्यापुढे अंतराळ आणि त्यापलीकडे गर्भगृह आहे. अंतराळावरही कहई शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराचा बाह्यभाग, मंदिराच्या बाह्यभिंतीच्या चौथर्यावर बाणासारखे सरळ वर जाणारे स्तंभ अशी बाह्यभागाची रचना. मधेमध्ये काही देखणी शिल्पेही कोरलेली आहेत.
मंदिराचा पार्श्वभाग अर्धस्तंभाचे नक्षीदार शिखर, स्तंभांवरही भारोत्तोलन करता करता शरभ आदि प्राण्यांवर स्वार होणारे यक्ष आहेतच. हा यक्ष एका हाताने तो भिंत तोलून धरतोय त्याचे वेळी तो वाहनावर चाबूकही उगारतोय.
साधक आणि मातृका, मधूनच काही भग्न शिल्पं आहेत. हे राम, लक्ष्मण, सीता का कृष्ण बलभद्र सुभद्रा काहीच कळत नाही. हे इंद्रजिताचे लक्ष्मणासोबतचे द्वंद्व असावे. अगदी अशाच प्रकारचा रामायणातील पट जवळच्याच गोंदेश्वर मंदिरात आहे.
सुरसुंदरींच्या विविध प्रकारांची सभामंडपाच्या स्तंभांवरच शिल्पे येथे आढळतात.

यादवकालीन खानदेश भाग ७

 





यादवकालीन खानदेश

भाग ७
सेऊणचंद्र द्वितीय
सेऊणचंद्र द्वितीयेचा वाघळी शिलालेखात एका मौर्यकूलप्रदीप गोविंदराजाचा उल्लेख आहे. त्याने सेउणचंद्र द्वितीयेला आपला महामंडलनाथ म्हटले आहे. कदाचित ह्या मौर्यकुलाला वेसूगिनेच शासन करून यादवांचे अंकित केले असावे आणि याच पराक्रमाचा उल्लेख हेमाद्री यांनी," संहृतप्रोद्धमुद्दामधामसामंत संतति: ” या ओळीने केला आहे. यानंतर भिल्लम चतुर्थ याचे नाव येते. त्याला हेमाद्रीने समरांगणातील भीम म्हटले आहे. पण त्याची फारशी माहिती उपलब्ध नाही.
सेऊणचंद्र द्वितीय ह्याचे हेमाद्री प्रशासनात तसेच देवळाली ताम्रपट वसई येथील ताम्रपट आणि वाघळी येथील शिलालेख यात उल्लेख सापडतात. देवळाली ताम्रपटावर ग.ह. खरे यांनी, all Indian history Congress च्या १९५५ अधिवेशनात वाचला होता. हा ताम्रपट शके ९७४ चा असून त्यात सेऊणचंद्र द्वितीय याने “देवलवल्ली” हा गाव आपला दंड नायक “श्रीधर” या दान दिल्याचा उल्लेख आहे. हा सर्वात आधी उल्लेख आहे. दुसरा उल्लेख आहे तो वाघळी येथील सिध्देश्वर मंदिरात असलेल्या शिलालेखात, वाघळी हे गाव खानदेशातील चाळीसगाव जवळ पूर्वेस सहा किलोमीटर अंतरावर आहे आणि येथील एका शिवालयात शिलालेख कोरलेला आहे. संपादक डॉक्टर कीलहार्न यांनी तो वाचला आहे. यात महामंडलनाथ सेउणचंद्र ह्याची प्रशस्ती व त्याचे सामंत कूल असलेल्या सौराष्ट्रातील वल्लभीवरून आलेल्या मौर्य घराण्याची वंशावळ दिली आहे. वसई ताम्रपट वसई येथे सापडला, जो डॉक्टर भाऊ दाजी यांनी बर्जेस यांच्याकडे दिला आणि तो भगवानलाल इंद्रजी यांनी इंडियन ॲंटीक्वेरी यात छापला आहे. सेऊणचंद्र द्वितीय विषयी राज्यप्रशस्तीतील श्लोक,
तत: समरमेदेनीपतिपतंगभंगव्रत:
प्रतापशिखिलंधितस्रिजगंगण: सेऊण:
असा आहे याचा अर्थ सेऊणचंद्राने अनेक राजांचा पराभव केला आणि त्याच्या पराक्रमास जणू तीनही जगांचे अंगण उणे पडले.
तसेच वसई आणि आईरमदेवाच्या अश्वी ताम्रपटातील श्लोकात भिल्लम चतुर्थ नंतर यादव राजेवंशाला दुर्दशेचे दिवस आले आणि पृथ्वीचा उद्धार करणाऱ्या महावराहाप्रमाणे सेऊणचंद्राने आपल्या राज्याचा या आपत्तीतून उद्धार केला अशा अर्थाने आहे.
या दुर्दशेला कारणेही तशीच होती, कारण उत्तरेतील राजकारणात परमार विरुद्ध त्रिपुरीचा कर्ण कलचुरी आणि गुजरातचा चालुक्य भीम एकवटले आणि त्यांनी त्याचा पराभव करून थेट धारा नगरी पर्यंत चाल केली. मालव देश कलचुरी अश्वारोहिंनी उडवल्यावर या प्रांतात दक्षिणेत असलेल्या सेऊण प्रदेशावर त्यांची दृष्टी पडली आणि त्यात नाशिक जिल्ह्यातील काही भाग भोजाचा उत्तराधिकारी यशोवर्मा यांच्या अधिकारात होता. हे त्याच्या कळवण ताम्रपटावरून लक्षात येते. कर्ण कल्चुरीच्या रीवा शिलालेखात त्याने कुंतलपल्लव जिंकीत कांचीपुरम पर्यंत आपली विजय सेना नेली, असे वर्णन आहे. अर्थात ही अतिशयोक्ती आहे.
दक्षिणेत चालुक्य आणि चोल या़चा संघर्ष पराकोटीला पोचला होता. यात चालुक्यांच्या पराभव झाला आणि याचा फायदा कलचुरींनी घेतला. चालुक्य घराण्यातील भाऊ भाऊ सोमेश्वर द्वितीय आणि विक्रमादित्य सहावा हे परस्परांविरूध्द ठाकले. सेऊणचंद्राने विक्रमादित्य सहावा याची बाजूला उभा राहिला. याचा उल्लेख हेमाद्री यांनी प्रशस्तीत केला आहे. त्यामुळे साहजिकच सोमेश्वर द्वितीय आहवमल्ल हा यादवावर चिडला. त्याच्या विचपल्ली जिल्हा मेहबूबनगर येथील शिलालेखात त्याने सेऊण राजाचा पराभव केल्याचा उल्लेख येतो. तो म्हणजे सेऊणचंद्र द्वितीय असावा. तसेच त्याला विक्रमादित्य सहावा यांचेकडून भूप्रदेश ही मिळाला असावा. नाशिकच्या पूर्वेस वाघळी सारख्या प्रदेशात सापडतात हे विशेष.
वाघळी शिलालेखात मौर्य कुलप्रदीप गोविंदराज हा स्वतःला सेउणचंद्र द्वितीय याचा सामंत म्हणतो, हे कुळ सौराष्ट्र प्रदेशातील वलभी येथून या गावात येऊन खानदेशात स्थायिक झाले होते हे दिसते. ते केव्हा खानदेशात आले हे मात्र कळत नाही, पण हा शिलालेख महत्त्वाचा वाटतो; यावरून की या शिलालेखात सापडणारी मौर्य वंशावळ आणि त्यांची बावीस राजांचा उल्लेख आहे. वंशावळ जी सोम यापासून सुरू होऊन सर्वशूर ते गोविंद राजाची येते. या गोविंदराजाने वाघळी येथे सर्वांग सुंदर शिवालय निर्माण केले आणि त्याचे समोर जलपूर्ण वापी बांधली, या शिलालेखात या वास्तूचे खुप सुंदर वर्णन केले आहे ते असे,
सर्वैषां पार्थिवानां त्रिदिवपतिपुरारोहनि: श्रेणिभूतं
गोविंदो भूमिपालत्स्वमलनृपगुणैरन्वित: कीर्तिकाम:।।
वापी चकार सुविमलोपलगाढबध्दा
सोपानपंक्तिसुरवेश्मनिविष्टदेवा
शंखोज्वलोर्मिवबहूशुभ्रजलप्रवाहा
संस्नापिताभीशपनामधुनाशदक्षां।।
गोविंद राजाने देवाचे मंगल, भोग गंध, धूप, दीप तसेच शास्त्र, गीत, नृत्य यांचेसाठी नर्तिकांच्या उपजीविकेसाठी, ब्राम्हणांच्या भोजनासाठी अन्नछत्र चालावे म्हणून आणि वेदाभ्यास विद्वानांचे भोजनासाठी काही भुमी दिली तिचे वर्णन असे आहे, १. वगलुकम्मत भुमी: याचे पूर्वेस भंभि ( बहुतेक भामेर) व दक्षिणेस देवल क्षेत्र ( देवळाली) पश्चिम व उत्तरेला कारकगांव याची ओळख पटत नाही. २. वखुली क्षेत्र याचे पूर्व पश्चिम-दक्षिणेला मार्ग कम्मत व सिद्धेश भूमी व उत्तरेला वह ३. वनकुटक भूमी: याचे पूर्व आणि उत्तरेला नदी आणि दक्षिणेला वह आणि पश्चिमेला ग्रामभू ४. पुर्वेला कार्पटिकाचे क्षेत्र, दक्षिणेकडे देवाचे शेत, पश्चिमेला ढोरे जाण्याचा मार्ग म्हणजे गोपथोवधी आणि उत्तरेला वटकूप म्हणजे वडाचे झाड आणि बारव. कम्मत हा नदीकाठचे गाळाचे शेतासाठी उपयोगी येणाऱ्या शब्द यादवकालीन अभिलेखात आणि महानुभाव साहित्यात वारंवार दिसतो तर वह किंवा वाही म्हणजे लहान नाला होय. ही दाने सोळा विद्याभ्यासी पंडितांना गोविंदराजा व त्याची राणी नायकी यांनी दिली. वाघळी शिलालेखात गोविंद राजाची दान देण्याची तारीख २० जुलै १०६९ आणि १३ ऑगस्ट १०६९ ही आहे, या तिन्ही ताम्रशासनावरून सेऊणचंद्राचा काळ म्हणजे इसवी सन १०४८-१०७८ असा आहे. या शिलालेखातून आपल्याला खानदेशातील मांडलिक घराण्यांची म्हणजे खानदेशातील राज्यांची माहिती मिळते, हे मौर्य घराणे कधी आले ? याबद्दल विशेष चर्चा नाही. परंतु पाटणे या परिसरात असलेले पितळखोरा लेणी आणि मौर्यांच्या पाटलीपुत्र राजधानी काळापासून येथे मौर्य होते का? की गुजरातच्या पाटणा वरून येथील प्रदेश पाटणे म्हणून ओळखला जाऊ लागला? मौर्यांच्या राजधानी वरून पाटणे नाव असणे, यावरून या प्रदेशात मौर्य काळापासूनच मौर्य वंश लोक राहात असावेत असा अंदाज येऊ शकतो. हे मौर्य म्हणजे कोण? खानदेशातील मुळ लोक हे कोळी आणि भिल्ल होते यावरून साहजिकच माधांता हा जो मुळ पुरुष सांगितला जातो, याची सविस्तर चर्चा खानदेशाचा प्राचीन काळ यात करू या.
चर्चा
सिध्देश्वर मंदिर जे गोविंद राजाने १०६९ मधील बांधले आहे. मंदीरातील शिलालेखातून कळते. पत्नी मौर्य मांडलीक महामंडलनाथ सेऊणचंद्र यादव यांची मुलगी आहे. यांनी सभामंडप बांधण्यासाठी तर दान दिले आहे. तिथल्या वितानावर असलेला वेणूगोपाळ हा सील आणि नाण्यांवरही दिसतो. असाच वेणूगोपाळ हा लोणार येथील दैत्य सुदन मंदिरातील छतावर आहे. ए.व्ही. नाईक यांनी ते शिलालेख वाचला आहे. जे सिध्देश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. (व्ही, व्ही, मिराशी.) वाघळी येथील सुर्यवंशी कुटुंब सिध्दनाथ नायकी विहिर प्रपा मौर्य राज्यांच्या नंतर बृहद्रथ घराणे सत्तेवर आले का? वाघळी लहान राज्यांतील गोविंदराजा निकुंभ राजा आहे का? नाशिक जवळ सापडलेली नाणी जी चौथ्या शतकातील उत्तरार्थात आहेत. यावरून अहिर राजा मानसनृप ( Bombay gazetteer page 240) पुराणांमध्ये अहिर राज्य हे तापी आणि देवगड मध्ये आहे. हे पण अहिर आहेत का?
महामंडलेश्वर सेऊण याने मंदिर इ. स. १०६९ मध्ये बांधले असा शिलालेखात उल्लेख आहे. यादव राजा सेऊण याचा मौर्य मांडलिक गोविंद आणि त्याच्या पत्नीने हे मंदिर उभारले. खूप पडझड झाली आहे. तरीही मंडप सोडल्यास बाह्य भाग कळत नाही. मंडपाच्या तीनही बाजूंनी प्रवेशद्वार असावे. चांगदेव आणि चारठाणे येथील मंदिरासारखे असू शकेल. दुसऱ्या मुखमंडपाच्या विरूद्ध बाजूला गाभारा असणार. मंडपातील खांबावर दोन प्रकारचे शिर्ष आहे. मधल्या स्तंभांच्या शिर्षावर किचक, तर बाजूच्या खांबावर नागशीर्ष दिसते. मंडपाच्या छतावर कृष्ण आणि गोपींचे शिल्प आहे.
सेऊणचंद्र द्वितीय याचा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वाघळी परिसरात असलेल्या सिध्देश्वर मंदिर जे आता महानुभाव पंथाचे मठ आहे. तिथल्या शिलालेखाने बराच प्रकाश पडतो. याच मंदिराच्या आवारात चक्रधरस्वामींचा निवास घडला होता. लिळाचरित्रात वागुळीए वयति अशी नोंद आहे. लेखाचे वर्णन केले तर तो बराच मोठा ४२ ओळींचा आहे. भाषा संस्कृत लिपी दाक्षिणात्य वळणाची नागरी आहे. लेख पुर्ण पद्यात आहे. लेखाचे संपादन किलहॉर्न यांनी केले आहे. काळ इ. स. १०८० आहे. लेखात महामंडलनाथ सेऊणचंद्र याचा निर्देश आहे. हा भिल्लम चतुर्थ याचा पुत्र सेऊणचंद्र द्वितीय इ.स. १०५०-१०८० हा होय. याच नृपतीचा वसई ताम्रपट प्रसिध्द आहे तो इ. स. १०६९ मधील आहे. या लेखात सामंत गोविंदराज याचे वर्णन आणि वीस पुर्वजांची यादी येते. ती अशी, सोम, मांधात, कीकट, तक्षक, भीम, सर्वशूर, गोविंद राज प्रथम, साध्वासिक प्रथम, झंझराज, देवानासिन्, मुंज, पद्माकर, वापैय, वालपराज, साध्वासिक द्वितीय, शांतीराज, प्रवरसुकर, भाईलेक, भीमराज, गोविंदराज द्वितीय ही होय.
याच गोविंदराजाने हे मंदिर निर्माण केले आणि वापीही बांधली शिलालेखात वास्तूचे वर्णन सुंदर रितीने केले आहे.
वापी चकार सुविमल्लोपलगाढबध्दा।
सोपानपंक्तिसुरवेश्मनिविष्टदेवा।
शंखोज्वलोर्म्मिबहुशुभ्रजलप्रवाह।
संस्थापिताभिशमनामघनाश दक्षां।
गोविंद राजने हे दान त्याची राणी राजाई नायकी हीच्या सोबतीने दिली. यात संगमी आणि मधुवाटीका ही गावे, देवपुजेला मला, दिवाबत्ती साठी लाकडी तेलघाणे, वाडा, इमान शेत भोग आणि गच्छकांना भूमी ब्राम्हण आणि विद्याभ्यास करण्यासाठी अन्नछत्र होय. भुमीदानाचा तपशील दिला आहे. दुसरे महत्त्वाचे मंदिर म्हणजे महानुभावांचे कृष्ण मंदिर, जे सिद्धेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. महानुभव यांच्या ताब्यात आल्यानंतर त्यांनी तेथे कृष्णाची मूर्ती स्थापन केली आणि ते मंदिर कृष्ण मंदिर किंवा महानुभव मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले. मंदिराच्या मोठ्या दगडांवर दुर्वाच्च अशी संस्कृत अक्षरे आहेत. मंदिराजवळच एक प्राचीन विहीर आहे. मंदिर सुमारे साडेचारशे वर्षापासून महानुभव यांच्या ताब्यात आहे. या मंदिराच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर यादव नृपती सेउनचंद्र द्वितीय याचा 11 व्या शतकातील देवनागरी लिपीतील संस्कृत शिलालेख आहे. त्याची तिथी आषाढ अमावस्या सूर्यग्रहण म्हणजे साधारण इसवीसनाच्या १०६९ ही आहे.
ह्या लेखाचा सारांश खालील प्रमाणे आहे. गोविंदराजा मौर्य यादव नृपती येऊन याचा मांडलिक याने हा लेख असलेले मंदीर बांधले आणि त्यास बऱ्याच देणग्या दिल्या. शिवाय यादव नृपती सेऊणचंद्र याने सिद्धेश्वराच्या मंदीराला संगमी व मधुवाटिका ही गावे दान दिले. हा लेख तीन दगडावर तीन भागात आहे. तथापि तिन्ही भाग मिळून एकच लेख असल्याचे स्पष्ट आहे. या लेखात माधांता, यादवांचा मांडलिक मौर्य कुळाचा मूळपुरुष तसेच मौर्य वंशावळीतील किकट, तक्षक, भीम, सर्व शूर, गोविंद, साध्वासिक, झंझ, देवहस्ती, मुंज, पद्माकर, बप्पैय, बालपराज, साध्यसिक, शांतीराज, प्रवरसुकर, भैलेक, भीमराज, गोविंदराज, म्हणजे या मंदिर बांधणारा आणि दान देणारा होय तर नायकी जी मंदिर बांधण्यात सहभागी झालेली गोविंद राजाची राणी, सेऊणचंद्रद्वितीय दान देणारा देवगिरीचा यादव नृपती या व्यक्तींनामांचा आणि वल्लभी सौराष्ट्रातील गाव संगमी मधू वाटिका आणि कारकग्राम या ग्राम नावांचा समावेश आहे.
सध्या हे मंदिर भग्न अवस्थेत असल्यामुळे मूळ विन्यासाची कल्पना येत नाही. तीन बाजूला कक्षासन असलेल्या मंडपाचा मंदिराचा मंडप वेगळा मोकळा वाटतो. मंदिराची खास विशेषता येथील स्तंभांची दोन प्रकारे शिर्षे होत. मंदिरातील मध्यभागी असलेल्या चार स्तंभांची सशिर्ष दोन आमलकात विभागले आहेत. वरच्या बाजूला चौरसाकृती पट्टिकांची योजना केली असून चारही कोपऱ्यांवर वेल सरी आहेत. प्रतीक आमलकात किचकाकृती म्हणजे भारवाहक यक्ष कोरलेली आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे स्तंभ महाराष्ट्रातील चारठाणा येथील भवानी मंदिरात जे मुक्ताईनगरच्या येथील मंदिरात दिसतात. त्या मंदिराचे गर्भगृह आणि सरी कोरलेल्या आहेत. त्यावर गोलाकृती नागफण्यांचे काठ असलेल्या स्तंभाधार सरी कोरलेल्या आहेत.
सर्वात विशेष म्हणजे या मंदिराचे छत नाविन्यपूर्ण आणि कलात्मक आहे. अशा प्रकारचे नाशिक जिल्ह्यातील देवळाली तसेच लोणार येथील दैत्यसूदन मंदिरात गोलाकार छतामध्ये श्रीकृष्ण बासरी वाजवत असून त्याभोवती नृत्यतल्लीन आठ गोपिका दाखवलेल्या आहे. कृष्ण मंदिराला लागूनच एक भुयार आहे.
वाघळी गावात एका ओट्यावर गणेशाची मूर्ती असून कुठल्यातरी मंदिराच्या प्रवेशद्वाराचा दगडी महिरपीचा भाग आहे, ती म्हणजे गणेश मंदिराचा भाग असावा असे लोक म्हणतात. यादव काळातील स्थानिक राजे शिव मंदिरे बांधण्यास उत्तेजन देत असे दिसते. संस्कृत भाषा तेव्हा प्रचलित होती.
सिध्देश्वर मंदिर, वाघळी
• संदर्भ: शं. गो.तुळपुळे, प्राचीन मराठी कोरीव लेख
• ब्रम्हानंद देशपांडे, देवगिरीचे यादव
• भांडारकर, अर्ली हिस्टरी ऑफ डेक्कन.
@ सरला

Tuesday, 13 April 2021

यादवकालीन खानदेश भाग ६

 




यादवकालीन खानदेश
भाग ६
मागील लेखात डॉ पद्माकर प्रभुणे, यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले ते म्हणजे झंझ राजा हा ठाणे शिलाहार शाखेतील होता आणि त्याने गोदावरी आणि भिमाशंकर परिसरात बारा शिवालये बांधली या मुद्द्यावर मुलभूत विचार व्हायला हवा.
या मुद्द्यावर रूपाली मोकाशी यांनी सविस्तर चर्चा केली आहे आणि ती देवालये कोकणातील असावीत असा अंदाज व्यक्त केला आहे.
डॉ पद्माकर प्रभुणे,
झंझ हा ठाणे शिलाहार शाखेतील राजा होता, गोदावरी ते भीमा या परिसरात त्याचे राज्य होते का? नसल्यास नद्यांच्या उगमस्थानी शिवालये ( ताम्रपटात शंभोर्योद्वादशाsपि असा उल्लेख आहे, तेरा असा नाही) बांधणे शक्य दिसत नाही. ती कोकणात असणार आहेत.
रूपाली मोकाशी यांचा पण संशोधक मधील लेख वाचला आणि त्यांनी मोकाशी यांच्या झंझराजाने तेरा शिवालये बांधली याचे खंडन केले आहे. त्यामुळे तुमच्या मुद्द्याला पुष्टी मिळते. धन्यवाद हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात आणून दिल्याबद्दल..
ब्रम्हानंद देशपांडे यांच्या मते हा या यादवांशी संबंधित राजा शिलाहार नसावा तर राष्ट्रकुट शाखेचा सामंत असावा कारण अशी छोटी सामंत घराणी बरीच होती. शिवाय झंझराजा शिलाहार याचा काळ अंदाजे ९२२ इ.स. असा आहे. तो भिल्लम द्वितीयचा काळ इ.स. १००० शी जुळत नाही. पण कोकणातील शिलाहार राजा अनंतदेव यांच्या खारेपाटण ताम्रपटात भिल्लम नामक एका यादव राजाचा उल्लेख येतो. म्हणून या शिलाहारांना भिल्लम द्वितीय शरण गेला असा देशपांडे यांचा युक्तिवाद आहे. पण तो पटत नाही कारण नंतरचा यादव राजा वेसुगी याची पत्नी नायल्लादेवी ही गोग्गी राजाची कन्या होती. असे डॉ.भांडारकर यांचे मत आहे. तर देशपांडे तिला लाट देशातील चालुक्य वंशातील एक सामंताची मुलगी मानतात. त्यामुळे दोन्ही शक्यता खऱ्या वाटतात कारण ताम्रपटात तिच्या वडिलांच्या कुळाचा नावात तसा स्पष्ट उल्लेख नाही.
मागील लेखात झंज राजा कोण याबद्दल चर्चा झाली, पंडित भगवानलाल इंद्रजी या झंझराजाला कोकणच्या शिलाहार घराण्यातील समजतात तर ब्रम्हानंद देशपांडे यांच्या मते तो राष्ट्रकुट शाखेचा सामंत असावा, कारण राष्ट्रकुट सामंत घराण्याची लहान लहान सामंत त्याकाळी पुष्कळ होती, परंतु वाघळी येथील सिध्देश्वर मंदिरातील शिलालेखावरून यादवांचे मांडलिक मौर्य घराण्याची जी वंशावळ दिली आहे, त्यातही एक झंझराजा आहे. आणि तो समकालीन असण्याची शक्यता आहे.
नंतर येणाऱ्या यादववंशीय राजाचे नाव आहे, वेसुगी हेमाद्री रचित राज्यप्रशस्तीत भिल्लम द्वितीय ह्याचे नाव येते. दुसरे यादववंशीय नाव वेसुगि होय. तेसुगी, वासुगि, वादुगि असे ते नाव यादवांच्या इतर शिलाताम्रशासनातून येते. हेमाद्री खालील श्लोक उद्धृत करतात,
एतस्मान्महसां महानिधीरसौ श्रीवेसुगिर्जज्ञिवान् ।।
कळस ताम्रपटात त्यांचे नावापुढे “सामंतचुडामणी” हे बिरूद आहे, त्यांची पत्नी नायलदेवी किंवा नायल्लादेवी ही की गोग्गी राजाची मुलगी होती, असे म्हटले आहे. डॉक्टर भांडारकरांच्या मते हा गोग्गीराजा म्हणजे शिलाहार होय. तर ब्रम्हानंद देशपांडे यांचे मते लाट देशातील चालुक्यांच्या वंशातील बारप्पाचा मुलगा असावा असे म्हटले आहे पण शिलाहार वंशातील असण्याची शक्यता आहे कारण झंझराजा यांच्या नंतरच्या वंशजाचे नाव हे गोग्गीराज आहे.
यानंतर येणाऱ्या यादववंशजाचे नाव जे फक्त राजप्रशस्तीत आहे ते म्हणजे अर्जुन होय. या अर्जुनाला महाभारतातील अर्जुन याचेशी तुलना केली आहे.तर यादव शिलालेखात नाव येते ते भिल्लम तृतीय याचे होय. तर हेमाद्री अर्जुनानंतर भिल्लम तृतीयचे नाव देतो.
भिल्लम तृतीय
याचे काळातील कळस बुद्रुक ताम्रपट प्रसिद्ध आहे, तो भिल्लम तृतीयने कार्तिक महिन्यात सूर्यग्रहण पर्वावर दिलेला आहे, म्हणजे इसवीसन १०२५ याचा अर्थ भिल्लम तृतीयाचा राज्य काल इसवीसन १०१५-१०४२ असा म्हणता येईल. यावेळी कल्याणीचे चालुक्य सत्तेवर सम्राट जयसिंग द्वितीय जगदेकमल्ल विराजमान होता. त्याचा काळ इसवीसन १०१५-१०४२ असा आहे तर याच काळात परमार सिंहासनावर विख्यात राजा भोज हा होता. त्याचे शिलाताम्रशासनावरून त्याने लाट, कर्णाट व कोकण प्रांतावर विजय मिळवला असे दिसते. त्याचा उत्तराधिकारी यशोवर्मा याचा ताम्रपट नाशिक जिल्ह्यात कळवण या ठिकाणी सापडला आहे. भोजचरितात भोजने कल्याणी चालुक्यांचा पराभव करून आपल्या चुलत्याचा म्हणजे वाक्यातीराज मुंजाचा पराभवाचा सूड घेतला, असे म्हटले जाते.
यावरून जयसिंग द्वितीय जगदेकमल्ल याचा काळ चांगलाच कठीण असणार, त्याचे सामंत ही त्याचे विरुद्ध कट आखू लागले होते, त्याला जिवे मारण्याचा कट केला होता, असे त्याच्या नागाई शिलालेखावरून कळते.
नांदेड जिल्ह्यात तळखेडला सापडलेल्या शिलालेखात जयसिंग द्वितीय देगकमल्ल ह्याचा उत्तराधिकारी सोमेश्वर प्रथम याचा ब्राह्मण सेनापती नागवर्मा याचा उल्लेख असून त्याने "सेऊणदिशापट्ट" असे बिरूद घेतले आहे. त्यावरून तृतीय भिल्लम हा परमारांना मिळाल्याने चालुक्यांचे बाजूने नागवर्मा याने त्याचा पराभव करून ही पदवी घेतली असावी, असा तर्क डॉ. निळकांत शास्री करतात तर ब्रम्हानंद देशपांडे यांचे मते, ही शक्यता नाही कारण भिल्लम तृतीयची पत्नी हम्मा किंवा आवल्लादेवी ही जयसिंग द्वितीयची मुलगी होती. त्यामुळे आपल्या सासऱ्यान विरुद्ध तो परमार यांना सहाय्य करेल हे शक्य वाटत नाही. भिल्लम तृतीया याने कळस ताम्रपटात संग्राम राम हे बिरुद आहे.
पण एक गोष्ट लक्षात येते की या काळात म्हणजे खानदेशात चालुक्य, भोज आणि यादव यांच्यात अटीतटी आणि अस्वस्थतेचा काळ होता.
हेमाद्रिच्या राज्यप्रशस्तीत भिल्लम तृतीय नंतर वादुगी-वेसुगी- भिल्लम चतुर्थ असा क्रम येतो परंतु या सर्वांची नावे यादव शिलाताम्रपटात येत नाही, याउलट कळस आणि वसई ताम्रपटात भिल्लम तृतीय नंतर एकदम सेउणचंद्र द्वितीय ह्याचेच नाव येते म्हणजे या सत्तावीस वर्षात हेमाद्रीच्या मतानुसार हे चार राजे झाले अर्थात त्यांचा राज्य काळ मर्यादित असावा. वादुगीला कवींचा आवडता आणि स्तुतीपात्र तर वेसुगिने सामंताचे दमन केले असे म्हटले आहे.
संदर्भ: देवगिरीचे यादव ब्रह्मानंद श्रीकृष्ण देशपांडे
श. गो. तुळपुळे यांचे मराठी कोरीव लेख.
वि. भि. कोलते आणि शां. भा. देव यांचे महाराष्ट्र आणि गोवे येथील शिलालेख व ताम्रपटांची सूची

यादवकालीन खानदेश भाग ५

 




यादवकालीन खानदेश
भाग ५
बाळकृष्ण अंजनगावकर यांचा लेख
धडियस व्दितीय हा दुसरा राजा इ.स. ९७२ याच वर्षी प्राकृत भाषेचा कवी धनपाल याने आपला ग्रंथ " पाइयलच्छी" हा पुर्ण केला.
वाक्पती मुंज
यांचा काळ इसवी सन ९७३ ते इसवी सन ९९५ हा होय. हे एक परमार घराण्याचा महान राजा होते. जे सियाक द्वितीय यांचे दत्तक पुत्र होते. आणि ज्यांनी राष्ट्रकूट घराण्याचा अस्ताच्या काळात नंतर माळवा राज्याची स्थापना केली. त्यांच्या प्राचीनतम अज्ञात पूर्वजांमध्ये मध्ये उपेंद्र कृष्णराज होते. यांना वापती द्वितीय असेही म्हणत. राज्याने घेतलेल्या पदव्यांत अमोघवर्ष, श्रीवल्लभ, पृथ्वीवल्लभ, परम भट्टारक , महाधिराज परमेश्वर या पदव्या येतात. त्यांच्या आणि तैलप्पाने यांच्या युद्धाचे उल्लेख अभिलेख तसेच ऐन ए अकबरी या ग्रंथात सापडतात. कुसुमावती (राजवल्लभ की 'भोजचन्द्रिका' के अनुसार)
वाग्पतीचा काळ परमार राज्यासाठी गौरव काळ होता. कौथेय या दानपत्रात त्यांच्या कारकिर्दीचा आढावा मिळतो. त्यांनी हुणं यांनाही पराजित केले. सफल विजेता असून साहित्य रसिक असा हा राजा होता. त्यांच्या राज्यभरात राजदरबारात विद्वानांमध्ये "यशोरूपक" चे रचियेता "धनिक"तर "नवसांहकचरीत" चे याचे लेखक पद्मगुप्त तर "दशरूपक" याचे लेखक धनंजय हे विद्वान होत. मुंज विषयी अजून एक साहित्य कृती आढळते, मुंज रास नावाची, मुंजरास हे एक अपभ्रंश रचना आहे. याच्या लेखकांच्या नावाचा पत्ता लागत नाही आणि त्यामुळे रचना काळात आणि विषय याविषयी माहिती मिळत नाही.
हेमचंद्र यांची व्याकरणाची रचना इ.स.११९० मधील आहे. त्यामुळे ही रचना याच काळात लिहिली गेली असावी. या ग्रंथात मुंज राजाची प्रणय जीवनाचे चित्रण आहे. कर्नाटकचा राजा चाल्युक्य तैलप्पा राजा यांनी बंदी बनवल्यावर यांचे प्रेम त्याची विधवा मुलगी मृणालवती बरोबर होते. राजा तिला घेऊन बंदी गृहातून पळून जाण्याचा प्रस्ताव ठेवतो. परंतु ती आपल्या प्रेमी बरोबर प्रणय संबंध तिथेच राहून ठेवू इच्छित होती. ज्यावेळेस तैलपाला हे कळले, तेव्हा परिणाम स्वरुप त्याने चिडून त्याला तिच्यासमोरच आपले प्रेम याला हत्तीच्या पायी देऊन हत्या केली, हे कथासूत्र असून ही रचना छोटी म्हणू शकत नाही.
वाक्पती मुंज यांच्यानंतर त्यांचाा छोटा छोटा भाऊ सिंधू हा परमाार हा गादीवर आला. राजा त्यांनी "कुमार नारायण" तसेच सहसांक या पदव्या घेतल्या. तसेच वाक्पती मुंज ह्यांनी आपल्याा नावाने. मुंज सागर नावाचा तलााव धार येथे बांधला.
मेरू तुंग हे एक जैन विद्वान होते, जे काठियावाड आणि गुजरातचे राहणारे होते. प्रबंधचिंतामणी हा जो जैन साहित्याचा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे, त्याची रचना मेरूतुंग या आचार्यानी केली. काही विद्वानांचे अनुमान असं लावलं जातं की प्रबंधचिंतामणी ही रचना इसवी सन १३०५ मध्ये झाली. हा एक ऐतिहासिक ग्रंथ आहे, जो पाच खंडात विभाजित केला आहे. या खंडाचे क्रमशः विक्रमांक, सातवाहन मूलराज, मुंज, भोज सिद्धराज जयसिंह, कुमारपाल, लक्ष्मण सेन, जयचंद्र इत्यादी विषयांवर माहिती मिळते. असे म्हटले जाते की आचार्य मेरूतुंग यांनी एक "भोज प्रबंध " असाही एक ग्रंथ लिहिला होता जो आज उपलब्ध नाही. एवढे मात्र नक्की मेरू तुंग यांच्या "प्रबंधचिंतामणी" यात भोजन कथा सुद्धा येतात.
पद्मगुप्त हे राजा मुंजाचे आश्रीत कवी होते. ९७४-९९८ या काळात पद्मगुप्त हे राजाचे आज आश्रित कवी होते. ज्यांनी "नवसाहसासाहसांकचरित" हा ग्रंथ लिहिला, हे एक संस्कृत महाकाव्याची रचना केली. यात १८ सर्ग आहेत.आणि तो एक ऐतिहासिक ग्रंथ आहे. यात काल्पनिक राजकुमारी शशिप्रभा हिच्या प्रणयकथेचा आविष्कार आहे तसेच माळवाचे राजा सिंधुराज यांच्या चरित्राचा काही भागही आहे असे विद्वानांचे मत आहे.
ते धारानगरी येथील सिंधू राज यांचे ज्येष्ठ भ्राता होते. यांच्यानुसार त्यांचा काळ इसवी सन १००५ असा आहे. त्यांचे वडिलांचे नाव मृगाङक गुप्त असे होते. त्यांना परीमल कालिदास असंही म्हटलं जातं. नंतरच्या कवी धनिक आणि मम्मट यांनी त्यांना उद्युक्त केलं आहे.
विद्वानांच्या दृष्टीत “नवसाहसाहसांकचरित” संस्कृत साहित्याच्या इतिहासात काव्यरचना तसेच प्रमाणे इतिहासाच्या चरित्र नायक अतिरंजित वर्णन आहे, ते यातही दिसते यातही वैदभी शैलीचा, कालिदासाची वापर केल्यामुळे कालीदासाचा प्रभाव दिसतो. हे महाकाव्य हिंदीत अनुवाद "चौखंबा विद्याभवन" या नावाने झालेले आहे.
मुंज तलाव मांडू धार'
भिल्लम द्वितिय यांच्या कर्तृत्वाचा विचार केला तर त्याच्या राज्यकाळातील संगमनेर ताम्रपट हा पहिला राजवंशातील लेख आहे यात यादवांची वंशावळ पौराणिक वंशावळ शंभु, ब्रम्हा, मरिची, अत्री, इंदु, पुरूरवा, आयुस, नहुष, ययाती, यदु अशी असून ऐतिहासिक दृढप्रहारी संस्थापकाला गाळले आहे.
संगमनेर ताम्रपटात भिल्लमाच्या पराक्रमाचे वर्णन केले आहे व मुंज राजाला पराभूत केले आणि चंचल लक्ष्मीला आपला स्वामी रणरंगभीमाकडे पतीगृही परत आणले.
मेरूत्तुंगाचा प्रबंधचिंतामणी ह्यावरून कळते की चालुक्यांनी वारंवार आक्रमण करून अतिशय त्रास दिला. तैलप्पाने मुंजाला ठार मारले. तैलप्पाने मुंजास जिंकून बंदीत टाकल्यानंतर तैलप्पाची बहिण मृणालवती हिचे मुंजावर प्रेम बसले आणि दोघांनी मिळून पळून जाण्याचा गुप्त कट केला पण मृणालवतीने ही वार्ता तैलप्पाला सांगितली आणि रागावलेल्या तैलप्पाने मुंजास मृणालवती समोर हत्तीच्या पायी देऊन ठार केले.
भिल्लम द्वितीयच्या कर्तृत्वाचा विचार केला तर संगमनेर ताम्रपट उपयोगी ठरतो. संगमनेर ताम्रपटात राजाने एक नवीन शिवालयाची उभारणी केली, असे दिसते आणि मंदिरातील देवतेचे नाव विजयाभरण असे आहे. विजयाभरण हे भिल्लमाचेच एक बिरुद असावे. प्राचीन काळी मंदिराच्या निर्मात्याचे नाव त्या दैवतास सोडले जात असे. विजयाभरण हे भिल्लमास तैलप्पाने मुंज परमार आणि यांच्यातील युद्धात तील विजयानंतर दिले असावे. शिवाय या ताम्रपटातील बिरुदे महासामंत, आरातीसुदन, संग्रामराम, सेल्लविदेग कुंदुकाचार्य आणि द्वारावती पुरवराधीश्वर अशी येतात. काही कानडी बिरुद वाटतात.
लस्थियव्वा हे भिल्लम यांच्या पत्नीचे नाव असावे, लस्थियव्वा, लच्छीयव्वा किंवा लक्ष्मी म्हणूनही तिचे वर्णन संगमनेर, कळस, अश्वी आणि वसई ताम्रपटात येते. तिच्या वर्णनासाठी अश्वी ताम्रपटात येणारा श्लोक असा आहे.
भार्या यस्य च झंझाराजतनया श्रीलस्थियव्वाह्रया।
धर्मत्यागविवेकबुध्दीसगुणा श्रीराष्ट्रकूटान्वया।
या जाता नवबालराजसमये यध्वन्वयाधारिता।
सप्तांगोद्यतराज्यभारधरणात् राज्यत्रयार्ध्या तत: ।।
यावरून ती तीन राजकुळांना पवित्र आणि पुजार्थ होती. राजा झंझ हा शिलाहार राजा होता आणि शिलाहार आणि परमार यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते..झंझराजा हा राष्ट्रकुटांचा शाखेचा सामंत होता का? अशी बरेच प्रश्न आहे पण आपल्या मुलांना तिने चांगले शासक बनवले म्हणजे कदाचित ती लहान असतांनाच राज्य सांभाळण्याची जबाबदारी पडली असावी असे वाटते.
शिलाहार कालीन राज्याची कारकिर्दीत झंझराजा त्याने केलेल्या कार्याचा आढावा घ्यायला घेतांना झंझ राजा शिलाहार साम्राज्याच्या गादीवर इसवीसन 910 मध्ये आला. त्यांची राजकीय कारकीर्द वीस वर्षे अबाधित होती. पुढे त्याचा लहान भाऊ गोग्गीराज याने वारसा सांभाळला. राजाला एकच मुलगी होती जी चांदूरच्या यादव राजा भिल्लम चौथा यास दिली होती येथे कदाचित चौथा आणि दुसरा हा घोळ झालेला दिसतो. याने केलेली कामगिरी म्हणजे एकच होती. त्यांनी त्याच्या आयुष्यात एकच आणि उत्कृष्ट म्हणता येईल असं काम केलं ते म्हणजे तेरा शिवालये बांधली.
त्र्यंबकेश्वरची गोदावरी आणि खाली भीमाशंकर यातील प्रदेशात उगम पावणाऱ्या बारा नद्यांवर शिवमंदिर बांधले. येथे उपलब्ध असलेल्या ताम्रपट वरून ओळीतून आपल्याला राज्याची माहिती मिळते. त्र्यंबकेश्वर येथे अहिल्या तीर्थ जवळ नदीवर आहे.
• संदर्भ: देशपांडे श्रीकृष्ण ब्रम्हानंद, देवगिरीचे यादव
• श. गो. तुळपुळे, यांचे मराठी कोरीव लेख.
• वि. भि. कोलते आणि शां. भा. देव यांचे, महाराष्ट्र आणि गोवे येथील शिलालेख व ताम्रपटांची सूची
मुंज तलाव मांडू धार'

अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

  अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...