विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label शाहुपर्व. Show all posts
Showing posts with label शाहुपर्व. Show all posts

Saturday, 22 April 2023

#शाहूंचा_सेवक_मायाजी_फडतरे #शाहूंचा_बोका

 


#शाहूंचा_सेवक_मायाजी_फडतरे
#छत्रपती_थोरले_शाहूराजे म्हणजे छत्रपती शिवाजी राजे यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच मराठा साम्राज्यात रूपांतर करत अखंड 42 वर्ष हिंदुस्थानाभर सत्ता प्रस्तावित करणारे अजातशत्रू,हिंदपती.छत्रपती संभाजी राजांच्या हत्येनंतर 17 वर्ष शाहू राजे औरंगजेबाच्या नजर कैदेत होते,येसूराणी आणि शाहू यांनी खुप हालअपेष्टा कैदेत सोसल्या,आलमगीर च्या मृत्यू नंतर त्याच्या मुलाने शाहू राजांना सोडलं आणि मराठा मुलखात यादवी माजवून मराठे आपापसात लढवले.शेवटी शाहू राजांनी कर्तृत्व आणि बुद्धीच्या बळावर आपलं राज्य स्थापन करत पाहता पाहता दिल्लीवर स्वारी करत तिथल्या दिल्लीपती ची क्रूर हत्या घडवून आपल्या वडिलांच्या छत्रपती संभाजी राजांच्या मृत्यूचा बदला घेतला.कैदेतली आपली माणसं सोडवली आणि दिल्लीला संरक्षण देत मुघलांच्या हिरव्या परचेम सोबत लाल किल्ल्यावर भगवा फडकवला तो आजवर तिथं अभिमानाने तिरंग्याच्या रुपात फडकतोय.आपल्या 42 वर्षाच्या कारकिर्दीत शाहू राजांनी आपल्या सरदारांना प्रोत्साहन देऊन राज्यकर्ते घडवले असा किंग मेकर राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा नातू थोरले शाहू राजे.
शाहू राजांच्या दरबारात हजारो सरदार,लाखो सैन्य,शेकडो पराक्रमी योद्धे होते सोबतच राजकारण आणि राज्यकारभार व्यवस्थित चालवण्यासाठी लागणाऱ्या बुद्धिमत्तेनी,चातुर्याने आणि मुद्सदीपणाने परिपूर्ण अश्या काही महान असामी होत्या त्यातील एक हुशार असामी म्हणजे #मायाजी_फडतरे.
शाहू राजांना प्राणी,पक्षी,शिकारी कुत्री पाळायचा छंद होता,त्यांनी राजवाड्यामाग एक माळावर कोंबड्या पाळल्या होत्या त्या कोंबड्या सांभाळण्यासाठी एक माणूस नेमला होता त्याला ते कोंबडे नावाने हाक मरायचे.कोंबड्याच्या माळावर एक बोका माजला होता,हा बोका रोज 2-3कोंबड्या फस्त करून सरकारच नुकसान करायचा.हुजरे कोंबडे यांनी बोक्याची तक्रार शाहू राजांना सांगितली.शिकारी मंडळी बोलावून मोठ्या कष्टाने बोका पकडला आणि एका पिंजऱ्यात कैद करून ठेवला.पकडलेल्या बोक्याला लांब कुठंतरी रानात सोडायची जबाबदारी शाहूंनी दरबारात हजर असलेल्या #मायाजी फडतरे यांना सांगितली.मायजींनी ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.
#मायाजी_फडतरे यांनी त्या पिंजऱ्याला पालखी सारख सजवून काही लोकांना कामावर ठेवून ती पालखी घेऊन ते बोका लांब सोडायला घेऊन चालले.जो गाव रस्त्यात येईल त्या गावच्या पाटलाच्या,कुळकर्णी, देशमुख यांच्या वाड्याबाहेर थांबून त्यांना सांगायचे.
"शाहू राजांचा हा प्रिय बोका त्यांनी तुमच्या गावात सोडायला सांगितलाय, जेव्हा शाहू राजांना याची आठवण येईल तेव्हा तुम्ही बोका दरबारात हजर करायचा असा आदेश आहे"
पाटील, देशमुख मंडळी मात्र घाबरली होती शाहू राजे जितके प्रेमळ तितकेच रागीट होते,उध्या ह्या बोक्यापायी गावावर काय संकट आलं तर शाहू राजे क्रोधीत होतील आणि गावावर अवकळा पसरेल त्या पेक्षा पाटील,देशमुख गावातून दीडशे दोनशे रुपये गोळा करून आणायचे बोक्याच्या खर्चसाठी द्यायचे मायजींच्या हातात द्यायचे आणि सांगायचे आमच्या गावात नको पुढच्या गावात सोडा,अस प्रत्येक गावात होऊ लागले.मायाजी आणि कामगारांना यात खूप मनोरंजन होऊ लागलं शिवाय सरकार दरबारात पैसा गोळा होऊ लागला.सरतेशेवटी मायजींनी दूर रानात बोका सोडून दिला.सगळ्या कामगारांना पगार देऊन उरलेली भली मोठी रक्कम घेऊन मायाजी दरबारी आले.शाहुराजांना घडला प्रसंग सांगितला.शाहू राजे खुश झाले शाहूंनी ती रक्कम #मायाजी_फडतरे यांना त्यांच्या प्रामाणिक पणा आणि बुद्धीचा गौरव करत बक्षीस म्हणून दिली.एका साधारण बिनकामी बोक्याच भांडवल करत हजारो रुपये उभे करणारा मायाजी सारखा कारभारी दरबारात असावा म्हणू त्यांनी त्यांची नेमणूक मोठ्या महत्वाच्या पदावर केली आणि त्यांचा योग्य सन्माम केला.
शाहू राजांच्या या अशा गुणांमुळे आणि पदरी असलेल्या अशा हुशार लोकांमुळे 42 वर्ष शाहूंचा कारभार व्यवस्थित चालला.काळाच्या ओघात इतिहासातील अशे हिरे आणि त्याचा पराक्रम मात्र तसाच कागदोपत्री खितपत पडला.थोरले शाहू महाराज आणि त्यांचा गौरवशाली इतिहास लोकांसमोर यायला हवा त्यासाठी इतिहास आपणच वाचला पाहिजे,वाचवला पाहिजे.
लेखन-#मंगेश_गावडे पाटील
(संदर्भ-शेडगावकर भोसले यांची बखर)

बाल शिवाजी ते शाहू

 

Ch 2 -


बाल शिवाजी ते शाहू

येसूबाईंच्या मनाची अवस्था जर पहिली तर एका बाजूला आपला पती,मराठ्यांचा छत्रपती शंभुराजे ऐन तारुण्यात साथ सोडून गेला होता,दुसऱ्या बाजूला ज्यांच्या साठी जगायचं ते  बाल शिवाजी आणि आबासाहेबांनी मोठ्या कष्टाने फुलवलेलं स्वराज्याच 32 मणाच,रयतेच्या डोईवर सुखाच छत्र धरणारं स्वराज्याच तख्त सिंहासन औरंग्याच्या हाती लागणार होतं.खाशा खाशा गोकुळाला वेढा पडला होता सारे शोकसागरात होतेच त्यात औरंग नावाचा जहरी साप त्यांना गिळायला फणा काढुन सज्ज होता.येसूराणींवर प्रचंड दबाव होता.दुसरी कोणी स्त्री असती तर रायगडावरून उडी मारून जीव दिला असता,एका बाजूला रायगड आणि रायगडावरील माणस दुसऱ्या बाजूला स्वराज्याची तमाम रयत आता काय होतंय,कोण वाचवेल स्वराज्य या आशेत होती.येसूराणी म्हणजे साक्षात रायगडाच्या राजाची पराक्रमी सून होती,जिजाऊंच्या अनुभवांतून समृद्ध झालेल्या संस्कारांच्या विदयापिढात वाढलेली एक आदर्श माता,राज्यकारभारीण होती.ती स्वराज्याची "कुलमुखत्यार" होती. येसुराणी नियतीपुढं खचली होती,संभाजी नावाच्या रणात घोंगावणाऱ्या तलवारिची शस्त्र विना उरलेली मोकळी एकटीच पडलेली म्यान होत पण भीतीचा मागमूसही तिच्या चेहऱ्यावर न्हवता.ती लढत होती आपल्या नशीबाशी आणि सांगत होती नियतीला 'राजा नसला म्हणून काय झालं आपलं सिंहासन अजून सज्ज आहे'.
           मधीच कधीतरी झुल्फिकारखानाचे वकील यायचे 'किल्ला ताब्यात ध्या' म्हणून आर्जव करायचे मराठे हट्टी होते ते किल्ला द्यायला तयार न्हवते.आक्रमण,हल्ले प्रतिहल्ले चालू होते.दिवस काळजीत पुढं सरत होते.स्वराज्याची "कुलमुखत्यार" म्हणून आठ महिने  राज्यकारभार चालू होता.तसं तर राजाराम महाराज गादीवर छत्रपती म्हणून बसले होते पण राजकारणाची मुत्सद्दी धोरण आखण्यात ते अयशस्वी होते.आपल्या भावाला शंभुराजांना मनात ठेवून त्याच्या मुलाच्या नावानं बाळ शिवाजी च्या वतीने ते राज्यकारभार पहात होते पण सारी सूत्रे येसुरांणींच्या हातात होती.
         मराठे झुल्फिकारखान  खानाचा वेढा तोडायला यशस्वी होत न्हवते तेव्हा मात्र लढून उपयोग नाहीं आता युक्ती चा मार्ग निवडत येसूबाईंनी खलबतखान्यात बैठक बोलावली.पंत,प्रधान,सचिव,सेनापती सारे एकत्र जमले स्वराज्याच्या भविष्याची चर्चा रंगली होती.प्रत्येक जण आपापले विचार मांडत होते पण त्या विचारांच्या पेक्षा औरंगजेब बलशाली होता युक्त्या,लढाया करून उपयोग न्हवता आता एकच मार्ग शिल्लक होता.चारी बाजूंनी रायगड घट्ट आवळला जात होता,श्वास कोंडला जात होता.
 एक नजर येसूबाईंनी सर्वांवर फिरवली आणि दीर्घ श्वास घेत आपला निर्णय सांगितला. तसा इतक्या वेळ शांत राहोलेला सेनापती संताजी घोरपडे वाघा सारखा सज्ज झाला.त्याची छाती फुगली होती,हाताच्या मुठी आवळल्या गेल्या, "नाही,मुळीच शक्य नाही स्वराज्याच तख्त अस गनिमांच्या तावडीत सोडून जाण्यापरीस मेलेलो काय वाईट" संताजी रागात बोलत होता.
"नाही हे कदापी शक्य होणार नाही, स्वराज्य आणि बाळराजे मुघलांच्या तावडीत देऊन आम्ही पळ काढला तर काय तोंड दाखवू या रयतेला" धनाजी जाधव पण तडक उभे राहत बोलू लागले.
"त्यापरीस हितच कटुन मरु पण रायगड सोडणार नाही" जोत्याजी केसरकर काळजीच्या स्वरात म्हणला तसा त्याच्या डोळ्यात पाण्याचा ओसरता थेंब जमा झाला.
      सारे शांत होते,आता कोण काय बोलेल यावर राजाराम राजे काय बोलतील यावर सर्वांचं लक्ष होत पण येसूबाईं उभ्या राहिल्या.आपली पूर्ण शक्ती एकवटून त्या बोलत होत्या नव्हे आदेशच देत होत्या,
"या रयतेवर सुखाच छत्र व्हावं आऊसाहेबांनी पाहिलेलं हे स्वप्न,आबासाहेबांनी शिवभूपतींनी मोठ्या बलिदानाने उभं केलं,हे तख्त सिंहासन म्हणजे आपली प्रतिमा आणि त्या सिंहासनावर बसणारा राजा म्हणजे आपलं हृदय,आपलं सत्व,आपलं अस्तित्व पण हे अस्तित्व आज नाहीस होण्याच्या मार्गावर आहे आणि तुम्ही लढाईच्या गोष्टी करताय,आता लढण्यापेक्षा राजा वाचवणं गरजेचं आहे म्हणून चंदी ला आपल राज्य आहे सध्या राजाराम राजेंना तिकडं पाठवू,संताजी धनाजी आणि इतर पडली मुलूखगिरी करतील,आम्ही बालशिवाजी सोबत कैद होतो,पुढं तुम्ही तुमच्या कार्यकर्तृत्वावर स्वराज्य अबाधित ठेवत आम्हाला सोडवून आणलं यात शंका नाही"
      सारे शांत होते,कोणाचंही काही बोलायच धाडस होत न्हवत,
"पळून जाण्यापेक्षा दादामहाराजांसारखं आम्ही पण मुघलांवर तुटून पडू"
एवढ्या वेळ शांत बसलेले राजाराम राजे कडाडले.
"नाही,जसं ठरलंय तसच होईल"येसूबाईंनी आपला निर्णय ठाम पणे सांगितला.
        कोणालाच हा निर्णय मान्य न्हवता पण काही पर्याय नासल्याने शेवटी नाही होय करत राजाराम महाराज त्यांचा कुटुंब कबिला आणि सेनापती आणि कारभारी मंडळी एका रात्री गपचूप वाघ दरवाज्याने रायगड उतरून चंदी म्हणजे जिंजी च्या दिशेने निघाले.पुढं भविष्यात आपण येसूराणी सरकार आणि बाल शिवाजी ची सुटका करू असा मनात बेत धरत ओल्या डोळ्यांनी सर्वांनी रायगड सोडला.
        मराठ्यांचा इतिहास जितका पराक्रमाचा,साहसाचा,धैर्याचा होता तितकाच आपुलकीचा,संयमाचा,निर्णयक्षमतेचा आणि भावनेचा आहे.धर्म शास्त्रनुसार वडिलांच्या निधनानंतर मोठ्या मुलाचा अधिकार त्यांच्या मालमत्ता,कारभारावर असतो पण बाल शिवाजी लहान होता,त्यांना राजा बनवणे शक्य न्हवत म्हणून येसूबाईंनी राजाराम महाराजांचा राज्याभिषेक केला होता.राजराम राजे तरुण होते,निर्णय घ्यायची क्षमता त्यांच्यात होती शिवाय युद्ध शास्त्र सुद्धा त्यांना जमत होत.
       ऐकत झुल्फिकारखान वेढा अधिक आवळत होता एके दिवशी त्याचे काही स्वार आणि वकील रायगडावर आले,येसूबाईंनी  एक तह करत रायगड मोगलांच्या हाती द्यायचं मान्य केलं.झुल्फिकारखानाला आनंद झाला आयत स्वराज्य हातात आलं,मराठयांचा राजा आयता हातात येणार होता म्हणून त्यांनी तहतील अटी मान्य केल्या होत्या.येसूबाईंनी कुराण हातात घेऊन शपथ ग्यायला लावली होती की,जो पर्यंत येसूबाई मुघलांच्या कैदेत आहेत तो पर्यंत त्यांच्या चरित्राची,इज्जतीची आणि मान सन्मानाची जबाबदारी झुल्फिकार खान घेणार होता.शिवाय बाल शिवाजी राजांना राजा म्हणून मान्यता मुघल बादशहा देणार होता.एकदा का बाळशिवाजी मुघलांचे मनसबदार होऊन राजा म्हणून मान्यता मिळाली की त्यांच्या सुरक्षेची जास्त काळजी करायची गरज न्हवती.मुघलांनी मोठ्या आनंदात मागण्या मान्य केल्या.रायगडावर उपस्तीत असलेला छत्रपती संभाजी राजेंचा कुटुंब कबिला,महत्वाची काही सरदार मंडळी आणि बाळ शिवाजी च्या रक्षणासाठी जोत्याजी केसरकर अशी जवळ जवळ 600 माणसं कैद केली.झुल्फिकारखान मात्र रायगड हातात येऊनही उदास होता कारण त्याचा जिंकून सुद्धा पराभव झाला होता.कडक पहारा असून पण राजाराम राजे म्हणजे स्वराज्याचा छत्रपती त्याला रायगडावर सापडला न्हवता.मराठ्यांचा पराभव करत राज्य ताब्यात ग्यायच स्वप्न भंगल होत.तोंड पाडत झुल्फिकारखान औरंगजेबाच्या कारभारात बाळशिवाजी आणि येसूबाईंना घेऊन हजर झाला.
        औरंगजेबाचा दरबार भरला होता,एका उंच आसनावर दाढी कुरवाळत आणि हातातले माळेचे मणी मोजत तो दिल्लीचा महत्वकांक्षी बादशहा अबुल मुजजफ्फर मुहीउद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर म्हणजे औरंगजेब  शांत बसला होता.त्याच्या शेजारी एका मखमली पडद्याआड एक 50 ची स्त्री  त्याची मूलगी झीनत बसली होती.साधारण 80 च्या पुढं गेलेला वृद्ध झालेला तो आलमगीर आपल्या पांढऱ्या-सोनेरी दाढीवरून हात फिरवत सज्ज झाला.आपल्या मनसबदार,सरदारांचे कुर्निसात त्याने मंजूर केले काही पराक्रम गाजवणाऱ्यांना खिल्लती  वाटल्या जात होत्या.त्याच वेळी येसूबाई आणि बालशिवाजी यांना दरबारात हजर करण्यात आलं.येसूबाईंनी पाहताच औरंगजेब आपली बैठक ताठ करत सावध बसला.सौभाग्यवतीच्या कुंकवाने भरलेलं ते कपाळ आज पांढऱ पडलं होत.पांढरीच पण भरजरी साधी नेसलेल्या येसूबाई एखाध्या देवी सारख्या भासत होत्या,रायगड हातात आला पण मराठ्यांचा राजा सापडू दिला नाही याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता.येसूबाईंच्या चेहऱ्यावर किंचितही भय न्हवत.ते तेज पाहून औरंगजेबाने सुद्धा नजर झुकवली. समोर सात आठ वर्षाच कोवळं लेकरू आपली नजर खाली करत पायाच्या अंगठयांन जमिनीशी खेळत होत.अंगावर भरजरी वस्त्र,कमरेला छोटी तलवार,डोईवर रेशमी मोत्यांच्या तुर्याचा राजेशाही फेटा,गळ्यात मोठ्याच्या माळा त्याच्या छोट्याशा छातीभोवती गुंडालेल्या छोट्याशा रेशमी  शेल्यात एक भरजरी वस्त्र आणि सोन्या-मोत्यांनी सजवलेली कट्यार,कानात कर्णफुले,हातात सोन्याचं कडं आशा रूपातील तो बालशिवाजी तितकाच रुबादर आणि देखणा दिसत होता.
"नाम क्या है तुम्हारा?"
औरंगजेब त्या छोट्याशा मुलाकडे पाहत मोठ्या गुर्मीत धमकावत विचारता झाला.क्षणाचा ही विलंब न करता बालशिवाजी ची नजर वर गेली ती थेट औरंग्याच्या डोळ्यात,हाताच्या मुठी आवळत तो युवराज नजर रोखून त्या आलमगीर औरंगजेबकड पाहत होता,त्याला कसलीच भीती वाटत न्हवती.औरंगजेब थरारला,थोडासा सावरला.तीच नजर,तसाच साज आणि अशाच बुलंद छातीचा संभाजी याच खेळण्या बागडण्याच्या वयात दिल्ली च्या दरबारात असाच दिल्लीच्या मुघल तख्तावर बसलेल्या आलमगीर औरंगजेबाला डोळ्यात डोळे घालून रोखत उभा होता.तो प्रसंग औरंगजेब अजून विसरला न्हवता. शिवाजीनं माझी खैरात उधळून लावली होती,सारा दरबार भयभीत होता पण असाच याचा बाप संभाजी आपल्या समोर छाती फुगवत उभा होता.औरंगजेबाला विश्वास बसत न्हवता पण हा नियतीनं घडवलेला योगायोग होता.इतिहासान पुन्हा एकदा मराठ्यांच्या लेकराचं रुद्र रूप त्याला दाखवलं होत.
"सुना नहीं हमने क्या पुछा,नाम क्या है तुम्हारा?" 
औरंगजेब स्वतःला सावरत पुन्हा गरजला.
"शिवाजी संभाजीराजे भोसले" आपल्या शरीरातील सगळी ताकद एकवटत बाळ शिवाजीनं आपलं नाव सांगितलं.औरंगजेबाला नीट ऐकू गेलं न्हवत तो पुन्हा रोखून म्हणला."जरा ठिकसे नाम बताना,अब तो हमेशा मुझे आपको बुलाना पडेगा" हसत औरंगजेब म्हणाला.

"आप हमारा नाम कभी भुलेंगे नहीं, क्योकी मेरा नाम मेरे दादाजी के नाम से रखा है,शिवाजी संभाजीराजे भोसले" मोठ्या विजयी तोऱ्यात बाल शिवाजी ने आपला परिचय खड्या आवाजात करून दिला.शिवाजी नाव ऐकताच तख्तावर बसलेला औरंगजेब ताडकन उभा राहिला.सारा दरबार हादरला होता, छटपट मुजरे जडले,कुर्निसात पडले. आपलं तख्त सोडून तो आलमगीर खाली आला. अगदी बालशिवाजी च्या जवळ आला.शिवाजीनं आईचा हात घट्ट पकडला.एकदा येसूबांईंकडे पाहिलं आणि बाल शिवाजी कड पाहून तो विचार करु लागला.याचा आजा शिवाजी असाच आपल्या दरबारात खिल्लत उधळून लावला दरबाराचा अपमान केला होता,मुघलांच्या हातावर तुरी देत कैदेतून गायब झाला होता.अजून एक शिवाजी त्याचा समोर उभा होता उमर कमी होती पण रुतबा तसाच होता.औरंगजेब तडफडत होता पण काहीच करू शकत न्हवता.

    "शिवाजी नामसे हमे नफरत है,हम आपका नाम बदलेंगे" औरंगजेबाचा आवाज गंभीर होत होता.छोटासा बाळ शिवाजी सुखावला होता.आपल्या आईने सांगितलेल्या आजोबांच्या पराक्रमी कथा त्याला खऱ्या वाटू लागल्या होत्या.

"तुम्हारा दादा शिवाजीने हमारी पुरी सलतनत को परेशान किया था, सैतान जैसा शिवाजी हमे छलता रहा....लेकिन मै तुम्हे सच्च आदमी बनाउंगा" हसत हसत औरंगजेब बोलत होता.

येसूबाई आणि शिवाजी सोबत मराठी मावळ्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या,सर्वांचं लक्ष औरंगजेबकडं होत.

 बालशिवाजी च नाव त्यानं साव ठेवलं,साव म्हणजे शांत,सच्चा.पुढं साव च शाहू झालं आणि शंभूपुत्र शिवाजीचा शाहू झाला होता.

#थोरले_शाहू_महाराज #शाहुपर्व_भाग_5 #मुघलांच्या_कैदेतील_शाहूंराजे

 


#थोरले_शाहू_महाराज
शाहू राजे जवळजवळ अठरा वर्ष औरंगजेबाच्या छावणीत कैद होते.वयाच्या 7 व्या वर्षी रायगडावर कैद झालेला शंभू पुत्र 18 वर्ष मुघली सेनेच्या विळख्यात अडकून पडला होता.महाराणी येसुबाईंनी शाहू राजांना चांगल्या पद्धतिने शिक्षण दिल होत रणांगणातल्या गोष्टी सांगून शाहूंच्या मनात पराक्रमाची ज्योत पेटवून दिली होती.मराठे मुघल छावणीवर हल्ले करायचे तेव्हा शाहू राजांच्या मनगटातली रग उफाळून यायची त्यांनाही वाटायचं आपण समशेर घेऊन रणांगणात जावं आणि सुटका करून घ्यावी,ब्रम्हपुरीत औरंगजेबाची छावणी पडली होती आणि अचानक धनाजी जाधवांनी हल्ला चढवून औरंगजेब भयभीत केला होता तेव्हा मात्र शाहू राजांना एक आशा लागली होती की आपली मुक्तता होईल पण लाखाच्या फौजे पुढं कणभर मराठे टिकणार कसे.शाहू राजे कैदेत असताना कसे जगले असतील याची कल्पनाही करू शकत नाही.आपण स्वतः एक दिवस घराबाहेर नाही गेलो तर दिवसभर मानसिक तणाव सहन करावा लागतो.आजारी असेल आणि आठवडा भर घरात आराम केल्यावर जेव्हा एकदम बाहेर पडतो तेव्हा होणार जो आनंद असतो तो आनंद शाहूंच्या आयुष्यात न्हवता.अठरा वर्ष शत्रूच्या छावणीत राहणे सोपं नाही बरं फक्त राहायचं नाही तर कैद सोसायची.कितीतरी अपमान, किती तरी हाल,अपेष्ठा सहन कराव्या लागल्या. पण मराठे जेव्हा मुघलांची दाणादाण उडवायचे तेव्हा मात्र शाहूंच्या आणि येसूबाईंच्या मनाला एक आनंद व्हायचा.आपला त्याग,आपली कैद आणि आपण सोसलेले हाल वाया गेले नाहीत.राजाराम राजे या गोष्टीचा बदला घेत होते.शाहूंना सोडवण्याचे खूप प्रयत्न झाले पण त्यात यश आलं न्हवत.शाहूंनी लहानपणापासून मराठ्यांच्या पराक्रमाच्या आणि बेलाग छातीच्या सह्याद्रीच्या गोष्टी ऐकल्या होत्या तो सह्याद्री त्यांनी मुघलांच्या छावणीत असताना अनुभवला होता.
राजाराम राजांचा पकडण्यासाठी झुल्फिकार खान तिकडं जिंजीला वेढा देऊन बसला होता.इकडं महाराष्ट्रात औरंगजेब स्वतः नेतृत्व करत मराठ्यांचे गडकिल्ले जिंकत होते.एका पाठोपाठ एक अशे किल्ले तो जिंकत होता कधी तह व्हायचे कधी लढाई व्हायची.खरं तर मुघलांनी एकच किल्ला लढून जिंकला होता तो म्हणजे तोरणगड बाकी त्यांनी जिंकलेले किल्ले हे जिंकले नाहीत तर किल्लेदाराच्या हातात मोहरा देऊन विकत घेतले होते.मराठे एखादा किल्ला लढवायचे नंतर पैशे घेऊन त्यांच्या ताब्यात द्यायचे.मुघल किल्याची दागडुजी करायचे,रसद भरायचे किल्ला जिवंत करायचे आणि दोन तीन महिन्यांनी मराठे रात्री येऊन किल्ला जिंकून ग्यायचे.अस करत मरहट्टे त्यांना लुटत होते.सह्याद्री कसा बिकट आहे,कसा रांगडा आहे हे मुघली सेनेला माहीत न्हवत.उत्तरेच्या विस्तीर्ण पसरलेल्या माळरानावर मैलो- मैल पसरलेल्या सपाट प्रदेशात युद्ध खेळणारे मुघली सैन्य सह्याद्रीच्या डोंगर रांगा, अवघड घाट माथे यात फसत होते.उत्तरेत नदीची पात्रही लांब च्या लांब पण संथ वाहणाऱ्या आणि रुंद पण दक्षिणेत नद्या लहान,खोल आणि अतिवेगाने वाहणाऱ्या होत्या.मुघली घोडी सुध्दा पाण्यात शिरायला तयार नसायची.उत्तरेच्या माळरानावर कुठं तरी लहानशी टेकडी असायची बाकी सारा मैदानी प्रदेश.दक्षिण देशात मात्र मैला मैलावर लहान टेकड्या,खिंड आणि कवचित एखाद मैदानी पठार असायच.उत्तरेच्या मानानं सह्याद्रीतल्या नद्या,ओढे मुघलांना किरकोळ वाटायच्या.
ओरंगजेबाची छावणी पडली तर 4-5मैलाचा प्रदेश त्याच्या छावणीने व्यापून जायचा.लाखो सैन्य,घोडे,जनावरे,हत्ती आणि करोडो रुपयांची संपत्ती घेऊन तो सह्याद्रीत घुसला आणि आयता मराठ्यांच्या ताब्यात सापडला.औरंगजेब जिथं जाईल तिथं शाहू आणि येसूराणी यांना सोबत घेऊन जायचा,सोबत त्याचा जनाना पण असायचा.मराठी दौलतीचे किल्ले जिंकून ग्यायचं म्हणून तो किल्यावर वेढे देत होता.राजाराम राजें सिंहासनावर बसले होते खरे पण सिंहासन त्यांच्या नशिबात न्हवत.सारखी धावपळ त्यांच्या नशिबी होती.राजाराम राजेंनी लढाई स्वतःच्या बचावासाठी केल्या. मराठी सैन्य मात्र मुघलांना लुटण्याचा इराद्याने हल्ला करून गायब व्हायचे.सरंजाम पद्धत पुन्हा सुरू केली त्यामुळे मनगटात तलवारी आवळल्या गेल्या आणि अंगातील रक्त सळसळत मुघलांवर तुटून पडलं यातूनच मराठे अगदी नर्मदेपालिकडे गेले आणि संरजांम वसूल करू लागले.मराठी सैन्य मुघली प्रांतात हल्ले करून आपली पकड मजबूत करत होते,औरंगजेब मात्र इकडेच किल्ले जिंकायचा नादात होता. 26 वर्ष औरंगजेब मराठी मुलखात होता पण तो कधीच विजयी झाला नाही.विजयाचे सोहळे साजरं करण्याचं भाग्य त्याला मराठी भूमीत लाभलं नाही.मराठे,निसर्ग आणि मुघल यांनी या भूमीत असा रणतांडव मांडला होता की औरंगजेबाच्या पुढच्या कित्येक पिढ्याना त्याचा परिणाम भोगावा लागला.
मराठ्यांचा गनिमी कावा असा होता की ते अचानक हल्ला करायचे लढायचे कमी पण लुटायचे जास्त,त्यात मोगली सैन्य विनाकारण मारले जायचे.कधी कधी महिना महिना सह्याद्रीचा पाऊस थांबत नसायचा अशा वेळी मात्र सर्वांची दैना उडायची.शाहू राजांनी सुद्धा हे सह्याद्रीच रौद्र रूप अनुभवलं,सह्याद्री पहिला तो औरंगजेबाच्या छावणीत.बुलंद,बेलाग,मजबुत.कातळ ताशीव दगडांच्या पर्वत रांगेतला सह्याद्री उन्हाळ्यात शांत निपचित पडून असतो.कुठंतरी वावटळ उठून झाडाची वाळलेली पान आकाशात फेर धरायची.पावसाळ्यात मात्र सह्याद्री खवळून उठायचा.हाताच्या अंगठ्या एवढा एक एक थेंब असायचा.पावसाळ्यात नदी नाले ओसंडून वाहायचे.वाहणाऱ्या पाण्याबरोबर लालबुंद माती वाहून यायची.शाहू राजांच्या यातनाच्या पुढं सह्याद्रीच रौद्र रूप काहीच न्हवत पण मुघलांना ते सहन होत न्हवत.
एकदा औरंगजेबाच्या सैन्याचा मुक्काम मानदेशात पडला होता.माण नदीच्या छोट्या पात्रात त्याची भली मोठी सेना तळ ठोकून होती.माण देश म्हणजे दुष्काळी प्रदेश.या भागात औरंगजेबाची छावणी पडली होती.सगळे शांत झोपी गेले अचानक रात्री 2 वाजण्याच्या सुमारास आरडा ओरडा चालू झाला.सारी मुघल सेना अस्ताव्यस्त झाली होती.सारी गुलालबारी जागी झाली.त्या गुलालबारीत पूर्ण पाणी शिरलं होत.औरंगजेब खडबडून जागा झाला.त्या धामधुमीत त्याचा पायाला जबर दुखापत झाली.विव्हळत कसा बसा तो त्यातून बाहेर आला.चौकशी केल्यावर समजले की लांब कुठंतरी डोंगरावर ढगफुटी झाली होती,आणि त्या पावसाच्या पाण्याने माण नदीला पूर आला होता.या अचानक आलेल्या अस्मानी संकटात औरंगजेबाची कितीतरी लाखांच नुकसान झाल होत.हजारो जनावरे मेली होती.मनूची नावाचा इतिहासकार म्हणतो की "दुर्गंधी इतकी पसरली होती की शुद्ध हवा ग्यायला अडीच कोसावर जावं लागायचं."
इतकी बेकार अवस्था औरंगजेबाची झाली होती.
औरंगजेबाच्या कैदेत असताना शाहू राजे छावणीत सुरक्षित होते याच सगळं श्रेय जात ते महाराणी येसूबाई,राजाराम राजे आणि दक्षिण प्रांतात धुमाकूळ घालणाऱ्या मराठी सेनेच.शाहू राजे खरे घडवले ते त्या वीर मातेने.विचारांचा,संस्कारांचा,पराक्रमाचा वारसा शाहूंच्या रक्ताच्या थेंबा थेंबात जिवंत ठेवायचं काम केलं ते पहिल्या गुरू महाराणी येसूबाईंनी.काही प्रसंग अशे आले होते की औरंगजेबाने या माय लेकरांची ताटातूट केली होती.औरंगजेबाची छावणी ब्राह्मपुरीत जवळजवळ 5 वर्ष तळ ठोकून होती.त्याच्यानंतर येसूबाईंना नगरच्या किल्ल्यात ठेऊन शाहूंराजेंना बादशहाने सोबत ठेवलं होतं.
शाहू राजे म्हणजे औरंगजेबाची ढाल होती.ही ढाल सोडवण्यासाठी कितीतरी प्रयत्न झाले पण त्यात यश आलं न्हवत.अचानक मराठ्यांनी हल्ला केला आणि प्रसंग जीवाशी आला तर शाहूंच्या मानेवर तलवार धरून मुघल स्वतःची सुटका करून घेऊ शकत होते आणि म्हणूनच औरंगजेबान शाहूंना इतकी वर्षे जिवंत ठेवलं होतं.शाहू आणि येसूबाई कैदेत यायच्या आधी त्यांनी काही अटी मांडल्या होत्या त्याचा जामीन झुल्फिकार खान होता.तो झुल्फिकार खान जिंजी ला वेढा देऊन होता.अचानक एके दिवशी एका बाजूने संताजी आणि दुसरीकडून धनाजी नि हल्ला केला आणि हल्ला इतका जबर होता की मुघलांची प्रचंड हानी आणि प्रचंड लूट झाली होती.झुल्फिकार खानाला मारायचा आणि संभाजी राजांच्या हत्येचा बदला घ्यायचा आशा त्वेषाने संताजी राव तुटून पडले होते.अचानक राजांचा निरोप आला आणि झुल्फिकार खानाला जिवंत सोडावा लागला.खान तलवारीच्या वाराच्या टप्प्यात आला होता पण त्याच्या वकिलाने राजाराम राजांकडे तहाची बोलणी केली.राजाराम राजेंनी एक गोष्ट जाणली होती की मुघलांच्या दरबारात झुल्फिकार खान हा शाहू राजे आणि इतर कैद्यांना जामीन आहे त्यामुळे तो असेपर्यंत औरंगजेब त्यांच्या केसालाही धक्का लावणार नाही.म्हणून फक्त आणि फक्त शाहू राजांच्या संरक्षणासाठी झुल्फिकार खान जिवंत राहणे गरजेचा होता.राजाराम राजेंनी त्याच्याशी मैत्री चा हाथ समोर केला होता.नेमकी हीच गोष्ट कडक शिस्तबद्ध लढणाऱ्या संताजी रावांना खटकली.या आधी सुद्धा राजाराम राजेंनी वतनदारी,सरंजाम पद्धत चालु केली याला संताजी चा विरोध होता.त्यात आता हा विषय खूप शेवटाकडे गेला आणि संताजी रावांनी नाराज होऊन राजाराम राजेंशी वाद घालत स्वराज सोडून दिलं. स्वराज्याचा सेनापती रुसून निघून जाणे ही गोष्ट स्वराज्यासाठी घातक होती.राजाराम राजेंनी धनाजी जाधवांना सेनापती पदाची वस्त्र दिली आणि संताजी शत्रूंना जाऊन मिळाला तर आपल्याला जड जाईल म्हणून त्याला कैद करण्याचा हुकूम निघाला.खरतर संताजी स्वराज्याशी बेईमानी करणाऱ्यातले न्हवते पण तरि राजाराम राजेंनी विषाची परीक्षा नको म्हणून आदेश काढले.इतिहासात मात्र आम्हाला वेगळंच दाखवलं इतिहास आम्हाला सांगतो की धनाजी संताजी यांच्यात फूट पडली पण संताजी धनाजी यांच्यात कसलाच वाद न्हवता हा वाद होता स्वराज्याचे छञपती आणि संताजी. धनाजी राव फक्त हुकूम पाळायच काम करत होते.पुढं संताजी रावांचा मृत्यू झाला.हळूहळू शाहू राजे राजकारणाचा अभ्यास करत होते. औरंगजेबाच्या चाली ह्या खूप विचार करून केलेल्या असायच्या पण कुठंतरी त्याच्या फौजेत इमानदारी संपत आली होती.त्याच्या फौजेत आलेला सैनिक हा कित्येक वर्षे घरी गेला न्हवता परिणामी सैन्याची मानसिक स्थिती लढण्याची न्हवती पण स्वतः लंगडा औरंगजेब नेतृत्वाला उतरायचा आणि त्याला पाहून सैन्यात चेव चढायचा.
मुघल सैन्यात कित्येक मराठा सरदार आपल्या तलवारी गाजवत होतें, राजपूत होते,उमराव,वतनदार होते.ह्या लिकांना शाहू राजांनी आपल्या बाजूने वळवून संघटन बांधायचा प्रयत्न केला होता.मुघलांच्या कैदेत असल्याने उत्तरेत जशी प्रतिष्ठा असेल तर रहावं लागायचं.त्यांच्या प्रतिष्ठेनुसार रीतिरिवाज होते ते पाळायला लागायचे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा वारस, शूर पराक्रमी संभाजी राजांचा मुलगा म्हणून कित्येक मुघलांना सुद्धा शाहूनबद्धल प्रेम,आदर आणि स्नेह होता.शाहू राजांना वाटायचं कधी मुघलांकडून सुटका होईल आणि मातृभूमी च्या मातीचा मळवट कपाळी लावेल.पण नियतीच्या मनात वेगळच होत.
क्रमश:
संदर्भ :
१)मुकद्दर-
2)चिटणीसाची बखर
3)अखबर ते औरंगजेब

#शाहुपर्व_भाग4 #शाहूराजे_आणि_राजरामराजे

 



#शाहुपर्व_भाग4
शाहू राजांचा अभ्यास करताना आपल्याला राजाराम महाराजांच्या चरित्रावर पण एक प्रकाश टाकणं गरजेचं आहे.शाहूंचा हक्क असलेल्या हिंदवी स्वराज्याचे तख्त राजाराम राजे सांभाळत होते.कैदेतही शाहूराजे सुरक्षित होते यामागे काहीतरी राजकीय डाव नक्कीच असावे त्या शिवाय औरंगजेब सहजासहजी शाहू राजांना सांभाळणं अशक्य होत. शाहू राजे यांचा झाला तेव्हा राजाराम किशोर अवस्थेत होते.पुढे संभाजी राजांना कैद केल्यावर लगेचच येसूबाईंनी राजाराम राजेंना राजा म्हणून घोषित केले.खर तर गादीवर हक्क शाहूंचा होता.शाहू लहान होते आणि तरी त्यांना राजा बनवलं आणि कारभार केला तर पूर्वी संभाजी राजांविरोधात होती तशी काही मंत्री मंडळी बंड करून आपल्याच घरात यादवी माजण्याची शक्यता होती. शिवाय येसूबाईंनी स्वराज्य वाचवणे महत्वाचं मानलं होत,गादीवर सक्षम राजा बसवला तर लढणारे सैन्य सुद्धा व्यवस्थित निष्ठेने लढतील आणि येसूबाईंना मुळी राज गादीचा मोह न्हवता.राजाराम राजे स्वराज्याचे तिसरे छत्रपती झाले होते.झुल्फिकार खान फणा काढून रायगडला वेढा घालून बसला होता त्याला चुकवून राजाराम राजे काही महत्वाच्या कारभारी व सरदारांच्या मदतीने चंदी म्हणजे जिंजी कडे जायला रवाना झाले.जिंजी कडेच का जायचं या माग सुद्धा येसूबाईंच राजकारण होत.जिंजी प्रदेश हा त्या वेळी हरजीराजे महाडीक यांच्या ताब्यात होता तर तंजावर ला शहाजी राजांचा पुत्र व्यंकोजी याचे राज्य होत.इकडं महाराष्ट्र मुघलांच्या घोड्यांच्या टापाखाली भरडला जात असताना छञपती जिंजी ला गेला हे समजून औरंगजेब जिंजीला जाईल आणि महाराष्ट्र मुक्त होईल. फाल्गुन अमावस्येला छत्रपती संभाजी राजांची हत्या झाली,येसूबाई शाहू कैद झाले.आता राजारामला पकडायला औरंगजेबाचा जीव तुटायला लागला होता.राजाराम संपला की स्वराज्य संपणार होत.अख्ख्या महाराष्ट्र जरी जिंकला आणि राजाराम सापडला नाही तर त्या विजयाला कवडीमोल किंमत होती याला इतिहास साक्ष आहे नेतृत्व संम्पल की सैन्य शरण येत आणि तोच युद्ध धर्म होता.त्यामुळं जो पर्यंत मराठा राजा ताब्यात नाही तो पर्यंत दिल्लीपती जिंकूनही हरलेला होता.राजाराम राजे रायगड सोडून गेले ते थेट प्रतापगड वर.तिथून त्यांनी राजकीय चाली खेळत कारभार चालू केला.संभाजी राजांना पकडल्यावर मराठा सरदार घाबरले होते.मराठे वतनासाठी लढायचे,इनामासाठी लढायचे पण शिवाजी,संभाजी राजांनी कोणाला वतन दिली न्हवती आता औरंगजेब महाराष्ट्रात आला होता, संभाजी राजे संपणार होते मग मराठ्यांनी धोक्यात असलेलं भविष्य आणि मुघलांकडे गेलो को ते वतन देत होते हे पाहून मुघलांना जाऊन मिळायचं ठरवलं आणि काही सरदार आपलं सैन्य घेऊन मुघलांना मिळाले सुद्धा होते त्या सर्वांना राजाराम राजेंनी खलिते पाठवून परत माघारी बोलावलं.किल्ल्यावर खलिते गेले किल्ले जपा,चौक्या पहारे वाढवा म्हणून आदेश निघाले. खर तर राजाराम राजे शरीराने कृश होते पण लढाऊ होते.लहान पणा पासून ते आईच्या पदराआड होते शिवाय नंतर च्या काळात नजर कैदेत असल्याने त्यांना राजकारणाची एवढी माहिती न्हवती पण रामचंद्र अमात्य सारखा मंत्री सोबत होता त्यामुळे कसली चिंता न्हवती.प्रतापगडावरून आपल्या काही लोकांनी निवड महाराष्ट्रात करायची आणि काही लोक जिंजीला सोबत न्यायची होती.पण प्रतापगड ला काखरखानाचा वेढा पडला.राजाराम राजेंनी पहिलाच पराक्रम करायचा प्रयत्न केला त्यांनी पिलाजी गोळे,रुपाजी भोसले, यांच्या सोबतीनं काखरखानाच्या छावणीवर हल्ला चढवला पण दुर्दैवाने त्यांना यश आलं नाही.राजाराम राजेंनी प्रतापगडावर असतांना काही खटले न्यायनिवाडे केले ,काही लोकांना सनदा दिल्या होत्या आणि आपले सैन्य सुद्धा गोळा करण्याचा प्रयत्न केला.मुघली सेना प्रतापगडावर वेढा आवळायला लागली होती.राजाराम राजे नि पन्हाळा-वासोटा-सातारा मार्गे पन्हाळा किल्ला जवळ केला आणि ते पन्हाळ्यावर पोहचले.तिथून त्यांनी खचलेल्या लोकांच मनोधैर्य वाढवत शिवनीती चा वापर करत सर्वांना एकत्र करायचा प्रयत्न केला.संभाजी राजांच्या निधनानंतर सेनापती संताजी घोरपडे मुघलांवर तुटून पडला होता पण त्याला यश मिळत न्हवत.एक रात्री मात्र संताजी घोरपडे,संताजीच भाऊ बहिर्जी, मालोजीआणि विठोजी चव्हाण यांनी कोरेगाव भीमा ला असणाऱ्या औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला चढवला.नशीब बलत्तर म्हणून बादशहा वाचला पण बादशहाच्या छावणीत असलेल्या गुलाब बारीच सर्वात मानाचे असलेले सोन्याचे कलश त्यांनी तोडून नेले.इकडं धनाजी जाधवांनी रायगडला वेढा देऊन बसलेल्या झुल्फिकार खानावर हल्ला केला आणि त्याचे 5 हत्ती आणि काही तोफा पळवून नेल्या.वरून येसूबाई 8 महिने किल्ला लढवत होत्या आणि खाली कोकणातून धनाजी यायचा आणि वेढा तोडायचा प्रयत्न करायचा.संताजी धनाजी दोघे नंतर पन्हाळागडावर जाऊन राजाराम राजेंना जाऊन भेटले.तिथं राजाराम राजांनी त्यांच्या पराक्रमाला खुश होऊन संताजी घोरपडे यांना ममलकमदार म्हणजे राज्याचा आधार हा किताब दिला.बहिर्जी घोरपडे यांना हिंदुराव,मालोजी घोरपडे यांना अमीरउलउमराव,विठोजी चव्हाण यांना हिम्मतबहाद्दर आणि धनाजी जाधव यांना जयशिंगराव ह्या किताबांनी गौरवल.मराठी पराक्रमी लोकांना मुघल वतन देत होते त्यामुळे मराठे आपला प्रदेश लढवत न्हवते.किल्ले मुघलांच्या ताब्यात जात होते,सैन्य कमी होत होत परिणामी लष्करी ताकद कमी होत होती.ती वाढवणे गरजेचं होतं म्हणून राजाराम राजेंनी आपल्या सरदारांना सरंजाम द्यायला चालू केला.त्यामुळे मराठे मुघलांनी जिंकलेल्या प्रदेशावर हल्ले करून तो जिंकून त्यावर सरंजाम बसवून स्वतः सरंजामदार बनायला लागले.मुघलांनी सोपे किल्ले जिंकले होते पण दुर्गम किल्ले जिंकता येत न्हवते.किल्ले मुघलांच्या ताब्यात गेल्याने मराठा लष्कर पुन्हा राजाराम राजेंकडे जमा होऊ लागलं.मोकळ्या झालेल्या लष्कराला सोबत घेऊन खानदेश मधून जिंजी मार्गे रसद पोहच होणार होती आणि लष्करी कारवाया करता येणार होत्या.राजाराम राजेंनी रामचंद्र अमात्य यांना हुकूमतपनाह आणि शंकराजी नारायण यांना राजाज्ञा ही 'किताब देऊन,शिक्के दिले.महाराष्ट्र या दोघांच्या जीवावर सोडुन राजाराम राजे वाण्याच्या वेशात प्रल्हाद निराजी,मानाजी मोरे,खंडो बल्लाळ आणि संताजी धनाजी सोबत जिंजी ला निघून गेले.इकडं येसूबाईंना कैद झाली.वाटेत अचानक लक्क्षमेश्वर जवळ मुघल सैन्य पाठलाग करत येत पण बहिर्जी घोरपडे, संताजी जगताप आणि रुपाजी भोसले स्वतः लढाई करत राजाराम राजेंना नदी पार करून बेगणुर प्रातांत पोचवतात.आता ह्या बेगणुर प्रातांच मुख्य ठाण आलेल्या केळदी मध्ये ही सगळी पोहचतात.केळदी च्या त्या राज्याचा प्रमुख असलेला सोमदेव नायक याच नुकतंच निधन झाल्यानं त्याची गादी त्याच्या बायकोच्या चेंनम्मा च्या ताब्यात होती.राणी चेंनम्मा ही राजाराम राजेंना संरक्षण देती आणि पुढं त्यांना जिंजी ला पोहचायला मदत करते.मुघलांनी जिंजीला जाणाऱ्या वाटेत सर्वच ठाणेदारांना राजाराम राजे वाटेत दिसेल तिथं मारायचे किंवा कैद करायचे आदेश दिले होते.अगदी पोर्तुगीज व्हाईसराय ला सुद्धा राजाराम राजेंना पकडायचे आदेश होते कारण राजाराम समुद्र मार्गे पण जाऊ शकत होता.औरंगजेब नाराज झाला तर बेदनूर लुटून नेईल, राणी चेन्नमा ला कैद करु शकत होता पण शिवाजी राजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या प्रेरणेने बेदनूर राज्य उभं राहिलं होत,शिवाजी राजांचे उपकार हिंदूंवर होते म्हणून राणी ने हा धोका पत्करला होता.अथक प्रयत्न करून राजाराम जिंजी ला पोहचतात. जिंजी अंबिकाबाई म्हणजे शिवाजी राजांच्या मुलीच्या ताब्यात होती त्याचा कारभार हरजीराजे महाडिक पाहत होते.अंबिका बाईंना ताबा देऊ नये असं वाटायचं पण शेवटी त्यांनी राजाराम राजेंचा हाथी जिंजी सोपवली.राजाराम जिंजी ला पोहचले होते इकडं औरंगजेबाची अवस्था पाहण्यासारखी होती.शाहू आणि येसूबाईंना आता थोडा दिलासा मिळाला होता.एकदा का राजाराम राजे सक्षम झाले की ते शाहू आणि येसूबाई यांची सुटका करणार होते.पण औरंगजेबाने झुल्फिकार खान,शहजादा कामबक्ष आणि असदखान यांना जिंजीला वेढा द्यायला पण जिंजी साधा सुद्धा किल्ला न्हवता.त्यात मुघलांनी कर्नाटक प्रांतात खूप धुमाकूळ घातला होता,मंदिर पाडली होती त्यामुळे कर्नाटकातील काही नायक मंडळी राजरामांना येऊन मिळाली त्यामुळं राजाराम राजेंलष्करी दृष्टया सक्षम झाले होते.जिंजी तीन किल्ल्याचा मिळून बनला होता.राजगिरी,कृष्णगिरी आणि चंद्रयनदुर्ग अशे तीन खंड एकत्र येऊन जिंजी चा किल्ला होता.मजबूत तटबंदी,बुरुज आणि भोवताली खंदक होती आणि खंदकात रानटी जलचर प्राणी त्यामुळे जिंजी प्रदेश सुरक्षित होता.जिंकणे अवघड होता.ही गोष्ट झुल्फिकार खानाला माहित होती.जिंजीला मोठ्या तोफांचा मारा केला,मोर्चे लावले पण जिंजी हातात येत न्हवती.राजाराम राजेंनी मात्र वेढ्यात असलेले मराठे फोडले आणि स्वतःकडे वळवून घेतले त्यात नेमाजी शिंदे,माणकोजी पांढरे,नागोजी माने सारखे सरदार राजाराम राजेंचा पक्षात गेले.
बरेच दिवस राजाराम राजे लढा देत राहिले.औरंगजेब मात्र महाराष्ट्र सोडत न्हवता तो महाराष्ट्रातून जाणारी रसद तोडून राजाराम राजांना पकडण्यासाठी आपल्या सैन्याला रसद पुरवत होता.राजाराम राजे यांची रसद संपत आली होती.राजाराम राजेंची हालत बिकट झाली होती तेव्हा त्यांनी हरजी राजेंकडून आणि तिथल्या काही महत्वच्या लोकांकडून पैसा गोळा केला होता.तरी पण रसद पुरवणं शक्य होत न्हवत राजाराम राजांची रसद संपल्यानं झुल्फिकार खुश होता आता राजाराम हातात येणार म्हणून त्यांनी औरंगजेबाला पत्र पाठवले होते.अचानक एके दिवशी तंजावर प्रांतातुन व्यंकोजी राजेंचा पुत्र शहाजी हा रसद आणि लष्कर घेऊन जिंजीला येऊन मिळाला.ताज्या दमाची फौज जिंजीला मिळाली आणि मराठे पुन्हा वेढा फोडू लागले.
औरंगजेब मात्र मराठ्यांचे किल्ले घ्यायला पुढं सरसावत होता.सातारा किल्ला जिंकायला त्यांनी सर्जाखानाला पाठवलं होत.राजाराम राजेंनी संताजी धनाजी मात्र महाराष्ट्रात ठेवले होते.संताजी गनिमी काव्यात माहिर होता.हंबीरराव मोहित्यांच्या हाताखाली शिकलेला असल्याने संताजी कायम सावध युद्ध खेळायचा.त्यात त्यांनी सर्जाखान याला चांगलाच धुतला आणि लुटला होता.
मराठ्यांनी मुघलांना या भूमीत जास्त विजय मिळवून दिला नाही.औरंगजेबान आपली छावणी ब्रह्मपुरी परिसरात लावली होती आणि अचानक एक रात्री धनाजी जाधवांनी हल्ला करून येसूबाई आणि शाहू राजांना सोडवायचा प्रयत्न केला पण तो फसला.पुढं जिंजी लढवणे मुस्किल झाल्यावर झुल्फिकार खानाकडून खंडणी घेत राजाराम राजे पुन्हा महाराष्ट्रात आले.राजाराम राजे यांचे शाहू राजांशी पूर्ण संबंध तुटले होते.कसल्याही प्रकारच पत्रव्यवहार होत न्हवता पण शेवट पर्यंत राजाराम राजेंना शाहूंना सोडवावा अस वाटायचं त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते.झुल्फिकार खानसोबत सुद्धा राजाराम राजांनी चांगले संबंध ठेवले होते.राजाराम राजेंचा बराच काळ जिंजी किल्ल्यात वेढ्यात गेला.पण मराठे मात्र तरी सुद्धा औरंगजेबाला पुरून उरत होते.आपण पुढच्या भागात पाहू औरंगजेबाची मराठी सेनेने आणि सह्याद्रीने कशी फजिती केली.

#हिंदनृपती_कथा_शंभुपुत्राची #शाहूपर्व_भाग_3_शाहूंच_लग्न

 



#हिंदनृपती_कथा_शंभुपुत्राची
शाहूंच्या वाढत्या वयाचा विचार करता शाहूंचा विवाह करण गरजेचं होतं पण औरंगजेबा नी लग्नासाठी मुस्लिम सरदारांच्या मुलींची पाहिलेली स्थळ येसूराणी यांना मान्य न्हवती.सर्व मराठा सरदार घाबरले होते,कैदेत असल्यामुळे औरंगजेब हट्टाला पेटला तर शाहू राजांचा जबरदस्ती विवाह करू शकत होता.
येसूबाईंनी मात्र झीनत आणि झुल्फिकारखानाच्या मदतीने बादशहाच्या दरबारात अर्ज केला आणि त्यांना सुचवलं की, 'शाहू हिंदू आहेत आणि धर्म शास्त्र नुसार लग्न आपल्या धर्मात होत त्यामुळे शाहूंचा विवाह मुस्लिम मुलीशी लावून शाहूंचा धर्म बाटवू नये'.
औरंगजेबान शाहूंच्या लग्नाचा विषय येसूबाई यांच्यावर सोपवून दिला.पण औरंगजेबाच्या डोक्यात मात्र अर्जातील 'शाहूंचा धर्म बाटेल' या विषयावर विचारचक्र फिरू लागल.
औरंगजेबाच्या छावणीत आणि त्याची मनसब स्वीकारलेली हजारो मराठे होते,त्यात काही मातब्बर घराण्यातील लोक सुद्धा वतन आणि जहागिरी साठी आपली तलवार गाजवत होते.त्यातच कण्हेर च्या शिंदे घराण्यातील सावित्रीबाई यांच्याशी शाहूंचा विवाह झाला.नंतर शाहूंचा दुसरा विवाह करण्याचा अर्ज औरंगजेबा पाठवला.औरंगजेबाने तो मान्य केला.शाहूंच्या पहिल्या लग्नावेळी औरंगजेब त्याच्या राजकीय चालींमध्ये व्यस्त होता त्याला लग्न कार्यात सहभागी होता आलं न्हवत पण या वेळी तो स्वतः शाहूंच्या लग्नासाठी उत्सुक होता,हजर राहणार होता.
जोत्याजी केसरकर आणि येसूबाईंनी एक स्थळ बघितलं होत.औरंगजेबाच्या सेनेत कित्येक वर्षे भोसले घराण्याशी संबंध असलेले रुस्तुमराव जाधवराव यांची कन्या अंबिकाबाई हिची निवड येसूबाईंनी केली होती.
शाहू राजे म्हणजे औरंगजेबाच्या नातवाच्या वयाचे होते त्यात शाहूंच्या शांत वागणुकीमुळे त्यानी शाहूंच्या लग्नाची जबादारी स्वतःवर घेतली.शेडगावकर भोसल्यांच्या बखरी नुसार औरंगजेबाने सात बिघ्याचा मांडव शाहूंच्या लग्नासाठी सजवला होता.आपल्या शहजादयाच लग्न असल्यासारखं तो लक्ष देत होता.तो स्वतः लग्नाला हजर होता.औरंगजेबान एक लाख रुपये शाहूंच्या लग्नावर खर्च करत मोठया उत्साहात लग्न कार्य पार पाडलं होत.लग्न पार पडलं खरं पण लग्नानंतर एक संकट येसूबाई आणि शाहूंच्या समोर आ वासून उभं राहिलं.औरंगजेबाने शाहू आणि नवीन नवरीला तोंड दाखवायला बोलावलं होतं.पूर्वीच्या काळी हिंदू मुली,महिला किंवा नवविवाहिता ह्या दुसऱ्या धर्मातील लोकांसमोर आशा साज श्रुंगार अवस्थेत जात नसत,त्यात औरंगजेब म्हणजे मोठा लहरी होता.काही गैर वर्तन केलं तर नवरी बाटेल.मोठा पेच प्रसंग येसूबाईंवर ओढवला होता.जर नवरी दाखवली नाही तर औरंगजेब नाराज होणार होता आणि औरंगजेब नाराज होऊन चालणार न्हवत.सगळे काळजीत होते.सर्व जवळची मंडळी,नोकर वर्ग शाहूंच्या लग्नामुळ खुश होता तो आज तोंड पाडून पुढं काय होईल याचा विचार करत होते.येसूबाई आपल्या तंबूत ह्या संकटातुन सुटण्याचा मार्ग काय असेल यावर विचार करत असताना अंबिकाबाई आणि त्यांच्या सोबत जाधवराव यांनी काही दासी पाठराखण म्हणून पाठवल्या होत्या त्या तंबूत आल्या.त्यात एक दासी होती अंबिकाबाई यांच्याच वयाची,तश्याच बांध्याची आणि तेजस्वी सुद्धा होती.येसूबाईंनी तिला शाहूंची नवरी बनवून औरंगजेबाच्या समोर पाठवायचं ठरवलं.पूर्वी जेव्हा एखाद्या जहागीरदार,देशमुख,राजे यांच्या मुलीच लग्न केलं जायचं तेव्हा तिच्या सोबत काही दासी पाठवल्या जाई,त्या नवीन नवरीला कामाचा त्रास होऊ नये म्हणून खास माहेरहून अशा दासी पाठवायची प्रथा होती.या दासी शेवटपर्यंत सोबत राहायच्या या दासी म्हणून आलेल्या मुलींची लग्न त्या राजाच्या दासीपुत्रांसोबत केला जायचा.दासीच्या सोबत शरीर संबंध त्यावेळी सर्वमान्य होते.तर काही राजे स्वतःची कामवासना शमवण्यासाठी या दासीचा वापर करायचे त्यांच्या पासून झालेल्या मुलांना स्वतःच नाव द्यायचे पण त्यांना इतर राजकुमारांसारखे अधिकार मात्र मिळत नसायचे. जाधवरावांनी पाठवलेल्या त्या दासीच नाव होत बिरुबाई.या बिरुबाईला भरजरी वस्त्र,मौल्यवान दागिने घालून तिचा साज शृंगार केला,नवीन नावरीसारखी तिची आदब ठेवत तिला दुसऱ्या दिवशी औरंगजेबाच्या दरबारात औरंगजेबाला दाखवण्यासाठी नेलं.
औरंगजेब खुश झाला.तो शाहूंना नातवासारख मानत होता.त्यामुळे त्यांनी एका मांडीवर शाहू आणि एका मांडीवर बिरुबाईला बसवून आशिर्वाद दिले.दोघांना कपडे,दागिने देऊन त्यांचा योग्य सत्कार केला.सोबतच अक्कलकोट,सुपा,इंदापूर,बारामती आणि नेवासा ह्या पाच सुभ्याची जहागिरी आणि सरदेशमुखी बिरुबाईला भेट दिली.शाहू राजानं कडे ह्या सनदा सोपवल्या शिवाय काही महत्वाचे सरदार शाहूंच्या सोबत कायमचे दिले त्यात निंबाळकर,घोरपडे,झुंजारराव घाटगे, म्हसवडचे माने,दफळे हुलजतकर अशी मातब्बर माणसं शाहूंच्या सोबत दिली.
इतिहास जर पहिला तर शाहू राजे यांची एकूण चार लग्न झाली होती.कैदेत दोन आणि नंतर दोन.शाहू राजांची पहिली पत्नी ही ह्या शिंदे घराण्यातील सावित्रीबाई, दुसऱ्या पत्नी रुस्तुमराव जाधवराव यांच्या कन्या अंबिकाबाई पण अंबिकाबाई कैदेत असतानाच आजारपणात त्यांचं निधन झाल्याचे काही संदर्भ उपलब्द आहेत.तिसऱ्या पत्नी सोनाजी मोहिते हंबीरराव यांच्या कन्या सगुणाबाई, चौथ्या पत्नी ह्या रामोजी राजे शिर्के यांची कन्या सकवारबाई आशा चार पत्नी आणि काही दासीचा उल्लेख सुद्धा आढळतो.शाहूंच्या राज्याभिषेक वेळी पट्टराणी म्हणून सावित्रीबाई यांच्या नावाचा उल्लेख आढळतो.या ठिकाणी एक विषय महत्वाचा आहे छत्रपती संभाजी राजे यांना पकडून देण्यात गणोजी शिर्के याचा हाथ असल्याचं सांगितलं जातं पण शाहू राजांनी शिर्के घराण्यातील मुलीशी लग्न करणे ही गोष्ट भोसले आणि शिर्के घराण्यात वाद न्हवता,शिर्के मुद्धाम बदनाम केल्याचा जणू पुरावा आहे.
बिरुबाई भोसले ह्या त्यांच्या दासी होत्या.नवरी म्हणून त्यांना औरंगजेब समोर उभं केल्यामुळे त्यांनाही पत्नीसारख वागवलं होत.ह्या बिरुबाई यांचं इतिहासात खूप उल्लेख सापडतात.तसेच काही वादग्रस्त संदर्भ ही सापडतात पण बिरुबाई ह्या शाहू राजांच्या स्त्री म्हणून उल्लेख असलेला शिलालेख निंब गावच्या बारा मोटच्या विहिरीवर आहे.पण शाहू राजांची पत्नी म्हणून बिरुबाईचा कुठेच उल्लेख नाही.
शाहूंचा विवाह कार्य व्यवस्थित पार पडलं होतं पण शाहूंच्या विवाहाच्या वेळी औरंगजेबाला केलेल्या अर्जात जो उल्लेख होता 'शाहूंचा विवाह मुस्लिम मुलीशी झाला तर शाहूंचा धर्म बाटेल' ही गोष्ट औरंगजेब बादशहाच्या मनात घर करून होती,औरंगजेब हा हिंदूंचा कट्टर शत्रू होता.दारा शुकोह नावाचा त्याचा भाऊ हिंदू लोकांचा खूप सन्मान करायचा,त्याच वर्तन हिंदु धर्मासाठी फायद्याचं होत म्हणून तर औरंगजेबाला दारा शुकोह ची हत्या करणं सोपं झालं होतं.एकदा बाटवलेला हिंदू हा त्याच्या धर्मातील लोकांना नको असतो आणि याचा फायदा घेत औरंगजेबाने लाखो हिंदू बाटवले होते.
औरंगजेबाच्या डोक्यात आता शाहू राजांना बाटवायचा विचार चालू होता.मराठ्यांची फौज मुघलांना किल्ले जिंकून देत न्हवती,स्वराज्य हाती येत न्हवत त्यात शाहूंना बाटवल की मराठयांच खच्चीकरण होणार होत.राजाराम राजे,धनाजी,संताजी आणि मराठी मावळे मुघल सापडतील तशे कापत निघाले होते.औरंगजेबाने खूप प्रयत्न करून आणि बरीच संपत्ती खर्च करूनही राजाराम राजे त्याला सापडत न्हवते आपले काही सरदार राजाराम राजे यांच्या मागावर पाठवून औरंगजेब स्वतः मात्र शाहूंच्या धर्मांतराच राजकारण खेळू पाहत होता.
त्यासाठी त्यानी हालचाल चालू केली,येसूबाई तर पुरत्या घाबरल्या होत्या पण खचल्या न्हवत्या.येसूबाईंच्या संस्कारात वाढलेले शाहू सुद्धा देवा धर्माच्या बाबतीत कट्टर होते.पण कैदेत असताना त्यांना या गोष्टी साठी संघर्ष करावा लागायचा.पूर्ण मुघलांनी भरलेल्या वीस लाखाच्या छावणीत छोटासा परिवार आणि सोबत शाहू यांना देवपूजेच धार्मिक सुख खूप कमी वेळा मिळायचं.छत्रपती संभाजी राजांनी स्वराज्य आणि धर्म या दोन गोष्टीसाठी आपलं आयुष्य पणाला लावलं होतं आणि त्याच सर्जाचं रक्त ज्यांच्या अंगात खेळतय तो शाहू कसा झुकेल औरंगजेबा समोर.आज आमची पोर संभाजी महाराज म्हणलं तरी पेटून उठतात पण ज्यांच्या अंगात संभाजी राजांचा रक्त खेळत होत आणि येसूबाई सारखी माता ज्यांच पालनपोषण करत होत्या त्या शाहू राजांची अवस्था धर्मा बाबत कशी असेल.देव,देश आणि धर्मासाठी मरण पाठीवर घेणारे मराठे धर्मांतर स्वीकारतील तरी कसं.त्या पेक्षा जीव दिलेला काय वाईट.आपला पवित्र हिंदू धर्म ज्या धर्माला किती तरी हाल अपेष्टा सहन केल्यानंतर छत्रपती शिवाजी राजांनी न्याय मिळवून दिला होता तो पवित्र आणि संस्कारांचा महासागर असलेला हिंदू धर्म सोडून इस्लाम स्वीकारणं शाहूंना मान्य न्हवत.धर्मांतराची धमकी दिली तेव्हा शाहू राजे संतापले होते.हाताच्या मुठी घट्ट आवळून निरोप घेऊन आलेल्या सैनिकांवर राग व्यक्त करत होते.कैद ही अशी गोष्ट जी पराक्रमी पुरुषाला सुद्धा झुकायला लावते पण छत्रपती संभाजी राजे आणि शाहू राजे मात्र त्याला अपवाद ठरले होते.औरंगजेब हट्टाला पेटला होता त्याने शाहूंना मानसिक त्रास चालू केला,जाता येता तो धर्मांतर करायची धमकी द्यायचा.शाहूंच्या तंबूचे पहारेकरी तो सारखा बदलायचा त्याला भीती होती की शाहू आणि येसूबाई पहारेकर्यांच्या मनात प्रेम निर्माण करून पळून जाऊ शकतात.तो या बाबतीत शहाणा झाला होता.कित्येक दिवस शाहूंना अंधाऱ्या तंबूत कैद केले.शारीरिक अन्यायही केले असतील यात शंका नाही.शाहूची मनसब जप्त करण्याच्या धमक्या दिल्या तर काही वेळासाठी शाहूनच उत्पन्न सुदधा काढून घेतलं होतं.एकदा तर औरंगजेबान शाहू आणि येसूबाई या माय लेकराची ताटातूट केली शाहू आणि येसूबाई यांना एकमेकापसून लांब ठेवलं.कैदेत किती तरी अन्याय सहन केले, धर्मांतराच्या कित्येक धमक्या आल्या पण शाहूंनी त्याला भीक घातली नाही की भयभीत झाले नाही उलट शाहू म्हणायचे 'वडिलांसारखे माझे हालहाल करून जरी मारलं तरी मी हिंदू धर्म सोडणार नाही'.आपल्या वडिलांचा छत्रपती संभाजी राजांचा पराक्रम,शिवाजी महाराजांची स्वराज्य निर्मितीसाठी या मातीसाठी,स्वराज्यासाठी,स्वातंत्र्यप्राप्ती साठी लाखो ज्ञात अज्ञात मावळ्यांनी सांडलेल्या हिंदूंच्या रक्ताची आठवन यायची आणि शाहू राजे सुद्धा एका तेजस्वी शक्तीने पेटून उठायचे आणि धर्मांतर करणार नाही असं ठामपणे सांगायचे.शेवटी औरंगजेबान काही काळासाठी माघार घेतली कारण मराठ्यांची सेना आता अगदी जवळ येऊन हल्ले करायला लागली होती,शाहूंचा धर्मांतर करायचा मुद्धा त्यानं सोडून दिला पण तो ते विसरला न्हवता आज ना उध्या पुन्हा औरंगजेब धर्मांतर करणारच होता पण सध्या मराठे शांत करणे गरजेचे होते म्हणून औरंगजेब स्वतः किल्ले जिंकण्यासाठी लढाईवर जायला सज्ज झाला.
संदर्भ:चिटणीस बखर,
शेडगावकर भोसले यांनी बखर
शाहू दप्तर

#कथा_शंभुपुत्राची #शाहुपर्व #भाग_२_शाहूंची_कैद

 

औरंगजेबान तहात ठरवल्याप्रमाने कैदी केलेल्या मराठी स्त्रियांना सुरक्षेची हमी दिली,शाहू राजांना स्वतंत्र राजा म्हणून मान्यता दिली,आता शाहू राजे कैदेत होते पण राजे होते कैदेतील 600 मराठा सेवक शाहूंच्या सेवेला हजर होती.शिवाय काही मराठी सरदार मंडळी शाहूंच्या सोबत देत सात हजारांची मनसब शाहूराजांना दिली.आता शाहू राजे मुघलांचे मांडलिक होते पण कैदेत होते.शाहूंच वय कमी असल्याने त्यांची जहागिरी सभाळण्याचं काम येसूबाई करायच्या 'येसूबाई-ए-वालिद-शाहू-सन-अहद' आशा शिक्का येसूबाईंना दिला.शाहूंना औरंगजेबाने आपल्या छावणीत कैद केले होते.सोबत झीनत म्हणजे औरंगजेब याची मुलगी असायची तिला हा छोटासा शाहू खूप आवडायचा.झीनत च लग्न झालं न्हवत त्यामुळे मूलबाळ नसल्यानं ती शाहूंना मुलासारखा जपत होती.शाहू अतिशय शांत होते पण जिज्ञासू होते. जोत्याजी केसरकर शाहूंना युद्ध शिक्षण देत होते तर येसूबाई जिजाऊंच्या रूपांन पुन्हा एकदा एक शिवाजी घडवीत होत्या.शाहू सुद्धा हळू हळू सगळ्या कसोटीत उतरत यशस्वी होत होते.औरंगजेबाच्या अगदीच जवळ असल्याने त्यांचं लक्ष प्रशासनावर जास्त होत,ती प्रशासनाची पद्धत ते आपल्या मनात साठवत होते.पण दुर्दैवाने ते कैदेत होते.
आलमगीर औरंगजेब म्हणजे अजब रसायन होतं कधी ते शाहूंसोबत प्रेमान वागायचा तर कधी शाहूंचा अपमान सुद्धा करायचा.त्याच्या मनात शाहूंच्या बद्धल कुठं तरी राग होता आणि कधीकधी तो प्रकट करून दाखवायचा.औरंगजेबाने राजारामराजेंना शोधण्यासाठी जंग जंग पछाडलं होत.पण सह्याद्रीत येऊन सह्याद्रीचे वाघ पकडणे सोपं न्हवत.राजाराम संपला की मराठी राज्य संपणार होत पण राजाराम राजे जिंजी ला पोहचले होते तिथून ते संताजी-धनाजी यांच्या मदतीने मुघलांना सळो की पळो करून सोडत होते.जिंजी सुद्धा जिंकायच्या प्रयत्नात औरंगजेब होता पण त्याला यश येत न्हवत तो त्याचा सरदारांवर राग व्यक्त करायचा आणि त्याचा तो वैतागलेला चेहरा पाहून शाहू आणि येसूबाई मात्र मनोमन खुश असायचे.
औरंगजेबाने त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढी मोठी हार मानली होती.अदिलशाही,कुतुबशाही त्यानं सहज जिंकून घेतली होती पण मराठी दौलत त्याच्या हाती येत न्हवती.सह्याद्रीच्या कडे कपारीत त्याला तडफडत ठेवत मराठे मात्र चांगलाच धडा देत होते.कधी कधी औरंगजेबाचा राग इतका वाढायचा की तो शाहू राजांवर भडकायचा.शाहू मात्र शांत पणे सहन करायचे.शाहूंना मारावं असही औरंगजेबाला वाटायचं पण मराठ्यांचा वाढता प्रभाव पाहून जर शाहूंना दगाफटका केला तर मराठे आपली कबर इथंच बांधतील ही भीती त्याच्या मनात होती.संताजी घोरपडे नि तोडून नेलेले सोन्याचे कलश त्याची साक्ष देत होते.भविष्यात जर मराठे आपल्या पेक्षा वरचढ झाले तर हा शाहू सोडून त्यांच्यात यादवी माजवता येईल म्हणून त्यानी शाहूंना जिवंत आणि सुखरूप पण कडक नजरकैदेत ठेवलं होतं.
छोटासा शाहू आता मोठा होत होता,मराठ्यांच्या पराक्रमाच्या कथा त्याच्या कानावर यायच्या,मन आनंदित व्हायचं.येसूबाई आपल्या पुत्राला घडवण्यात कुठंही कमी पडत न्हवत्या,आपले पूर्वज आणि त्यांनी निर्माण केलेल हे स्वराज्य संवर्धित करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि ते वाढवलं पाहिजे.म्हणूच शस्त्रा सोबत शास्त्रा,विद्या, चातुर्य,निर्णय कशे घ्यायायचं,राज्यकारभार कसा करायचा,दरबारी लोकांशी कसं वागायचं सारं सारं येसु शाहूंना शिकवत होती.ज्योत्याजी आणि इतर मावळे शाहूंना अतिशय प्रेमान,सावधानतेने वेळ मिळेल तस गपचूप तलवार,भाला, पट्टा शिकवत होते,एक भविष्यातला महान राजा कृष्णासारखा कंसाच्या कैदेत वाढत होता.
औरंगजेबाची मुलगी झीनत नेहमी शाहुंची ढाल बनून उभी राहायची.तीच मुलासारखं प्रेम शाहुंवर होत.लग्न झालं नासल्याने मातृत्वाचा अखंड झरा ती शाहुंवर अर्पण करायची.येसूबाई आणि झीनत यांचेही संबंध चांगले होते,झीनत ला नेहमी येसूबाईंच्या नशिबावर कीव यायची त्यामुळे तीन त्यांनाही कधी अंतर पडू दिलं न्हवत.शाहूंच्या सोबत संभाजी राजांनी आणखी दोन मुलं कैदेत होती.जाधवांच्या दुर्गा सोबत जिजाऊंनी शंभूराजांचा विवाह लावून दिला होता,जेव्हा शंभूराजे दिलेरखानाकडे केले होते तेव्हा दुर्गा बाई सोबत होत्या,त्यांच्या पोटी मदनशिंग आणि मानशिंग नावाची दोन मुलं होती,ती सुद्धा शाहूंच्या सोबत कैदेत होती पण औरंजगेबांन त्यांना शाहूंपासून दूर ठेवले होते.शाहूंवर औरंगजेब जास्त लक्ष देऊन असायचा.
का कोण जाणे? पण शाहुंच्या नजरेत त्याला भविष्यातील मराठ्यांचा बादशहा दिसायचा.संभाजी सारखी महत्वकांक्षा त्याच्या डोळ्यात होती तर शिवाजी सारखं शांत पण नवीन शिकण्याची ओढ असलेली बुद्धिमत्ता शाहुंमध्ये होती.
औरंगजेब जिथं जाईल तिथं सावली सारखा शाहु सोबत घेऊन जायचा कारण त्याला भीती होती,कदाचित मराठ्यांनी जर हल्ला केला,जीव जाईल असा प्रसंग आला तर शाहूंचा वापर ढालीसरखा करून सुटका करून घेता येईल.
औरंगजेबाच्या 5 मैलाच्या मोठ्या छावणीत मद्यभागी त्याचा तंबू असायचा.तंबू कसला तो कापडी महालच होता.त्याला औरंगजेबाची 'गुलाबबारी' म्हणायचे.त्याचा घेरा भला मोठा,त्याला मुख्य तीन प्रवेशद्वार असायची.तीनही प्रवेशद्वारांना वापर वेगवेगळा होता.त्या गुलाबबारी बाहेर डोळ्यात सुरमा भरलेलं तळपत्या तलवारी हातात घेतलेले हशम कडक पहारा देऊन असायचे.औरंगजेबाच्या तंबूचा पहिला दरवाजा त्याच्या मार्जितल्या खास सल्लागार आणि श्रीमंत उमरावांसाठी होता. हीच मंडळी त्यातून ये जा करायचे.दुसऱ्या प्रेवेशद्वारातून फक्त सरदार,सैनिक,मनसबदार यांना प्रवेश होता त्यांच्या व्यतिरिक्त कोणी येऊ शकत न्हवत.तिसरा दरवाजा मात्र शाही जनाना आणि मेहमानासाठी होता.औरंगजेब थकला होता तरी पण जनाना सोबत घेऊनच फिरायचा.तिन्ही प्रवेशद्वाराच्या आतमध्ये एका मोठ्या खोलीत औरंगजेबाला बसण्यासाठी सोन्याची खास बनवलेली तख्त असायची.त्याच्या बाजूला बाकीच्यांना बसायला लाकडी मंचक,गाड्या,तक्के लोड असायचे.ह्या तंबूत वेगवेगळे अशे बरेच कक्ष होते त्यात बादशहाचा नमाज पढायचा कक्ष,जेवणाचा कक्ष,स्वतंत्र शयनकक्ष,जनानखण्यासोबतचे कक्ष वेगवेगळे होते,प्रत्येक कक्षाच्या मधी जाड कापडी भिंती असायच्या या सगळ्या कक्षाच्या मधोमध अती सुरक्षित आणि सहज कोणाला समजणार नाही असा एक कक्ष होता त्या कक्षात शाहू राजे नजर कैदेत ठेवले होतें, शाहू राजे सगळी गुलाबबारी फिरू शकत होते पण गुलाबबारी बाहेर जायला त्यांना बंधी होती,लढाईच्या प्रसंगी तर त्यांना कक्षाच्या बाहेर पडायला पण बंदी होती.शाहूंराजांचं बालपण अतिशय संवेदनशील अवस्थेत होत.औरंगजेबाच्या छावणीतील सैनिकांना सुद्धा शाहू राजांच्या नशिबावर कीव येत असेल.मुघलांकडून कैदी म्हणून जी वागणूक दिली जायची त्यापेक्षा तहीतीशी चांगली वागणूक शाहूंना होती पण कधी कधी औरंगजेब शाहूंना मारायची धमकी द्यायचा तेव्हा मात्र येसूबाईंच्या काळजाला पीळ पडायचा,तर कधी कधी शाहूंच धर्मांतर करायच्या धमक्या सुद्धा यायच्या.शाहू मात्र हे हसण्यावारी न्यायचे आणि आलेली संकट टाळायचा प्रयत्न करायचे.
छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी महाराज यांना घडवताना जिजाऊंनी जे काही शिवरायांना शिकवलं होत त्या सोबत ज्या काही गोष्टी अनुभवातून शिकता येतात ते सुद्धा येसूबाई शाहूंना शिकवत होत्या.
नेताजी पालकर,शिवा काशीद,तानाजी मालुसरे,नेताजी पालकर,शंभूशिंह जाधवराव,कोयाजी बांदल,फिरंगोजी नरसाळे,कविकलश आशा असंख्य मावळातील तेजस्वी,पराक्रमी,धाडसी वीरांच्या गोष्टी सांगून येसूबाई शाहूंच्या कोवळ्या मनात लढण्याच आणि स्वधर्मासाठी निष्ठा वाहण्याच बाळकडू पेरत होत्या.शाहू राजे सुद्धा आपल्या वडिलांच्या सारख शूर होऊन औरंगजेबच साम्राज्य संपवून दिल्लीच्याच शिंहासनावर बसण्याची स्वप्ने पाहू लागले होते.त्यासाठी त्यांनी औरंजेबाचा अभ्यास चालू केला.गेले अनेक वर्षे औरंगजेब दक्षिणेत आला,झुंजला.अनेक यातना त्याने सहन केल्या,पराक्रम,हार,पराभव आशा अनेक घटनांनी त्याच मन कणखर बनलं होत.तो इकडं होता पण तरी त्याच्या उत्तरेच्या राज्यात त्याच्या विरोधात कोणी बंड केलं न्हवत,कोणी त्याच्या राजगादीवर हक्क सांगत आक्रमणं केलं न्हवत.शेवटच्या श्वासापर्यंत सैन्य त्याला देव मानायचे आणि मरणाला मिठी मारायचे.औरंगजेबाची त्याच्या प्रशासनावर असलेली पकड,आपल्या सरदारांच्या वर असलेला वचक,भीती, दरारा आणि संबंध ह्या शिकण्यासारख्या गोष्टी छोटासा शाहू पाहत होता,शिकत होता.कधी तरी आपण या कैदेतून सुटू आणि उंच भरारी घेत आपलं शिंहासन साकार करू अशी भावना त्यांच्या मनात होती.
औरंगजेब शाहूंना मुद्दाम आपल्या सोबत खलबत करायला बसवायचा,शाहूंना तो सरदारांवर भडकलेला पाहून भीती वाटायची आणि शाहूंच्या मनात आलमगीर विषयी भीती बसली पाहिजे अस त्याला वाटायचं म्हणून तो त्यांना दरबारात पण घेऊन जायचा.
असाच एके दिवशी औरंगजेबाचा दरबार भरला होता.अनेक मातब्बर सरदार दरबारात हजर होते.शाहू राजे औरंगजेबाच्या जवळच बसले होते.दरबार चांगला रंगला होता आणि अचानक औरंगजेब उभा राहिला.त्याच्या पायातील मखमली जोडे बाजूला सरकले होते,अचानक उठल्याने त्याला जोडे सापडेना त्याची अवस्था पाहून शेजारी बसलेल्या शाहू राजांनी तात्काळ ते जोडे पुढे केले,म्हातारा औरंगजेब खुश झाला.त्यांनी त्याच्या जवळचा मखमली किमती रुमाल शाहू राजांना भेट दिला.औरंगजेब हुशार होता त्याच्या डोक्यात वेगळंच काहीतरी चालू होतं.त्याची नजर दरबारात फिरली.कपाळावर आठया पडल्या आणि मुत्सद्दी विचाराने औरंगजेब शाहूंना म्हणू लागला.
"शाहू आम्ही तुमच्या वडिलांना मारले,तुमच्यावर अन्याय करत तुम्हाला कैद केले.तरी पण तुम्ही आमची एवढी सेवा करत आहात.आम्ही तुमच्यावर खुश होऊन तुम्हाला कैदेतून मुक्त करतो,जा आणि तुम्ही तुमचा राज्य सांभाळा".
शाहूंनी एकदा औरंगजेबाकड पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरन त्याच्या मनाचा खेळ ओळखत हुशारीने शाहूंनी उत्तर दिलं.
"जहापना तुम्ही आम्हाला कैद करून आमची तर मदत केली आहे.आमचे चुलते तर आमच्या वडिलांना कैद करणार होते,त्यांनी आम्हालाही कैद करून मारलं असत,तुम्हीच आम्हाला इकडं आणून त्यांच्या तावडीतून आमची सुटका केली,शहजादया सारखी आमची काळजी घेतली तुम्हीच आमच्या चुलत्यांना पराभूत करून तुमच्या हाताने आम्हाला गादीवर बसवलं तर आम्ही राज्य सांभाळू".
हे ऐकताच औरंगजेब प्रचंड खुश झाला.त्याला खात्री पटली होती की शाहू आता आपल्या हुकमानुसार वागतील पण ही तर शाहूची चाल होती,काही करून औरंगजेब खुश केला तरच कैदेत आपण सुखात जगू शकतो हे शाहूंना चांगलंच समजलं होत.शाहू नेहमी त्याला खुश करायचे.
औरंगजेब भलताच खुश होता,शाहू आता वयाने थोर होत होते तास अलमगिराने त्याच्या जवळच्या मातब्बर मुस्लिम सरदारांच्या मुलिंची स्थळ शाहूंसाठी पाहिली होती आणि लग्नाविषयी येसूबाईंजवळ प्रस्ताव मांडला.

#कथा_शंभुपुत्राची #भाग_१_शाहूंचा_जन्म

 

#3"एप्रिल1680 चैत्र पौर्णिमा शालिवाहन शके 1602 हनुमान जयंती चा तो दिवस. पुराणातील एका निष्ठावंत भक्तांचा जन्मदिवस सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत होता.किल्ले रायगडावर मात्र भर दुपारी काळजीचं काळं ढग जमा झाल होत.छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रकृती गंभीर होती.सारा रायगड अठरा कारखाने आणि रयत काळजीत होती.शिरकाई देवीला जागर चालू होता.काहीही करून राजाला बरं वाटलं पाहिजे म्हणून माणूस ना माणूस त्या देवीला प्रार्थना करत होता.महाराणी पुतळाराणींनी तर देव पाण्यात ठेवून, 'आपलं सारं पुण्य महाराजांच्या वाट्याला दे अन त्यांना बरं वाटू दे' म्हणत त्या शंभू महादेव आणि तुळजा भवानी ला साकडं घातलं होत.
"तुका म्हणे सायासाचे फळ,सोडून जाय काळ वेळ दोन्ही" तुकोबांच्या उक्तीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज पृथ्वीवरच आपलं कार्य पूर्ण करून वयाच्या अर्धशतकातच स्वराज्य पोरकं करून गेले. अंगणातल्या तुळशींनी माना टाकल्या,गोठ्यातल्या गाई आणि पागेतली घोडी सुद्धा रडू लागली.वाराही काही काळ शांत झाला असेल या शांत वातावरणात रायगडावरील आक्रोशान मात्र आसमंताला धडकी भरली असेल.शूर आबांचा पराक्रमी छावा शंभूराजे या वेळी पन्हाळगडी होते.शंभुराजे आणि कारभारी मंडळी यांच्यात राज्यकारभारावरून नेहमी वाद व्हायचे म्हणून महाराजांनी मुद्दाम त्यांना पन्हाळगडी ठेवलं होतं.काही दिवसांपूर्वी महाराजांनी भेटून संभाजीराजांना लवकर रायगडावर बोलावू म्हणून सांगितलं होतं.शंभुराजे म्हणजे साक्षात #स्वराज्याचा_कर्ण.दिलेल्या वचनांसाठी सत्व हरवलेला.आपल्या अंगी असामान्य पराक्रम आणि मनगटात प्रचंड ताकद,छातीत बुलंद हिम्मत पण आपल्या पित्याच्या शब्दापुढं सारं विसरून शांत राहिलेला महान योद्धा. काळानं वेळ साधली होती,वेळेनं डाव टाकला होता आणि शंभूराजे आणि राजाराम यांना पोरकं करत बाप नावच छत्र नाहीस झालं होतं.जेव्हा ही बातमी शंभुराजांच्या कानी पडली तेव्हा सह्याद्रीच्या एखाद्या कातळ दगडात सुरुंग फुटून दगडांचे लाखो तुकडे चहुबाजूंना अस्थव्यस्त पसरावे तशी अवस्था शंभुराज्यांच्या मनाची झाली होती.त्यातच त्यांच्या अनुपस्थितीत सगळी कार्य उरकली होती त्यामुळे संतापाचा ज्वालामुखी त्यांच्या काळजात अवतरला होता.बलाढ्य पहाडाच्या छातीचा शंभूराजा खचला होता.आबांच्याआठवणीनं पुरता गुरफटला होता.आपल्या वडिलांचा पराक्रम,शौर्य,धैर्य,साहस आणि वडिलांच्या सोबत वयाच्या सातव्या वर्षी अनुभवलेली दिल्लीपती औरंग्याची कैद ते आजवर घडलेले असंख्य प्रसंग आठवत शंभूराजे तडफडत होते. शंभूराजांनी भरारी घेतली आणि महाराजांचे संकल्पित पूर्णत्वास नेण्यासाठी पाय रोवले.स्वराज्याची धुरा आपल्या 23 वर्षाच्या कोवळ्या पण पराक्रमी खांद्यावर पेलवित स्वतःला 16 जानेवारी 1681 ला राज्याभिषेक करून घेतला.32मणाच सुवर्ण सिंहासन पुन्हा एकदा रयतेच्या डोईवर सुखाच छत्र धरायला सज्ज झालं.दिल्लीचा बादशहा औरंगजेब मात्र हादरला होता.शिवाजी भोसले संपला म्हणजे पूर्ण दक्खन प्रांत त्याच्या ताब्यात येईल असं त्याला वाटायचं पण संभाजी राजांच्या राज्याभिषेकाच्या बातमीने त्याच्या स्वप्नांना चुराडा झाला होता.राजमाता जिजाऊ यांच्या मृत्यू पासूनच औरंग्यांन दक्षिणेत हालचाली वाढवल्या होत्या.निम्म्याहून अधिक सैन्य हळू हळू दक्षिणेत गुप्त पणे उतरत होत.शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी राजांनी गादीवर पकड मजबूत केली होती.संभाजी लहान आहे,वय कमी आहे त्याला पकडून संपवायचं आणि दक्षिण जिंकून पूर्ण हिंदुस्थान आपल्या अमलात आणायचा म्हणून स्वतः औरंगजेब आपलं उरलं सुरेल सैन्य घेऊन दक्षिणेत उतरला.हा औरंगजेब मोठा धूर्त होता. तितकाच कपटी होता सत्तेसाठी त्यानं आपला बाप कैद करून भावांच्या कत्तली घडवल्या होत्या,मुलांना सुद्धा कैद केले होते.छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला त्याला भेटायला गेले तेव्हाच कैद करून त्यांना संपवायचा बेत त्यानी केला होता,पण दक्षिणेतून त्याला खबर मिळाली होती की शहाजी ची पत्नी शिवाजीची आई आपल्या सर्व फौजेसहित युद्ध करायला सज्ज आहे आणि वेळ पडली तर मराठे उत्तरेत आक्रमण करायला माग पुढं पाहणार नाही.त्यात शिवाजी च्या केसाला जरी धक्का लागला तरी अखंड हिंदुस्थानच राजकारण बदलणार होत.त्या मूळ औरंगजेब मनात असूनही शिवाजीराजांना कैद सोडून काहीच करू शकला न्हवता.
आता जिजाऊ न्हवत्या,ना शिवाजी राजे होते उरला होता मराठ्यांचा 23 वर्षाचा कोवळा राजा,तो आपल्या सैन्यापुढे किती वेळ टिकणार अस समजून औरंगजेब महाराष्ट्रात आला होता.मुघलांची छावणी पडली तर 5 मैलाचा परिसर व्यापून जायचा एवढी बलाढ्य सेना. लाखो सैन्य,लाखो जनावर,हजारो व तोफा,हत्ती,घोडे,बैल असंख्य.दक्षिणेत आलमगीर आला खरा पण इथं आल्यावर मात्र त्याच्या स्वप्नांचा पुरता चुराडा झाला होता.
क्षत्रिय कुळाच धगधगत,उसळणारं लालबुंद रक्त ज्यांच्या धमन्यांमधून वाऱ्याच्या वेगानं धावत होत ते बलशाली,काटक,चिवट मराठे,आपल्या कुस्तीच्या आखाड्यात कमावलेल्या बलदंड बाहुंमध्ये धार लावून तळपत्या पातीच्या समशेरी घेऊन सज्ज झाले.सरसेनापती हंबीरराव मोहिते,महलोजी बाबा घोरपडे यांच्या सारखी शांत डोक्याची आणि गनिमी काव्यात प्राविण्य असलेली जेष्ठ मंडळी तर संताजी घोरपडे,धनाजी जाधव,विठोजी चव्हाण,जोत्याजी केसरकर,कवी कलश यांच्या सारखी तरुण रक्ताची बेधुंद लढणारी गरम डोक्याची आणि रगील स्वभावाची वाघरं सोबत घेऊन संभाजी राजांनी औरंगजेबाची सेना सळो की पळो करून सोडली होती.
काळ वेळ धोक्याची होती.कधीही हल्ले, प्रतिहल्ले होत होते.आशा काळात संभाजी राजांची छावणी माणगांवच्या जवळच गांगवली परिसरात होती.शृंगारपूर हुन निघालेली येसूराणी साहेब यांची पालखी रायगडावर येणार होती.येसूबाई म्हणजे संभाजी राजांच्या पत्नी."श्री सखी राज्ञी जयती"अशा शिक्क्यासह संभाजी महाराजांच्या अनुपस्थितीत कारभार चालवणारी महान स्वराज्याची महाराणी.येशुराणीं ची तब्येत ठीक न्हवती,येसूबाई गरोदर होत्या,त्यातच त्यांना प्रसव वेदना जाणवू लागल्याने त्यांची पालखी गांगवली गावात उतरवली.गांगवली हे येसूबाईच आजोळ होतं त्यामुळे माणस आपलीच होती.
असह्य होणाऱ्या प्रसववेदना येशुराणींना इतिहासात घेऊन जात होत्या,असाच शत्रू पाठीवर होता,थोरले महाराज शहाजीराजे अदिलशाही सोबत झुंज देत होते.जिजाऊंना लोकाच्या घरी ठेऊन शहाजीराजांनी कर्नाटक स्वारी केली होती.असा आवतरला होता आणि आबासाहेब शिवाजी राजांचा जन्म झाला होता.येसूबाईंची अवस्था जिजाऊंच्या सारखी होती.क्रूर औरंग्या नावाचा शत्रू सहयाद्रीच्या वाघाला संभाजी राजांना संपवून स्वराज्य गिळायला तयार होता.पण येसूराणी खचली न्हवती शांत होती.मन घट्ट करत परिस्तितीला झुंज देत होती.राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संस्कारात आणि छत्र छायेत येसूबाई आणि संभाजी राजे लहानाचे मोठे झाले होते.शंभूराजे जर 'तळपती धारदार तलवार असतील तर त्या तलवारीला शांत करणारी म्यान' म्हणजे येसूराणी होत्या.दोघांची प्रीती आणि एकमेकाप्रती ओढ दृष्ट लागण्या सारखी होती.
शालिवाहन शके 1604 वार गुरुवार वैशाख वद्य सप्तमीचा म्हणजे 18 मे 1682 चा तो दिवस,सूर्य मावळतीकडं जातं होता.सूर्यास्ताच्या किरणांनी सारा आसमंत भगवा झाला होता.पूर्वेला कुठं तरी चंद्र आपलं ओझरत दर्शन देत हळूहळू वर सरकत होता.आशा प्रसंगी येसूबाईंच्या शरीरात प्रसव वेदनांचा अग्नी उफाळून आला होता.भयानक,असह्य वेदना सहन करत येसूबाईंच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत बाळाचं रडक बोल कानी आलं आणि एकच आनंदाची बातमी चौफेर उधळली,बाळराज जन्माला आलं.एकच आनंदोत्सव साजरा होऊ लागला.स्वराज्याला युवराज आले होते.छत्रपती संभाजी राजांचा वारस आला होता.चंद्र सूर्याच्या उपस्थितीत जन्म झाला म्हणजे चंद्र सूर्य असेपर्यंत ज्यांची कीर्ती अजरामर राहिलं अस एक नवं चैतन्य जन्माला आल होत.शंभुराजांना तर आपले आबासाहेब पोटी आले असा भास होऊन त्यांनी त्या मुलाचं नाव शिवाजीराजे ठेवले. तो छोटासा शिवाजी रायगडावर हळूहळू मोठा होत होता.संभाजी राजे मुघली सेनेची दाणादान उडवत होते.येसूबाई आपल्या पुत्राला त्याच्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगत त्याच्या मनात देव-देश आणि धर्माबद्धल आदर आणि प्रेम निर्माण करत होत्या.हा छोटासा युवराज आपल्या काकांसोबत राजाराम राजे यांच्या सोबत जास्त काळ असायचा.राजाराम त्या वेळी तरुण होते,देखणे रुबाबदार होते पण लहानपणापासून जबाबदारी अंगावर नसल्याने ते निवांत होते.दोघा चुलता पुतण्याला एकमेकांशिवाय करमत नसे.
काळाच कालचक्र फिरलं,एके दिवशी दृष्ट मुघली सैन्याने संगमेश्वरला एकट पडलेल्या संभाजी राजांना कैद करून अतिशय वेगाने बहादूरगड म्हणजे पेडगावच्या किल्ल्यावर औरंगजेबाच्या समोर हजर केलं.संभाजी राजांचा क्रूर पद्धतीने छळ करून त्यांची हत्या घडवली गेली.धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी संभाजीराजांनी भीमा इंद्रायणी तीरी मरण पत्करलं पण ते शरण गेले नाही.संभाजी राज्यांच्या स्वाभिमानी रक्तानं ते तुळापूर आणि ती भीमा इंद्रायणी पवित्र झाली. तुळापूर म्हणजे पूर्वीच नागरगाव.त्या नागरगावच्या टेकडीवर असलेला नागरमल खंडोबा आजही नागरगावच नाव लक्षात आणून देतो.शहाजी राजे आणि मलिक अंबर याचा तळ पूर्वी या गावात पडला होता.मलिक अंबर च्या मनात आलं आपल्या हत्तीची तुला करावी.पण हत्तीची तुला कशी करायची यावर शहाजी राजांनी युक्ती शोधून तुला करून घेतली.म्हणून त्या गावाचं गाव तुळापूर ठेवलं.तिथं संगमेश्वर महादेवाचं मंदिर बांधले.तोच संगमेश्वर महादेव आज शंभूराज्यांच्या रक्ताच्या अभिषेकान पावन झाला होता.कठीण प्रसंगात क्षणाचा विलंब न लावता जुल्फिकारखान यान रायगडला वेढा दिला.असा वेढा की लाख प्रयत्न करून तो वेढा मराठयांना तोडता आला न्हवता. संभाजी राजांच्या शोकसागरात सारा मुलुख बुडालेला असताना रायगडला वेढा ह्या संकटाने अखंड महाराष्ट्र नव्हे पुरा दक्खन हादरला होता.रायगडावरच पूर्ण भोसले कुटुंब वेढ्यात अडकलं होत.सात वर्षाचा छोटासा बालशिवाजी आपल्या आईच्या कुशीत रडत रडत आपल्या बापाचा चेहरा आठवत होता.बापाचा सहवास जास्त लाभला न्हवता पण बापाची कमी मात्र त्याला आज जाणवत होती.
क्रमशः
✒️#मंगेश_गावडे पाटील
संदर्भ:शेडगावकर भोसले घराण्याची बखर
चिटणीसाची बखर
थोरले शाहू महाराज यांचे चरित्र

अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

  अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...