विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label “महाराजा छत्रसाल बुंदेला”. Show all posts
Showing posts with label “महाराजा छत्रसाल बुंदेला”. Show all posts

Monday, 3 May 2021

“महाराजा छत्रसाल बुंदेला”

 

४ मे १६४९

“महाराजा छत्रसाल बुंदेला”...🙏🚩
शिवछत्रपतींच्या प्रेरणेनं उत्तरेत स्वतंत्र राज्य स्थापन करणाऱ्या महावीर महाराजा छत्रसाल बुंदेला यांचा आज जन्मदिन...
शिवछत्रपतींची प्रेरणा आजही बुंदेलखंडी जनता विसरलेली नाही आज ही छत्रसाल यांच्या समाधीवरचं कवन या गुरुशिष्यांची यशोगाथा दृग्गोचर करत आहे...
मोगलांना कडवी झुंज देणारा मध्यभारतातील एक झुंजार योद्धा एकेकाळी जेव्हा छत्रसाल मोगलांच्या हैवानी अक्रमणाने त्रस्त होऊन छत्रपती शिवरायांच्या आसऱ्याला आले होते तेव्हा शिवरायांनी त्यांना शरण देऊन त्यांच्यात मोगलांशी लढा देण्याची प्रेरणा निर्माण केली व स्वतंत्र बुंदेला राज्य प्रस्थापीत करण्याची एक उर्मी जागृत केली तसेच राजकारणाचे (औरंगजेब विरोधाचे) पाठही दिले पुढे जाऊन ह्याच छत्रसाल बुंदेलांनी शिवरायांनी अखून दिलेल्या मार्गाने मोगलांना पळता भुई थोडी करत स्वताचे बुंदेलखंड राज्य निर्माण केले हे सर्व होत असताना छत्रसाल बुंदेलांना छत्रपती शिवरायांनी त्यांच्यावर केलेल्या उपकाराचा हयातभर कधीच विसर पडला नाही आपला पुत्र जगतराजला ह्या उपकाराची कायम जाण रहावी म्हणून छत्रसाल बुंदेलांनी उतरत्या वयात त्याला एक पत्र लिहीले ते असे...,
“औरंगजेब बादशहाने पचास बरस राज करो बनके बखत मै सिवाजी के पास पुना को गये खबर नही आए हम कोन साल मे गए तीस पैतीस बरस गई..ई सिवाजी के पास हम बहुत दिन रहे विद्या सीखी बान चलावे वगैरा जो हम वहासे आए सो बादशाहसे हमने बैर ठाण लिया”...
थोडक्यात मी पुण्यात शिवाजीमहाराजांकडे बरेच दिवस राहीलो त्यांच्याकडून अनेक विद्या तसेच धनुष्यबाण चालवायला शिकलो व तिथून परत आल्यावरच माझ्यात मोगलाशी उभे वैर धरण्याचे धारिष्ट्य निर्माण झाले...
शिवाजी पीछे हुवा बुंदेला बलवान,
प्राणनाथ का शिष्य यह छत्रसाल महान ।।
➖➖➖➖➖➖➖➖➖
चित्रकार आर्टीस्ट : @dinesh_kachi ♥️

राजा छत्रसाल बुंदेला

 


राजा छत्रसाल बुंदेला
खुद्द शिवरायांनी दिला स्वराज्याचा कानमंत्र, छत्रसालच्या तलवारीने फोडला होता मुघलांना घाम..
छत्रसाल राजाचा जन्म झांशीजवळ एका गावात ककर-कचनयमध्ये झाला. त्यांचे वडिलांचे नाव होते बुंदेला वीर चंपतराय. त्यांनी 17व्या शतकाच्या तिसऱ्या दशकात ओरछा प्रदेशाला मुघल साम्राज्यातून स्वतंत्र करण्याचा प्रण केला होता. यासाठी त्यांनी विद्रोचा झेंडा हाती घेतला होता. परंतु चंपतराय यांना स्वकीयांविरुद्धच अनेकदा युद्ध करावे लागले. कारण स्वकीयांपैकी काही जण हे मुघलांची हुजरेगिरी करून त्यांचे बंड थोपवण्याचे प्रयत्न करत होते. 30 वर्षे संघर्षानंतर स्वकीयांपैकीच काहींनी कट करून 1661 मध्ये चंपतराय यांचा वध केला आणि मुंडके कापून औरंगजेबाकडे पाठवले. या संघर्षाच्या काळात बालक छत्रसालही आपल्या वडिलांसोबत जागोजागी भटकत राहिले. आणि त्यांच्याकडून युद्धकलेचे प्रशिक्षण घेत राहिले. आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याची भावना छत्रसाल यांच्यात वाढीस लागली होती. यासाठी त्यांच्याकडे काही साधन नसल्याने ते सुसंधीची प्रतीक्षा करत होते.

वडिलांच्या हत्येचा प्रतिशोध घ्यायचा होता
- दरम्यानच्या काळात छत्रसाल मुघल सैन्यात भरती झाले. आणि सैन्यासह दख्खनच्या मोहिमेवर आले. तेथे मिर्झा राजे जयसिंग यांच्यासह सैन्यासह पुरंदरच्या वेढ्यात, आपला भाऊ अंगद तथा काका जामशहा यांच्या सोबत होते. त्या वेढ्याच्या वेळी शौर्य गाजवल्याने त्यांना पुरस्कृतही करण्यात आले. परंतु, छत्रसालच्या हृदयात आपल्या वडिलांच्या हत्येचा प्रतिशोध घेण्याची जिद्द पेटलेली होती. शिवाजी महाराजांच्या मुघलांविरुद्धच्या संघर्षामुळे ते प्रभावित झाले. मुघल सल्तनतीला आव्हान देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेण्याची तीव्र इच्छा त्यांच्या मनात जागी झाली.

◆छत्रपती शिवाजी महाराज व छत्रसाल यांची भेट◆
एका दिवशी शिकारीच्या बहाण्याने छत्रसाल मुघलांच्या कंपूतून बाहेर पळून गेले. त्यांनी भीमा नदी पार करून आपल्या पत्नीसह शिवाजी महाराजंची पुण्यात भेट घेतली. इतिहासकारांच्या मते, छत्रपती शिवाजी व छत्रसाल भेट, शिवाजी महाराजांच्या आग्ऱ्याहून सुटकेनंतर 1667 मध्ये झाली. छत्रसाल काही काळ शिवाजी महाराजांकडे पुण्यात राहिले. तेथे त्यांनी महाराजांकडून युद्धनीती, कूटनीती आणि शासननीतीचे शिक्षण घेतले. नंतर त्यांनी या शिक्षणाचा आपल्या मुलखात बुंदेलखंडात मोठ्या खुबीने उपयोग केला.

महाराजा छत्रसालची इच्छा होती की, दक्षिणेत राहून मुघलांविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांसोबत स्वराज्याच्या कामी यावे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज दूरदर्शी होते. त्यांनी स्वराज्याच्या प्रयत्नाला फक्त दक्षिणेपर्यंत सीमित ठेवायचे नव्हते. म्हणून त्यांनी छत्रसालला सल्ला दिला की, तुम्ही बुंदेलखंडात परता आणि मुघलांविरुद्ध स्वातंत्र्याचा शंखनाद करा.
अन् तळपू लागली छत्रसालची तलवार
- छत्रपती शिवाजी महाराजांचा सल्ला प्राणपणाने मानून छत्रसाल बुंदेलखंडात परतले. तेथे त्यांनी फक्त 5 घोडदळातील सैनिक आणि 25 तलवारबाज यांच्यासह संघर्षाला सुरुवात केली. जवळ होती फक्त छत्रपतींनी चेतवलेले स्वराज्याचे स्फुलिंग. लवकरच ती संधी आली जेव्हा औरंगजेबाने आपल्या सैन्याला ओरछातील मंदिरे नष्ट करण्याचा आदेश दिला. या वेळी रयतेच्या दृष्टीने छत्रसालच एकमेव आशेची किरण होते. म्हणून सर्व जण छत्रसाल यांच्या नेतृत्वा संघटित झाले. यानंतर एकेक जहागीरदार अन् सरदार छत्रसाल यांना जोडत गेले अन् सर्वांनी मुघलांचा सशस्त्र प्रतिकार केला.

अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

  अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...