१३ सप्टेंबर १५९४....
कोकणातील
रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला
अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्ये सीमा ही कुंडलिका नदीची खाडी
आहे खाडीवर रेवदांडा येथे साळावचा पुल असल्यामुळे दोन्ही तालुके
गाडीमार्गाने जोडले गेले आहेत... कुंडलिका खाडीच्या मुखाजवळ उत्तरबाजूला
रेवदांड्याचा किल्ला आहे तर दक्षिणेकडे कोरलाई गावाजवळ
“कोरलाईचा किल्ला”....
इ.स.१५२१ मध्ये (Diogo Lopes De Sequeira) दिओगो लोपेज डी सेक्वीरा या पोर्तुगीजांच्या गव्हर्नरने निजामशहा कडुन परवानगी मागून प्रथम येथे धक्का बांधला व ही माची बांधून क्रुसाची बातेरी उभी केली...
पोर्तुगीज आणि निजामशाहीचे बिनसले आणि किल्ल्याचे काम अर्धवट राहिले पुढे पोर्तुगीजांचा वाढता धोका ओळखून निजामशहानेच १५९२ मध्ये इथे हा जलदुर्ग उभारला आणि त्याला ‘बुरहान दुर्ग’ असे नावही दिले हे एवढ्यावरच थांबले नाही तर १३ सप्टेंबर १५९४ रोजी या दुर्गावरूनच पोर्तुगीज आणि निजामशाहीत संघर्ष उडाला यामध्ये निजामशाहीचा पराभव झाला आणि गडाचा ताबा पोर्तुगीजांकडे आला पोर्तुगीजांचा हा कालखंड प्रदीर्घ असल्यामुळे या दुर्गाच्या स्थापत्यावरही मग त्यांचा प्रभाव पडला...
शिवकाळातही हा गड त्यांच्याकडेच होता ऑगस्ट १६८३ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी एकदा हा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला होता पण तो अयशस्वी ठरला पुढे मार्च १७३९ मध्ये चिमाजी अप्पांनी शेजारच्या तळगडाचा हवालदार सुभानजी माणकर यांच्या मदतीने कोर्लई मिळवला आणि मराठ्यांच्या जरीपटका गडावर फडफडू लागला यानंतर इंग्रजांन बरोबरच्या शेवटच्या युद्धापर्यंत हा गड मराठ्यांकडेच होता...
@gadwat_official