विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 25 September 2020

*राणूबाई भोसले-जाधव*

 


*राणूबाई भोसले-जाधव*
राणूबाई म्हणजे शंभूराजांची दुसरी आईच.शंभूराजांचा जन्म झाला त्या दिवशी बेभान होणाऱ्या म्हणजे "राणूबाई".त्यांना अगदी लहान वयातच वडिलकीची शिकवण झाली होती.आपल्या तीन बहिणींच्या पाठिवर आपला भाऊराया जन्माला आलाय हा मोठा आनंद त्यांना.शंभूराजे लहान असताना प्रत्येकवेळी राणूबाई शंभूराजांना त्यांच्या मांडिवर घेऊन झोपवत असे. त्या शंभूबाळासाठी स्वतः अंगाई गायच्या.शंभूबाळाली राणुबाईंची सवय झाली होती.राणूबाई दिसल्या नाहित तर शंभूबाळ खुप कासावीस होत.शंभूबाळ राणुबाईंच्या थाळ्यात जेवण करत असे.त्याही शंभूराजांना आपल्या हाताने घास भरवत असे.किती समज होती राणूबाईंना... आपली जन्मदाती आपल्याला सोडुन गेली आहे.आपला भाऊ खुप लहान आहे, त्याला आईची आठवण येऊ नये म्हणून राणूबाई शंभूबाळाला स्वतःच्या मांडिवर खेळवत असे. अरे ज्या वयात राणूबाईंना आईची उब हवी होती त्या वयात राणूबाई शंभूराजांना आईची उब देत राहिल्या.अखेर राणूबाई म्हणजे सह्याद्रीच्या काळ्या पाषाणवर भगवा रोवणाऱ्या,श्रमकरी कष्टकरी रयतेचा पित्याप्रमाणे सांभाळ करण्याऱ्या शिवरायांच्या कन्या होत्या.
पण या वयात केव्हडी समज म्हणावी राणूबाईंची. शंभूबाळाला काय हव काय नको याची त्या सर्व तसदी घेत राहिल्या.त्याचप्रमाणे अंबिकाबाई, व सखूबाई पण शंभूराजांवर खुप माया करत होत्या.पण राणूबाई मात्र दोन भुमिका पार पाडत राहिल्या, एक बहीण व दुसरी म्हणजे शंभूराजांची आई.महाराज मोहिम करून जेव्हा गडावर परतायचे आणि आल्यावर महाराज आऊसाहेबांच दर्शन घ्यायचे.. त्यानंतर मात्र महाराजांची नजर शंभूबाळाला शोधायची.आणि शंभूबाळाला शोधत असताना जेव्हा महाराज शंभूबाळाला राणुबाईंच्या मांडिवर निवांत झोपलेले पहायचे तेव्हा महाराजांच्या चेहऱ्यावर मोठ समाधान यायच.धावपळीचा सारा थकवा निघुन जायचा.
काय अभिवान वाटे महाराजांना, आम्ही गडावर आल्याबरोबर आमच्या लेकीने आम्हाला बिलगायला हव,पण आमची लेक शंभूबाळाला अगदी आईप्रमाणे सांभाळताय..क्षणात महाराजांना सईबाईंची आठवण झाल्या शिवाय राहत नव्हती.आज सईबाई जरी नसल्या तरी सईबाई राणुबाईंच्या निमित्ताने शंभूबाळाचा सांभाळ करत आहेत म्हणून म्हाराजांचे डोळे नेहमी पानावले जायचे.महाराज आऊसाहेबांना म्हणत.... आऊसाहेब सईंनी जगाचा निरोप तर घेतलाच,पण जातांना त्यांनी हि अशी संस्काराची आणि समजुतदारपणाची शिदोरी आम्हाला देऊन जाताना विसरल्या नाहित. आऊसाहेब आम्ही शंभूराजांना जेव्हा जेव्हा राणुबाईंच्या मांडिवर निवांत पाहतो तेव्हा रेव्हा आम्हाला त्यांच्या आई सईबाई दिसतता.आणि आमचा जेवढा थकवा असतो तो सर्वचा सर्व निघुन जातो.खरच आऊसाहेब आमची लेकर म्हणजे खर सोन आहे खर सोन.....
काळ निघत गेला,तशी वेळ बदलत गेली.राणूबाई स्वतः तलवारबाजी मध्ये तरबेज होत्या.त्या स्वतः शंभूराजांना आऊसाहेबांच्या देखरेखीखाली तलवारबाजी शिकवत असे...
आज एक मोठा प्रश्न उभा राहतो कि शंभूराजांचे गुरु कोण. यावर सांगायचे झाले तर शंभूराजांचे गुरु म्हणजे रामाजमाता जिजाऊसाहेब,छत्रपती शिवाजी महाराज,आणि शिवकन्या राणूबाई भोसले-जाधव होय.कारण राणूबाई देखील स्वतः संकृत भाषेत पारंगत असल्याचा खुप ठिकाणी उल्लेख अढळतो. शंभूराजांच्या जडणघडण मध्ये त्यांच्या सिंहाचा वाटा होता.म्हणून यावरुन स्पष्ट होते कि शंभूराजांचे गुरु राणूबाई देखील होत्या.
कालांतराने दोघ भाऊ बहिणींच्या नात्याला वेगळा मोड घ्यावा लागला.रिती रिवाजानुसार राणूबाईंच लग्न सिंदखेडराजाचे कृष्णाजी जाधवराव यांच्याशी निश्चित झाला.राणूबाईंना समजुन चुकले कि आता आपली आणि शंभूराजांची ताटातुट होणार.त्यात राणूबाईंनी जे केल ते खुप नवलाच घडल.शिवरायांच्या कन्या त्या.त्यांनी जे केल त्यावर आऊसाहेबांचे व महाराजांचे डोळे पानावले,या छोट्या राणूबाईने तर खुप रडवल.... ज्या आऊसाहेबांच्या देखरेखीत शंभूराजांची जडणघडण होत होती त्याच आऊसाहेबांकडुन राणूबाई वचन मागताय......
आऊसाहेब आज आम्ही गडावर आहोत,पण उद्या मात्र नसणार,म्हणून आऊसाहेब वचन द्या आम्हाला,आमच्या माघारी तुम्ही आमच्या शंभूराजांना आमच्या आईची आठवण येऊ देणार नाहित,..... आऊसाहेब वचन द्या आम्हाला आमच्या माघारी आमचा शंभूबाळा आईची सावली कमी पडु देणार नाहीत... आऊसाहेब आम्ही बराच काळ आमच्या आईच्या उब मध्ये काढलाय, पण आमच्या शंभूबाळाला आईची उब नशीब आली नाही,म्हणून तुम्ही त्यांची मायेची उब तुम्ही होणार हे वचन द्या आऊसाहेब...... काय समज म्हणावी या शिवकन्याची जीने या वयात शंभूबाळाची आईची भुमिका पार पाडली..हे सर्व एकूण महाराजांनी राणूबाईंना कवटाळले.... खुप रडला,,, रयतेचा पोशिंदा राणूबाईंना कुशीत घेऊन खुप रडला... धन्य झालो आम्ही आमच्या पोटी हे असल रत्न जन्माला आलय.
राणूबाईंचा विवाह झाला.त्या सासरी गेल्या असल्या तरी त्यांच लक्ष कायम शंभूराजांवर राहिले शेवटपर्यंत त्या शंभूराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या .....
*लेखक....*
*ललित सूर्याजी पाटील*
*शिवशंभू चरित्र व्याख्याते*
* जिल्हा जळगांव*

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...