विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 8 November 2019

पेशवा यांची वंशावळ

पेशवा यांची वंशावळ

Shirish Mulekar

भट घराण्यातील मुळ पेशवे - बाळाजी विश्वनाथ भट यांच्या पासून पेशवेपद हे वंशपरंपरेने मिळालं.

बाळाजींना दोन मुलगे व दोन मुली

१. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे

२. चिमाजी अप्पा (चिमणाजी अप्पा)

३. भिउबाई ही कन्या. आबाजी पंत हे पती

४. अनूबाई . इचलकरंजीकरांकडे विवाह

५. कन्या. बारसं होण्यापूर्वी मृत्यू

१. थो. बाजीराव पेशवे यांची संतती

१. नानासाहेब पेशवे - पानीपतवरील युद्धानंतर त्या धक्क्याने लगेच मृत्यू पावले.

२. रामचंद्र- पुढे संतती नाही

३. पुत्र. बारसं होण्यापूर्वी मृत्यू

४. पुत्र. बारसं होण्यापूर्वी मृत्यू

५. रघुनाथराव उर्फ राघोबादादा पेशवे.

६. जनार्दन- पुढे संतती नाही

२. चिमाजीअप्पांची संतती

१. कर्ण. पुढे संतती नाही

२. सदाशिवराव भाउ. पानीपतवर मृत्यू.

३. बयाबाई. नाईक ओंकार घराण्यात विवाह

१.१ नानासाहेब पेशवे यांची संतती

पत्नी गोपीकाबाईपासून

१. विश्वासराव. वयाच्या १९ वर्षी पानीपतवर मृत्यू. अपत्य नाही.

२. थोरले माधवराव पेशवे. यांनी पानीपत युद्धानंतर राज्य परत उभारलं. वयाच्या २७ वर्षी मृत्यू. अपत्य नाही

३. यशवंतराव. लहानपणी मृत्यू

४. मोरेश्वर. लहानपणी मृत्यू

५. पुत्र. जन्मत: मृत्यू

६. नारायणराव. गारद्यांकरवी खुन झाला.

१.५ रघुनाथराव पेशवे यांची संतती

पत्नी जानकीबाईंपासून

१. पुत्र. लहानपणी मृत्यू

२. गोदुबाई. लहानपणी मृत्यू

३. पुत्र. लहानपणी मृत्यू

पत्नी आनंदीबाईंपासून

४. भास्कर. देवी मुळे लहानपणी मृत्यू

५. विनायक. तान्हा असताना रघुनाथरानांच्या हातून पडल्याने मृत्यू

६. दुर्गाबाई. जोशी बारामतीकरांकडे विवाह

७. अमृतराव. हे दत्तक पुत्र. मुळ नाव भुस्कुटे.

८. कन्या. लहानपणी मृत्यू

९. दुसरे बाजीराव पेशवे.

१०. चिमणाजी. औट घटकेचे पेशवे

२.२ सदाशिवराव पेशवे यांची संतती. पुढे वारस नाही.

पत्नी उमाबाई पासून

१. कृष्णराव. लहानपणी मृत्यू

२. पुत्र. लहानपणी मृत्यू

३. ताराई

पत्नी पार्वतीबाई पासून

४. पुत्र. लहानपणी मृत्यू

५. पुत्र. लहानपणी मृत्यू

१.१.६ नारायणराव पेशवे यांची संतती

पत्नी गंगाबाई पासून

१. सवाई माधवराव . वयाच्या ४० व्या दिवशी पेशवे झाले. त्यांच्या नावाने बारभाईंनी राज्य चालवले.

१.५.७ दत्तकपुत्र अमृतराव पेशवे यांची संतती

पत्नी सावीत्रीबाईपासून

१. विनायक.

२. एक अपत्य. जन्मानंतर लगेच मृत्यू

१.७.९ दुसरे बाजीराव पेशवे यांची संतती

पत्नी वाराणसीबाईपासून

१. कृष्णाबाई. लहानपणी मृत्यू

२. वामनराव. लहानपणी मृत्यू

३. कृष्णाबाई. लहानपणी मृत्यू

पत्नी गंगाबाई पासून

४. कन्या. जन्मानंतर ६ दिवसांनी मृत्यू

५. योगाबाई. पटवर्धन कुरूंदवाडकर घराण्यात विवाह.

मुलगा वारस नसल्याने वेणगाव, ता. कर्जत, जि. रायगड येथील माधवराव नारायणराव भट यांची ६ पैकी ४ मुलं दत्तक घेतली

६. धोंडोपंत उर्फ नानासाहेब- १८५७ च्या स्वातंत्र संग्रामाचे नेते. अपत्य नाही.

७. गंगाधर उर्फ बाळासाहेब. अपत्य नाही.

८. मथुराबाई

९. कृष्णाबाई उर्फ शामा

१.१.६.१ सवाई माधवराव पेशवे यांची संतती. पुढे वारस नाही

पत्नी रमाबाई पासून संतती

१. चौथ्या महीन्यात गर्भपात

२. कन्या. जन्मानंतर लगेच मृत्यू

१.५.७.१ विनायकराव पेशवे यांची संतती

पत्नी सरस्वतीबाई पासून

१. काशीबाई. जोग घराण्यात विवाह

२. अपत्य. मृत्यू

यांचे दत्तक पुत्र

३. नारायण. मुळ नाव थत्ते. एक कन्या.

४. माधवराव. मुळ नाव केळकर

१.५.७.१.४ माधवराव (नंतरचे) पेशवे यांची संतती

१. पुत्र. जन्मानंतर मृत्यू

२. कृष्णराव- यांना २ पुत्र व २ कन्या

३. सदाशिव - १ पुत्र व १ कन्या

१.५.७.१.४.२ कृष्णराव यांची संतती

१. विनायक

२. विश्वनाथ

३. छबुताई

४. ठकुताई

१.५.७.१.४.३ सदाशिव यांची संतती

१. रघुनाथ

२. कन्या

१.५.७.१.४.२.१ विनायक यांची संतती

१. सरोजीनी. जन्म १९२५

२. कृष्णराव. जन्म १९२७

३. रत्नमाला. जन्म १९३५

४. विनायक. जन्म १९३९

१.५.७.१.४.३.१ रघुनाथ यांची संतती

१. विश्वासराव. जन्म १९२३

२. प्रभावती. जन्म १९२४

१.५.१० चिमणाजी रघुनाथ उर्फ दुसरे चिमाजी अप्पा यांची संतती

१. द्वारकाबाई ही कन्या थत्ते घराण्यात विवाह. यांचा नातू लक्ष्मण यास दुसरे बाजीराव पेशवे यांची पत्नी सईबाई हीने दत्तक घेतलं पण इंग्रजांच्या धास्तीने ते थत्ते हेच नाव लावतांत.

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांना त्यांची द्वितीय पत्नी मस्तानी पासून झालेली संतती-

पुत्र समशेर बहादूर उर्फ कृष्ण सींह

त्यांना एक पुत्र- पुत्र अली बहादूर

त्यांना २ पुत्र- समशेर बहादूर द्वितीय व झुल्फीकारअली

हे वंशंज पुढे बांदा संस्थानाचे नबाब झाले. हे संस्थान बाजीराव पेशव्यांना राजा छत्रसाल कडून मिळालेल्या १/३ हिश्श्यातील प्रदेशात आहे. ही मंडळी बांदा, इंदूर, कोठी या परीसरात राहतांत व ते श्रीमंत बाजीराव पेशव्यांचे रक्ताचे वंशज असल्याचा अभिमान बाळगतांत.

थोडा विस्तार झाला पण वंशावळ समग्र आली. पेशवे यांचे वंशज पुण्यात राहतांत. माझी भेट झालेली नाही पण काही इतीहासकारांनी घेतलेल्या मेहनतीवरून जमा केलेल्या माहीतीवर आधारीत आहे.

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...