विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 18 August 2021

साळुंकीचे पाखरू अथवा साळुंकीचे पंख 👇👇👇 कुलचिन्ह अर्थात देवक : राजे साळुंखे चाळुक्य राजवंशाचे

 




साळुंकीचे पाखरू अथवा साळुंकीचे पंख
👇👇👇
कुलचिन्ह अर्थात देवक : राजे साळुंखे चाळुक्य राजवंशाचे
---------------------------
---------------------------
सतीशकुमार सोळंके देशमुख,
.................✍️
साळुंकीचे पाखरू किंवा साळुंखी पंख हे दख्खणातील एक महापराक्रमी उच्चकुलीन राजवंश असलेल्या राजे साळुंखे चाळुक्यांचे कुलचिन्ह अर्थात देवक (टोटेम) आहे. साळुंखे राजवंशातील कोणत्याही पडनावाने राहणाऱ्या कुटुंबांची 'साळुंखे' म्हणूनची ओळख साळुंकीचे पंख अथवा साळुंकीचे पाखरू अशा कुलचिन्हावरूनच होते. साळुंखे राजवंशातील लग्न अथवा इतर मंगल कार्यात देवक म्हणून साळुंखी पंखाची स्थापना होते. पूर्वज कुलाचार म्हणूनही तसेच होणे योग्य आहे.
मराठ्यांमध्ये लग्नकार्य वगैरेमध्ये गोत्र न पाहता देवक बघून लग्न केले जातात. या मागचा मुख्य उद्देश म्हणजे एका कुळामध्ये लग्न होऊ नयेत हाच आहे. एका 'जीन्स'मध्ये लग्ने होऊ नयेत हे विज्ञानाला सुद्धा मान्य आहे. याचा अर्थ आपल्या पूर्वजांनी एका कुळात (जीन्स) लग्न होऊ नयेत म्हणून देवकाची जी परंपरा सुरू केली, ती वैज्ञानिकदृष्ट्या दूरदृष्टीचे द्योतक म्हणावेसे वाटते. मराठ्यांची शहाण्णव कुळे मानली जातात. यातील भावकीची कुळे सोडली तर एक दुसऱ्यातील बेटीव्यवहार ३६ कुळांमध्येच झालेला दिसून येतो. मराठ्यांची देवके सुद्धा ३६ असल्याचेच दिसून येतात. प्रत्येक कुळाला कुलचिन्ह अर्थात देवक दिसून येते. एकाच कुळामध्ये लग्न होऊ नयेत म्हणून मराठ्यांची ही देवक परंपरा महत्त्वाची ठरते. या परंपरेत देवक हा कुळाचा बँड असल्याचे लक्षात येते.
सार्वभौम चक्रवर्ती सम्राट दख्खनाधिपथेश्वर राजे साळुंखे चाळुक्य राजवंशाचे देवक 'साळुंकीचे पाखरू' अथवा 'साळुंकीचे पंख' आहे. स्वतःच्या कुळाचे कुलचिन्ह अर्थात देवक 'साळूंखी पंख' असतानासुद्धा साळुंखे राजवंशातील अनेक वंशज आज कुलाचाराच्या बाबतीत मोठे कन्फ्युज दिसतात. 'साळुंकीचे पंख' देवक वापरण्याऐवजी हे वंशज इतर कोणतेही देवक सांगत असल्यामुळे कुलाचाराच्या बाबतीत हे लोक भ्रमिष्ट असल्याचे दिसतात. साळुंखे राजवंशाचे गुरुगोत्र 'मानव्य' असले तरी साळुंखे राजवंशाचे भाट अथवा हेळवी हे गोत्र सर्रासपणे 'भारद्वाज' सांगताना दिसतात. त्यामुळे साळुंखे राजवंशातील बहुतांश वंशज आज त्यांचे गुरुगोत्र भारद्वाज सांगताना दिसतात. बऱ्याच ठिकाणी साळुंखे राजवंशातील आजचे वंशज 'भारद्वाज' आणि 'साळुंकीचे पाखरू' या दोघांची सांगड घालून त्यांचे देवक अज्ञानवश होऊन 'भारजाचे पाखरू' असल्याची बतावणी करतानासुद्धा दिसतात. राजे साळुंखे चाळुक्य राजवंशातील वंशजांची या पोस्टमुळे यापुढील काळातील भ्रमिष्टता दूर व्हावी हीच अपेक्षा!
पार्वती मातेच्या आईचे नाव मैना आहे. साळुंकी पक्षाला हिंदीमध्ये मैना असे संबोधन होताना दिसते. तुळसीदासांच्या रामचरित मानसमध्ये मैनेला (साळुंकी) हिमालयाच्या पत्नीच्या अर्थाने लिहिलेले आहे.
'साळुंकी' तथा 'शाळू' या पक्षाचे शास्त्रीय नाव ॲक्रिडोथेरीस ट्रिस्टिस असे आहे. या पक्षाला इंग्लिशमध्ये कॉमन मैना असे नाव आहे. हे पक्षी निसर्गाच्या संतुलनासाठी फायदेशीर आहेत. निसर्गातील कीटक आणि किडे हे यांचे मुख्य भक्ष असल्यामुळे हे पक्षी शेतकऱ्यांचे मित्र आहेत. 'साळुंखीचे पाखरू' हे निरनिराळ्या हवामानामध्ये जुळवून घेण्याची क्षमता ठेवत असल्यामुळे या पक्ष्यांचा वावर उष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण प्रदेशांतील सर्वत्रच्या भागात दिसून येतो. हा पक्षी मानवी वस्त्यांजवळ तर सर्रासपणे आढळून येतो.
'साळुंकीचे पाखरू' हा पक्षी मुळतः एक दक्षिण आशियाई पक्षी आहे, जो भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, ब्रह्मदेश इत्यादी देशात मोठ्या संख्येने पाहावयास मिळतो. सध्याच्या स्थितीत मात्र हा पक्षी जगातील अनेक देशात दिसून येतो. हा पक्षी अशा पक्ष्यांमधील आहे, ज्याची संख्या आणि प्राकृतिक निवासस्थान दिवसेंदिवस वाढत आहे. साळुंकीच्या पाखराची चोंच आणि पाय पिवळ्या रंगाचे असून डोळे तांबूस तपकिरी रंगाचे असतात. साळुंकीच्या पाखराच्या पायाचा खालचा व मागचा भाग पिवळ्या रंगाचा आणि पिसरहीत असतो. साळुंकीच्या पाखराची लांबी साधारणपणे २३ ते २७ सेंमी. असून यांचे वजन ८३ ते १४३ ग्रॅम आणि यांच्या पंखाचा विस्तार १२० ते १४२ मिमी. असतो. नर व मादी दिसायला सारखेच वाटणाऱ्या या पक्षाचे संपूर्ण डोके, मान आणि छातीचा वरचा भाग काळा असतो, तर शरीराचा बाकीचा भाग गर्द तपकिरी रंगाचा असतो. साळुंकीच्या पाखराच्या पोटाचा मागचा भाग पांढरा व शेपटीचे टोक आणि बाहेरील पिसे पांढरी असलेली हे पक्षी उडताना दिसून येतात.
साळुंकीचे पाखरू मोठे मिजासखोर, भाडकुदळ आणि मोठमोठ्या पक्षांचा आक्रमक रीतीने सामना करणारे असते. या पक्षाच्या सर्व हालचालींमध्ये आत्मविश्वास दिसून येतो. कावळा व चिमणी यांच्याप्रमाणेच साळुंकीचे पाखरूही मानवाच्या सहवासाला कायमची चिकटून राहिलेले दिसते. ज्या ठिकाणी मानवाचा अधिवास आहे, त्या ठिकाणी साळुंकीच्या पाखराचा वावर सर्रासपणे दिसून येतो. मैना, साळु वगैरे मुलींच्या ठेवल्या जाणाऱ्या नावांचा आणि साळुंखे सारख्या आडनावांचा या पक्षाच्या नावामुळे संदर्भ लागतो.
साळुंकी हा पक्षी शक्यतो जोडीने वावरणारे दिसतात. प्रसंगानुरूप वेगवेगळे आवाज काढणारा हा पक्षी सर्वभक्षी प्रवर्गातील असून फळे, धान्य तसेच सर्व प्रकारचे किडे खाणारा हा पक्षी आहे. साळुंकी पक्षामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे रक्षण होण्यास मदत मिळते. त्यामुळे या पक्षाला शेतकऱ्याचा मित्र सुद्धा म्हटले जाते.
मार्गदर्शक :
प्रोफेसर डॉ. नीरज साळुंखे,
असोसिएट प्रोफेसर,
पीएचडी गाईड,
@
शब्दांकन :
सतीशकुमार शिवाजीराव सोळंके-देशमुख,
(एम.ए.बी.एड् & बी.पी.एड्),
👉मुख्य आयुर्विमा सल्लागार LIC,
👉ऑल इंडिया चेअरमन्स क्लब मेंबर.
👉M.D.R.T. USA
👉L.I.R.T. INDIA
👉"अग्निवंश",
सिद्धीविनायक काॅलनी गेवराई,
ता.गेवराई,
जि.बीड.
9422241339,
9922241339.

No comments:

Post a Comment

क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10

  क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10 औरंगजेबाचा बिदरला वेढा: २८ फेब्रुवारीला औरंगजेब बिदरच्या परिसरात पोहोचला आणि त्याने २ मार्चला बिदरच्या किल्ल्या...