महाराणी छत्रपती ताराबाई....
उपाधी = महाराणी.
राज्य_काळ = १७०० – १७०७
राज्याभिषेक = इ.स. १७००
राज्यव्याप्ती = पश्चिम महाराष्ट्र, कोकण,दक्षिण भारतात तंजावर पर्यंत
राजधानी = पन्हाळा
पूर्णनाव = महाराणी ताराबाई राजारामराजे भोसले
जन्मदिनांक = [1675/1674 (इतिहासात जन्मतारखेच कुठेही उल्लेख नाही]
जन्मस्थान = तळबिड
मृत्यूदिनांक = इ.स 9 डिसेंबर 1761
मृत्यूस्थान = सातारा
पूर्वाधिकारी = छत्रपती राजारामराजे शिवाजीराजे भोसले
उत्तराधिकारी = छत्रपती शाहुराजे संभाजीराजे भोसले
वडील = हंबीरराव मोहिते
राजवंश = भोसले
राजचलन = होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन)
महाराणी ताराबाई (१६७५-१७६१) ह्या छत्रपती राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. छत्रपती ताराराणी भोसले यांचा जन्म १६७५ साली झाला. जर तुम्ही कुुुठेेेही ताराबाईंची जन्मदिनांक १४ ऐप्रिल पाहत असाल तर ती अत्यंत चुकीची आहे. ताराबाईंचे लग्न छत्रपती राजाराम महाराजांशी १६८३-८४ च्या सुमारास झाले. २५ मार्च १६८९ रोजी मोगलांनी रायगडास वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या. छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर ताराबाई, राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या. रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली.सन १६९४ साली त्या तिघी जिंजीला पोहचल्या. ९ जून १६९६ रोजी ताराबाईंना शिवाजी हा पुत्र झाला.
राजाराम महाराजांच्या निधनानंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे हाती आल्यावर समोर उभ्या असलेल्या अनेक कठीण प्रसंगांनी खचून न जाता मोगली फौजांना मागे सारण्यासाठी ताराराणीने आक्रमक भूमिका घेतली. मराठेशाहीतील मुत्सद्यांना काळाचे गांभीर्य समजावून देऊन शेवटपर्यंत या सगळ्यांबरोबर एकजुटीने राहून तिने शत्रू थोपवून धरला. लष्कराचा आत्मविश्वास वाढवला. मोगलांना कर्दनकाळ वाटावेत असे कर्तृत्ववान सरदार त्यांच्यासमोर उभे केले. दिल्लीच्या राजसत्तेवर स्वतःचा असा धाक निर्माण केला. मराठ्यांची खालावलेली आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी तिने मोगली मुलुखावर स्वाऱ्या करून चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करून आर्थिक बळ वाढवले.
करवीर राज्याची, कोल्हापूरच्या राजगादीची तिने स्थापना केली. ताराबाई मराठ्यांच्या इतिहासातील ही एक कर्तबगार राजस्त्री होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीमहाराज यांच्यामागे त्यानी कणखरपणे राज्याची धुरा सांभाळली. सरसेनापती संताजी, धनाजी यांना बरोबर घेऊन मोगलांना सळो की पळो करून सोडणारी ही रणरागिणी म्हणजे महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववान स्त्रियांमधील एक मानाचे पान आहे.
No comments:
Post a Comment