विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 3 February 2021

सरदार बाजी कदम

 


सरदार बाजी कदम
मराठ्यांच्या कर्तृत्वाच्या उदयकाली विठोजी भोसले, मालोजी भोसले, लखुजी जाधवराव निंबाळकर, पवार, बाजी कदमराव हे निजामशाहीचा चौथा सुलतान मुर्तझा निजामशाह आणि पुढे मलिक अंबर ह्याच्या पदरी सेवेत होते. देवळाली प्रवरा येथील सरदार बाजी कदमराव ह्यांना साल्हेर आणि मुल्हेर हे किल्ले, किल्ल्यावर फितवा करून मिळवून दिल्याबद्दल देवळाली प्रवरा आणि रुई ही गावे इ.स. १५८० साली इनाम मिळाली होती. पुढे विजापूरकारांशी लढताना बाजी कदमांचा बंकापूर ( कर्नाटक ) येथे मृत्यू झाला. आजही त्यांचे वंशज हे देवळाली प्रवरा येथे आहेत.
पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत हे घराणे आले. खंडेराव कदम आणि तिसरे बाजी हे शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू सरदार होते. ह्यांच्याकडे राजगड किल्ल्याची तटसरनौबती होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेत तामिळनाडू येथील वली गंडापुराम हा किल्ला जिंकला. ह्या किल्ल्याची किल्लेदारी कदमांकडे होती. छत्रपती राजाराम महाराजांच्या जिंजी मोहिमेतही कदमांनी स्वराज्यासाठी आपले पूर्ण योगदान अर्पण केले. पानिपतच्या लढाईत ह्या घरातील सात पुरुष कामी आले. आजही कदमांकडे पारंपरिक आणि दुर्मिळ अशी जुनी शस्त्रे जपलेली आहेत. त्यांत धोप तलवारी, गूर्ज, कट्यारी, ढाली, बिचवे, हस्तिदंती गुप्त्या, भाले, शिवकालीन शिवराया आणि इतर ऐतिहासिक साधने आहेत.
पन्हाळ्याचा वेढा चालू असतांनाच २६.९.१६८९ या दिवशी राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी िंलगायत वाण्याचा वेश परिधान करून गुप्तपणे वेढ्याबाहेर पडले. सोबत मानसिंग मोरे, प्रल्हाद, निराजी, कृष्णाजी अनंत, निळो मोरेश्वर, खंडो बल्लाळ, बाजी कदम इत्यादी मंडळी होती.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...