विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 5 July 2021

#श्री_सखी_राज्ञी_जयती...


 #श्री_सखी_राज्ञी_जयती...

अस म्हणतात की एखादा महापराक्रमी योद्धा हा लाखात एक असतो, पण त्याची पत्नी नक्कीच दहा लाखात एक असते. तिचं हृदय कशाचं असत हे तिलाच ठाऊक.
रणरागिणी, कणखरता म्हणजे काय असते ह्याचे ज्वलंत उदाहरण, सोज्वळ, रूपवान, जेवढी कठोर तितकीच हळवी, प्रेमळ, निर्णयक्षम, सहनशीलतेचा महामेरू, स्वराज्याच्या एका धगधगत्या निखाऱ्याला सदैव फुलता ठेवणारी, एका वादळाला कायम समजून घेणारी, धीर देणारी, प्रत्येक संकटात खंबीरपणे सोबत असलेली, लखलखती तलवारच जणू, छत्रपतींच्या क्षत्रियकुलवंत घरातील पहिली सून, एका रुद्राची राज्ञी, एका छाव्याची पत्नी, जणू सर्वांस दुसरी जिजाऊच भासणारी, स्वराज्यासाठी निस्सीम त्याग अन स्वार्थ बाजूला ठेऊन स्वराज्यहित जोपासणारी, श्री सखी राज्ञी जयती असलेल्या #महाराणी_येसूबाईसाहेब…..
येसूबाई स्वराज्यात दाखल झाल्या त्यावेळी त्यांचे वय ६० वर्ष होते.
त्यापुढे उर्वरित आयुष्य त्यांनी सुखाने अन समाधानाने घालवले. या वयातही त्यांनी अनेक सल्लामसलतीत शाहूंना मदत केली, दानधर्म केला, ईश्वराचे चिंतन केले.
जीवनात अनेक चढउतार पाहिलेल्या, गृहकलह तसेच राजकीय संघर्षात होरपळून निघालेल्या या मराठ्यांच्या दुर्दैवी महाराणी म्हणजे महाराणी येसूबाई.
संभाजी राजांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर येसूबाईं तब्बल २९ वर्ष, ८ महिने अन १९ दिवस मुघलांच्या कैदेत होत्या. एकटेपणाने कशी काढली असतील त्यांनी एवढी वर्ष.
माहेरावर फितुरीचा कलंक,
पतीची चाळीस दिवस अनन्वित अत्याचार करून दुर्दैवी हत्या अन स्वतः सलग तीस वर्षे औरंगजेबाच्या कैदेत.
एवढे दुःख तर द्रौपदीच्या वाट्याला सुद्धा आले नाही.
दुर्दैवाने हे आम्हाला कधी शिकवलेच नाही वा कोणी सांगितले नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे.
‘श्री सखी राज्ञी जयती’ महाराणी येसूबाईसाहेबांना माझं शत शत नमन. 🙏

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...