विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 2 October 2018

प्रतापराव गुजर "


प्रतापराव गुजर "
खानास गर्दिस मिळवणे बिगर तोंड दाखवु नये.. राव खानास ऐसेच सोडलात.. तुम्हि सरदारकी नाहि शिपाईगिरी केलीत.." ऐक तिखट आदेश नेसरीत थडकला..! खांद्यावर पद तर सरसेनापतीपदाचे.. हा कसला आदेश..? नको ते पद घ्या राजीनामा .. दुसरे राजेमहाराजे मिळतील अजुन.. कुठली मोहीम सांभाळा तुम्हीच .. हि आताची स्वामीनिष्ठा अवघा महाराष्ट्र अनुभवतोय..!! पण तो सेनापती वेगळाच होता.. शिवछत्रपतिंच्या हिंदवी स्वराज्याचा सरसेनापती कुडतोजी उर्फ प्रतापराव गुजर. स्वराज्यावर चालुन आलेला बहलोलखान आयता मराठी तलवारीत सापडलेला.. कुठे रावांचा निर्णय चुकला.. त्याला खंडणी वसुल करुन सोडला.. महाराजांना बातमि समजलीच.. थेट सह्याद्रीच्या कड्यावरुनच वाघ चवताळला.. आदेश नेसरीत प्रतापरावांसभोवती थैमान खालु लागला.. खानास जिवंत सोडले...? तो येणार नक्कीच येणार.. दिवस मावळतीला निघालेला.. प्रतापराव आणि सहा शिलेदार सहज निघाले.. वाट नेहमीचीच असेल.. गस्तफेरफटका असेल ..का ..कुठे..? निघाले इतिहासालाच माहित.. ऐक अंतरावर धुळ खुपच दिसली.. त्यात आवाज हि होते..जरा चिञ स्पष्टच दिसले... फौज.. खानाची.. बहलोलखानाची..! हत्ती .. घोडे.. मुघली मुंडकी.. अरे हरामखोरा तुला जिवंत सोडला.. तु पुन्हा फौजेसकट..? प्रतापरावांच्या अंगात तांडव संचारले.. रिकीबीला टाच बसली.. तलवार रोखाने निघाली.. राव थांबा फौजेसकट भिडु.. पण नाही राव घुसलेच.. पाठोपाठ सगळीच फौज निघाली... किती हजार.. छे फक्त सहा जण. एकुण सात तलवारी.. खानाला इशारा झाला.. कुणीतरी येतय अंगावर .. कितीजण सात जण..! मराठी तलवारी भिडल्या.. सात तलवारी.. हजारी फौजेवर.. क्षणार्धात शांतता .. गर्दिस मिळवणारे.. गर्दित हरवले.. प्रतापरावांसकट सहा शिलेदार लढता.. लढता ईहलोकी गेले.. केवढि हि स्वामिनिष्ठा.. कुठुन माणस निर्माण केली हि शिवछञपतींनी.. साध काम आहे का.. फक्त सात जण हजारोंच्या मुघली मुंडक्याना भिडले.. नेसरी पावन झाली..
माघ_व. १४, महाशिवरात्र, शके १५९५

सात बेलपञे गळाली..
मुजरा सरसेनापती प्रतापराव गुजर..
आणि सहा शिलेदारांना.

कुणी शाहिर अजुनहि गात आहे..

म्यानातुन उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात..!
वेडात मराठे वीर दौडले सात

No comments:

Post a Comment

राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे

  राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे : सरदार मलोजी रणनवरे हे जिंती तालुका फलटण येथील पुरातन वतनदार....