विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 2 October 2018

शिवरायांचे शुरवीर मावळे बाजी पासलकर

शिवरायांचे शुरवीर मावळे
बाजी पासलकर
छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरवात केली होती. शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती. जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरवात केली. तोरणा, शुभानमंगळ, रोहिदा असे किल्ले त्यांनी काबीज केले. विजापूरच्या आदिलशाही दरबारात शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाने सन १६४८ साली फत्तेखानास धाडले.

फत्तेखानाने जेजुरीजवळ बेलसर येथे आपला तळ ठोकला होता. खानाच्या सैन्याने शिरवळजवळील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करुन किल्ला काबीज केला. मराठ्यांचा हा पहिलाच पराभव होता. छत्रपतींनी कावजी मल्हार यास सुभानमंगळ भुईकोट वर चालून जाण्यास सांगितले. त्यांनी एका रात्रीत गड सर केला. तर फत्तेखान वर हल्ला करण्यासाठी बाजी पालसकर, कान्होजी जेधे, गोदाजी जगताप बेलसरच्या छावणीवर गेले, अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला.

फात्तेखांचा सरदार मुसेखानाने पुरंदरावर हल्ला केला, पुरंदराला खानच्या सैन्याचा वेढा पडला. गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युद्ध झाले. बाजी पासलकर, कान्होजी जेधे, गोदाजी जगताप यांनी गानिमांची कत्तल केली. फात्तेखांचा सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकांना भिडले. दोघात तुंबळ युद्ध झाले. अखेरीस गोदाजीच्या वीराने मुसेखानाच्या छाताडाचा वेद घेतला व खान कोसळला. मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला पण बाजी पासलकर सारखा वीर रणी पडला.

यदुनाथ सरकारांच्या मते काय सावंताच्या युद्धात बाजी मरण पावले (हे सवाई बाजी असावेत). सभासदाच्या बखरीत या युद्धाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे. राज्पुरीहून काय सावंत म्हणोन पांच हजार फौजेनिशी युद्धास आला. युद्ध मोठे होतां बहुत रणखंदल जाले. काय सावंत खास व बाजी पासलकर महायोद्धा, याच्या मिश्या दंडायेवढ्या, यांस पीळ घालून वारी केशांच्या आधारे निंबे दोहींकडे दोन ठेवीत होता, असा शुरमर्द ठेविला, याशी व त्याशी खासाखाशी गांठ पडली. एकास एकांनी पंचवीस जखमा करून ठार मारले. मग उभायान्ताकडील दळ आपले जागीयास गेले.

बाजी पासाल्कारांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला. पुण्याजवळील वरसगाव धरणातील जलाशयाला बाजी पासलकर यांचे नाव देण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे

  राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे : सरदार मलोजी रणनवरे हे जिंती तालुका फलटण येथील पुरातन वतनदार....