विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 7 January 2019

मराठा साम्राज्याच्या पहिल्या आणि शेवटच्या सरसेनापती मातोश्री उमाबाईसाहेब दाभाडें

The Only Woman Commander - in - Chief of The Maratha Army..
#SARSENAPATI_UMABAISAHEB_DABHADE
वरील चिञ दाभाडे घराण्यातील वंशज Satyasheelraje Dabhade राजे यांनी प्रसिद्ध चिञकार Pramod Kallappa Morti यांच्याकडून घडवून लोकापर्ण केले...
महाराष्ट्रात तरवार गाजवत आपल्या पराक्रमाने उत्तरेत मराठा साम्राज्याचे वादळ निर्माण करणारे सरसेनापती दाभाडे घराणे हे आपल्या पराक्रमाने सर्वश्रूत आहे. स्वराज्यविस्तारापासून ते साम्राज्यविस्तारातही मौलीक कामगिरी बजावणारे दाभाडे घराण्यात एक रणरागिणीच जन्माला आली होती . हिच रणरागिणी सरसेनापती खंडेराव दाभाडेंची पत्नी म्हणून लाभली.खंडेराव दाभाडेनंतर ञिंबकराव दाभाडे सेनापतीपदावर आले आणि काहीकार्यकाळात रणभुमीवर धारातीर्थ पडल्यावर सेनापती पद हे मातोश्री उमाबाईसाहेब दाभाडेंनी सांभाळले. उमाबाईसाहेबांनी
मराठा साम्राज्याच्या पहिल्या आणि शेवटच्या सरसेनापती ठरल्या गेल्या . आपल्या कणखर आणि कुशल नेतृत्वाने दाभाडे घराण्याचा दरारा कायम ठेवला गेला.
दाभाडे बंधु महाराष्ट्रात असल्याची संधी साधून अहमदाबादच्या जोरावरखा बाबी या मोगल ठाणेदाराने त्यांची ठाणी उठवली. दाभाडे बंधुंना हे कळल्यावर ते अहमदाबाद वर चाल करुन गेले, त्यांच्या सोबत त्यांच्या मातोश्री उमाबाई दाभाडे याही होत्या. अहमदाबाद जवळ उमाबाई यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या युध्दात दाभाडेंचा प्रचंड विजय झाला.
अहमदाबादच्या रणभुमीवरील पराक्रमा बद्दल थोरल्या शाहू महाराजांनी उमाबाईंना सोन्याचे तोडे देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच हा सन्मान त्यांना वंशपरंपरागत करुन दिला. सोन्याचे तोडे पायात घालण्याचा मान फक्त छत्रपतींच्या घराण्यातील स्त्रियांना होता.
असा मान मिळवणार्या सेनापती उमाबाई दाभाडे ह्या एकमेव महिला होतं.
सेनापती उमाबाई दाभाडेंचा अल्पशा आजारपणाने तळेगाव येथे मृत्यु झाला महाराणी ताराराणी साहेब यांच्या नंतर मराठेशाहीतील नावाजलेल्या उमाबाई या पराक्रमी स्त्री होत्या. सेनापती उमाबाई दाभाडेंची समाधी तळेगाव दाभाडे पुणे येथे आहे.
त्यांच्या मृत्युची तारीख 28 नोव्हेंबर 1753.
फोटो साभार : दाभाडे घराण्यातील वंशज Satyasheelraje Dabhade राजे व प्रसिद्ध चिञकार Pramod Kallappa Morti.
माहिती साभार : गडप्रेमी बाळासाहेब पवार व रवि पार्वती शिवाजी मोरे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...