विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 11 February 2019

नरवीर तानाजी मालुसरेंचे एक अपरिचीत_युध्द

नरवीर तानाजी मालुसरेंचे एक अपरिचीत_युध्द.* नरवीर तानाजी मालुसरे असे नाव घेतले कि लगेच आपल्याला त्यांच्या सिंहगडावर केलेल्या पराक्रमाची आठवन होते. सर्व सामांन्यांसाठी त्यांचे चरित्र या एकट्या प्रसंगापुरतेच मर्यादित झाले आहे. परंतु त्यांनी इतर केलेल्या पराक्रमांविषयी सर्व सामांन्यांना अजीबातच माहिती नाही. तानाजी मालुसरेंचे संगमेश्वरचे युध्द हे असेच अपरिचीत युध्द आहे, ज्या युध्दाला हवे आहे तेव्हडे महत्व देऊन लेखकांनी जगासमोर मांडले नाही. हा तानाजींवर झालेला अन्यायच आहे. संगमेश्वरी असतांना शत्रुंनी केलेल्या अकस्मात हल्ल्या दर्म्यान तानाजींनी कमालीचे धाडस दाखविले होते. त्या प्रसंगाचे तपशिलवार वर्णन पुढिल प्रमाने_
दाभोळ, चिपळून, संगमेश्वर काबीज झाले, राजापुर लुटले गेले. ह्या बातम्या धडा-धड आदिलशाहाच्या कानावर आदळत होत्या. तो या बातम्यांनी अस्वस्थ झाला. त्याने लगेच श्रूंगारपुरच्या सुर्याजीस आदेश केला. तो त्याला म्हणाला_ "तो (शिवाजी राजे) आमचा उघड शत्रु राजापुरवर चालुनजात असतांनाहि त्यास तु का अडविले नाही? असो ते जाउदे तो आता परत त्याच मार्गाने जवळ आला आहे. तेव्हां त्यास तेथे अडव (त्याच्याशी युध्दकर). आदिलशाहाने आशा प्रकारचा आदेश सुर्याजीला करताच हे काम अतिशय कठिण असतानांही सुर्याजीने करण्याचे धाडस दाखविले. आदिलशाहाच्या दबावाखाली सुर्याजीने छत्रपति शिवरायांच्या विरोधात उघड-उघड शत्रुत्व धारण केले. तेव्हां सुर्याजीं सुर्वे श्रूंगारपुरला होता त्याने लगेच शिवरायांच्या संगमेश्वरी असलेल्या सैन्यावर धावा बोल्ला. संगमेश्वरी शिवरायांचे सैन्य अल्पसे होते. या अल्पशा सैन्याला सुर्याजीच्या सैन्याने चोहो बाजुंनी घेरले. शिवरायांच्या या सैन्याचे नेत्रुत्व तेव्हां पिलाजी निळकंठरावांकडे होते. आपले सैन्य शत्रुंनी चोहो बाजुंनी घेरले आहे, असे जेव्हां पिलाजींना समजले तेव्हां पिलाजीं फ़ार भयभीत झाले. शत्रुंना सामोरे जाऊन त्यांच्याशी युध्द करण्यापेक्षा युध्दातुन पळून जानेच त्यांनी योग्य समजले. ते आपला जीव वाचवण्याच्या भितीने संगमेश्वरहून पळुन जाऊ लागले. तोच भितीने कापणात्या त्या पिलाजीला आपल्या लोकांनामागे सोडुन पळुन जातांना तानाजी मालुसरेंनी पाहिले. तानाजीं सारख्या प्रतापि पुरुशाला हे अजिबात खपनारे नव्हते. उर्वरीत टिप्पणी मध्ये आहे.
चित्रकार:- सुरेश चपेले ⛳️🚩
संदर्भ :- शिवभारत

माहिती साभार -@_shivkalyanraja_ -
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

No comments:

Post a Comment

राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे

  राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे : सरदार मलोजी रणनवरे हे जिंती तालुका फलटण येथील पुरातन वतनदार....