*आदर्श छत्रपती शिवाजी महाराज; काल आज आणि उद्याही!*_
आपल्या असामान्य गुणांमुळे जनमानसांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारा जाणता राजा अर्थात छत्रपती शिवाजी महाराज. एक आदर्श राज्यकर्ता म्हणून त्यांचे नाव अगदी अगत्याने घेतले जाते आणि यापुढेही कायमच घेतले जाईल.
आज महाराजांच्या जयंती निमित्ताने महाराजांचे काही गुण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. महाराजांचा हा समृद्ध वारसा आपण पुढच्या पीढीपर्यंतही पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. चला तर जाणून घेऊया बहुगुणी महाराजांचे असे कोणते गुण आहेत जे पुढच्या पीढीसाठी नक्की मार्गदर्शक आहेत...

1) *सर्वधर्मसमभाव* : शिवाजी महाराजांच्या स्वधर्माविषयी प्रचंड निष्ठा
आणि आदर होता. तरीही देखील त्यांनी कधीही इतर धर्मांचा तिरस्कार किंवा
अनादर केला नाही. त्यांच्या सैन्यात हिंदूंप्रमाणे मुस्लिम मावळेही होते.
आजच्या काळात लहानपणापासूनच मुलांमध्ये हा गुण रुजवणे, महत्त्वाचे झाले
आहे.
2) *साहसी व धाडसी वृत्ती* : कोणत्याही संकटात, अडचणीत न डगमगणारे महाराज आणि त्यांच्या साहस कथा ऐकतच आपण लहानाचे मोठे झालोत. कधी शक्ती तर कधी युक्तीच्या जोरावर यशस्वीरित्या साहस कसे करावे, हे महाराजांकडून शिकण्यासारखे आहे.
3) *कमालीची निष्ठा* : देश, स्वराज्य आणि काम यांच्या प्रती कशी निष्ठा असावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महाराज. महाराजांची हीच निष्ठा आज जर आपण आपल्या दैनंदिन कामात आणली तर यशाकडे होणारी आपली वाटचाल कोणीच रोखू शकणार नाही.
4) *स्त्रियांचा आदर* : आजकाल स्त्रियांवरील वाढते अत्याचार, शोषण हे पाहता आता स्त्री स्वातंत्र्यासोबत स्त्रीयांचा आदर करा हे सांगावे लागत आहे. अशा काळात महाराजांकडून शिकवण नक्कीच पुढील पीढीला देऊ शकतो. 'स्त्रियांची इज्जत कायम राखली पाहिजे मग ती कुणीही असो' अशी महाराजांची भूमिका होती. महिलांविरुद्ध अत्याचाराला महाराजांनी कधीही थारा दिला नाही.
5) *नेतृत्व गुण* : शिवाजी महाराजांचा अतिशय महत्त्वाचा गुण म्हणजे नेतृत्व. हातात अधिकार असताना सर्वसमावेषक विचार करणे, इतरांना सोबत घेऊन पुढे जाणे, कुठेही दुजाभाव होऊ न होणे असे आदर्श नेतृत्व पुढच्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
6) *संघ भावना* : महाराजांनी उभं केलेलं 'स्वराज्य' हे सांघिक भावनेचं (टीमवर्कच) बेस्ट उदाहरण आहे. कुठे, कधी कुणाची गरज आहे. कुणाला पुढं करायचं, सोबत घेऊन काम कसं करायचं. आहे त्या टीमच्या साहाय्याने विजयश्री कशी प्राप्त करायची हे महारांजी अनेकवेळा दाखवून दिलंय. कारण सांघिक भावनेमुळेच अनेक कामे सोपी होतात, लवकर होतात. आचार-विचारांची देवाण घेवाण होते.

No comments:
Post a Comment