विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 5 February 2019

समरभुमी उंबरखिंड:- मराठ्यांच्या इतिहासाची गौरवशाली गाथा.

समरभुमी उंबरखिंड:-
मराठ्यांच्या इतिहासाची गौरवशाली गाथा....
(विजयदिन - 2 फेब्रुवारी)
"समरभुमीचे सनदी मालक,
शतयुद्धाचे मानकरी,
रणफंदीची जात आमुची,
कोण आम्हा भयभित करी.....!
______भारताच्या इतिहासात अनेक पराक्रमी राजे होऊन गेले.महाराणा प्रतापसिंह सारखे प्रसंगी वनवास भोगला.पण, देशासाठी प्राण अर्पण करणारे रणधुरंदर पराक्रमी योद्धे या हिंदुस्थानात जन्माला आले.पुढे हाच वारसा घेऊन पुढे शहाजीराजे शिवराय,संभाजीराजे जन्माला आले.देव देश धर्माच्या रक्षणार्थ झुंजते झाले.शिवरायांनी आपल्या हयातीत एकुण पाचशे लढाया केल्या.कोणी कीतीही सांगेल मला नाही माहीत.परंतु,मला माहीत असलेल्या पाचशे लढाया अाहेत.ज्यात शिवराय प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सामील होते.
______कंबरेला नागव्या असिलता अडकवुन रानोमाळ दौड घेणार्या व रणनवर्याची जात सांगणार्या बारा मावळ व सात नेर्यांतील,कोकण,तळकोकणातील माणसांना एकत्र करुन मोघल व इतर पातशाह्यांविरूद्ध झुंज देणारे शिवराय हे खरच अद्वितीय योद्धे होत..
पेण पासुन पुर्वेकडे पंधरा मैलावर असणार्या व सह्याद्रीहुन कोकणात उतरणार्या
कुरवंडे घाट हा घाट लोणावळा ते खाली कोकणात उंबरे गावा पर्यंत जातो.लोणावळा-चावणी-ठाकुरवाडी-अ
ंबानदीपात्र-ठाकुरवाडीची ती टेकडी.
मागे उभा आफाट सह्याद्री ते अंबा नदीचे पात्र चिंचोळी वाट....दोन्ही बाजुने टेकड्या व पुढे ठाकुरवाडीची टेकडी हिच ती खिंड उंबरखिंड....
याच खिंडीत ही लढाई झाली.
या लढाईत प्रत्यक्ष शिवाजी महाराज सैन्याचे नेतृत्व करत होते.
____ शके १५८२ माघ शुद्ध चतुर्दशी पौष मास (जानेवारी १६६१) दिल्लीपती शहेनशाए हिंदोस्था औरंगजेब. त्याचा सेनापती शाएस्तेखान आपल्या सरदारास कारतलबखनास म्हणाला की,
माझ्या आज्ञेने तु सेनेसह सह्याद्री उतरण्याचा विचार कर.त्या कारतलबखानास या माझ्या गरुडाच्या बसकणीसारख्या जिथे वार्यालाही जाता येत नाही व शिरला वारा बाहेर पडु शकत नाही अशा माझ्या सह्याद्रीची कल्पना नव्हतीच.निघाला कारतलबखान आला पुण्यात..सोबत होते कछप व चव्हाण,अमरसिंह,
मित्रसेन व त्याचा भाऊ,सर्जेराव गाढे,जसवंत कोकाटे,महाबाहु जाधव व जगजीवन,उदाराम व अजिंक्य रायबाघीण असे नामचिन रणधुरंदर योद्धे.कारतलबखान पुण्याहुन निघाला किल्ले लोहगडाच्या दक्षिणोत्तर मार्गाने तो निर्भयपणे सह्याद्री उतरु लागला.तो पूणे- तळेगाव- वडगाव- मळवली मार्गे लोणावळ्याकडे आला वास्तविक पाहाता वाटेवरील लोहगड, विसापूर किल्ले स्वराज्यात होते, पण महाराजांच्या आज्ञेमुळे या किल्ल्यावरुन खानाच्या सैन्याला कोणताच विरोध झाला नाही. कारण,उंबरखिंडीत खानाला कोंडीत पकडून झोडपून काढणे शक्य होते. महाराजांनी नेताजीला खानाच्या वाटेवरील पाणवठ्यांची, विहिरींची कोंडी करण्याचा हुकूम दिला. त्यामुळे खानाची फौज तहानेने हैराण झाली.
_______नाळेच्या पाऊलवाटेने जाताना आपण पडु की काय असा भास होऊन त्याचे सैन्य अतिशय कुंठीत झाले.आपल्या सेन्यासह येणार्या त्या घमेंडखोर कारतलबखानास आपला शत्रू मुळीच दिसला नाही,अरण्यमात्र दिसले.शत्रूनीं(शिवरायांच्या सैन्याने)भरलेल्
या परंतु शुन्य वाटणार्या अशा झाडीत जेव्हा तो शिरला.तेव्हा,मित्रसेनादी सरदारांनी त्याची कड सोडली नाही.जेथे वारासुद्धा नव्हता अशा त्या महवनांत वस्ती करणार्या कारतलबाने आपल्या रक्षणाचा उपाय चिंतीला नाही.त्या कीर्र रानात शिरणार्या त्या शिवाजी राजेंच्या शत्रूस आपण अंधकारमय लोक पाहीला असेच वाटले.
_____ प्रतिकुल वार्याच्या मार्याखाली सह्याद्रीहुन उतरणार्या त्या शत्रूस शिवाजीराजांनी लगेच आडवले नाही.सह्याद्रीच्या तळास असणारा शिवाजी राजांचा तो प्रदेश घेण्याची उत्सुकता असलेल्या शत्रूस तेथेच आडवले असते.तर,सैन्यासह तो त्या आरण्यसागरात येऊन पडला नसता.असाच मनाचा निश्चय करुन समर्थ असतांही शिवरायांनी बहुबलाचा गर्व वाहणार्या त्या कारतलबास येथे आडविले नाही.मग,सह्याद्रीच्या पुष्कळ पुढे आलेल्या त्या शत्रूवर शिवाजीराजांनी चाल करुन त्यास कोंडले.त्या क्षत्रियवीर पुर्वीच नेमलेले पायदळाचे सज्ज नायक येऊन त्या दाट आरण्यात दोनही बाजूंस ठिक ठिकाणी समीप राहीले असतांही ते दिल्लीपतीच्या सैनिकांस समजले नाही.
नंतर उंबरखिंडीतील आरण्यात कारतलबखान सेनेसह आला.
_____तितक्यात शिवरायांच्या सेनेची रणभेरींचा निनाद त्या अरण्यात दुमदुमला व त्या कारतलबखानास उमजले की त्या शिवाजीराजेंचे सैन्य जवळ आलेले आहे.रणवाद्यांचा तो आवाज ऐकुन त्याने शौर्य गाजवावे असे मनात आणले व तुंगारण्याचा आधिपती मित्रसेन त्वरीत घोड्यावरुन खाली उतरला,टेकाडावर उभे राहुन, आपल्या वीरांना घेऊन,विरासन धारण करुन,धनुष्य वाकवुन त्यावर बाण लावुन युद्धास सज्य झाला.त्याचप्रमाणे मित्रसेन वगैरे लोक युद्धासाठी सज्ज झाले.पण,शिवरायांच्या मावळ्यांच्या तोफांचे गोळे पदोपदी पडत असल्याने.कारतलबखान आपले सैन्य जमवुन उभा राहाला.तेव्हा,आरण्याच्या मध्यभागी तेजाचे घरच अशा धनुर्धारी अमरसिंहाने न गोंधळता.त्या अारण्याच्या मध्यभागी बाणांचा वर्षाव करुन शिवरायांच्या मावळ्यांना घायाळ केले.काही जण रक्ताच्या अंघोळ्या करत धारातिर्थी पडले.मग,रागाने संतप्त शिवरायांनी दिला आदेश सेनापतींना सुटले बोरटीकर देशमुख राजपाटील,यशवंतराव रामाजी,विश्वासर
ाव हतनूरकर दिनकरराव बागराव इ. ज्यांच्यापुढे नियतीही माथा टेकविते असे हे शुर वीर निघाले...
...आडवा त्या कारतलबखानाच्या सर्व वाटा.....व सेनापती सुटले...
खान.... खान...त्याला काही समजायच्या आत..रणनवर्याची जात सांगणार्या मावळ्यांच्या असिलता म्यान बाहेर येऊन नागव्या झाल्या व जेव्हा त्या यवनसेनेवर बरसु लागल़्या.परंतु,कारतलबखान देखील मोठा नामचिन सरदार व सोबतचे अणखी सरदार.ते काही युद्धावेश सोडेनात..मग....मग..
_____स्वत: शिवाजी महाराज वधासाठी त्वरीत घोड्यावर चढुन जगात उत्कर्ष उत्पन्न करणारे धनुष्य हाताने ओढणारे ते शिवाजी राजे पेटलेल्या अग्निच्या ज्वालांच्या लोळांनी,खांडववन भस्मसात करणार्या अर्जूनाहून किमपी कमी नाहीत.असे सुरांना तसेच असुरांना देखिल दिसले.शिवाजीराज
ाच्या वीरश्रेष्ठांनी तीक्ष्ण व लांब तरवारीच्या योगें पाडलेल्या शत्रुकडील घोड्यांच्या रक्ताच्या पुरानें अरण्याच्या मध्य भागात अरुणाहुनही आधिक लाली आली.मित्रसेनादी वीरांनी गोंधळुन न जाता पदोपदी रक्षिले असतांही शिवरायांच्या योद्ध्यांच्या बाणांच्या पिंजर्यात सापडल्यामुळे त्या सैन्याची दाणादाण उडाल्यामुळे ते थांबले, नंतर सुर्य मध्यान्ही येऊन शिवाजीराजेंच्या तेजाबरोबरच ताप देऊ लागला.पुर्वी कधी न पाहीलेल्या, शत्रूच्या रक्षणाखाली असणार्या,वारा मुळीच नसणार्या अस्या महारण्यामध्ये सगळे सैन्य दु:खी होऊन धीर सोडताना पाहुन रायबाघीण कारतलबास म्हणाली की,
"शिवाजीराजेरुपी सिंहाच्या आश्रयाखाली असणार्या वनांत प्रवेश केला, हे तू वाईट काम केलेस!दिल्लीपतीचे सैन्य येथे घेऊन येऊनते त्वां गर्विष्ठाने सिंहाच्या जबड्यांत आणून सोडीले,ही दुखःची गोष्ट होय.आज पर्यंत दिल्लीपतीने जेवढे यश मिळविले.त़्याचे सारे यश तूं ह्या आरण्यात बुडविलें!पहा!मागे व पुढे, उजवीकडे व डावीकडे उभे असलेले शत्रू आनंदाने लढू इच्छित आहेत.हे पटाईत तिरंदाज असलेले तुझे सर्व सैनिक चित्रांतील मनुष्याप्रमाणे अगदी स्तब्ध अाहेत.खेदाची गोष्ट अहे की,दिल्लीपतीच्य
ा त्या मुर्ख सेनापति शाएस्तेखानाने प्रतापरुपी अग्निमध्ये तुला सैन्यासह टाकले.शत्रू तुला ताबडतोब जिवंत पकडून नेऊ इच्छित आहे.तु मात्र आरण्यात कोंडला गेला असताना आंधळ्याप्रमाणे युद्ध करु इच्छीत आहेस.फलनिष्पत्ती होत असेल तरच मनुष्याच्या उद्दोगाचा ह्या जगात उपयोग,नाही तर तेच साहसाचे कृत्य उपहासास कारणी भुत ठरते.म्हणून तु आज लगेच जा व त्या राजास शरण जाऊन आपणास सैन्यासह मृत्युपाशातुन सोडवुन घे."
_____ याप्रमाणे रायबाघिणीनें त्या मशहूर व साहसीं यवनास तेथे जागे केल्यानंतर तो कारतलबखान परावृत्त झाला व त्याने आपला वकील शिवरायांकडे पाठविला.नम्र भाव स्विकारुन तो वकील शिवरायांच्या कडे आला.तेव्हा,अतिसुंदर ,उंच मानेच्या रुंद छाती,धिप्पाड देह,महाबलवान,दोनही बाजुस बाणांच् भाते पंखाप्रमाणे लावलेल्या, रत्नजडीत अलंकार घातलेल्या अशा घोड्यावर आरुढ होऊन अंगात कवच घातलेल़्या व हातात धनुष्यबाण व तरवार असणार्या घोडदळाच्या सामुदायामध्ये शिवराय होते.त्यांच्या मस्तकावर शिरस्राण शोभत होते.वैकक्षहारा
सारखा व प्रचंड ढालीने शोभणारा दुपेटा त्यांनी परिधान केला होता.सोनेरी कमरपट्ट्यापासून लटकणार्या तरवारीच्या योगे ते शोभत होते.त्यांच्या तेजस्वी उजव्या हातात उंच भाला होता.ते अत्यंत सौम्य असुनही आपल्या तेजाने अत्यंत उग्र दिसतायेत.ते श्री शंकर ह्यांहूनही उग्र,कुबेराहुनही धनाढ्य,अाग्निपेक्षा अत्यंत असह्य,वायूहूनही बलवान, इंद्राहुनही समर्थ,यमाहूनही क्रुर,वरुणापेक्षाही नीतिज्ञ,चंद्रापेक्षाही अल्हाददायक, मदनापेक्षाही अजिंक्य असे ते शिवाजी राजे पाहुन तो मोंगल दुताने कारतलबखानाचा संदेश बयान केला.
______कारतलबखानास शिवरायांनी अभयदान दिले.पण,तोपर्यंत शिवरायांच्या सैन्याने लुट लुटले व चारही बाजुंनी अडविले.कोणी घोड्यावरुन उतरुन आपण अभयमुक्त झाला.रक्ताने लाल झालेले वस्र परीधान करुन कोण्या विरानें लगेच शस्र टाकुन जणु का़य सन्यास घेतला.कुणी कर्णभूषणाच्या लोभाने एकाचे कान तोडले असता त्याने मोते व रत्ने ह्यांचा कंठा लगेच टाकुन दिला.आम्ही शिवाजीराजाकडीलच आहोत,असे सांगुन काही घोडेस्वारांनी अपणास सोडवुन घेतले.इतक्यांत हात वर करुन जणूं काय रागावलेल्या प्रमाणे उंच स्वरानें ओरडणार्या भालदारांनी शिवाजीराजेंच्या आज्ञेने अरण्यांतील निरनिराळ्या सेनापतींकडे येऊन शत्रुशी युद्ध करण्याचे सर्वत्र बंद करा म्हणून सांगितले.मग अभय प्राप्त झालेले मोंगल सैनिक भ्यालेल्याप्रमाणे वनांतून त्वरेने निघुन गेले.
_____मोगलांनी इतसित: फेकलेल्या व आंत अपार कोष असलेल्या पेट्या आपले लोक भराभर आणु लागले.पळून जाणार्या शत्रूंनी अरण्याच्या मध्यभागी सोडून दिलेले हत्ती व घोडे सैनिक घेऊन आले.पळालेल्या शत्रूने भाराच्या भीतीने टाकलेले पुष्कळ हांडे, पेले,झार्या व सोन्याची दुसरींही पुष्कळ भांडी ह्यांचे पर्वत आपल्या मावळ्यांनी सगळीकडे रचले.अस्या समयी आपल्या प्रचंड भुजदंडाने शत्रुसमुहाचे दंडन करणारे शिवाजीराजे सेनापती नेताजीस पाहुन बोलु लागले.
"आदिलशाहाच्या ताब्यांतील देश पादाक्रांत करण्यास मला जाऊं दे!पण तूं मात्र मोंगलांचा नाश करण्यासाठी येथेच रहा. "
______अशाप्रकारे शिवरायांनी त्या कारतबलखानास त्या उंबरखिंडीत कमीत कमी सैन्याशिवाय शह दिला.प्रतिकुल परीस्थिती असतानासुद्धा त्यांनी खानास सह्याद्री उतरु दिला.योग्य ती वेळ येऊ दिली.योग्य नियोजन साहस या गनिमी काव्याच्या पुरक बाजु आहेत.शिवरायांच्या बर्याच लढाया या तलवारीच्या बळावर नाही.तर,बुद्धीच्या बळावर जिंकल्या गेल्यात.एक थोर राजकारणी व मत्सुद्दी योद्धा या गुणांची झलक येथे दिसुन येते.पाठीला मरण बांधून फिरणारे या सह्याद्रीच्या गिरीकंदरांत जन्मलेले मावळ त्या कैलासावरील शिवाच्या शिवगणांपेक्षा नक्कीच कमी नाहीत.
_____ गडे हो,कधी गेलाच अवर्जुन पाली गणपतीच्या दर्शनास तर,शेमडी गावातुन चावणी गावाकडुन (4 की.मी. ता-खालापुर,जिल्हा-रायगड,खोपोलीच्या पुढे)जाणार्या उंबरखिंडीकडे चार पाऊले वाकडी करावयास कधी चुकु नका.चार चिणकीची, झेंडुची फुले वहायला कधी विसरु नका...
शिवदुर्ग मित्र लोणावळा या संस्थेने तेथे समरभूमीत एक थोरले स्मारक उभारले आहे.2 फेब्रुवारीला येथे त्या लढाईत धारीतिर्थी पडलेल्या विरांना मानवंदना दिली जाते.....जरुर जा...!
तो आपला इतिहास आहे..धगधगत्या प्रेरणेचा पोत व उरात सुर्यदेवाप्रमाणे तेज घेऊन फिरणार्या मराठ्यांच्या शौर्याची ती विजयगाथा आहे....आपल्या पुर्वजांची ती रणभूमी आहे......!
त्या शहेनशां ए हिंदोस्थां दिल्लीपतिच्या सरदारांस व खुद्द औरंगजेबास धुळ चारुन जगात उत्कर्ष करणार्या शिवबा़चे आपण मावळे आहोत....!
तो इतिहास जपायला हवा....!
धन्यवाद....
मर्यादे़यंविराजते...
संदर्भ:-
*शिवभारत-
कविंद्र परमानंद गोविंद नेवासकर
सभासद बखर
जेधे शकावली
मल्हार रामराव चिटणिस बखर
श्रीशिवदिग्विजय
औरंगजेबाचा संक्षिप्त इतिहास
(मी जे संदर्भ वापरलेत त्यांचे आणखी वेगळे उल्लेख करण्याची गरज मला वाटत नाही.लेख यांनाच अनुसरुन लिहलेला आहे.तसेच एक साधन वगळता सर्व साधनांत 'उंबरखिंड' असाच उल्लेख आहे.त्यामुळे मी यालेखात बदल केले आहेत.)
लेखन-
नवनाथ आहेर
(9922973101)
बा रायगड परीवार
www.navnathaher.wordpress.com

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...